फोटो
इथे खालीआहेत.
आज
सकाळपासूनच पाऊस कोसळत होता .तसा सात जूनपासून थांबलेलाच नाही पण आजचा
काही वेगळाच वाटला . नऊपर्यंत दोनतीनदा चहाही झाला .सौने 'व्हेजपराठे'
करायला घेतले होते .
"असे चमचमीत पराठे पावसात कुठेतरी खायला मजा येते",मी .
"चला ,तर आजच जाऊया" .
घड्याळाकडे पाहिले .आता लोणावळा (ट्रेनने)काही
शक्य नव्हते .लोकलचे टाईमटेबल १०.२४ची कर्जत मिळेल हे सांगत होते
."पळसदरीला जाऊन येता येईल ",मी जाहीर केले .तिकडून काहीच उत्तर आले नाही
पण पराठे बनवायचा वेग अचानक वाढल्याचे जाणवले .बाहेर पावसाचा जोरही वाढला
.टिव्ही लावून सेंट्रल रेल्वेचा अंदाज घेतला ,म. रे. बद्दल काहीच बातमी नव्हती
.लगेच तयारीला लागलो .
झटपट छ्त्र्या घेऊन स्टेशन(डोंबिवली) गाठले .बुधवार आणि दहा वाजले असल्याने गर्दी नव्हती .कर्जत गाडी चार मिनीटे अगोदरच आली ! बदलापूरपासून बाहेरचं दृष्य एकदम बदललं . उजवीकडे डोंगराची रांग अधुनमधून दिसत होती आणि रुळाजवळून वाहणारे चहाच्या रंगाचे ओढे .गाडीत काही माथेरानचे मुलामुलींचे ग्रुप होते .बहुतेक टपालवाडीच्या धबधब्यावर जाणार .
गेल्या पंचवीस वर्षांत चारपाच वेळातरी गेलो आहे पण प्रत्येक वेळेचा उत्साह आणि मिळणारा वेळ बदलत गेला हे जाणवतंय .पूर्वी दिवसभर रेंगाळायचो आता झटपट जाऊन परतण्याचा विचार येतो . साडेअकराला कर्जतला आलो .अजून खोपोली शटल यायला अर्धा तास होता .वेळेचा सदुपयोग कर्जत स्टेशनला काय असणार ?नाईलाजाने गरम समोसे वडे खावे लागले .
खोपोली गाडीने सवाबाराला पळसदरीला आलो .येथे कर्जतचा गडबडाट पूर्ण गायब आणि उतरणारे पाचजणांशिवाय फक्त निसर्ग .डावीकडे खंडाळा घाटाचा डोंगर ढग नी ,त्यातून येणाऱ्या निळ्या रेल्वे .लहान मुलासारखे गाडी कधी न पाहिल्या सारखे आपण पाहात राहातो .उजवीकडे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धरणाकडे एक जाणारी चिखलाची पायवाट .का कोण जाणे हे स्टेशन आणि हा परिसर बाळाच्या तीट लावलेल्या गालासारखा सुरेख निरागस राहिला आहे अजून ,पंचवीस वर्षँ पाहातोय
पाउस छान पडतोय .पुढच्या टोकाला येऊन स्टेशनच्या पाटीपाशी फोटोला सुरुवात केली .पायवाटेने वर रे केबिनपाशी धरणाची भिँत आहे .इथून पळसदरी/पळसधरी धरण ,पलीकडचे गाव आणि पच्श्रिमेकडचे डोंगर पाहातांना वेळ भराभर जातो . गाड्यांचेही व्हिडिओ काढले .मग धरणाच्या भिंतीवरून तोल सावरत छत्री धरत पुढे आलो आणि पाण्याच्या मोठ्या आवाजाने आमचे स्वागत केले
धरणातलं पाणी येथून पुढे भिँतीवरून वीतभर वाहात होतं .एका पांढऱ्याशुभ्र धबधब्यात पडत होतं .गावतर शंभरफुटांवर दिसतंय .खाली परत रुळाकडे जाऊन परत वर यायला पाहिजे .विचार करतोय तेवढयात चारपाच गाववाले बायामाणसं त्यापाण्यातून पलीकडे गेल्यावर आमचा आत्मविश्वास वाढला .आम्ही हातधरून पार झालो .चपला जाताजाता वाचल्या .
गावात छान घरं आहेत .एक छानसा रस्ता धरणाच्या कडेकडेने शाळेजवळ येतो .मुंबई कडून कारने यायचे झाल्यास पनवेल खोपोली रस्त्याने एनडी स्टुडीओ मार्गे खिंडीतून उजवीकडे वळल्यावर येथे पोहोचतो .समोरच्या डोंगरात एक किमीवर छानसा धबधबा आहे .पण आज जाणार नव्हतो .दीड वाजला होता .जवळच्याच स्वामि समर्थ मठाला धावती भेट देऊन बाजूला एका बंगलेवाल्याने हॉटेल चालू केले आहे त्यात गरमागरम चहा घेत पाऊस बघत थोडावेळ बसलो .सवा दोनची नाही पण सवा तीनची शटल मिळणार होती .येतांना धरण निर्धास्तपणे ओलांडले .पावसाचा जोर वाढला होता नी नंतरची गाडी पावणे पाचला होती .
पळसदरीची पावसाळी पन्नाशीनंतरची सहल यशस्वी करून
पाचच्या आत परत आलो .
फोटो
Srd, हा लेख एकदम घाईत लिहीला
Srd,
हा लेख एकदम घाईत लिहीला आहे असे वाटते. खुप त्रोटक वाटतोय.
जरा नीट आरामात बसुन लिहाल तर बरे होईल.
लेख वाचता वाचता प्रचि बघायला मजा येते. तेव्हा शक्य झाल्यास इथेच प्रचि टाका.
srd जाम कन्फ्युज दिसतायत
srd जाम कन्फ्युज दिसतायत प्रवास वर्णनाबद्दल. अहो srd तुम्ही आधी यो रॉक्स, मायबोली वविकर आणी इतर माबोकरांनी लिहीलेली प्रवास वर्णने नीट वाचा जरा. तुम्ही काय लिहीले आहे याचा थांग पत्ता लागत नाही.:अओ:
आता वरचेच उदाहरण घ्या. पळसदरीला तुम्ही कधी जायचे ठरवले? कसे गेलात? कुठुन गेलात? सोयी काय होत्या? कुठला मार्ग कुठुन कुठे जात/ येत होता? तिथे खाणे पिणे इत्यादी काय सोयी होत्या? अशी बरीच माहिती थोडक्यात पण देता येते, ती तर दिलीच नाहीत, आणी फोटु बी नाय टाकले.:अरेरे::अओ:
फु स बद्दल रागवु नका.:स्मित:
टुनटुन
टुनटुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१) २) ३) ४) ५) ६)
१)
![१](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4269_zpsf94601bc.jpg)
२)
![२](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4258_zpse3f88b3f.jpg)
३)
![३](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4262_zps1218df13.jpg)
४)
![४](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4280_zpsaf513379.jpg)
५)
![५](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4282_zps1061b471.jpg)
६)
![६](http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/p1/Photo4290_zpsa7bfa379.jpg)
srd, चांगलं लिहिलंय. अजून
srd, चांगलं लिहिलंय. अजून थोडं विस्तृत लिहा.
फोटोही मस्त आले आहेत. ती लिंक ब्राऊजरमधे पेस्ट केली की फोटो दिसत आहेत.
हं आत्ता कसे मनासारखे. फोटु
हं आत्ता कसे मनासारखे.:स्मित: फोटु आधी दिसले नाय. आता दिसलेत, छान आलेत. तुमची एक दिवसाची ट्रिप मस्त झाली. मुंबईवाले जास्तच लक्की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
#मंजूडी ,लिखाण वाढवले आहे .
#मंजूडी ,लिखाण वाढवले आहे . #टुनटुन धन्यवाद .आपल्या राहाण्याच्या जागेपासून परिसरानुसार शंभर किमीपर्यंत काहीनाकाही डोँगर ,रान ,समुद्र .वाळवंट असणारच .मुंबईकरांनाही खास थंडीसाठी अथवा तारे पाहाण्यास खूप दूर जावं लागतं ,बर्फ( हिमवर्षाव) पाहाण्यासाठी काश्मीर .
साधारण ३-४वर्षांपूर्वी आम्ही
साधारण ३-४वर्षांपूर्वी आम्ही डोंबिवलीहून पळसदरीला गेलो होतो स्वामींच्या मठात. चारचाकीने बदलापूर पाईपलाईन रोडने गेलो होतो. येताना N.D. स्टुडीओमार्गे आलो, येताना महडला गेलो बाप्पाच्या दर्शनाला,हेच दिवस होते, मजा आली. तेव्हा बदलापूरमार्गे खूप खड्डे होते. चौककडून आलो तो चांगला मार्ग होता. हा लेख वाचल्यावर आमची ट्रीप आठवली. फोटो नंतर बघते.
मुख्य मुद्दा राहुनच गेला ना.
मुख्य मुद्दा राहुनच गेला ना. व्हेजपराठयांच काय झाले. ते कुठे कधी खाल्लेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते स्टेशनवर बसुन खाल्ले. काय
ते स्टेशनवर बसुन खाल्ले.:फिदी: काय अनिलभाई हा शालजोडीतला मला की काय्?:डोमा::खोखो:
न्हाय वं आता सगळी ट्रीप
न्हाय वं आता सगळी ट्रीप त्यानी त्या व्हेज पराठ्यापाई केली नव्हं. तेचं पुढे काय झालं ते लिवलच न्हाय ना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चुकुन खायचे विसरले तर गेले ना वेस्ट्ट.
म्हणजे खायची सोय त्यांनी घरीच
म्हणजे खायची सोय त्यांनी घरीच केली.:फिदी: काय हे srd , व्हेज पराठ्यांचे खरच काय केले?
आम्ही गंमत करतोय म्हणून रागवु नका. पण खादाडी आणी ती पण पावसाळी ट्रिपमधली, खूप रंगतदार असते.:स्मित:
आमच्या लहानपणी तिखटामिठाच्या पुर्या, दही भात ( आई बाबा बरोबर असतील तर), बटाटे काचर्या, थालिपिठ प्रवासात नेणे हीच चंगळ होती, स्टेशनवर बटाटेवडे, मुगवडे,खायचो. अब जमाना बदल गया, आताची पोरे चिप्स, कुरकुरे मागुन वात आणतात.:फिदी:
आताची पोरे चिप्स, कुरकुरे
आताची पोरे चिप्स, कुरकुरे मागुन वात आणतात. >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
#अमितभाई ,आणि #टुनटुन
#अमितभाई ,आणि #टुनटुन लिहिण्याच्या नादात व्हेज पराठ्यांचे विसरलो .गमती जमतीसाठीच तर आपण जातो त्याशिवाय मजा नाही . काही हरवले नाही तर जत्रा कशी ?वाट चुकलो नाही तर ट्रेक कसा ?काही फजिती झाली नाही तर पिकनिक कसली ?त्या चहाच्या हॉटेलात काय एकमेव आसरा होता नी पाऊस थांबतच नव्हता .सौचा विचार होता इथेच पराठे खाऊ .मी नको म्हणालो .बाहेरचे पदार्थ येथे खायचे नाही असे हॉटेलवाले बोलतात .हळूच पिशवी उघडून पाहिल्यावर तिला कळले की मेथांब्याचे तेल बाहेर आले आहे .प्रश्न सुटला .अडीच वाजले होते .स्टेशन फलाटावरच्या एकमेव वीसफुटी शेडमध्ये (#टुनटुन १०+) सवातीनची गाडी येईपर्यंत व्हेज परांठेना पावसाच्या साक्षीने न्याय दिला .आणि एक लिहायचे राहिले . रेल्वेचे तिकीट धरून एकशे तीस रुपये (एक चिप्स पाकिट पण घेतले होते)उडवले .
फोटो छान आहेत.
फोटो छान आहेत.
पळसदरी हे मस्त ठिकाण दिसत आहे
पळसदरी हे मस्त ठिकाण दिसत आहे पावसाळ्यात जाण्यासाठी ..
>> फक्त निसर्ग .डावीकडे खंडाळा घाटाचा डोंगर ढग नी ,त्यातून येणाऱ्या निळ्या रेल्वे .लहान मुलासारखे गाडी कधी न पाहिल्या सारखे आपण पाहात राहातो .उजवीकडे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धरणाकडे एक जाणारी चिखलाची पायवाट .का कोण जाणे हे स्टेशन आणि हा परिसर बाळाच्या तीट लावलेल्या गालासारखा सुरेख निरागस राहिला आहे अजून