मध्यरात्रीला दारावरच्या
टकटकीने झोपमोड झाली....
उंबर्याबाहेरच्या थेंबाने,
चौकशी केली...
आत येण्याची परवानगी विचारत,
"मी सूख आहे" म्हणाला...!
त्यासरशी,
गालावरच्या सुकलेल्या आसवांना,
मी हसताना पाहिलं!!
'आता साधारण थेंबही, हिला आशा दाखवतात'
असं उपरोधी हसणं....
मलाही अंगवळणीच पडलेल्या
हा गोष्टी सार्या..
हा थेंब मात्र रेटून उभा,
'येऊ ना?' विचारत...
मी ही नेटानं तो क्षण सावरला...'नको, तू बाहेरच अस' सांगितलं त्याला ठणकावून..
"अगं, पण तुझ्या लाडक्या पावसानं पाठवलंय मला.. आणि मी एकटा नाहीये,
अख्खी बरसात आहे सोबत... "
कधीतरी भेटून गेलेल्या, त्या टिपूसावर अविश्वास तरी दाखवू कसा?
पण, हे सारे क्षणांचेच सोबती, नाही का?
पुन्हा गालांवरून वाहताना, हयाच टिपूसांचं रंग- रूप बदललेलं असणार..
कोरड्या मनानं मी दार लाऊन घेतलं...
आत शांत पडून राहिले...
हळूवार थेंब पडत राहिले,
थेंबांचा मग पाऊस झाला,
अवेळीच आलेला....
आणि माझ्या दाराबाहेरच राहिलेला....
बाहेर सूख कोसळत होतं!
छतावरून पानांवर-
पानांवरून डबक्यात,
एका घनगर्भ लयीत..
आणि मी,
मी मात्र-
कोरडे डोळे मिटण्याच्या प्रयत्नात.......
वा खूप सुंदर, खूप अलवार ....
वा खूप सुंदर, खूप अलवार ....
धन्यवाद शशांक, हे स्फूट काही
धन्यवाद शशांक, हे स्फूट काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात सादर केलं होतं, सादरीकरणाने जास्त रंगत येते, असं नक्की वाटलं
हे स्फूट काही दिवसांपूर्वी
हे स्फूट काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात सादर केलं होतं, >>> याची ऑडिओ किंवा व्हिडिओ लिंक शक्य असल्यास येथे जरुर देणे ...
धन्स...
हे स्फूट काही दिवसांपूर्वी
हे स्फूट काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात सादर केलं होतं, सादरीकरणाने जास्त रंगत येते, असं नक्की वाटलं
हो हो ...मला आठवतय !!!!
छान रचना आहे.
छान रचना आहे.
हो हो ...मला आठवतय !!!! >>
हो हो ...मला आठवतय !!!!

>>
बागेश्रीदेवीजी कविता वाचता
बागेश्रीदेवीजी
)
कविता वाचता वाचताच लॅपटॉप ओलाचिंब झाला. यूएसबी पोर्टमधून थेंब बाहेर येऊ लागले.
(वाचक काय करणार बिच्चारे ! ते तर माणूस असतात
खूप सुंदर
खूप सुंदर
खुप छान, सादरीकरणाने जास्त
खुप छान, सादरीकरणाने जास्त रंगत येते, असं नक्की वाटलं >>>>>> +++१
छान ग !
छान ग !
(No subject)
सुंदर लिहलयसं गं बागे
सुंदर लिहलयसं गं बागे
खूप सुंदर
खूप सुंदर
छान
छान
छानै!! आगोदरही वाचल्याचे
छानै!!
आगोदरही वाचल्याचे स्मरते आहे.
पु.ले.शु!
धन्यवाद, दोस्तहो! येस्स
धन्यवाद, दोस्तहो!
येस्स शाम,
तुझ्यासोबत एफ्.बी चॅट वर शेअर केलं होतं मी हे
आवडलं.
आवडलं.
सह्हीए
सह्हीए
ए मस्तंच गं बागेश्री!! आवडलं!
ए मस्तंच गं बागेश्री!!
आवडलं!
सुंदर.
सुंदर.
कस्ली भन्नाट कल्पना आहे...
कस्ली भन्नाट कल्पना आहे... आवडलच, बागेश्री.
धन्यवाद सूकि, अमित, अंजू,
धन्यवाद सूकि, अमित, अंजू, सुसुकु व दाद
आवडल.
आवडल.
छान!=
छान!=