कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वसंताचा मेनू
आयटम -
१. आख्खा मसूर. (मोहरी नसलेला)

क्रमशः

(खरा मेनू फक्त मलाच माहीत असल्याने बाकी कोणी काही लिहीले तर विश्वास ठेवू नये. धन्यवाद.)

>>
१. आख्खा मसूर. (मोहरी नसलेला)>> अख्ख्या मसूराला 'चवळी' म्हणतात का? असे गावंढळ प्रश्नही विचारु नयेत. उत्तर मिळणार नाही.

ढकला... दही लावा, ताक लावा, ताकाला तूर लावा.. पण पुढे सरका...
नाहीतर मॄणची आठवण काढा...
बारा त नसला म्हणून काय? ए वे ए ठि तर आहे.. Happy

>> खरा मेनू फक्त मलाच माहीत असल्याने बाकी कोणी काही लिहीले तर विश्वास ठेवू नये.
ही सूचना कोणासाठी आहे? Proud

तर सांस्कृतिक कार्यक्रमांत एम्टीने 'चित्रावरून आयडी ओळखा' हा खेळ सुचवला आहे.

चित्रं काढून आणायची की आयत्या वेळी काढायची? Proud

ए ए नो चीटिंग. आयत्या वेळी चिठ्ठी उचलून मग त्याप्रमाणे चित्रं काढावी लागतील. लालू तुझ्याकडे इरेझेबल बोर्ड अन ड्राय इरेज मार्कर्स आहेत का? नसल्यास कागद- पेन्स वापरू. चिठ्ठ्या मी आणू शकते करून, किंवा इतरांनी पण आणा अन मग आपण एकत्र करू.

हे कुठले आयडी असणार आहेत. ए.वे.ए.ठी.चेच का माबोवरचे कुठलेही.
आणि आयडी माहीत नसेल तर काय चित्र काढायच. Happy

चिठ्ठ्या उचलून होय! बरं बरं.

>> आणि आयडी माहीत नसेल तर काय चित्र काढायच.
तर 'काकू मला वाचवा' असं ओरडत खोलीला एक फेरी मारायची. Lol

मस्त गेम आहे हा. मला माझ्या पहिल्या बारा जिटिजीची आठवण झाली. भाईंनी आणि आणखिन कोणीतरी मिळून प्रश्नपत्रिका काढली होती. अवॉर्ड म्हणून "मायबो-लिकर", कोणाला बरं मिळाली होती? बाई, तुम्हाला का?
लालू (तेव्हाचा आयडी आणि व्यक्ती) नृत्याचा कार्यक्रम करणार होती पण तसं काही न करता तिनी जिटिजि संपता संपता फक्त टांग मारली म्हणजे... एक हात आणि एक पाय झोकात कथ्थक च्या स्टाईल मध्ये फिरवून एक पोज दिली होती.

हो.

तेच हे ए वे ए ठि ना, ज्यात आधी कुणीतरी भेळ आणणार हे ठरले असताना बुवा म्हणाले होते "मीसुद्धा भेळ आणली तर चालेल ना? " Lol

तो नसवा मै. मी तेव्हा मिसळ आणली होती. पण हा प्रसंग आठवतोय मला. नंतर कुठ्ल्याशा एवेएठि दर्म्यान झाला होता. तो माझा दादागिरीचा पहिला अनुभव होता. Proud

मैच्या कम्युनिटी सेंटरमधलं माझंपण पहिलं ए वे ए ठी होतं. शिंडीबाय घेऊन आली होती. तिच्या बाळानी सॉफ्टड्रिंकमधे बुडवून आणि झक्कींनी कॅमेर्‍याच्या डोळ्यापासून चोरून आपआपला लाडू खाल्ला होता. Proud (झक्कींचा लाडू खातानाचा फोटो आहे. :P) आणि देसायांनी पावभाजी सांडली असं सांगून व्हेज बिर्यानी आणली होती. कुणीही वास घेऊन सांडल्याची खात्री करायला कारपाशी गेलं नाही. रॉणीचं उकळतं रंपा आणि बुवांची हनी (व्होडका) पॉप्युलर आयटम होते.

>>मृण आली होती त्या वेळी - तिला प्रत्यक्ष प्रथम तेव्हा भेटले मी.
यानंतर स्वातीला, 'भ्रमनिरास' रागातलं काहीतरी म्हणायचंय असं का वाटतंय? Proud

>> यानंतर स्वातीला, 'भ्रमनिरास' रागातलं काहीतरी म्हणायचंय असं का वाटतंय?
नाही, हट्टी कानडा. Proud

>>हट्टी कानडा Lol

>>तो माझा दादागिरीचा पहिला अनुभव होता.
कोणी केली होती बुवांवर दादागिरी? तरीच तेव्हा त्यांनी खुदाई खिन्नतेनं गाणं म्हंटलं होतं. Proud

Pages