यावेळेस स्टेप्ससहितः
बेस कलर्सची पायरी क्र. १
साध्या पेन्सिलने पक्ष्याची आउटलाईन आणि वैशिष्ट्ये रेखाटली. मग त्यात बेस कलर्सचा पहिला लेयर दिला. आवश्यक तिथे रंग गडद केले किंवा कागदाचा भाग पांढराच (अनटच्ड) ठेवला. (उदा. डोळ्याभोवतालील भाग)
रंग भरण्यास सुरुवात केली. त्या त्या भागासाठी ३, ४ किंवा जास्त शेड्सचा वापर केला. उदा. नीळे डोके, पंख यासाठी ट्रू ब्ल्यू, लाइट अॅक्वा, इंडीगो ब्ल्यू इ. शेड्स, केशरी भागासाठी कॅनरी यलो, स्पॅनिश ऑरेंज, कार्माइन रेड, क्रिमसन रेड इ. शेड्स वापरल्या.
लेअरींग पद्धतीने आवश्यक त्या गडद भागांसाठी रंगांचे जास्त लेअर्स चढवले. अपवादात्मक जागा सोडल्यास काळा रंग वापरलाच नाही. फक्त डोळा व त्याभोवतालच्या रेघांसाठी मुख्यतः इंडीगो ब्ल्यू आणि काळा रंग वापरला. डोळ्यातील प्रकाशबिंदूसाठी जागा सोडली होती. या व इतर बारीक कामांसाठी व्हेरीथीन पेन्सिल्स वापरल्या.
चित्र पक्षी, बांबू आणि वाटी या क्रमाने रंगवले. बॅकग्राऊंड सर्वात शेवटी रंगवली. बरेच कलर पेन्सिल आर्टीस्ट्स सर्वात आधी बॅकग्राउंड रंगवून घेतात व सबजेक्ट नंतर. मी अजून असं करुन पाहिलं नाहिये. इंडीगो ब्ल्यू ही एक अफाट शेड आहे. डार्कर भागांसाठी पर्फेक्ट.
या चित्रासाठी तुलनेने पातळ कागद (94gm2 ) वापरला. चित्राचा आकार ९" बाय ११" आहे.
माध्यमः प्रिझमाकलर प्रीमीयर आणि प्रिझमा व्हेरीथीन पेन्सिल्स.
फेसबुकवरील इशान हातेकर फाउंडेशन पेजवर त्यांच्याकडील सुंदर पेट्सची छायाचित्रे अपलोड होत असतात. त्यांच्या 'युक्लीड' या सुंदर मकाव पक्ष्याचे चित्र पाहिल्यावर त्याचे रेखाटन करायचा मोह मला आवरला नाही. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आनंदाने स्केच काढण्याची परवानगी दिल्याबद्दल Ishan Hatekar Foundation चे विशेष आभार!
अमेझिंग आहेस तू!!रंग काय
अमेझिंग आहेस तू!!रंग काय देखणे आहेत या चित्रातले!
सगळंच चित्रं अप्रतिम आहे, पण मला बॅकग्राउंड पण इतकी आवडलीय! ठिपके ठिपके काढून रंगवली आहेस का गं? आय अॅम व्हेरी क्युरिअस..
मस्त मस्त ! त्या लिंकवर
मस्त मस्त !
त्या लिंकवर माउड्यांची बाळं काय गोडुली आहेत
मस्त !
मस्त !
अमेझिंग!!!! _/\_ रंग काय
अमेझिंग!!!! _/\_
रंग काय सुंदर उतरलेत... आणि डोळ्यात जीव दिसतो आहे अगदी ...
वर्षु दी मस्तच गं..
वर्षु दी मस्तच गं..
व्वा...... सुरेखच !!
व्वा...... सुरेखच !!
सुंदर
सुंदर
वर्षा, हे चित्रं बेस्ट आहे
वर्षा, हे चित्रं बेस्ट आहे आतापर्यंतच्यात
वा! अप्रतिम चित्र आहे वर्षा.
वा! अप्रतिम चित्र आहे वर्षा. मस्तच
सुरेख! शेवटचा तयार चित्राचा
सुरेख! शेवटचा तयार चित्राचा फोटो सुंदर आहे. कमाल!
खूप सुंदर स्टेप बाय स्टेप
खूप सुंदर
स्टेप बाय स्टेप आणी माहितीबद्दल विशेष आभार्स!!!!!!>>>> +१
अ प्र ति म चित्र आणि
अ प्र ति म चित्र आणि स्टेप्सही!
खूपच सुंदर !!!!
खूपच सुंदर !!!!
अहाहा! फार सुंदर!
अहाहा! फार सुंदर!
सर्वांना धन्यवाद! >>पण मला
सर्वांना धन्यवाद!
>>पण मला बॅकग्राउंड पण इतकी आवडलीय! ठिपके ठिपके काढून रंगवली आहेस का गं?
बस्के, नाही गं. ठिपके काढून खूप वेळ लागेल.
कागदाच्या टेक्स्चरमुळे बॅकग्राउंड अशी दिसते. यासाठी पेन्सिल कागदाच्या पृष्ठभागाला बरीचशी समांतर पकडायची आणि एका दिशेने (उदा. डाव्या कोपर्यातून उजव्या कोपर्याकडे) हलके स्ट्रोक्स देऊन तो भाग भरुन घ्यायचा. मग त्याच किंवा दुसर्या रंगाच्या पेन्सिलने विरुद्ध दिशेत, उजव्याकडून डाव्याकडे स्ट्रोक्स देऊन रंग भरायचे. अर्थात हे रंग भरणे युनिफॉर्म झाले पाहिजे, पेन्सिलीवरचे प्रेशर कमी-जास्त करु नये. दोन-तीन रंगांचे लेयर्स अशा पद्धतीने चढले की असं टेक्स्चर दिसतं. पोपटाच्या रंगकामात (पेन्सिल समांतर न पकडता) पेन्सिलीच्या पॉइंटचाच वापर मुख्य आहे.
सुंदर!
सुंदर!
सुन्दर.
सुन्दर.
मस्तच जमलय..
मस्तच जमलय..
अप्रतिम
अप्रतिम
जबरीच !
जबरीच !
सुंदर!
सुंदर!
अ प्र ति म ! विशेषतः
अ प्र ति म !
विशेषतः पक्ष्याचा डोळा, पाय , वाटी आणि रंगसंगती अतिशय छान जमली आहे.
ओह असं होय. सही आहे! (अवघड पण
ओह असं होय. सही आहे! (अवघड पण आहे, पण ते आम्हाला!)
अप्रतिम जमलंय वर्षा.
अप्रतिम जमलंय वर्षा.
सर्वांचे खूप आभार!
सर्वांचे खूप आभार!
भारी!
भारी!
Pages