गृहिणींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काय काय करता येईल?

Submitted by पियू on 14 June, 2013 - 03:12

नमस्कार.

मला फक्त गृहिणींसाठी एक पाच दिवसांचा व्यक्तीमत्व विकासाचा कोर्स घ्यायचा आहे.
या गृहिणी कोणताही व्यवसाय किंवा अर्थार्जन करत नाहीत.

मला या पाच दिवसांच्या (रोज दिड तास) प्रोग्राम मध्ये कोणकोणते विषय घेता येतील?

मी स्वतः आत्तापर्यंत जेवढे व्यक्तीमत्व विकासाचे कार्यक्रम अटेंड केलेत त्यात मुख्यत्वे पुढील मुद्द्यांना स्पर्श केला होता.

- व्यक्तीमत्व (प्रकार - एक्स्ट्रोवर्ट, इन्ट्रोवर्ट, पॉसिटिव्ह, निगेटीव्ह इ.)
- कामांचे नियोजन (ऑफिसमधल्या)
- गोल सेटींग
- लीडरशीप
- टीम बिल्डींग
- स्टेज कॉन्फिडंस
- टेबल मॅनर्स इ.

पण मला हे विषय ग्रुहिणी ऑडियन्सला अपील होणारे वाटत नाहीयेत. शिवाय इनमीन पाच दिवसात मी हे विषय घेउन त्यांना बोर करु इच्छित नाही.

मोस्ट्ली क्राऊड असा आहे ज्यांना घरुन कोणत्याही मुलासोबत्/पुरुषासोबत शिकण्यासाठी परवानगी नाहीये. म्हणुन "फक्त स्त्रीयांसाठी" असलेल्या या प्रोग्रामला कसेबसे सोडत आहेत. काही जणींना लग्नानंतर घराबाहेरच पाठवत नाहीयेत अश्याही मुली आहेत.

त्यामुळे या पाच दिवसांसाठी मी कोणते विषय घेऊ?

मला सुचलेले काही विषय-

१. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे.
२. न्युनगंड न बाळगणे./ इतरांशी तुलना न करणे.
३. सकारात्मक विचार / आशावादी असणे.
४. "नाही" म्हणायला शिकणे.
५. स्वतःवर प्रेम करणे.
६. नातेसंबंध जपणे.

तुम्ही काही सुचवु शकाल का?

* अजुन एक:

मला कोणी इन्स्पीरेशनल (मराठी शब्द सुचवा प्लीज) व्हिडिओज ची लींक द्याल का? शक्यतो भाषातीत (कोणतीही भाषा नसलेली)..

उदा. फॉर द बर्डस किंवा बाऊंडीन (हे माझ्याकडे ऑलरेडी आहेत. ह्यांची लींक देऊ नका)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिबिराचे ५ दिवस संपले की पुढे ये रे माझ्या मागल्या ही परिस्थिती येणार नाही ह्याचा विचार करावा>> +१

हे शिबिर संपल्यावर पुढच्या शिबिराला यावे आणी पुढच्या वेळेस येताना आजुबाजुच्या किंवा घरातल्याच बायकांनाही घेउन यावे यावर भर द्या. ५ दिवसात फार काहि होणार नाहि हि वस्तुस्थीती आहे पण consistency ठेवता येणार असेल तर उत्तमच होइल. बाकि या कामाबद्दल तुमचे अभिनंदन आणी शुभेच्छा.

पियु,मस्तच! वेगळा विषय.
वर सगळ्यांनी बरेच चांगले-चांगले विषय सुचवले आहेत.
'आरोग्य' या विषयापासून सुरुवात कर. बहुतांशी स्त्रीया स्वतःच्या आरोग्याचा विचार करत नाही.

या कोर्सला येणा-या महिलांना स्वतः मध्ये काय बदल करायला आवडेल...हे जाणून घेतल्याने त्यांना नेमके काय करायचे ते सांगता येईल.

>>
मोस्ट्ली क्राऊड असा आहे ज्यांना घरुन कोणत्याही मुलासोबत्/पुरुषासोबत शिकण्यासाठी परवानगी नाहीये. म्हणुन "फक्त स्त्रीयांसाठी" असलेल्या या प्रोग्रामला कसेबसे सोडत आहेत. काही जणींना लग्नानंतर घराबाहेरच पाठवत नाहीयेत अश्याही मुली आहेत.
<<

खरंच का? मी हे वाचून इतकी हतबुद्ध झाले आहे की काही सल्लाच काय, शुभेच्छादेखील देण्याच्या मन:स्थितीत नाही. या कुठल्या वयोगटातल्या स्त्रिया आहेत? लिहितावाचता येणार्‍या आहेत का?

ग्रूहीणी म्हणजे घरी राहून घर सांभाळणारी असे मला वाटते. म्हणून ते नोकरीवाल्या बायकांचे विशय नको.
होम सायन्सच्या पुस्तकात दिलेली माहीती तुमच्या कामाला येइल का. शाळेमधे होमसायनस असते.

गृहीणीपद महत्वाचं आहे हे समाजावर ठसवण्यासाठी त्याची जाणीव त्या गृहीणींनाच करून देणे. पूर्वी गृहीणींचा विमा उतरवता येत नसे. या नियमाविरुद्ध एका महिलेने कोर्टात लढा देऊन गृहीणीपद किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं होतं. घरातली फ्रंट एकाने सांभाळल्याने दुस-याला अर्थार्जन करणं सोपं होतं. एका अर्थाने कंपनीतला एक महत्वाचा विभाग सांभाळल्यासारखंच आहे ते. म्हणूनच ज्याचा विमा कंपनी उतरवत होती त्याचं आर्थिक उत्पन्न निश्चित करताना त्यात गृहीणीचं मोल किती याची जाण सर्वांना असायलाच हवी. म्हटलं तर ही अतिशय छोटी गोष्ट आहे, पण आपण किती महत्वाचं काम करतो आहे याची अशा महिलांना जाणिव झाली तर आत्मविश्वास वाढण्याला त्याची मदत होईल असं वाटतं. चुभूदेघे.

( गृहीणीपद स्त्रियांसाठीच असावं का हा प्रश्न इथे अलाहिदा).
अवांतर : स्त्रियांना पुरुषांशी बोलण्याची परवानगी नसणं... भारतात खूप ठिकाणी ही परिस्थिती आहे. माझ्या बायकोशी का बोललास यावरून वादावादी, खून असंही वातावरण असतं. शहर, वाडी, वस्ती, गाव.. काहीच अपवाद नाही याला)

गृहिणीपद महत्वाचं/ अभिमानाचं आहे हे ठसवणे व गृहिणीपद बाईसाठी सर्वोच्च महत्वाचं अश्या प्रकारे ग्लोरिफिकेशन या दोन्हीमधे एक खूप थिन लाइन आहे. पहिला भाग त्यांच्या आत्मसन्मानासाठी महत्वाचा तर दुसरा भाग हा अत्यंत चुकीच्या बाजूने जाणारा तो बॅलन्स सांभाळणं हे इन्स्ट्रक्टरने लक्षात ठेवण्याची फार महत्वाची गोष्ट.

ऑगस्टो बोलची थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड ही जी थिअरी आणि एफर्ट होता/ आहे त्यासंदर्भात शोधलंस तर अजून काही जास्त उपयोगी पॉइंटर्स मिळतील.

मला तुझा एक्स्पर्टीझ कशात आहे ते माहित नाहीये. पण थिएटर गेम्सपैकी काही गोष्टींचा वापर करणार असलीस पहिल्यांदाच तर आधी एखाद्या छोट्या ग्रुपमधे ते करून बघ.

स्वाती, हतबुद्ध होऊ नकोस. खरंच अगदी ग्रॅज्युएट, किमान बारावीपेक्षा जास्त शिकलेल्या बायकासुद्धा अशा परिस्थितीत असतात. मीही पाहिल्यात. मुळात हे बदलायला हवंय हेच त्यातल्या काहींच्या लक्षात येत नाही. आलं तरी नवरा व सासूसासरे यांच्यासमोर काहीही चालणार नसतं.... असो.

एक छोटस सजेशन माझ्याकडुन, पहिल्या दिवशी या सत्राचे स्वरुप फक्त ओळ्ख, आवडि-निवडी,घरातील आर्थिक परीस्थिती या पुरते ठेवुन जास्तित डेटा गोळा करा मग तुम्हाला त्या.न्च्याशी स.न्वाद साधणे अधिक सोपे होइल.
५ दिवस फार कमी आहेत कारण या ५ दिवसात सुद्धा तुम्हाला काही तासच मिळणार आहेत..तेव्हा या स्त्रिया परत एखाद्या सत्राला येतिल अस बघा त्यासाठी तुमच्या नियमात बसत असेल तर शेवटच्या दिवशी एखादी छोटी घरगुती वापराची भेटवस्तु दिल्यास त्या परत येण्यास मदत मिळेल.

Some of the most effective training sessions start by king the participants to list their objectives. The facilitator writes these down and then each participant evaluates on the last day.

It prompts the participants to think about why they are attending and what they hope to gain.

The instructor can list their objectives too.

Another effective technique is to discuss three changes these women can implement in their daily lives- create break out groups-give them 20-30 minutes to discuss and then have one person from each group share what they agreed upon. The group can also discuss how they can support each other after the course has ended.

Even the best discussions and training material is of little use if the women cannot or will not put anything to practice.

I am really impressed that you are attempting something like this. Best wishes to you and to the women.

गृहव्यवस्थापन.

रोजचे रूटिन कसे मॅनेज करावे आणि घर चालवणे. Basic home management.
There are many ladies who cannot get the hang of running a house, keeping it clean and managing kids all at the same time without any help. Basically once the people living in a home unit and their habits are known day to day management can be fixed. You can ask each lady to write down her house routine tasks and then teach them to effectively manage the time and put all activities in order. some times when they cannot do this properly, the elders and husband etc scold them further eroding their self esteem.

1) defining home tasks and managing them efficiently. setting up a customized routine.
2) child management and their health management.
3) Self esteem - introduction to the concept and simple ways to maintain a healthy self esteem.
4) Gender concerns. - health, emotional issues. financial freedom ( the need for it)
5) Intolerance to abuse - physical as well as verbal/emotional
6) Give them an idea that there is a bigger world outside their home ( restricted environment)
and they have an equal right as an individual to be a vibrant part of it.

7) teach them simple poems and songs which they can sing to themselves to connect with their self esteem and individuality.
8) To maintain a self note book. and keep it in a private place to write down their own thoughts
9) To give them an idea that things may change in another 5 - 10 years as the in laws will get older and more dependent on them for care and the children will become more and more independent. to live with the paradox and maintain a sense of self through all of it.

Really very sweet of you to be a part of something like this. Best wishes.

शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे आभार.
शिबीर संपल्यानंतर नक्की माझा अनुभव इथे पोस्ट करेन.

खरंच का? मी हे वाचून इतकी हतबुद्ध झाले आहे की काही सल्लाच काय, शुभेच्छादेखील देण्याच्या मन:स्थितीत नाही. या कुठल्या वयोगटातल्या स्त्रिया आहेत? लिहितावाचता येणार्‍या आहेत का?

>> हो. लिहितावाचता येणार्‍या आहेत. ऑलमोस्ट सगळ्या १२वी आहेत. (मुलींच्या शाळेत/ कॉलेजमध्ये शिकुन/ लग्नाआधी एकत्र शाळेत शिकायची परवानगी होती म्हणुन). काही जणी लग्नाआधी एकत्र शाळेत शिकलेल्या पण आता लग्न झाल्यावर सासरचे लोक घराबाहेर पाठवत नाहीत किंवा मुलांसोबत शिकायला पाठवणार नाहीत अश्या आहेत.

मीही हतबुद्धच झाले ऐकुन. पण शिबीर घेण्याआधी मनात एकच विचार आहे. मी त्यांची परीस्थिती बदलु शकत नाही. त्या स्वतःच त्यांची परीस्थिती बदलु शकतील एवढा विश्वास ५ दिवसात त्यांना देऊ शकेल की नाही माहीत नाही. पण तरीदेखील आहे त्या परिस्थितीत सुद्धा त्यांना आनंदात राहाण्याचा, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. तो त्यांना जाणवुन द्यायचा आहे.

>> आहे त्या परिस्थितीत सुद्धा त्यांना आनंदात राहाण्याचा, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. तो त्यांना जाणवुन द्यायचा आहे.
ह्म्म. तुम्हाला शुभेच्छा.

तुम्ही नुसते ऐकून सोडून न देता त्यांच्यासाठी शिबिर घ्यायचे प्रयत्न करत आहात हि कौतुकास्पद गोष्टं आहे. तुमच्या कामासाठी शुभेच्छा.

<<२. शिबिराचे ५ दिवस संपले की पुढे ये रे माझ्या मागल्या ही परिस्थिती येणार नाही ह्याचा विचार करावा. एखाद्या गृहोद्योग करणाऱ्या महिलेशी ओळख उदा: एखादीला घरगुती पाळणाघर काढायचे असेल तर सध्या जिचे घरगुती पाळणाघर आहे अशा महिलेची ओळख (मेंटरिंग). सरधोपट सर्वाना एक मेंटर पेक्षा प्रत्येकीला यथावकाश एक मेंटर. >>>
यासाठी त्यांना बचतगट ओळख आणि ते सुरु करुन देण्याचे मार्गदर्शन देऊ शकता.
बचतगटात बहुतेक दहाएक जणिंचा ग्रूप असतो. त्यांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज, मार्गदर्शन मिळते इतकीच माहिती आहे. कोणाला बचतगटाबद्दल अजुन काही माहिती असल्यास प्लिज इथे लिहा.

* अजुन एक:

मला कोणी इन्स्पीरेशनल (मराठी शब्द सुचवा प्लीज) व्हिडिओज ची लींक द्याल का? शक्यतो भाषातीत (कोणतीही भाषा नसलेली)..

उदा. फॉर द बर्डस किंवा बाऊंडीन (हे माझ्याकडे ऑलरेडी आहेत. ह्यांची लींक देऊ नका)

आज माझा व्यक्तीमत्व विकासाचा क्लास सुरु झाला. खुप छान बायका आहेत. अगदी जीव लावावा अश्या.
तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे पहिला दिवस एकदम रॉकिंग झाला.
त्यांनी त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा माझ्याबरोबर शेअर केल्या.

त्यांना काही समस्या आहेत ज्या मी सोडवाव्यात ह्या अपेक्षेने त्या माझ्याकडे पाहात आहेत. त्यांना काहीही सुचवण्याआधी मला तुमची मदत हवी आहे.

केस १:

ह्या बाईंकडे पत्रकारीतेत कॉलम राईटिंगचा अनुभव आहे. पण त्याला ऑलमोस्ट १५ ते २० वर्षे लोटली आहेत. यांच्या नवर्‍याला ह्यांचे वेळीअवेळी बाहेर जाणे आवडत नाही म्हणुन त्याने लग्न करतांनाच अट घातली होती की तुला पत्रकारीता सोडावी लागेल. काही कारणामुळे यांचे लग्न जुळायला खुप उशीर होत होता म्हणुन घरच्यांच्या दबावाखाली त्यांना हे मान्य करावे लागले. मध्यंतरी एका अपघातात यांचा एक पाय जरासा अधु झाला. त्यामुळे आत्मविश्वास जरा कमी झाला आहे.

आज गेले ७ वर्षे ह्या शिकवण्या घेत आहेत. पण मनातुन त्याची अजिबातच आवड नाही. मनातुन लिहिण्याची आवड जात नाही. घरी डायर्‍या भरुन काय काय लिखाण करुन ठेवले आहे.

ह्यांना अ‍ॅज अ करीअर काय सुचवाल? ह्यांना कंप्युटर किंवा नेट येत नाही. ते शिकवण्याची व्यवस्था मी उद्यापासुन करतेय. माबोवर यायला सुचवणार आहेच. पण त्यांच्या घरी पीसी आहे की नाही ते अजुन माहीत नाहीये.

याव्यतिरिक्त अजुन काय सुचवता येईल?

पियु अतिशय सुरेख काम करतेयस त्याबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! Happy

त्या बाईंना काही वर्तमानपत्रं, नियतकालिकं मासिकं, पाक्षिकांकडे ते लिखाण पाठवायला सांग, कुठेतरी नक्की सिलेक्ट होईल. त्यांच्याकडून विचारणा झाली की बाहेर न फिरता घरून लिखाण करेन असं पहिल्यांदाच सांगून पहायचं. (तसं चालत असावं)
दुसरी गोष्ट कोणतंही लिखाण कुणालाही पाठवण्या आधी रजिस्टर करायला सांग. त्याची सोप्पी पद्धत म्हणजे आपण केलेलं लिखाण आपल्यालाच आपल्या पत्त्यावर पाठवायचं रजिस्टर एडी ने, आणि ते न उघडता तसंच ठेवायचं. पुढे मागे लिखाण चोरीस गेल्याचे लक्षात आले तर कोर्टात जाऊ शकतो.
सध्या तरी मला हेच सुचतंय..
आवड म्हणून लिखाण करायचं असेल तर माबो, मिपा आहेच, स्वत:चा ब्लॉगही लिहिता येईलच त्यांना. पण त्यासाठी नेट मस्ट आहे.

पियु अतिशय सुरेख काम करतेयस त्याबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! >>> +१००
पियू परी तुझ्या शिबिरासाठी वृत्तपत्र पब्लिसिटी सध्या कोण बघतय? त्यामध्ये ह्या बाईंचा काही उपयोग होऊ शकेल? शिबिराचे अनुभव त्यांनी लेख स्वरुपात लिहावे आणि मग तू ते कुठे प्रसिद्ध करू शकण्यासाठी मदत करू शकशील?? दुसर्याला निरपेक्ष मदत अवश्य करावी पण तू सुद्धा शिबीर क्षेत्रात नवीन आहेस. तुमचा एकमेकीना उपयोग झाला तर ती एक पुढील वाटचालीची एक छान छोटी सुरुवात होईल.

सगळ्यांचे आभार..

त्या बाईंना काही वर्तमानपत्रं, नियतकालिकं मासिकं, पाक्षिकांकडे ते लिखाण पाठवायला सांग, कुठेतरी नक्की सिलेक्ट होईल. त्यांच्याकडून विचारणा झाली की बाहेर न फिरता घरून लिखाण करेन असं पहिल्यांदाच सांगून पहायचं.

>> ही चांगली कल्पना आहे.

त्यामध्ये ह्या बाईंचा काही उपयोग होऊ शकेल? शिबिराचे अनुभव त्यांनी लेख स्वरुपात लिहावे आणि मग तू ते कुठे प्रसिद्ध करू शकण्यासाठी मदत करू शकशील??

>> असे आपलीच प्रसिद्धी/ जाहीरात करणारे लेख मुपी शिवाय कुठे छापतात? कोणाला माहीती आहे का?

अर्थात सरळ सरळ जाहिरातीचा एक भाग म्हणुन त्यांच्याकडुन अनुभव लिहुन घेउन नक्की छापता येईल. पण एकदम प्रॅक्टिकल विचार करायचा झाला तर त्यांनी लिहिलेल्या अनुभवाला जाहीरात म्हणुन छापण्याचा खर्च आर्थिकदृष्ट्या अजिबातच लॉजिकल नाहीये सध्यातरी.. इथे आम्ही त्यांना कंप्युटर, इंटरनेट, ब्युटी पार्लर, एम.एस.ऑफिस, शिवणकाम आणि व्यक्तीमत्व विकास हे सगळे फक्त ११११/- रुपयात शिकवतोय. आमची कमी फी हाच आमचा खरा युसपी आहे. सो एवढा खर्च करता येणार नाही गं.

Pages