विसरलोच असतो...

Submitted by विजय देशमुख on 3 July, 2013 - 22:52

"या.."
"अरे वैनी, कश्या आहात?"
"मी मजेत, तुम्ही सांगा"
"हो विसरायच्या आधीच सांगुन टाकतो. नेहमी मी विसरतो म्हणतात सगळे, शैलेशचा निरोप आहे, की त्याला यायला उशीर होईल."
"का? काय झालं"
"काही नाही तो परिक्षेची तयारी करतोय. कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन आहे न..."
"हं. उगाच लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. "
"अहो तो खुप चांगल्या पद्धतीने करतो हे काम, अर्थात मी आहेच त्याच्या मदतीला, पण आज सुलुसोबत बाहेर जायचं म्हणुन लौकर आलो."
"त्या भेटल्या का तुम्हाला?"
"नाही, ती ब्युटीपार्लरला जाणार होती, येईलच... तुम्हाला सांगीतलं नाही का?"
"हो सांगीतलं होतं, पण मला जमलं नाही, थोडी सर्दी झालिय ना..."
"ओह, ओके."
"घ्या पोहे ..."
"अरे वा..."
"आणि आल्याचा गरमागरम चहा..."
************
"सुलु आली नाही अजुन"
"येतील इतक्यात... पार्लरला गर्दी असेल"
"पोहे एकदम मस्त झालेत हं, सुलुला पण शिकवा कधीतरी"
"हं काहीतरीच काय"
"अहो खरच वैनी. आणि त्यात दुसर्‍याच्या घरात पोहे आणि चहा करणे गंमत नाही, मला तर स्वत:च्या घरात वस्तू सापडत नाही"
"दुसर्‍याच्या घरात?"
"हो, म्हणजे तसं हेही घर तुमचच म्हणा... शैलेश काय परका थोडीच आहे मला."
"अहो भाउजी, हा आमचा फ्लॅट आहे, २०३, तुमचा फ्लॅट वरच्या मजल्यावर आहे, ३०३"
"अरे देवा... म्हणजे सुलु घरी वाट पहात असेल... मेलो...."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy