दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा
-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!
-मी हार्ड अॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!
फोटो टाक की. आता वाचते.
फोटो टाक की.
आता वाचते.
छानच लागतो हा केक. आता घरी
छानच लागतो हा केक.
आता घरी गेल्यावर आईला करायला सांगीन. याचे मिश्रण कच्चेही खायला छान लागते.
यात लोणी घालायचं आहे ते
यात लोणी घालायचं आहे ते सॉल्टेड बटर नाही, घरगुती लोणी आहे. अनसॉल्टेड बटरचा अनुभव नाही.
प्रज्ञा, सुंदर जमलाय. आई तर
प्रज्ञा, सुंदर जमलाय. आई तर तूपच वापरते.
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक
प्रज्ञा९ , केक सुरेख दिसतोय.
प्रज्ञा९ , केक सुरेख दिसतोय.
केक छान दिसतोय. बारा गटगला
केक छान दिसतोय. बारा गटगला आणला होतास तो हाच केक ना ? मिश्रण पॅनमध्ये घेतल्यानंतर केक तयार व्हायला साधारण किती वेळ लागतो ते लिही ना टिपांमध्ये
फोटो टाकला आहेस तो प्रतिसाद संपादित कर. इमेज टॅग कॉपी-पेस्ट करून पाककृतीत टाक.
कातील दिसतोय केक!!!!! करुन
कातील दिसतोय केक!!!!!
करुन बघण्यात येईल
मस्त दिसतोय केक.
मस्त दिसतोय केक.
छान झालाय .हा केक फार छान
छान झालाय .हा केक फार छान लागतो आणि बेकरीच्या केकना( आणि सर्वच खारी बिस्किटांना)जो एक बेकरीछाप वास येतो तो याला नसतो .आमच्याकडे पिकलेली केळी मिसळतो त्याने मुलायम होतो .बेदाणे मनुका भिजवून घालतो .
होय होय... हाच तो बारागटगकेक!
होय होय... हाच तो बारागटगकेक!
बदल केला.
कातील दिसतोय केक!+१
कातील दिसतोय केक!+१
मस्त दिस्तोय केक.
मस्त दिस्तोय केक.
मस्त फोटो..
मस्त फोटो..
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय. सुक्या मेव्याची
मस्त दिसतोय. सुक्या मेव्याची सजावट नसल्याची उणीव अजिबात भासत नाही.
रंग वापरलाय का?
रंग वापरलाय का?>>> नाही. रंग,
रंग वापरलाय का?>>> नाही. रंग, इसेन्स काही नाही. फक्त केशर दुधात खलून, वेलची कुटून आणि बदामाचे काप करून मिश्रणात घातले, वरून काजू लावले.
खल्लास!!! खूप वर्षांपूर्वीची
खल्लास!!! खूप वर्षांपूर्वीची रवाकेकची आठवण जागरूक केल्याबद्दल धन्यवाद, प्रज्ञा.
उद्याच करते बघ.
वा, मस्त दिसतो आहे केक!
वा, मस्त दिसतो आहे केक!
एकदम सह्ही दिसतोय केक !!! आई
एकदम सह्ही दिसतोय केक !!!
आई यात केळी किंवा सफरचंदाचे तुकडे कधी अक्रोड / बदाम घालायची...
आठवण करुन दिल्याबद्दल धन्स... आता करुन बघेनच
केक एकदम तोंपासु दिसतोय. एक
केक एकदम तोंपासु दिसतोय.
एक प्रश्न - हा केक असा तू सांगितल्याप्रमाणे वाफेवरच करायचा का ओव्हनमधे केला तरी चालेल ? दोन्हीत नेमका काय फरक असेल?
झब्बु!
झब्बु!
मस्त! मीही असाच करते पण
मस्त! मीही असाच करते पण लोण्याऐवजी साजूक तूप घालते. त्याला मस्त खमंग स्वाद येतो त्यामुळे.
शुगोल, मी ओव्हनमधे कधी केला
शुगोल, मी ओव्हनमधे कधी केला नाही. त्यामुळे ती सेटिंग कशी हवीत ते इथेच कोणीतरी सांगू शकेल. पण चवीत फरक नसावा. कदाचित गॅसवर केल्यामुळे खरपूस होत असेल इतकंच.
प्रज्ञा९, धन्यवाद. मी लवकरच
प्रज्ञा९, धन्यवाद. मी लवकरच करून बघीन.
किती तरी दिवसांपासून या
किती तरी दिवसांपासून या रेसिपी ची वाट पहात होते. तव्या वर होणाऱ्या केक ची . या वीकेंड ला नक्की करून बघेन.
Thanks
- सुरुचि
प्राजक्ता | >>>>>>>>. हा
प्राजक्ता | >>>>>>>>. हा हार्ट शेप चा पॅन मधे केला की अवन मधे????
व्वा... काय सुंदर दिसतोय!
व्वा... काय सुंदर दिसतोय! नक्की करुन बघणेत येइल.
मस्त
मस्त
मस्त खरपूस झाला आहे. हा
मस्त खरपूस झाला आहे.
हा ओव्हनमध्ये/ मावे ज्यात कन्वेक्शन मोड आहे त्यातही करता येतो. १८० डिग्रीवर २२-२५ मिनिटं लागतात.
नॉनस्टिक पॅन पारंपरिक आहे, होय गं! टिपिकल अॅम्युमिनियमची केक पात्र असतात. तव्यावर वाळू पसरून त्या केक पात्रात केला जातो. बिनाअंड्याचा म्हणून आजी लोकांमध्ये एकदम लोकप्रिय!
Pages