दिंडी चालली चालली...

Submitted by जिप्सी on 6 July, 2013 - 11:02

आषाढवारी २०१३ क्षणचित्रे
स्थळः पूलगेट ते मगरपट्टा, हडपसर, देवाची उरूळी (पुणे)
=======================================================================
=======================================================================

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्तड नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला
दिंडी चालली चालली...

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली...

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीळचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली...

प्रचि ०१
विटेवरी उभा दीनांचा कैवारी, भेटाया उभारी दोन्ही बाह्या
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळा, भेटे वेळोवेळा केशिराजा
ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो
सर्वालागीं देतो समान दरुशन, उभा तो आपण सम पायीं
नामा म्हणे तया संताची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे
विटेवरी उभा दीनांचा कैवारी...

प्रचि ०२
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग

प्रचि ०६

प्रचि ०७
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग

प्रचि ०८

प्रचि ०९
रूप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा

प्रचि १०

प्रचि ११
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
भक्तीृ पाहि तोची, विठ्ठलाची

प्रचि १२
ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ
मला एकलीला का रे, दूर मोकलीसी ?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
प्रभातकाळी तुझे ईश्वरा, नाम मुखी येई
तूच माउली, तूच साउली, सावळे विठाई

प्रचि १६

प्रचि १७
बघा संतमेळा सदा रंगलेला
तिरी बैसलेला, देवापाशी
माहेर आपुले मंदिर तेथले
संत गुंगलेले, भजनात

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचे

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
आषाढीला होता वैष्णवांची दाटी
नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी
युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे
जोजवीत जेथे पान पिंपळाचे

प्रचि २८
सावळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे

प्रचि २९
पाऊले चालती पंढरीची वाट...
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३
माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी ?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी ?

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

बोला… पुंडलिका वरदे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि.१३ ...ह्रुदयस्पर्शि ..आजिंच्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन डोळ्यात पाणि आले.सर्व पोर्टेट खासच..

सहि रे ... एक से बढिया एक.... दिंडि साठी मारलेली दांडी सफल झाली Happy

बादवे
प्रचि २ हा प्रचि ४४ चा क्रॉप आहे का??? खरच असेल तर क्रॉप रेशो मस्त आहे तुझ्या कॅमेर्‍याचा.

|| तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ||

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

प्रचि २ हा प्रचि ४४ चा क्रॉप आहे का???>>>>>नाही रे, ते दोन वेगवेगळे फोटोज आहेत. Happy

यातील काहि फोटो 550D 18-135 तर काही Canon EOS 6D 70-200EF कॅमेर्‍याने काढलेत. Happy

जिप्स्या,कसले सुंदर आलेत फोटोज...एकेक नुस्ता पाहात बसावा..वाह!!!

गर्दीचे हावभाव्,मूड मस्त पकडलायेस...ग्रेट पिक्स!!!

Canon EOS 6D 70-200EF >>> हायला डायरेक्ट फुल फ्रेम.. तो पण विथ f/2.8 लेन्स... खतरनाक यार ... लेका आता तु फ्रोफेशनल झालस की Happy

हायला डायरेक्ट फुल फ्रेम.. तो पण विथ f/2.8 लेन्स... खतरनाक यार ... >>>>>माझा नाही तो जिवेशचा कॅमेरा आहे. Happy त्यातुन काढलेत मी फोटो. Happy कॅमेरा मख्खन आहे तो यार. Happy
आपण सध्या ५५०डि १८-१३५ वरच समाधानी. Happy

जिप्सी ...केवळ अप्रतिम
....ते वारीला जाणारे वारकरी एक धन्य आणि त्यांना आपल्या कॅमेर्यात कैद करणारा तू ही धन्यच.....
माझी ही ईच्छा होती वारीला जायची...तुझे फोटो पाहून न गेल्याचे दू:ख थोडे कमी झाले...
पुढ्च्या वर्षी नक्किच प्रयत्न करेन....
छान पिक्स शेअर केलेस्.....मनापासून आभार....

Pages