शब्दबेवडा
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!
ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!!
अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो
तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली
तरी निसर्गा! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो?
विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो
देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी
दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
विज्ञानाने हात टेकले अन्
विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो
हा शेर वाचून दि बायसिकल थिफ ची आठवण झाली.
मत्ला बेहद आवडला.
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो << व्वा ! >>
खूप सुंदर गझल सर...
क्या बात है
क्या बात है मुटेजी.....
मतला,रमून्,विज्ञानाचा शेर्,मक्ता..... मस्स्स्स्स्तच जमले आहेत.
मतला जबरदस्त आहे, फार
मतला जबरदस्त आहे, फार आवडला.
'शब्दबेवडा' ह्या शब्दावर आक्षेप नोंदवतो. तुमचा तो योजण्यामधे काहीतरी क्रांतीकारी विचार असणार हे माहीत आहे.
धन्यवाद!
झकास !
झकास !
श्री. गंगाधर मुटे हे मला आता
श्री. गंगाधर मुटे हे मला आता मराठी गझल क्षेत्रातील नक्षलवादी वाटू लागले आहेत.
मस्त गझल !
मस्त गझल !
सुंदर!
सुंदर!
नक्षलवादी
नक्षलवादी
नक्षलवादी मुटेजी, मतला मलाही
नक्षलवादी
मुटेजी, मतला मलाही फार आवडला!!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
पुलस्तीजी, माझ्या गझलेवर तुमचा हा पहिला प्रतिसाद, विशेष आनंद झाला म्हणून विशेष आभार.
-------------------------------------------------------------------------
<<<< शब्दबेवडा' ह्या शब्दावर आक्षेप नोंदवतो.>>>
<<<< श्री. गंगाधर मुटे हे मला आता मराठी गझल क्षेत्रातील नक्षलवादी वाटू लागले आहेत. >>>>
यावर यथावकाश आपण मनमोकळी चर्चा करू. मला खात्री आहे कि त्यातून संभ्रम दूर होतील.
तूर्त (नाईलाजाने) एवढेच सांगतो की,
या गझलेतील ओळ न ओळ, शब्द न शब्द, अक्षर न अक्षर
ही माझी स्वतःची "आपबिती" आहे. भूतकाळात जे जगलो ते शब्दातुन प्रकट झाले आहे.
हा कल्पनाविलास नसून वस्तुनिष्ट वास्तव आहे.
(कधीकाळी आत्मवृत्त लिहिले तर ते कथानक म्हणून विस्तारपूर्वक प्रकट होईल. पण हे काव्य आहे. काव्यात सुतावरून स्वर्ग गाठायचा असतो. वरील सर्व शेरांतून अर्थ शोधायचे असतील तर वाचकाला नक्कीच माथापच्ची करावी लागेल. शंभर ओळीचा आशय दोन ओळीत गुंफण्यासाठी मला जेवढे कष्ट घ्यावे लागले किमान तेवढे तरी कष्ट वाचकाला घ्यावेच लागतील, तरच दोन ओळीतून शंभर ओळींना पुरून उरेल एवढा अर्थ बाहेर पडेल.)
अनुभूतीचा सुसाट वारू
अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो
या शेरात सानी मिसरा लयीत नसल्याचे जाणवत आहे मुटेजी.....
भिडणे सोडुन परिस्थितीशी, ''शब्दबेवडा'' बनून गेलो.......... असे केल्यास जमावे.
कृ गै न.
मस्त झाकपाक गझल ज्जाम भारीये
मस्त झाकपाक गझल ज्जाम भारीये गझल मस्त मूड फ्रेश अगदी
मजा आली
व्यवस्थेशी<<<< लयीत ठेचकळलो ......
नक्षलवादी
खास मुटेशैली व आम देवपूरकर शैलीचा समन्वय !!! तुमच्या प्रथम प्रतिसादावरून तर जास्तच जाणवतो आहे समन्वय
चांगली गझल! व्यवस्थेशी
चांगली गझल!
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो
व्यवस्थेशी.. इथल्या आवर्तनात एक मात्रा कमी पडतेय जी 'सोडून' या आवर्तनात मोजलीये असे दिसते
मात्र त्यामुळे लय गडबडली आहे.
लोच्या "व्यवस्थेशी" तील "शी"
लोच्या "व्यवस्थेशी" तील "शी" मध्ये जाणवला
)
व्यवस्थेसवे सोडुन भिडणे ....... असे करता येईल बघा मुटे सर ('सवे' मुळे खास देवपूरकर टचही खुलून येईल
आशय फारफार आवडला.
आशय फारफार आवडला.
सर्वांगसुंदर............. !!!
सर्वांगसुंदर............. !!!
>> ऐश्वर्याला दिपून इथल्या
>> ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!!
आवडला.
"ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता
"ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!!" >>> हा सर्वात विशेष वाटला.
<<< भिडणे सोडुन परिस्थितीशी
<<< भिडणे सोडुन परिस्थितीशी >>>
<<<< मात्र त्यामुळे लय गडबडली आहे.>>>>
हे खरे, पण व्यवस्था/System या शब्दाला पर्याय पण नाहीये. आणि व्यवस्था हा शब्द काढल्यास तो शेरच धाराशायी कोसळेल.
आणि "शब्दबेवडा" या शब्दाचे औचित्यही संपुष्टात येईल.
एकंदर आवडलीच गझल मुटेसर!
एकंदर आवडलीच गझल मुटेसर!
विज्ञानाचा शेर आणि मतला विशेष आवडले
छान आहे. अर्थही खूप छान.
छान आहे. अर्थही खूप छान.
क्या बात है!! मस्त गझल. खूप
क्या बात है!! मस्त गझल. खूप आवडली