रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड'

Submitted by वर्षा on 25 June, 2013 - 05:44

यावेळेस स्टेप्ससहितः
बेस कलर्सची पायरी क्र. १

साध्या पेन्सिलने पक्ष्याची आउटलाईन आणि वैशिष्ट्ये रेखाटली. मग त्यात बेस कलर्सचा पहिला लेयर दिला. आवश्यक तिथे रंग गडद केले किंवा कागदाचा भाग पांढराच (अनटच्ड) ठेवला. (उदा. डोळ्याभोवतालील भाग)

पायरी क्र. २

रंग भरण्यास सुरुवात केली. त्या त्या भागासाठी ३, ४ किंवा जास्त शेड्सचा वापर केला. उदा. नीळे डोके, पंख यासाठी ट्रू ब्ल्यू, लाइट अ‍ॅक्वा, इंडीगो ब्ल्यू इ. शेड्स, केशरी भागासाठी कॅनरी यलो, स्पॅनिश ऑरेंज, कार्माइन रेड, क्रिमसन रेड इ. शेड्स वापरल्या.

पायरी क्र. ३

लेअरींग पद्धतीने आवश्यक त्या गडद भागांसाठी रंगांचे जास्त लेअर्स चढवले. अपवादात्मक जागा सोडल्यास काळा रंग वापरलाच नाही. फक्त डोळा व त्याभोवतालच्या रेघांसाठी मुख्यतः इंडीगो ब्ल्यू आणि काळा रंग वापरला. डोळ्यातील प्रकाशबिंदूसाठी जागा सोडली होती. या व इतर बारीक कामांसाठी व्हेरीथीन पेन्सिल्स वापरल्या.

शेवटः

चित्र पक्षी, बांबू आणि वाटी या क्रमाने रंगवले. बॅकग्राऊंड सर्वात शेवटी रंगवली. बरेच कलर पेन्सिल आर्टीस्ट्स सर्वात आधी बॅकग्राउंड रंगवून घेतात व सबजेक्ट नंतर. मी अजून असं करुन पाहिलं नाहिये. इंडीगो ब्ल्यू ही एक अफाट शेड आहे. डार्कर भागांसाठी पर्फेक्ट.

या चित्रासाठी तुलनेने पातळ कागद (94gm2 ) वापरला. चित्राचा आकार ९" बाय ११" आहे.
माध्यमः प्रिझमाकलर प्रीमीयर आणि प्रिझमा व्हेरीथीन पेन्सिल्स.

फेसबुकवरील इशान हातेकर फाउंडेशन पेजवर त्यांच्याकडील सुंदर पेट्सची छायाचित्रे अपलोड होत असतात. त्यांच्या 'युक्लीड' या सुंदर मकाव पक्ष्याचे चित्र पाहिल्यावर त्याचे रेखाटन करायचा मोह मला आवरला नाही. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आनंदाने स्केच काढण्याची परवानगी दिल्याबद्दल Ishan Hatekar Foundation चे विशेष आभार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!!!!!!!!!!!!!!!! Happy

फुल्ल कॉपी जरी मारली तरी मी आता चित्रकलेत पास होणार नाहीच.

किती सुंदर..

( असं स्टेप बाय स्टेप दिल्याने, आपल्याला जमू शकेल असा फाजिल विश्वास मात्र वाटला ! पण ते शक्य नाही, ते पण लगेचंच कळलं. )

सुपर्ब ! डोळा कसला भारी आलाय , मस्त ३ डी इफेक्ट जमलाय! पिसं सही !
वाटीचा बॅलन्स कसला साधलाय्स ! हॅट्स ऑफ टू यू डिअर Happy

सर्वांचे खूप खूप आभार.
ती वाटी बहुतेक खिळ्यासारख्या कशानेतरी ठोकली/बसवली असावी असं नंतर फोटो अधिक बारकाईने बघितल्यावर दिसलं पण तोपर्यंत माझं चित्र पुढे गेल्याने तो खिळा काढला नाही.

Pages