सध्या नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीच्या कृपेने एका एच आय व्ही / एड्स क्लिनिकमध्ये काम करत आहे. देशभरातील डॉक्टरांसाठी नॅकोने एक ट्रेनिंग सेशन घेतले होते. तेही चक्क अहमदाबादमध्ये.
अहमदाबादला जायचं म्हटल्यावरच मनात अगदी 'मोद' (!) दाटून आला.
डोंबिवलीहून गाडी रात्री सुटली. खाजगी बसनेच गेलो. दोन वर्षापूर्वी पाय मोडल्याने रेल्वेची धावपळ तशी जमत नाही. पण बस / विमान वगैरे चालते. ( धनगरी उपायाने तेवढी ताकत टिकून आहे. )
बसमधून सकाळी सहा ते अहमदाबादला पोचेस्तोवर म्हणजे तीन एक तास गुजरात पाहिला. आणि मन अगदी थक्क झालं. अगदी हिरवंगार, स्वच्छ आणि सुंदर. कितीतरी ठिकाणी चक्क मोर नाचत होते. तेही अगदी रस्त्याच्या कडेला. गावे / शहरेही अगदी स्वच्छ. जणू काही कुणी तिथे रहातच नाही की काय अशी अवस्था. कुठलाही दुर्गंध नाही.
अगदी अहमदाबाद आले तरी स्थिती तीच. अहमदाबाद मुंबईच्या तुलनेने अगदी स्वच्छ वाटले.
हे काही फोटो.....
वेळात वेळ काढून गांधी आश्रम पाहिला. साबरमतीच्या शेजारी जागा अगदी सुंदर आहे. गांधीजींच्या घरासमोरुन वाहणारी नदी.
प्रवेशद्वाराजवळील फोटो
बापूजींचे हस्ताक्षर..
आर के लक्ष्मणांची व्यंगचित्रे
बापूजी आणि कस्तुरबा..
ओळखा पाहू??? काय म्हणत असेल ती? जागो मोहन प्यारे !!
पाकिटावर नुस्तं नाव लिहिलं तरी त्याना पत्रे मिळत असत.
घराची प्रतिकृती ... अगदी साधे कौलारु घर आहे. घर ९६ वर्षे जुने आहे. तिथे बसले तरी अपार शांतता मिळत होती. आपलेही घर असेच हवे.
आमच्या हॉटेलच्या जवळ नदीत बोटिंगची सोय होती. तिथेच शेजारी असलेला उद्घाटनाचा बोर्ड .... समस्त मायबोलीकर खुश !!!!!!!!
आमच्या हॉटेलच्या समोर हे एक हॉटेल होते. हॉटेल पतंग . त्याचे ते वरचे गोल डोके गोल फिरते म्हणे. माझी रुम त्याच्या अगदी समोरच होती. पण मला काही ते फिरताना दिसले नाही.
ज्या बी जे मेडिकलने आमचे ट्रेनिंग घेतले, त्याचे प्रवेशद्वार..
सही! 'महात्मा गांधी, जहां हो
सही! 'महात्मा गांधी, जहां हो वहां' हे जबरी आहे. त्या फोटो मधे इंदिरा गांधी आहेत ना?
बाकी फोटोंबद्दलही माहिती द्या जमल्यास.
होय. इंदिरा गांधी.
होय. इंदिरा गांधी.
ट्रीप छान झाली. बाकी
ट्रीप छान झाली.
बाकी फोटोंबद्दलही माहिती द्या जमल्यास >> +१००
साबरमतीच्या शेजारी जागा अगदी सुंदर आहे
>>
नदीचे पाणी कसे आहे? प्रदुषित नाही ना? मागे राज ठाकरे म्हणाले होते की नाशिकात गोदावरी एकदम साबरमती सारखी करुन दाखवणार म्हणून.
हॉटेल पतंग . त्याचे ते वरचे गोल डोके गोल फिरते म्हणे.
>>
बहुतेक ते आतल्या बाजूने असावे. सेंटॉर हॉटेल पण असेच होते. अजुन असावे बहुतेक.
लेख, आणि त्यातील विनोदी अंग
लेख, आणि त्यातील विनोदी अंग आवडले.
<< समस्त मायबोलीकर खुश !!!!!!!! >> समस्त मधे आपणही आलात का?:-)
पाकिटावर नुस्तं नाव लिहिलं
पाकिटावर नुस्तं नाव लिहिलं तरी त्याना पत्रे मिळत असत.
>>
राहुल गांधींसाठीपण अशी काही सुविधा पोस्टाने द्यायला हवी.
अनेकदा गरजेच्या वेळी ते गायब असतात.
>> मन अगदी थक्क झालं. अगदी
>> मन अगदी थक्क झालं. अगदी हिरवंगार, स्वच्छ आणि सुंदर. कितीतरी ठिकाणी चक्क मोर नाचत होते. तेही अगदी रस्त्याच्या कडेला. गावे / शहरेही अगदी स्वच्छ. जणू काही कुणी तिथे रहातच नाही की काय अशी अवस्था. कुठलाही दुर्गंध नाही.. >>
छान वाटले अन वाईटही. अशी स्वच्छता , सुंदरता महाराष्ट्रात का नाही म्हणून.
अहमदाबादला जावून ६-७ वर्ष
अहमदाबादला जावून ६-७ वर्ष झाली. आता खूप बदल झाले असतिल. पण मी असताना साबरमतीचं पाणी प्रदुषित होतं. त्यावेळी साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू होता. माझे काही मित्र त्या प्रोजेक्टवर काम करत होते. साबरमती आश्रमात तर खूपदा जाणं व्हायचं. साबरमती आश्रम, त्याच्या आजुबाजुचा परिसर आणि त्याच्या समोर असलेला झोपडपट्टीचा भाग यावर दोन प्रोजेक्ट केले होते कॉलेजच्या कामाचा भाग म्हणून. तिथल्या या पूर्ण भागाची गांधींची फिलॉसॉफी वापरुन रोडेव्हलपमेंट आणि त्या भागाच्या ट्रॅफिक डेव्हलपमेंट बद्दल असे दोन प्रोजेक्ट होते. खूप फिरलेय त्या भागात.
सॉरी तुमच्या धाग्यावर मी दुसरंच पुराण सुरु केलं. पण अचानक साबरमती आश्रमाचे फोटो बघून कॉलेजातल्या आठवणी आल्या.
पुण्याच्या आगाखान पॅलेसमधेही
पुण्याच्या आगाखान पॅलेसमधेही अशा बर्याच गोष्टी आहेत.
कितीतरी ठिकाणी चक्क मोर नाचत
कितीतरी ठिकाणी चक्क मोर नाचत होते. >>>>
आयपीआर Institute for Plasma Research (गांधीनगरला) अॅटोवाले हळूहळू चालवतात, कारण मोर मध्येच रस्त्यावर येतो
ફોટા ગમ્યા નિલેશ .શારુ છે
ફોટા ગમ્યા નિલેશ .શારુ છે .ગાંધિના ગામમા મોર તો થાયછ ના .फोटो छान ,गांधिंच्या गावात मोर तर असणारच . जाति धर्मावरून गुजरातमध्ये फार दंगे झाले आहेत .सध्या वरवर शांत आणि आमोद आहे .
स्वच्छता व साधेपणा हा
स्वच्छता व साधेपणा हा गांधींच्या विचारसरणीचा स्थायीभावच होता याचा प्रत्यय साबरमती, वर्धा व मूळ [चंद्रपूर जिल्हा ] येथील आश्रम पाहिल्यावर येते.
धनगरी उपाय वै वाचुन
धनगरी उपाय वै वाचुन जामोप्याची आठवण आली.
आणि तरिही अहमदाबादची स्तुती वाचुन जरासा कन्फ्युजलोय.
फोटो छान..
साबरमतीला गेलं पाहिजे..
बापुजींच हस्ताक्षर बघुन फार बरं वाटलं.
शाळेत असताना माहिती असतं तर फ्लेक्स बनवुन आमच्या वर्गात लावलं असतं.
मास्तर अक्षरावरुन मारायला आले की त्याना तो फ्लेक्सच दाखवला असता...
पडणारे फटके तरी वाचले असते...
छान माहिती , फोटो थोडे मोठे
छान माहिती , फोटो थोडे मोठे आणि स्पष्ट हवे होते.
गुजराती फॉण्ट मधे लिहिलेले
गुजराती फॉण्ट मधे लिहिलेले साबरमती फोन वरुण दिसत नाही.
हो मोर खूप आहेत या भागात.
हो मोर खूप आहेत या भागात. आमच्या हॉस्टेलच्या मागच्या पुढच्या अंगणात पण बरेच मोर होते.
बी जे मेडिकल कॉलेज हे
बी जे मेडिकल कॉलेज हे आशियातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल आहे. तरीही ते स्वच्छ आहे. अगदी क्लीन. स्टाफ आणि डॉक्टर्स अगदी डेडिकेटेड आहेत. ( तिथले पगार महाराष्ट्राच्या तुलनेने थोडे कमी आहेत म्हणे. ) सोयी सुविधा, पेशंटशी वागणूक, औषधांची उपलब्धतता... सर्व वाखाणण्याजोगे आहे.
साबरमती आश्रम वगैरे जाऊ
साबरमती आश्रम वगैरे जाऊ द्या.
मोदींच्या राज्यात काय चांगले चांगले बघितले ते लिहा.
प्रसाद १९७१ ला
प्रसाद १९७१ ला अनुमोदन.
गुजरात बद्दल जाणुन घ्यायची ईच्छा आहे.