गृहिणींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काय काय करता येईल?

Submitted by पियू on 14 June, 2013 - 03:12

नमस्कार.

मला फक्त गृहिणींसाठी एक पाच दिवसांचा व्यक्तीमत्व विकासाचा कोर्स घ्यायचा आहे.
या गृहिणी कोणताही व्यवसाय किंवा अर्थार्जन करत नाहीत.

मला या पाच दिवसांच्या (रोज दिड तास) प्रोग्राम मध्ये कोणकोणते विषय घेता येतील?

मी स्वतः आत्तापर्यंत जेवढे व्यक्तीमत्व विकासाचे कार्यक्रम अटेंड केलेत त्यात मुख्यत्वे पुढील मुद्द्यांना स्पर्श केला होता.

- व्यक्तीमत्व (प्रकार - एक्स्ट्रोवर्ट, इन्ट्रोवर्ट, पॉसिटिव्ह, निगेटीव्ह इ.)
- कामांचे नियोजन (ऑफिसमधल्या)
- गोल सेटींग
- लीडरशीप
- टीम बिल्डींग
- स्टेज कॉन्फिडंस
- टेबल मॅनर्स इ.

पण मला हे विषय ग्रुहिणी ऑडियन्सला अपील होणारे वाटत नाहीयेत. शिवाय इनमीन पाच दिवसात मी हे विषय घेउन त्यांना बोर करु इच्छित नाही.

मोस्ट्ली क्राऊड असा आहे ज्यांना घरुन कोणत्याही मुलासोबत्/पुरुषासोबत शिकण्यासाठी परवानगी नाहीये. म्हणुन "फक्त स्त्रीयांसाठी" असलेल्या या प्रोग्रामला कसेबसे सोडत आहेत. काही जणींना लग्नानंतर घराबाहेरच पाठवत नाहीयेत अश्याही मुली आहेत.

त्यामुळे या पाच दिवसांसाठी मी कोणते विषय घेऊ?

मला सुचलेले काही विषय-

१. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे.
२. न्युनगंड न बाळगणे./ इतरांशी तुलना न करणे.
३. सकारात्मक विचार / आशावादी असणे.
४. "नाही" म्हणायला शिकणे.
५. स्वतःवर प्रेम करणे.
६. नातेसंबंध जपणे.

तुम्ही काही सुचवु शकाल का?

* अजुन एक:

मला कोणी इन्स्पीरेशनल (मराठी शब्द सुचवा प्लीज) व्हिडिओज ची लींक द्याल का? शक्यतो भाषातीत (कोणतीही भाषा नसलेली)..

उदा. फॉर द बर्डस किंवा बाऊंडीन (हे माझ्याकडे ऑलरेडी आहेत. ह्यांची लींक देऊ नका)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियुपरी, वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या सप्ताहांत (शनि-रवि) किंवा एखाद्या वयोगटाला / विषयाला अनुसरून किंवा सणासुदीच्या निमित्ताने निरनिराळ्या पुरवण्या येतात. स्त्रियांविषयीची सदरे, पुरवण्या, मासिके यांत त्यांना लेख लिहिता येतील किंवा आपले विचार मांडता येतील. जवळपासच्या एखाद्या लायब्ररीतून असे आवश्यक पत्ते घेऊन तिथे त्या आपले साहित्य पाठवू शकतात.

अगदी 'सकाळ' सारखे वृत्तपत्र घेतले, तरी कित्येकदा तिथे एखाद्या विषयास अनुसरून वाचकांना लिहिण्याचे आवाहन केलेले असते. निवेदनांमध्ये निबंध स्पर्धा जाहीर होत असतात. दिवाळी अंकांसाठी साहित्य मागविण्यात येत असते. अशा ठिकाणी त्या आपले साहित्य पाठवू शकतात.

जवळपासच्या गणपती मंडळांना वार्षिक अहवाल प्रसिद्ध करताना त्या पुस्तिकेत लेख हवे असतात, तिथे त्या लिहू शकतात.

Pages