आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
जाने कैसे कब कहा इकरार हो
जाने कैसे कब कहा इकरार हो गया
हम सोचते ही रह गये ओर प्यार हो गया
जाई, नाही. क्लू १: ती
जाई, नाही.
क्लू १: ती दस्तुरखुद्द जिप्सीच्या प्रेमात पडलीये.
जिप्सी, तू ओळखलेस तरी चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह असे काय
ओह
असे काय
माधव, कोडं आवडलं. उत्तर
माधव, कोडं आवडलं.
उत्तर शोधते.
५/४५ हम बंजारों कि बात मत
५/४५
हम बंजारों कि बात मत पूछो जी
जो प्यार किया, जो प्यार दिया
किरण, जवळ आहेस. पण हे
किरण, जवळ आहेस. पण हे नाही.
जिप्स्याशी का कोणी नफरत करेल? तो तर 'बिच्चारा' आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कोडं ५/४६ एक फेव्हिस्टीकची
कोडं ५/४६
एक फेव्हिस्टीकची बॉटल, एक केळं आणि एक प्रश्चचिन्ह यांची आपसात घनिष्ट मैत्री असते. केळाचे नाव अ असते. केळं आणि प्रश्चचिन्ह यांना एकमेकांवाचून अजिबात करमत नसते. ते तिघे एकदा बस भाड्याने घेऊन फिरायला जायचं ठरवतात. पण जायच्या एक दिवस आधी प्रश्चचिन्ह आणि अ मधे बेबनाव होऊन ठरल्या दिवशी फक्त अ आणि डिंकाची वाटली हेच बसमधून प्रवासाला निघतात. अ ला मनातून दु:ख झालेलं असतं ते पाहून डिंक कुठले गाणं म्हणेल ?
अकेले है तो क्या गम है चाहे
अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बसमे क्या नही
करेक्ट
करेक्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाने कहा मेरा जीगर गया जी अभी
जाने कहा मेरा जीगर गया जी अभी अभी यही था किधर गया जी
जिप्सीण प्रेमात पडल्यावर
जिप्सीण प्रेमात पडल्यावर जिप्सीला काय वाटलं? त्यावरून गाणं ठरेल.
हे आहे का?
इतना ना मुझसे तू प्यार बढा, के मै एक बादल आवारा.
कैसे किसीका सहारा बनू के मै खुद बेघर बेचारा. (त्या बिचारा, जिप्सी इत्यादी क्लूवरून.)
श्रद्धाला खेकडा भजी आणि सोबत
श्रद्धाला खेकडा भजी आणि सोबत आलं घातलेला वाफाळता चहा.
०५/०४५
शेवटी व्हायचं तेच झालं. जिप्सीण जिप्स्याच्या प्रेमात पडलीच. तेंव्हाच्या त्यांच्यातल्या संवादासाठीच हे गाणे लिहिले असावे. ओळखा.
उत्तरः
इतना ना मुझ से तू प्यार बढ़ा, के मैं एक बादल आवारा
कैसे किसी का सहारा बनू, मैं खुद बेघर बेचारा
इसलिए तुझ से मैं प्यार करू, के तू एक बादल आवारा
जनम जनम से हूँ साथ तेरे, हैं नाम मेरा जल की धारा
मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं
मेरा साथ कहा तक दोगी तुम मैं देस बिदेस का बंजारा (जिप्सी)
ओ नील गगन के दीवाने, तू प्यार ना मेरा पहचाने
मैं तब तक साथ चलू तेरे, जब तक ना कहे तू मैं हारा
क्यों प्यार में तू नादान बने, एक पागल का अरमान बने
अब लौट के जाना मुश्किल हैं, मैने छोड़ दिया हैं जग सारा
आणा आणा चहा आणि भजी.
आणा आणा चहा आणि भजी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं म्हणजे ये मौसम का जादू है
खरं म्हणजे
ये मौसम का जादू है मितवा
न अब दिल पे काबू है मितवा
हे गाणंही सूट होतंय. कारण या गाण्यात ते जिप्सीतून चाललेले असतात![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कोडं क्र. ०५/४७ गजबरावांना
कोडं क्र. ०५/४७
गजबरावांना लॉटरीचं तिकीट लागलं. त्यांनी एक जंगी पार्टी ठेवली. बॉल डान्स, ऑर्केस्ट्रा, गेम्स, सी फूड, डेझर्ट्स इ. इ. नुसती रेलचैल होती खाण्याची. एका कोप-यात अॅम्फीथिएटरमधे आजचा दिवस माझा हा सिनेमा दाखवण्यात येत होता. त्या दिवशी या नावाचा सिनेमा दाखवल्याबद्दल सर्वांनाच कौतुक वाटलं. सिनेमा पाहताना अ या केळ्याला खूप मौज वाटत होती. इतर लोकही आपल्यासारखेच एन्जॉय करताहेत का हे पाहण्यासाठी बाजूला पाहीले तर शेजारीही एक केळं होतं. अ ने त्याला नाव विचारलं तर त्याचंही नाव अ च होतं. अ ला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला. त्याने या दुस-या अ ला मजा येतेय ना असं विचारलं. तर दुसरा अ कुठलं गाणं म्हणेल ?
अकेले हम अकेले तुम जो हम तुम
अकेले हम अकेले तुम
जो हम तुम संग है तो फिर क्या गम
श्रद्धा, त्यातली थोडी भजी
श्रद्धा, त्यातली थोडी भजी इकडे पण पास कर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव, मस्त कोडं.
चहा आणिक भजी (मस्त पावसाळी
चहा आणिक भजी (मस्त पावसाळी हवा आहे )
केदार... थो SSS डंसं अजून
केदार... थो SSS डंसं अजून ट्राय कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी तर खरंच चहा भजी घेतोय
मी तर खरंच चहा भजी घेतोय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गजब का है दिन, सोचो जरा ये
गजब का है दिन, सोचो जरा
ये दीवानापन देखो जरा
तुम हो अकेले, हम भी अकेले
मजा आ रहा है, कसम से, कसम से
झिलमिल अचूक नेम हं
झिलमिल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अचूक नेम हं
कोड्याचं पीठ मळताना त्यात
कोड्याचं पीठ मळताना त्यात चिमूटभर विनोदाचं मीठ पण टाकलं तर मजा येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०५/४८ डॉ. आशिष
कोडं क्र. ०५/४८
डॉ. आशिष पराडकर एक अत्यंत नावाजलेला भौतिकशास्त्रातला संशोधक. स्वतःच्या प्रयोगशाळेत दिवसरात्र नवनविन क्रांतिकारी शोध लावण्यात मग्न. त्याचं त्याच्या बायकोवर अतिशय प्रेम. त्यामुळे जेव्हा तिला हृदयाचा विकार असल्याचं निदान झालं त्यावेळी तो अतिशय दु:खी झाला. योगायोगानं त्याचं एक अद्भुत संशोधन नुकतंच पूर्ण झालं होतं आणि त्यायोगे तो माणसाचा आकार कितीही लहान करू शकत होता. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून येऊ शकत होती. दुर्दैवानं त्याच्या घरातच पहिला प्रयोग करण्याची वेळ त्याच्यावर आली.
आशिष पराडकरनं प्रयोगाची पूर्ण तयारी केली. पेशंटच्या शरीरात शिरून तिच्या हृदयावर अॅक्च्युअल शस्रक्रिया करण्याकरता डॉ. कदमांना तयार केलं.
दोघेही लहान होऊन एका कॅप्सुल मध्ये जाऊन बसले. मिसेस पराडकरांनी ती कॅप्सुल गिळली. आत गेल्यावर डॉ कदम हृदयात जाऊन त्यातला दोष निवारण करण्याचं काम करू लागले आणि दोघेही आत नको, काही इमर्जन्सी आली तर एकतरी बाहेर हवा असा विचार करून आशिष मिसेस पराडकरांच्या छातीच्या पिंजर्यांमधून फिरत त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता, सुचना देत होता.
शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि यशस्वीही झाली. नंतर या अनुभवाबद्दल आशिषनं बायकोला विचारलं असता तिनं एक गाणं म्हणून त्यावेळी कसं वाटत होतं हे सांगितलं. तर ते गाणं कोणतं?
आप यूं फासलों से गुजरते
आप यूं फासलों से गुजरते रहे
दिल से कदमोंकी आवाज आती रही..
मामी, मस्त होतं कोडं. श्रद्धा
मामी, मस्त होतं कोडं. श्रद्धा __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, मस्त कोडं. श्रद्धा,
मामी, मस्त कोडं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा, सह्हीए
येस्स्स........ श्रद्धाला
येस्स्स........ श्रद्धाला पंचपक्वान्नांचं ताट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे गाणं युट्युबवर बघताना 'फासले' शब्दावरून कोडं बनवता येईल असं अचानक डोक्यात आलं आणि मग विचारशक्तीला कामाला लावताना मज्जाच आली.
कोडं आवडल्याबद्दल धन्यवाद.
कोडं क्र. ०५/४८
डॉ. आशिष पराडकर एक अत्यंत नावाजलेला भौतिकशास्त्रातला संशोधक. स्वतःच्या प्रयोगशाळेत दिवसरात्र नवनविन क्रांतिकारी शोध लावण्यात मग्न. त्याचं त्याच्या बायकोवर अतिशय प्रेम. त्यामुळे जेव्हा तिला हृदयाचा विकार असल्याचं निदान झालं त्यावेळी तो अतिशय दु:खी झाला. योगायोगानं त्याचं एक अद्भुत संशोधन नुकतंच पूर्ण झालं होतं आणि त्यायोगे तो माणसाचा आकार कितीही लहान करू शकत होता. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून येऊ शकत होती. दुर्दैवानं त्याच्या घरातच पहिला प्रयोग करण्याची वेळ त्याच्यावर आली.
आशिष पराडकरनं प्रयोगाची पूर्ण तयारी केली. पेशंटच्या शरीरात शिरून तिच्या हृदयावर अॅक्च्युअल शस्रक्रिया करण्याकरता डॉ. कदमांना तयार केलं.
दोघेही लहान होऊन एका कॅप्सुल मध्ये जाऊन बसले. मिसेस पराडकरांनी ती कॅप्सुल गिळली. आत गेल्यावर डॉ कदम हृदयात जाऊन त्यातला दोष निवारण करण्याचं काम करू लागले आणि दोघेही आत नको, काही इमर्जन्सी आली तर एकतरी बाहेर हवा असा विचार करून आशिष मिसेस पराडकरांच्या छातीच्या पिंजर्यांमधून फिरत त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता, सुचना देत होता.
शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि यशस्वीही झाली. नंतर या अनुभवाबद्दल आशिषनं बायकोला विचारलं असता तिनं एक गाणं म्हणून त्यावेळी कसं वाटत होतं हे सांगितलं. तर ते गाणं कोणतं?
उत्तर :
आप (आशिष पराडकर), यूं फासलों (फासळ्यांतून) से गुजरते रहे
दिल से कदमोंकी आवाज आती रही..
हे गाणं युट्युबवर
हे गाणं युट्युबवर बघताना>>>>>गाण्याचे पिक्चरायझेशन कस्लं बकवास आहे ना.
पण गाण मात्र एक नंबर. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, हो ना. हॉंटिंग
जिप्सी, हो ना. हॉंटिंग म्हणतात तसं आहे हे गाणं आणि व्हिज्युअल इफेक्ट म्हणून एक भूत आणि एक भूतीणही आहेत गाण्यात. गाणं खरंतर बघायचंच नाही, डोळे मिटून ऐकायचं फक्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages