अमेरीका स्वातंत्र्य दिन - ४ जुलै : Firework Over Manhattan (with settings)

Submitted by तन्मय शेंडे on 7 July, 2013 - 00:17

४ जुलै, अमेरीकाचा स्वातंत्र्य दिन शहरा-शहरात आतीषबाजी करुन उत्साहात साजरा केला जातो. मेसीजची न्यु-यॉर्क मधील आतीषबाजी म्हणजे नयनरम्य सोहळा, २५ मिनीटात १,६०० फटाक्याची आतीषबाजी होते त्यात ४०,००० ईफेक्ट असतात.

हा ईव्हेन्ट कॅच करण्यासाठी मी ५ वाजताच पोहचलो, फक्त चार तास आधी कारण मोक्याची जागा पकडायला. यंदा सूरक्षा व्यवस्था जास्तच कडक होती, बोस्टनला झालेल्या घटनेमुळे यावेळी बॅग घेउन जाण्यावर बंदी होती.पण वातावरण अगदी उत्साही छान लाईट म्युझीक, सगळे अगदी खुर्च्या टाकून तब्येतीत खात-पीत होते.

साधारण आठ वाजता एक-एक करुन मेसीजच्या चार बोटी(बार्ज) आल्या आणि रंगांचा सोहळा ९.३० वाजता सुरु झाला,त्याच्या काही प्रची.

प्रचीवर क्लिक केल्यास फुलस्क्रिन बघता येतील.

प्रची १
Firework1.jpg

प्रची २
Firework2.jpg

प्रची ३
Firework3.jpg

प्रची ४
Firework4.jpg

प्रची ५
Firework5.jpgकॅमेरा सेटींग:
फायरवर्कचे फोटो काढणं जरा कठीण आहे, कारण ़कॅमेरा फुल मॅन्युअल मोडवर ठेवून फोटो काढावे लागतात, त्यात वातावरणातील लाइट, फटाके लॉन्च करायचा पॅटर्न, लोकेशन, ई. यावर कॅमेरा सेटिंग अवलंबून आहे.

सेटिंग जरा सविस्तर दिलेत कारण प्रत्येक वेळेस हे सेटिंग लागू नाही होणार. तरी या फोटोसाठी हे(हेच) सेटिंग का सेट केले हे थोडक्यात लिहीलय.

१. ़कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, ट्रायपॉड आवश्याक आहे.
२.़ कॅमेरा मॅन्यूअल मोड मध्ये सेट केला.
४. अ‍ॅपरेचर व्हॅल्यू f/12 सेट केली कारण चांगली डेप्थ मिळायला. f/10 पेक्षा कमी सेट केली असती तर पूर्ण कॅन्व्हास क्लिअर नसता आला.
५. ISO आणि शटर स्पीड काही टेस्ट शॉटस घेऊन सेट करावे लागले. फटाके साधारण ७-८ सेकंदानी लॉन्च करत होते, म्हणून शटर स्पीड ८ सेकंदला सेट केला.
६. ISO जनरली मी १०० ठेवतो, पण शटर स्पीड ८ से़कंद असूनही फोटो व्यवस्थित एक्सपोझ झाला नव्हता. मग ISO ३२० ला सेट करुन छान एक्सपोझ फोटो मिळाला.
७. इतके सेटींग करुन देखिल फोटो अपेक्षित येत नव्हता कारण आकाश निळ-जांभळ येत होतं, वातावरणात बराच उजेड होता आणि सूर्यास्त पण ८.३० नंतर झाला होता. मग व्हाईट बॅलेन्स चेंज केला आणि २,५००K वर हवं तस काळं आकाश मिळाल.

धन्यवाद,
तन्मय शेंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

महागुरु, स्वाती - कॅमेरा सेटिंग्सवर लेखात लिहीले आहेत.

Pages