ब्रेड क्राफ्टिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 03:25

ब्रेड क्राफ्टिंगः मला माहितेय ,तुम्हाला नकीच कसे केलेय हे जाणुन घ्यायची इच्छा असेल नं..मग घ्या लिहुन.
साहित्यः
८ब्रेड
१कप फेविकॉल
१ १/२चमचा झिंक ऑक्साइड
१-२ चमचा तेल जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरता तेच घ्यावे.
पोस्टर कलर
कृतीः
ब्रेड सर्वप्रथम पाण्यात अगदी हलकेसे बुडवुन दाबुन घ्यावे.(नसेल घ्यायचे तरी चालेल)
त्यात फेविकॉल व झिंक ऑक्साइड घालावे.जसे आपण कणकेला तेलाचा हात लावतो त्याप्रमाणेच ह्या मिश्रणाला तेल लावुन मिश्रण चांगले म्हणजे अगदी खुप मळुन घ्यावे.झाला तुमचा डोव्ह तयार.
आता ह्या डोव्हच्या छोटया छोट्या पाकळ्या,फुले बनवावी.गुलाब ,सुर्यफुले अशी अनेक फुले बनवुन घ्यावीत.बाजारात रेडिमेड कार्डबोर्ड मिळतात किंवा जुन्या सीडीज त्यावर चिपकावावे.हवी तशी फुलांची एरेंजमेंट करावी.
सर्व सेट झाल्यावर त्याला वरुन ब्रश ने रंग लावावे.
झाली तुमची कलाकृती तयार.
सुकल्यावर त्याला वॉर्निश लावायला विसरु नये.
39526_1390072962649_6835146_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मिश्रणात बोरीक पावडर मिसळली तर कुठलाही किडा लागणार नाही. मोरचूद ( कॉपर सल्फेट ) पण मिसळता येईल. पण त्याने निळा रंग येईल. ( तोच रंग हवा असेल तर मिसळता येईल. )

८ ब्रेड च्या जागी, ८ ब्रेड स्लाईसेस हवेय ना ?

मयी,पिन्नु ,मी नताशा >>>>बुरशी लागणार नाही कारण त्यात आपण झिंक ऑक्साईड घालत आहोत..ते प्रिवेंटिव्ह म्हणुनच आहे.
दिनेश>>>>>> ८ब्रेड स्लाईसेस वापरायच्या...

सही !!

व्वॉव! मस्त दिसतय हे Happy

वेळ मिळताच करुन बघणार.

पन इथे केमिस्ट कडे झिंक ओक्साईड मिळेल का (आणि ते पण ओव्हर द काऊंटर) बघायला पाहिजे नाहीतर देशवारीत आणायला लागेल...

Pages

Back to top