Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजूक तूूपातले उच्च प्रतीचे
साजूक तूूपातले उच्च प्रतीचे मोतीचूर लाडू खूप उरले आहेत. सध्या फ्रीजमध्ये ठेवलेत. खराब व्हायच्या आत त्यांचॆ काय करता येईल?
ते मोतिचुर लाडु कुस्करा आणि
ते मोतिचुर लाडु कुस्करा आणि त्यात शेव मिक्स करुन शेव बुंदी करा...
थोडं गोड थोडं खमंग लागेल....
sakaLee don aaNi sandhyakaLee
sakaLee don aaNi sandhyakaLee don khavet. aatich urale asateel tar freezer madhye thevun dene. khaNyapurvee microwave madhye defrost karun kinchit garam karun khavet!
paN uralech kase yevhadhe?!?
मला वाट्ते दान केले तर कसे
मला वाट्ते दान केले तर कसे होईल? इतके हाय कॅलरी पदार्थ आपण बैठे काम करणार्यांसाठी हानिकारक आहेत. व कष्टाचे काम करणारांना त्याची गरज आहे पण मिळत नाही.
नपेक्षा, त्याची दूध घालून उकळवून खीर करूनही खाता येइल.
फ्रीज मध्ये कोथिंबीर, मिरची,
फ्रीज मध्ये कोथिंबीर, मिरची, ओले खोबरे कसे स्टोर करावे?
मिरचीचे देठ काढून टाका आणि मग
मिरचीचे देठ काढून टाका आणि मग घट्ट झाकणाच्या डब्यात घालून ठेवा. काढ्तेवेळी त्याला पाण्याचा वगैरे हात लावू नका.
ओले खोबरे खरवडून फ्रीजरमध्ये
ओले खोबरे खरवडून फ्रीजरमध्ये क्यूब्ज करून स्टोअर करावे. लागणार असेल तसा एकेक क्यूब वापरावा.
कोथिंबीर निवडून हवाबंद डब्यात ठेवावी.
दान करणे चालू आहेच. खीर
दान करणे चालू आहेच. खीर चांगला पर्याय वाटतोय.
कोथिंबीर स्टीलच्या डब्यात खाली कागद घालून ठेवल्यास उत्तम राहते फ्रीजमध्ये.
आशू... सगळ्यात सोप्पा उपाय..
आशू... सगळ्यात सोप्पा उपाय.. मायबोलीकरांना जेवायला घरी बोलवणे..
अर्र हिम्या. उरलेल्या
अर्र हिम्या. उरलेल्या लाडवांसाठी ' युक्ती' विचारली रे..हे तर शक्तीचं काम झालं.
आशू, असे नाहीतर तसे खाऊनच
आशू, असे नाहीतर तसे खाऊनच संपवावे लागणार आहेत ना ते मोतीचुराचे लाडू? मग त्याचं अजून काही करण्यात वेळ, शक्ती वाया नको घालवूस. फ्रिजात ठेवलेला लाडू रोज एकेक करून संपवून टाका, खायच्या आधी मावेमधे दहा सेकंद हाय पॉवरला ठेवा. अगदी ताजा ताजा लाडू वळल्यासारखा चव लागते.
धन्यवाद 'मन'जुडी.
धन्यवाद 'मन'जुडी.
आशुडे माझ्या नावची चित्रावळ
आशुडे माझ्या नावची चित्रावळ काढून ठेव नक्की आज, नाहीतर पोटदुखीचं औषध तरी घे.
त्यापेक्शा तू लाडू घेऊन जा
त्यापेक्शा तू लाडू घेऊन जा की.
आशू, तू टीशर्ट वर्गणी गटगला
आशू, तू टीशर्ट वर्गणी गटगला घेऊन जायला हवे होतेस लाडू
फन्ना उडाला असता.
आशू तु आली होतीस काल? किती
आशू तु आली होतीस काल? किती वाजता?
मी ६.३० ला निघाले.
अगं नाही ना जाता आलं मला.
अगं नाही ना जाता आलं मला. कर्माची फळं कितीही गोड असली तरी 'भोगावी' लागतातच , ती अशी.
आगर आगर किन्वा चयना ग्रास
आगर आगर किन्वा चयना ग्रास पुण्यात कुठे मिळेल?
अंगूरी रसमलई मिळते त्याच
अंगूरी रसमलई मिळते त्याच साईझचे साधारण, गुलाबजाम मिळतात छोटे. ते आणी मोतीचूर एकत्र करून स्वीटडीश म्हणून सर्व केले होते एका लग्नात. चांगलं लागलं होतं काँबो.
सावली, कबुतरांचा त्रास आहे
सावली,
कबुतरांचा त्रास आहे का गेला ?
गेला नसेल आणि सर्व उपाय हरले तर हे करुन बघा,
सर्व साधारण पणे ज्या ठिकाणी कबुतरे बसतात त्या ठिकाणी पेट्रोलियम जेलीचा थर द्या,
पे. जेली पायाला लागल्याने कबुतरे इरीटेट होतात मग परत येत नाहीत.
पिजन जेली नावाने पे. जे.च काही कंपन्या भारतात विकतात आणि कंपन्या ज्यांना कबुतराचा त्रास आहे त्या विकत ही घेतात.
कबुतरांचा त्रास गेला नाहीये
कबुतरांचा त्रास गेला नाहीये अजुन. खिडक्यांना जाळ्या लावायच्या असे ठरवलेय पण तरी बाल्कनीमधे जाळ्या लावायच्या नाहीयेत. खरंतर त्रास अजुन वाढलाच आहे. कबुतरे सारखी रोपे उपटून टाकतात, मोडतात, पानं तोडतात इ. हा जेली उपाय नक्की करुन बघते. उपयोग झाला तर नक्कीच सांगते इथे. मनःपूर्वक धन्यवाद
अरे कबुतरांच्या त्रासाचा
अरे कबुतरांच्या त्रासाचा वेगळा बीबी काढा. चुकून कबुतरांची औषधं इथे कुणीतरी स्वैपाकात वापरली तर घोळ व्हायचा.
आगर आगर किन्वा चयना ग्रास पुण्यात कुठे मिळेल? <<
दोराबजीमधे नक्की मिळते असे कळले आहे.
मी नेहमी वापरलेली युक्ती.
मी नेहमी वापरलेली युक्ती. कदाचित सगळेच वापरत अस्तिल म्हणून इथे बोलले नव्हते.
कोणतही पीठ मळायचं/कालवायचं झाल्यास आधी भांड्याला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. उदा. रोजची पोळ्यांची कणिक, कोथंबीर्/पालक वड्यांचं पीठ, खेकडा भजी (हे घट्टसर अस्तं).. इ. इ.
म्हणजे करवंडणं कमी होतं... पीठ सुकं होऊन इथे-तिथे चिकटणं इ.
मग? हात, भांडं स्वच्छं करणं सोप्पं होतं.
काम झाल्यावर भांड्यात पाणी
काम झाल्यावर भांड्यात पाणी भरून ठेवले थोडावेळ तरी करवडलेलं सगळं निघतं.
दुधाचं पातेलं रिकामं झालं की साय काढून झाल्यावर त्यातच कणीक भिजवायची. बरचसं करवडणं निघतं. मुळात पाण्याचं प्रमाण बरोबर असेल तर कणीक भिजवलेल्या भांड्याला काहीही उरत नाही थोड्याश्या ओशटपणाशिवाय.
खूप जास्त करवडलेलं असेल तर भांड्यात पाणी घेऊन ते भांडं उकळून काढायचे. यानंतर करवडलेलं रहायची काहीही शक्यता नाही. राह्यले तर भांडे फेकून द्या कारण त्यापुढे काही करणे शक्य नसते
दाद, अतिशय उपयुक्त टीप. कणीक
दाद, अतिशय उपयुक्त टीप. कणीक फुप्रो मधे भिजवताना सुद्धा मी तेलाचा हात लावून घेते. आणि कणिक मळून झाल्या झाल्या त्यात भांड्यात जी भाजी करायची असेल ती भाजी, किंवा मग कांदा चिरून घेते. मग फुप्रो स्वच्छ करायचे काम विनासायास होते.
जाडे क्विल्ट किंवा पांघ रुणे
जाडे क्विल्ट किंवा पांघ रुणे इत्यादी वॉशिंग मशीन मध्ये टाकली व वरून साबण पाव्डर टाकली की ती कधी कधी तशीच गठ्ठा बनून राहते, नग धुवुन आला तरी असे न व्हावे म्हणोन अगदी अर्धी वाटी पाण्यात डिटर्जंट पावडर मिसळून ती सर्वत्र टाकावी. व मशीन चालू करावे. किंवा अर्थात लिक्विड डिटर्जंट टाकावे.
धन्यवाद नीधप!
धन्यवाद नीधप!
माझ्याकडे वुडन फर्निचर आहे.
माझ्याकडे वुडन फर्निचर आहे. त्याला मध्येच शोसाठी म्हणुन लेदरचे चौकोनी तुकडे लावलेले आहेत आणि त्यावर पांढरे स्टिचेस आहेत. पावसात त्या लेदरवर बुरशी लागलीय. काय करता येईल?? सुक्या फडक्याने निघत नाही आणि ओल्या फडक्याने पुसलं तरी पुन्हा येतेच.
फिनाईल/ रॉकेल नी साफ कर
फिनाईल/ रॉकेल नी साफ कर
आता मला सांगा... मी यावेळेस
आता मला सांगा...
मी यावेळेस पतंजली ची मधुरम साखर आणलिये, ब्राऊन शुगर सारखी आहे. पाकीटावर लिहिल्याप्रमाणे- ती उसाची पहीली साखर आहे आणि अन्प्रोसेस्ड आहे सम्वॉट गुळाची चव लागतेय. नुसती खायला खरच अप्रतीम खमंग गोड चव. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही साखर जिथे जिथे आपण साधी साखर वापरतो तिथे वापरता येते.
मी आज सकाळी नेहेमीप्रमाणे चहात घातली पण सगळा चहा नासला... मग कॉफी+साखर एकत्र करून वरून दूध घातलं तर तेही फाटल
आता ती एक किलो साखर कशी संपवू? टाकून देण समहाऊ पटतच नाहिये...
Pages