आंब्याचा केक

Submitted by मानुषी on 15 July, 2008 - 06:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप , १ वाटी दही, १वाटी दूध, १ वाटी आंब्याचा पल्प्(फ्रेश किंवा कॅनमधला). १चमचा बेकिंग पावडर.
काजू बदाम बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे थोडे किंवा ऑप्शनल.

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण ४/५ तास झाकून ठेवा. ४/५ तासांनी करायच्या वेळी त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुटस घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ४५ मिनिटे बेक करा. झाल्यावर सुरी किंवा विणकामाची सुई आत खुपसून पहा. जर स्वच्छ बाहेर आली तर समजा केक झाला.

वाढणी/प्रमाण: 
५/६जणांसाठी.
अधिक टिपा: 

१) याच केक मध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन्स करू शकता. वरील मिश्रणात आंबा कॅन्सल करून (म्हणजे जर आंबा अव्हेलेबल नसेल तर) वेलदोडा जायफळ पूड घालून सिंपल प्लेन केक करू शकता.
२) आंब्याऐवजी फणसाचा पल्प घालू शकता. फणसाचा हा केक कोकणातल्या सांदण या पदार्थाच्या जवळपास जातो.
३) आंब्याऐवजी अननसाचे तुकडे घालू शकता. पण अननस कच्चा वापरू नये. अननसाच्या बारीक फोडी थोडी साखर घालून मंद गॅसवर एक उकळी काढावी व नंतर या थोड्या शिजलेल्या फोडी व थोडा ३/४ चमचे पाकही तुम्ही घालू शकता. फक्त पाकाच्या प्रमाणात साखर थोडी कमी करावी. थोडा पाइनॅपल एसेन्सही घालावा. हा अननस केक सुद्धा अप्रतीम होतो.
४) मिश्रण झाकून ठेवण्याचा वेळ सीझन प्रमाणे बदलेल.
करून पहा व कळवा.

माहितीचा स्रोत: 
हा बेसिक केक माझी आई निखार्‍यावर करायची. व्हेरिएशन्स माझी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्याती, बेकींग पावडर कमी पडत असेल कदाचित. दीड चमचा नेहेमीच्या केकला घालावी.
शिवाय, केकचं मिश्रण ओव्हनमध्ये ठेवण्याआधी ओव्हन प्रीहीट करतेस ना? टॉप आणि बॉटम- दोन्ही प्रीहीट करायचे- ३०० डी वर ५ मिनिटे. असे केले की केक अगदी २५-३० मिनिटात व्यवस्थित खरपूस होतो.
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

थॅन्क्स पीएस्जी, बेकिन्ग पॅन च्या आकारावर काही असेल का?

कालच केला होता हा केक. पण काहितरी बिघडले. मी microwave preheat करुन घेतला होता, नंतर ३० मिनीटे conv. mode मधे ठेवला होता तरी पण मधे कच्चा राहिलाआणि सगळे तुकडे तुकडे पडले. एकसलग केकसारखा आकार काही झाला नाही. पण चव मात्र मस्त प्रसादाच्या शिर्‍यासारखी झाली होती. Happy

मानुषी, ही पाककृती प्लिज सार्वजनिक कर, तसेच शब्दखुणांमधे आंब्याचा केक, आंबा, बेकरी पदार्थ इत्यादी लिही, म्हणजे सर्चमधे ही पाककृती येईल. Happy

आता झाली सार्वजनिक Happy

जेव्हा मसुद्याखाली आडव्या चौकोनात 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' असा संदेश दिसतो तेव्हा तो बाफ सार्वजनिक नसतो Happy

काल हा केक केला. अजिबात आगाऊपणा करून मनचे बदल केले नाही. पाकृ तंतोतंत फॉलो केली. एक बदल चुकून झाला. आंब्याचा रस उत्साहाच्या भरात आधीच मिसळला. पण केक अप्रतिम झालाय.
मानुषीताई, खूप धन्यवाद!

गोडाचे पदार्थ फारसे जमत नाहीत, म्हणून कमी होतात. एखादा जमला की (पदार्थाच्या) जास्त लाडात यायला होतं. म्हणून ३ फोटो.

mango-cake-1-maayboli.jpgmango-cake-3-maayboli.jpgmango-cake-2-maayboli.jpg

दुसर्‍या आणि तिसर्‍या फोटोवरुन केक किती भारी झालाय ते कळतंय. रंगही कसला परफेक्ट आलाय केकला. तोंपासु फोटो !

आईशप्पथ..ये धागा मैने कैसे मिसा ?
भारी..तु आंबेवालीच आहे मानुषी..कसले एक एक प्रकार सांगतेस मस्त..
आता पाकृ वाचते..
मृण्मयी, खत्तम फोटो आहे..मला कसतरी होतय बघुनच..आता मि काय खाऊ Sad

अगो, टीना, पराग धन्यवाद!

वरून व्हॅनिला आणि मँगो आइसक्रीमचे स्कूप्स घालून गरम केक अफलातू लागतो हे सांगायचं राहिलं. बेलीज (आयरिश क्रीम) घालून्पण खाण्यात आला.

मृण्मयी
तुझ्या उत्साहाचं खूप कौतुक वाट्तं हं....नेहेमीच.
मस्त दिसतोय केक.>>>>>>>>>>>>>एखादा जमला की (पदार्थाच्या) जास्त लाडात यायला होतं. म्हणून ३ फोटो.>>>>>> असू दे असू दे Proud
>>>>>>>>>> वरून व्हॅनिला आणि मँगो आइसक्रीमचे स्कूप्स घालून गरम केक अफलातू लागतो >>>>>>>
आमच्याकडे ही वहेरिएशन्स कायच्याकायच केली जातात. गार व गरमची. पण केक मात्र नुसता खाल्ला तरी शक्यतो गरमच. ३० सेकन्द मावेत.
>>>>>>>>आंब्याचा रस उत्साहाच्या भरात आधीच मिसळला. >>>>>>> याने थंड हवेत फार फरक पडत नाही.
पण आमच्या नगरात एस्पेश्यली उन्हाळ्यात आधीपासून घालून ठेवलेल्या आंब्याच्या पल्पने मिश्रण आंबट होण्याची शक्यता.
हो गं टिने...........४ ते ५ तास भिजत घाला.
तुझं बरोबर आहे.......... ४/५ चा अर्थ चार पंचमांश तास असाही होऊ शकतो तो तसा इथे नाही.
सिंडीबाय.........१ टीस्पून ........आपल्या नगरी भाषेत.......पोहे खायचा एक चमचा.

मृ... मस्त दिसतोय केक!

मी मागच्या महिन्यात प्रयत्न केला होता .. तो फसला! Sad .. बहुतेक मावेचं सेटिंग जमलं नाही..

बहुतेक मावेचं सेटिंग जमलं नाही..>>>>> मावेमधे नीट होत नाही हा स्वानुभव .माय मिस्टेक म्हनून सोडून दिले.पण दुसरीने केलेला खाल्ला होता,तो आवडला नव्हता.त्याऐवजी ओव्हनमध्ये मस्त होतो,

काय योगायोग आहे... आमरसाची एक बाटली उघडली त्यातला थोडा शिल्लक राहिला म्हणून मी काल चिठोर्‍यावर या केकचं प्रमाण लिहून घेतलं होतं. केक शनिवारीच घडेल बहुतेक.

मृ, जबरदस्त फोटो आलेत केकचे.. आता मला मी कधी एकदा करतेय असं झालंय.

भारी दिसतोय केक.
मायक्रोवेव्हमध्येच करायचा असेल तर कप केक्स करायचे. रिक्षा फिरवत नाही. Wink

न राहवून काल रात्री रवा भिजवून ठेवला आणि आज सकाळी दात घासायच्या आधी त्यात आमरस आणि इनो मिक्स करून बेक करायला ठेवला Wink

mango cake.jpg

वा , मानुषी, मस्त. सर्वांचे केक ही मस्त झालेत.

मुलं लहान असताना मी असा केक खूप वेळा करत असे. बिना अंडयाचा. दुध , दही लोणी घातलेला सात्विक केक.

मुलाला एका वर्षी खुप बरं नव्हतं म्हणून त्याच्या वाढदिवसाला ही विकतचा कृत्रिम रंग आणि वास असलेला केक टाळुन असा केक केला होता.

केक करण्यासाठी मुद्दाम एक बजाजचा आवन घेतला होता जो अलीकडे देऊन टाकला मोडीत वापर होत नाही म्हणून.

नॉय मृ... 'ढापून चिकटवली' हे सिद्ध करणं सोपं जाऊ नये म्हणून तसे बरेच बदल केलेले दिसताहेत.
म्हणजे उदा. आंब्याच्या पल्पचा कंस काढून टाकलाय, इथे मिश्रण ओता म्हटलंय तर तिथे ओतावे असं लिहिलंय, इथे 'तुम्ही' असे स्वच्छ शब्दात लिहिलंय तर तिथे 'तूम्ही' असे अस्वच्छ गबाळं ओंगळवाणं लिहिलंय, तसंच 'पल्प'ला गर, व्हेरीएशन्ससाठी 'वेगवेगळे प्रकार' असं देवनागरीकरणही केलंय.

Pages