Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा.
.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधल्या
मधल्या फोटोतले गृहस्थ हा फोटो काढला तेव्हा चान्दणी चौकात उभे होते, त्याआधी ते पहिल्या फोटोत जो डोंगर दिसतो तो ज्या चौकातून दिसायचा तिथे रहायचे. नंतर ते चीनमध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी एक पुस्तक लिहिले त्याचे नाव 'चान्दणी चौक टू चायना', तिसरा फोटो हे त्या पुस्तकाचे कव्हर आहे. त्यावर मधल्या फोटोतल्या गृहस्थांचाच फोटो आहे, टोपी आणि वेष यामुळे वेगळे दिसतात. (अधिक माहिती- या पुस्तकावर आता सिनेमाही निघाला आहे.)
मला मधला
मला मधला फोटो झक्कींसारखा वाटतोय ..
क्लिओ,
क्लिओ, झालं? :d
ती चीनची भिंत नाही आणि त्या माणसाचं नावही चिन्मय नाही.
सशल, ते झक्कीही नाहीत. :p त्या माणसाचं नाव सांगितले तर ओळखता येईल. पण त्याआधी पहिल्या आणि तिसर्या चित्रातला संबंध तरी ओळखणे एवढे कठीण नाही.
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
पहिला फोटो
पहिला फोटो मला मनमाड स्टेशन सोडल्या सोडल्या दिसणार्या डोंगरासारखा दिसतोय. त्याला आम्ही थम्स अप डोंगर म्हणायचो. अक्षय कुमार थम्स अपची जाहिरात करतो. अक्षय कुमार 'चांदणी चौक टू चायना' ह्या चित्रपटात देखील होता.
मधल्या गृहस्थांबद्दल माहिती नाही. पण ओल्ड मंक ह्या डार्क रम बरोबर थम्स-अपच चांगले लागते आणि कोक-पेप्सी वगैरे फारच भिकार लागते ही माहिती मला आहे. त्याचा काही उपयोग होउ शकतो का इथे?
टण्या
टण्या बरोबर.
त्या माणसाचे नाव रमेश चौधरी - पार्ले बंधूंपैकी एक. ज्यांनी थम्सअप या पेयाला आपले फ्लॅगशीप ड्रींक (याला मराठीत काय म्हणता येईल?) म्हणून घोषित केले.
'थम्सअप' हा या तीन चित्रातला समान धागा.
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
मुंबई पुणे
मुंबई पुणे मार्गात ते Duke's Nose नामक काहितरी दिसतं तेही असंच दिसतं का? ह्या Thumbs-up सारखं?
बापरे,
बापरे, टण्या..
तीर डायरेक्ट निशानेपे!
एवढं नसतं बुवा आलं आपल्याला!
जीडी, पुढची चित्रमालिका येऊद्या!
हे घ्या
हे घ्या पुढचं -
गजानन काही
गजानन काही क्लू लागत नाही. बाकी कोणी हे बघितले का? एखादेवेळेस पान एकदम मागे गेल्यामुळे कोणाला दिसले नसेल.
जीडी
जीडी आयडीया सही है! टण्या ग्रेट!
_______________________________
"शापादपि शरादपि"
अमोल,
अमोल, शुक्रवारी टाकलेले म्हणजे बरेच मागे गेले असणार.
बाकी कोणी बघितले का हे? उत्तर सांगू का?
जीडी,
जीडी, पहिले फारच मस्त होते. टण्या एकदम भारी उत्तर..
दुसरे काहीच क्लू लागत नाहीये..
जीडी जरा क्लू देणार का?
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
क्लू :
क्लू : मारुती
मिंटो
मिंटो फ्रेशचा जपानशी काही संबंध आहे का?
नाही.
नाही.
टाटा आणी
टाटा आणी मारुती हे जॉईंट व्हेंचर ने मिंट ओ फ्रेश च प्रॉड्क्शन करणार का?

मारूती
मारूती (सुझुकी) वरून टाटा, टेल्को, अगदी डेमलर बेंझ पर्यंत जाउन आलो, पण अजून काही लिन्क लागत नाही. त्यात मिंटो फ्रेश बद्दल माहिती नाही फारशी.
कदाचित
कदाचित मिंट फ्रेश च्या जाहिरातीमध्ये टाटा आणि मारुती ह्या गाड्या दाखवल्या असतील.
नाहीतर मिंट ओ फ्रेश डान्स का चान्स मधे मारुती मिळणार असेल, पुर्वी टाटा मिळत असावी.
मिंटो
मिंटो फ्रेशच्या कँपेनमधल्या राखी सावंतचा काही संबंध नाही ना?
टाटा सुमो -
टाटा सुमो - पहिलवान
सुझुकीची मारुती - पहिलवान
मिन्टो फ्रेश - पहिलवानाशी काय सम्बंध आहे बर.!, काही तरी असला पाहीजे.
आमच्या पहिलवानी डोक्यात नाही शिरत.:) (जरा मिन्ती घ्यायला पाहीजे. दिमागकी बत्ती जलवायला)
उत्तर -
उत्तर - पहिले चित्र टाटा मोटर्स, दुसरे चित्र सुझुकी. टाटाने इन्डिका बनवली तेव्हा त्या प्रकल्पाचे नाव 'मिन्ट' ठेवले. 'मारुती इन ट्रबल'!
बापरे! हे
बापरे! हे लक्षातच आलं नसतं. धन्यवाद जीडी
आता पुढची चित्रं..
सहीच
सहीच गजानन..
अजून येऊं दे!
सहीच जीडी
सहीच जीडी
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
गजा हे
गजा हे अंमळ अवघडच होते हं.
सही आहे.
अरे, सही
अरे, सही आहे!! लक्षात् आलंच नव्हतं.
--------------
नंदिनी
--------------
सही आहे
सही आहे गजानन. मी इंडिका च्या वेळेस त्या प्रोजेक्ट च्या SAP implementation साठी काम करत होतो, पण ते कोडनेम लक्षात नाही. आता उगाचच अंधुक आठवल्यासारखे वाटते
सही ...अवघडच
सही ...अवघडच होते हे ओळखणे.
ह्या प्रोजेक्ट्चे नाव माहीत नव्हते म्हणुन उगाच 'मिंट ओ फ्रेश' ह्या ब्रँडशी बादरायण संबंध लावत होतो.
या ३
या ३ चित्रांमधला संबंध ओळखा.. अगदी सोपे आहे.
देख के लख
देख के लख लख परदेसी गर्ल, एव्हरीबडी लाईक माय देसी गर्ल.
Pages