दिंडी चालली चालली...

Submitted by जिप्सी on 6 July, 2013 - 11:02

आषाढवारी २०१३ क्षणचित्रे
स्थळः पूलगेट ते मगरपट्टा, हडपसर, देवाची उरूळी (पुणे)
=======================================================================
=======================================================================

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्तड नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला
दिंडी चालली चालली...

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली...

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीळचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली...

प्रचि ०१
विटेवरी उभा दीनांचा कैवारी, भेटाया उभारी दोन्ही बाह्या
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळा, भेटे वेळोवेळा केशिराजा
ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो
सर्वालागीं देतो समान दरुशन, उभा तो आपण सम पायीं
नामा म्हणे तया संताची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे
विटेवरी उभा दीनांचा कैवारी...

प्रचि ०२
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग

प्रचि ०६

प्रचि ०७
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग

प्रचि ०८

प्रचि ०९
रूप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा

प्रचि १०

प्रचि ११
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
भक्तीृ पाहि तोची, विठ्ठलाची

प्रचि १२
ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ
मला एकलीला का रे, दूर मोकलीसी ?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
प्रभातकाळी तुझे ईश्वरा, नाम मुखी येई
तूच माउली, तूच साउली, सावळे विठाई

प्रचि १६

प्रचि १७
बघा संतमेळा सदा रंगलेला
तिरी बैसलेला, देवापाशी
माहेर आपुले मंदिर तेथले
संत गुंगलेले, भजनात

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचे

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
आषाढीला होता वैष्णवांची दाटी
नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी
युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे
जोजवीत जेथे पान पिंपळाचे

प्रचि २८
सावळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे

प्रचि २९
पाऊले चालती पंढरीची वाट...
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३
माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी ?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी ?

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

बोला… पुंडलिका वरदे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

__/\__ खरंच रे सगळा सोहळा मूर्तिमंत उभा केलास!!

रच्याकने.........तू पुण्यात आला होतास आणि साधा फोन सुद्धा केला नाहीस???? Angry

जिप्सी,

__/\__

ही एकच प्रतिक्रिया देऊ शकतो तुझ्या या कलेसाठी.
( वारक-यांच्या स्वागतासाठी आतुर असलेले नेत्यांचे फ्लेक्स काही फोटोत दिसले. Sad )

साध्या भोळ्या भाविकांचा ओसंडून वहाणारा भक्तिभाव पहाताना मन भरुन आलं.....

खूप छान, नजाकतीने फोटो काढलेस जिप्सी ....... खूप आवडले...........

मस्त , सुपर्ब. बहोत बढिया!! सहीच एकदम जिप्सी! फोटो अप्रतिम आणि अभंग देखील अगदी चपखल!
__/\__ श्री हरी विट्ठल!

|| विठ्ठल विठ्ठल ||

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

रंगासेठ, कोकण्या तुमच्यामुळे यंदाची वारी अनुभवता आली. मनापासुन धन्यवाद. Happy

मस्तच रे, सगळ्या फोटोतली माणसे आवडली, भक्तीरसात डुंबुन गेलेली...

मलाही खुप इच्छा आहे एकदा दिंडीबरोबर जायची...

_/\_

__/\__

Pages