कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाsssssल आली. बाईंची बाहुली एकदम गोड आहे. भावी मायबोलीकरणीचे पुरेपुर गुण आहेत. लालूच्या लेकींशी मस्त दोस्ती झाली. भरपूर खाणं, गप्पा, हशा, बुवांच्या फिरक्या घेणे, सां. का....
पुढचा कल्लोळ.... बुवा, सांगा हो कुठे करणार आहोत ते...

वसंता झाल्यावर नोंदणी कमी कशी दिसते आहे? कोण ते वरातीमागून गळालेलं? Proud

मज्जा एके मज्जा आली! वेदरमुळे जरी रात्रीच्या मुक्कामाची जागा बदलली (म्हणजे बसऐवजी शोनूच्या घरात :P) तरी गप्पा/गॉसिप्स/खाणं यथासांग झालंच. (अंजलीला आणि होस्टीणबाईंना बाइट्स मिळाले नाहीत इतकंच. :P)
जेवण सगळंच सुंदर होतं, पण त्यातही ग्रिल आयटम्स (आयटम हे नाव सार्थ करत!) भल्तेच ... 'हे' होते.
आदित्यला ग्रिल्ड चिकनची साद्यंत रेसिपी हवी आहे.

लेकीला सांभाळायला सगळ्या काक्वा आणि काका असल्यामुळे माझं खाणंपिणं अगदी व्यवस्थित झालं. Proud Happy

>>लेकीला सांभाळायला सगळ्या काक्वा>> वसंता झाल्यावर आणि बशीतून उतरल्यावर आम्ही मावशांच्या काक्वा झालो काय??

पुढच्या गटगला लांबचा पल्ला गाठायचा आहे. मृकडे फ्लोरिडाला via कॅरोलायना म्हणे. Proud
पुढच्या स्प्रिंगमध्ये जायचं ठरल्यास तुम्ही (देसाई) इथे असाल की भारतात हे आत्ताच बघून कन्फर्म करा.

नाही नाही, पार्ल्याक्वा आणि पार्लेकाका असं म्हणत होते.
(फार बुवा एक्स्प्लेन करावं लागतं! :P)

बुवांचं कौतुक करायचं राहिलं. एवढी मोठी गाडी काक्वांच्या गदारोळातही कॉन्फिडन्टली हाकत होते! Happy
(झालं कौतुक. :P)

योबे, शर्यतीत कोणी भाग घ्यायचाय ह्यावर चर्चा करायला वेगळा बीबी ओपन झाला की कळेलच Wink
मागे एकदा बर्फातल्या फोटोतली कॅनी लहान दिसत होती पण आता चांगली मोठी झाली आहे. (अगदी एवढीशी असताना पाहिली होती हो!!!) येता जाता मायबोलीकरांना शेपटीचे फटकारे मारुन हम भी कुछ कम नहीं हे दाखवत होती. Wink

>>पुढच्या गटगला लांबचा पल्ला गाठायचा आहे. मृकडे फ्लोरिडाला via कॅरोलायना म्हणे.

अय्या, असं आहे का? Proud बरं, घेतला वसंत! सगळ्या वसंतखोरांना फ्लोरिड्याचं आमंत्रण. बुवा त्यांच्या शब्दांत सांगायचं तर, 'बुंगाट' गाडी हाकत बारातून संत्र्याच्या बागेत आणतील! मधे कॅरोलायना कधी आलं आणि गेलं कळणार नाही. Proud

मजा आली!
ह्यावेळी मुख्य वसंतात आम्ही (बारा-फिलीकर) साधारण ५-६ तास असू पण वसंता आधीच्या आणि नंतरच्या मोसमातच (किंवा मोशनातही म्हणता येइल) जवळ जवळ १० तास होतो. त्यात शोनूकडचे लेओवर गटग बोनस! एकंदरित पर्वणी होती.

शोनूच्या उत्साह आणि अगत्य ह्याबद्दल मी वेगळं काय सांगावं? आम्ही रात्री ९ पर्यंत जर्सीतच प्यासिंजरं उचलित होतो आणि तिकडे तिची रात्री पेन्सिल्वेनियातून ड्राईव करुन कुठे तरी मॅरीलँडमध्ये आम्हाला गाठायची तयारी होती. पुढे तो सगळा बेत रद्दच झाला त्यामुळे बस डायरेक शोनूकडेच वळवली. अ‍ॅडवान्स नोटीस, १ तास. नोटिसचा मजकूरः "शोनू, आम्ही तुझ्याकडेच थांबतो रात्री आज".
आता फक्त तिच्या घरी जाऊन पाहुणचार झोडणार्‍यांना तिनी तिच्या घराच्या स्पेअर चाव्या वाटप करणे बाकी राहिलय! Happy
धन्यवाद वगैरे म्हणणे म्हणजे तिच्या प्रेमाची, अगत्याची अवहेलना केल्या सारखं होईल.

गाडीत नेहमची धमाल होतीच. खाणे आणि गप्पा! वृंदाताईंच्या पिशवीतून जे काही पदार्थ निघाले ते खाऊन माझा डोकवू पाहत असलेला सिक्स पॅक परत दडी मारुन बसला ह्याबद्द्ल मला त्यांच्यावर लाडिक संताप झालाय. Happy
बारक्याला कंटाळा येऊन तो त्रास देइल असं वाटलं होतं पण अदित्यनी वेळोवेळी त्याच्याशी खेळून, गप्पा मारुन खुप भार हलका केला. मोठ्या लोकांची ट्रिप म्हंटलं की सहसा वैताग करतात मुलं त्यांच्याशी कोणी बोलत नाही म्हणून. परतीच्या प्रवासात शोनूही सामिल झाली बारक्याशी खेळण्यात. (पोर सुट्टीला तिच्याकडेच पाठवायचा अत्यंत सेल्फिश विचार ही मनात येऊन गेला).

आता वसंता कडे वळू. खाण्या पिण्याबद्दल नवीन काही सांगायला नको (तुडूंब खाललं येवढच सांगतो), बाकी तिकडे चित्रमय वसंता आहेच साक्षीला.
बाकी ह्यावेळी लोलाच्या मुली घरातच असल्यामुळे मजा आली . लोला, बारक्याला कॅनी खुपच आवडली! काल-आज तिनी पोट बिघडल्याची तक्रार केली असेल तर त्याला जवाबदार बारक्या आहे ह्याची मी कबूली देतो. ती नाही म्हणत असताना सुद्धा हे तिला बिस्किटं भरवत होतं. तुझा लहाना शेवटी रागावला त्याला! Lol

ह्यावेळी बसून फार गप्पा जरी नाही झाल्या तरी "आयडी ओळखा" खेळात खुप मजा आली! क्रेडिट मैत्रेयीला, हा खेळ सुचवल्यामुळे.
(क्रमशः..)

>>
बस डायरेक शोनूकडेच वळवली. अ‍ॅडवान्स नोटीस, १ तास. नोटिसचा मजकूरः "शोनू, आम्ही तुझ्याकडेच थांबतो रात्री आज".
आता फक्त तिच्या घरी जाऊन पाहुणचार झोडणार्‍यांना तिनी तिच्या घराच्या स्पेअर चाव्या वाटप करणे बाकी राहिलय! स्मित
धन्यवाद वगैरे म्हणणे म्हणजे तिच्या प्रेमाची, अगत्याची अवहेलना केल्या सारखं होईल.
<<
+१०० Happy

(बाकी काय राहिलंय? गराज डोअरचा कोड दिला की! :P)

होय की. गराज कोड दिलाय मग स्पेअर किल्ल्या कशाला हव्यात? तसंही मला तिची डेव्हलपमेंप, त्याकडे जाणारा रस्ता रिसॉर्ट छाप वाटलाय आणि भयंकरच आवडलाय, कोडही आहेच तेव्हा..

>>अ‍ॅडवान्स नोटीस, १ तास. नोटिसचा मजकूरः "शोनू, आम्ही तुझ्याकडेच थांबतो रात्री आज".>> खरंच. आणि बंदुक बाईंच्या खांद्यावर Proud

वृंदाताईंच्या पोतडीतून थोड्या थोड्या वेळाने इतके निरनिराळे चवदार पदार्थ निघत होते की त्यांना काहीतरी जादू अवगत आहे असा माझा सौंशय आहे. एका नॉर्मल माणसाला इतके पदार्थ छान करता येणं अशक्य आहे. Happy

(मी आज ना उद्या त्यांचा मॅजिक वाँड ढापणार. :P)

अर्र, कशाला लाजवताय. दहीभात मैत्रेयीने आणलेला, सकाळी चहा बाईंनी केला . मी गराज कोड देण्याव्यतिरिक्त काही केलेलं नाही.
मला जाता येता राइड मिळाली, खायला , प्यायला, गप्पा करायला मिळाल्या. एकटीने ३००-४००मैल गाडी चालवण्यातून सुटका मिळाली. मीच बाराबशीला थँक्स म्हणायला हवं

शिवाय मोगरा अन तुळस घरपोच मिळाले तो बोनस वेगळाच

>>मी आज ना उद्या त्यांचा मॅजिक वाँड ढापणार>> वाँडमध्ये काही नाही हो बाई. सगळी हाताची चव आहे बघा Proud
वृंदाताई, ते बर्फीसारखं काय करुन आणलं होतंत त्याची रेसिपी द्या की. बेसनाच्या वड्याही अफलातून होत्या.

बेसनाच्या वड्याही अफलातून होत्या.>>>>+१

मी आज ना उद्या त्यांचा मॅजिक वाँड ढापणार>>>>> स्वाती, गेट इन लाईन Proud

सगळ्या वसंतखोरांना फ्लोरिड्याचं आमंत्रण>> मृ नविन बाफ काढ. 'आ व संत्रा घ्या' Happy

आम्हाला मिळाला नाही, NJ करांनी गाडीत संपवला.
बेसनाच्या वड्यांचं आधी नुसतंच कौतुक ऐकलं. कुठे आहेत विचारल्यावर संपल्या म्हणून सांगितलं. मग जरा आरडा ओरडा केल्यावर बुवांनी हळूच बसमधून काढून आणल्या. काक्वांनी त्याबद्दल त्यांना फैलावर घेतलं असण्याची शक्यता आहे ;).

Pages