Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साखर वाटण्याजोगं काहीतरी कारण
साखर वाटण्याजोगं काहीतरी कारण काढ आता
ती साखर दुग्ध पदार्थात वापरू नकोस. गोड शिरा केलास तर दूध+पाण्याचा करू नकोस, नुसत्या पाण्याचा कर. किंवा ती साखर घालून लापशी रव्याची खांडवी कर. ज्या पदार्थात गूळ वापरतोस, आमटीत वगैरे, तशी वापरून संपवून टाक.
ती एक किलो साखर कशी संपवू?>>
ती एक किलो साखर कशी संपवू?>> केक, बेसनाचे रव्याचे लाडू बनवा. पाक होतोय का बघा त्या साखरेचा, मग सिजनल फळांचा जॅम वगैरे बनवता येइल. कैर्या मिळत असतील तर पन्ह्यात वापरा.
यो कु दुध सोडून तु इतर
यो कु दुध सोडून तु इतर कोणत्या पदार्थात साखर खात असलास तर त्यात वापर.
नाहीतर ती संपेपर्यंत शिरा वगैरे सारखे पदार्थ सतत कर. किंवा जिथून विकत घेतलीस त्यांना विचार असं होतं का ते? नाही म्हणाले तर बदलून आण.
मी आज सकाळी नेहेमीप्रमाणे
मी आज सकाळी नेहेमीप्रमाणे चहात घातली पण सगळा चहा नासला... मग कॉफी+साखर एकत्र करून वरून दूध घातलं तर तेही फाटल>>>> नक्की साखरेमुळेच फाटला का हे बघा. ब्राऊन शुगर/ अनप्रोसेस्डस्शुगर गेली अनेक वर्षे वापरते आहे पण असाअम्निभव कधीच आला नाहीये.
चहा कॉफीत वापारायची नसेल तर पोळीबरोबर भरपूर तुप घालुन खा!
संपेल हळुहळु.
वविला नेऊन नुस्ती वाटुन टाक
वविला नेऊन नुस्ती वाटुन टाक सगळ्यांना. ज्यांना जे समजायचं ते समजतील.
मंजू... योडे !
मंजू... योडे !
अशी साखर पदार्थात घालण्याऐवजी
अशी साखर पदार्थात घालण्याऐवजी वेगळी घेऊन त्या पदार्थात वरून घालून पाहा. उदा. चहा तयार करतानाच्या मिश्रणात साखर घालण्याऐवजी चहा कपामध्ये भरल्यावर वरून चमचाभर साखर घालून पाहा. तरीही जर चहा बिघडला तर मग त्या साखरेच्या वापरासाठी अन्य दुग्धविहीन पर्याय शोधावे लागतील.
half n half small carton
half n half small carton expire होणार आहे? काय करू?
कुल्फी करुन टाक.
कुल्फी करुन टाक.
बाप्रे..सोप्पी आहे का?मी अजून
बाप्रे..सोप्पी आहे का?मी अजून कधीच केली नाहीए.
हाफ अँड हाफ बारीक गॅसवर जाड
हाफ अँड हाफ बारीक गॅसवर जाड बुडाच्या पातेलीत उकळात ठेव. जरा आटायला लागलं की त्यात साखर, एवरेस्टचा दुधाचा मसाला/केशर्/ड्रायफ्रूट्स वगैरे घालून गॅस बंद कर. गार झाल्यावर मोल्ड्समध्ये घालून फ्रिजरला सेट कर.
परवा कांद्याची पिठ पेरुन भाजी
परवा कांद्याची पिठ पेरुन भाजी केली होती. बरीच उरली म्हणुन फुड स्टोअर करण्याच्या डब्यात काढुन फ्रीजमध्ये ठेवली होती. आज काढली तर त्यातील कांदे हिरवे दिसताहेत तसेच पाणी सुटले आहे! किंचित खाउन बघितली. चवीत फरक वाटत नाहीये. खावी की नाही?
भाजी लोखंडाच्या कढईत केली होती आणि झाल्याबरोबर स्टीलच्या पातेल्यात काढुन ठेवली होती.
माझी फेवरिट भाजी असल्याने आणि बरीच असल्याने टाकवत नाहीये अन्यथा मी फ्रीजमधील अन्न एका सांजेपेक्षा जुने असेल तर लगेच टाकुन देते.
नको. मोह नको त्या भाजीचा.
नको. मोह नको त्या भाजीचा. टाकून देणे.
ओके. जड अंतःकरणाने टाकून
ओके. जड अंतःकरणाने टाकून देते.
धन्स नी.
रसमलई करण्यासाठी हल्दीरामची
रसमलई करण्यासाठी हल्दीरामची सिरपमधली टिन्ड रसमलई आणली आहे.ती तशीच्या तशी सिरप मधून काढून आटवलेल्या दूधात घालायची का आयत्या वेळी? की काही सोपस्कार करावे लागतात त्या सिरप मधल्या रसमलई वर दूधात घालण्याआधी?
>>रसमलई करण्यासाठी हल्दीरामची
>>रसमलई करण्यासाठी हल्दीरामची सिरपमधली टिन्ड रसमलई आणली आहे.ती तशीच्या तशी सिरप मधून काढून आटवलेल्या दूधात घालायची का आयत्या वेळी
प्रज्ञा, रसगुल्ले म्हणायचंय का? माझी एक मैत्रीण हे रसगुल्ले, याच टिनमधला थोडासा पाक + पाणी एकत्र करून त्यात बुचकळते. त्यांना उकळी आणून जरावेळ ठेवते. मग ते दुधात घालते. बर्यापैकी मऊ लागतात.
प्रज्ञा, त्या पॅटीज टीनमधल्या
प्रज्ञा, त्या पॅटीज टीनमधल्या पाकातून काढून हाताने दाबून घ्यायच्या. अगदी कोरड्या ठक्कं नको करायला पण अधिकचा (थब थब) पाक काढून टाक. किंचित आटवलेल्या दुधात दूध कोमट असताना सोडायच्या. दूध खूप गरम असेल तर त्या विरघळतील. हे तुला नंतर फ़्रीजमधे ठेवून थंड करावं लागेल... रसमलई थंड बरी नं?
मी हे सर्विंग बाऑल मधे कोमट असतानाच काढून घेते. वर काय काय गार्निश (दुधाचा मसाला झक्कं) ते घालूनच फ़्रीजमधे ठेवते.
मृण्मयी, अगं हल्दीरामच्या रसमयीच्या पॅटीज मिळतात कॅनमधे. टीनमधला पाक आणि दूध एकत्रं करणं किंचित रिस्की आहे. दूध फाटण्याची शक्यता?
>>मृण्मयी, अगं हल्दीरामच्या
>>मृण्मयी, अगं हल्दीरामच्या रसमयीच्या पॅटीज मिळतात कॅनमधे. टीनमधला पाक आणि दूध एकत्रं करणं किंचित रिस्की आहे. दूध फाटण्याची शक्यता?
>>याच टिनमधला थोडासा पाक + पाणी एकत्र करून त्यात बुचकळते. त्यांना उकळी आणून जरावेळ ठेवते. मग ते दुधात घालते. बर्यापैकी मऊ लागतात.
दूध आणि पाक एकत्र करायचा नाही. पाक+पाणी उकळून, त्यात रसगुल्ले घालून ठेवायचे. (कसेकाय ते माहिती नाही, पण अगदी रसगुल्ल्यांसगट उकळवले तरी ते फुटले, विरघळले नाही.) नंतर त्यातलं पाणी काढून दुधात घालायचे.
धन्यवाद दोघींनाही. ह्या रसमलई
धन्यवाद दोघींनाही. ह्या रसमलई पॅटीजच आहेत मॄण्मयी. डायरेक्ट आटवलेल्या दुधात टाकून चालणार असेल तर तसंच करीन.
मॄण्मयी.. आहा. सॉरी नीट वाचलं
मॄण्मयी.. आहा. सॉरी नीट वाचलं नव्हतं मी.
मी एकदा रसगुल्लेही असेच किंचित दाबून घेऊन आटवलेल्या दुधात घातले होते.. कोमट दुधात छान मऊ पडतात.
पाच किलोच्या वर टॉमेटोचे काय
पाच किलोच्या वर टॉमेटोचे काय करता येइल? सगळे पिकलेले लालबुंद आहेत.
पेरू, टोमॅटो सॉस.
पेरू, टोमॅटो सॉस.
ते टोमॅटो चिरून उन्हात ठेवून
ते टोमॅटो चिरून उन्हात ठेवून मग त्यांचे लोणचे करता येते.
नाहीतर सॉस, केचप हे ऑप्शन्स आहेतच.
काहीच नाहीतर प्युरी करून फ्रीज करून ठेवता येईल.
पेरू, विपू बघा प्लीज.
पेरू, विपू बघा प्लीज.
ऊन.. कहा है ऊन सध्या?
ऊन.. कहा है ऊन सध्या?
टोमॅटो अमेरिकेत आहेत बहुतेक.
टोमॅटो अमेरिकेत आहेत बहुतेक.
नाही. ऑस्ट्रेलियात आहेत
नाही. ऑस्ट्रेलियात आहेत टोमॅटो सध्या. इथे वेट विंटर चालु आहे.
टोमॅटोची प्युरी करुन ठेवल्यावर किती दिवस टिकेल?
टोमॅटो सॉस घरी ऑलरेडी खुप आहे. तीन दिवस सूप करुन संपवले थोडेसे पण रोज रोज सूप करायचा कंटाळा येतो. (फक्त करायचाच
). जर एकदम टोमॅटो शिजवून प्युरी करुन ठेवले तर किती दिवस टिकेल म्हणजे रोज रोज थोडेसे सूप करता येइल.
पेरू अगं फ्रीझ (डीप फ्रीझ)
पेरू अगं फ्रीझ (डीप फ्रीझ) करून बर्यापैकी टिकेल. क्यूब्ज मधे घडवून फ्रीझ करायचे.
जसे वापरावेत तसे, मग.
पंजाबी शेजारी असतील तर
पंजाबी शेजारी असतील तर त्यांना विकत का नाही. त्यांच्याकडे रोज ग्रेव्ही लागते. संपतील पटकन.
किंवा
अमा, पूर्ण गल्लीत गोरेच आहेत.
अमा, पूर्ण गल्लीत गोरेच आहेत.
फ्रिझ करायचे ट्राय करते.
Pages