अंधाऱ्या संध्याकाळी.

Submitted by राहुल नरवणे. on 8 July, 2013 - 08:06

एक संध्याकाळ, हुरहूर लावणारी,
काहूर माजवणारी.

एक संध्याकाळ, दिव्यातले तेल पळवणारी,
वात विझवणारी.

एक संध्याकाळ, पिलांना जवळ बोलावणारी,
पाखराचे पंख कापणारी.

एक संध्याकाळ, गंभिर, उदास, केविलवाणी, रडवणारी,
विदारक, केविलवाणी हसणारी.

एक संध्याकाळ, तुझं - माझं भांडण लावणारी,
दोघांना कायमचं विलग करणारी.

एक संध्याकाळ, मला अंतर्मुख करणारी, फसवणारी,
विलग होऊन बसणारी.

एक संध्याकाळ, दिसणारी - न दिसणारी,
प्रकाशाला दूर फेकणारी.

एक संध्याकाळ, काळीकुट् ,
संपवून सारं बसलेली गप्पं.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक संध्याकाळ, हुरहूर लावणारी,
काहूर माजवणारी.

एक संध्याकाळ,खंबा पळवणारी,
ग्लास फोडनारी.

एक संध्याकाळ, चखना संपनारी,
सिगरेट ची पाकीट फोडनारी.

एक संध्याकाळ, गंभिर, उदास, केविलवाणी, रडवणारी,
विदारक, फुल पीऊन हसणारी.

एक संध्याकाळ, तुझं - माझं भांडण लावणारी,
खंबा आणी चपटी मधे वाद लावणारी...

एक संध्याकाळ, काळीकुट् ,
संपवून खंबा बसलेली गप्पं.

किश्या,
परत एकदा धन्यवाद.
बाकी तू विडंबन छान करतोस. आवडलं. अगदी शब्द न शब्द. सुंदर. आणि सगळ्यात चागलं काय आहे. तर, कविता जरी दुसऱ्याची असली तरी त्यात "तू " दिसतोस. तुझा स्वभाव, तुझे विचार आणि तु. सगळं त्यात येतं. छान. Happy