Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
GPO बद्दलही लिहा ना..<<<
GPO बद्दलही लिहा ना..<<< इंद्रा, भाऊ आणि हीरांनाच विनंती केली म्हनून नाहीतर मी पण लिहीले असते.
माझे सासरे तिथे बरीच वर्ष कामाला होते. मुंबईच्या काही इरसाल आठवणी आहेत त्यांच्या..
हीरा, नेहमीप्रमाणेच उत्तम पोस्ट.
नंदिनी, अगं लिही ना प्लीज.
नंदिनी, अगं लिही ना प्लीज.
<< इंद्रा, भाऊ आणि हीरांनाच
<< इंद्रा, भाऊ आणि हीरांनाच विनंती केली म्हनून नाहीतर मी पण लिहीले असते.>> नंदिनी, हा धागा पण GPOच आहे; येऊंद्याच तुमची "पोस्ट" !
नंदिनी, अगं लिही ना प्लीज >>.
नंदिनी, अगं लिही ना प्लीज >>. कान पकडून सांगावे लागणार तर... आता लिव की..
हा धागा पण GPOच आहे; येऊंद्याच तुमची "पोस्ट" ! >
दिनेशदा.. काल उद्धाटन होऊनही फ्री वे आज वाहतुकी करता बंद आहे.. कारण कालचा मंडप अजूनही काढलेला नाही.
मामी, भाऊकाका, जस्ट किडिंग.
मामी, भाऊकाका, जस्ट किडिंग.
जीपीओ चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन शहरांतलं अंतर मोजायला इथून अंतर मोजतात. म्हणजे मुंबई ० किमी हे जीपीओ असणार.
जीपीओने पोस्टामधे सोन्याच्या कॉइन्सची विक्री चालू केली तेव्हा, झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला मी गेले होते. त्यावेळेला जीपीओचं आतून खर्या अर्थाने दर्शन घडलं. पोस्टाने एक तिकीटांचा आल्बम भेट म्हणून दिला होता आम्हा सर्वांना. माझ्या एका कलेक्शन करणार्या आतेभावाला मी तो आल्बम दिला होता.
जीपीओमधे फिरताना विचार आला की, इथे किती घटना घडल्याचे प्रतिसाद आले असतील. किती जन्म, मृत्यू, चांगल्या वाईट घटना यांच्या बातम्या या वातावरणामधे अजून घुमत असतील. तारेचा तो कड्डक्ट्ट आवाज, पोस्टकार्डाचे ते गठ्ठे, अंतरदेशीय (की आंतरदेशीय) पत्राचे ते निळे सुबक आयत, मोठ्या मोठ्या खाकी पाकिटातून पाठवलेली पत्रे, त्या पत्रातल्या प्रत्येक वाक्याचा ध्वनी हे सगळं त्या वातावरणामधे अजूनही जाणवलं होतं. जीएंची, सुनीताबाईंची पत्रं वाचताना, अगदी नुकतंच डॉ. सुप्रिया दिक्षित यांचं पुस्तक वाचताना "पत्र" हा आयुष्यातला किती महत्त्वाचा भाग होता हे जाणवतं. सुखदु:खाची, भल्याबुर्याची , प्रेमाची आणि अनुभवांचे हे संदेश हळूहळू आपल्या आयुष्यामधून गायब होत आहेत. मोबाईल, ईमेल आणि समस यांनी दळणवळणामधे क्रांती केली असली तरी आता ती मजा राहिली नाही हे खरे. नवीन कम्युनिकेशन मीडीया हे उत्तम आहेतच, पण जे काळामागे दडत चालले आहेत.. त्यांच्याविषयी मात्र मनामधे वाईट वाटत राहतं.
हस्तलिखित मजकूर वाचायची, तिचं परत परत पारायणं करायची गंमत वेगळीच असते. खास करून अगदी जवळच्या व्यक्तीच्या पत्रांची. माझ्या आईने मी जन्मायच्या आधी पाठवलेल्या तारेला माझ्या आजोबांनी पाठवलेली तार अजून जपून ठेवली आहे. If its a girl, name her Nandini. Will start from here immediately. If its boy, dont bother to tell me.
माझ्या मामाने बोटीवरून पाठवलेली पत्रे अजून जपून ठेवली आहेत. थोडासा नॉस्टाल्जिया आहेच, पण थोडंसं कुठेतरी भराभरा बदलत्या काळामधे गेलेल्या क्षणांना पकडून ठेवायचा छोटासा प्रयत्न आहेच.
(हे वरचंकाहीपण मुंबईशी संबंधित नाही. उडवू का?)
नको... खरच नॉस्टाल्जिया
नको... खरच नॉस्टाल्जिया
नवीमुंबेइ -----राक
नवीमुंबेइ -----राक बिगिचा,खार् घर---- मस्त------- वा शी पुल ईतर------
जीपीओ चं अजून एक वैशिष्ट्य
जीपीओ चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन शहरांतलं अंतर मोजायला इथून अंतर मोजतात. >>> खरंच? ही माहिती मस्तच आहे.
नको बये, काहीही उडवू नकोस. सगळीच माहिती छान आणि उपयोगी आहे. आजच वर्तमानपत्रात आलंय की 'तार' (टेलिग्राम) ची सेवा जुलै १५ पासून बंद होणार. हल्ली सगळ्यांकडेच मोबाईल असतात त्यामुळे तारेची गरज राहिलेली नाही. बातमी वाचून मी अन नवरा उगाच विचार करत होतो की अगदी दुर्गम प्रदेशात महत्त्वाचा निरोप तातडीनं पाठवण्याची आता काय सोय असेल? तिथे काय करतील? कदाचित तिथल्या त्यातल्या त्यात जवळच्या मोठ्या गावातल्या पोस्टमनच्या मोबाईल वर मेसेज पाठवता येईल अशी काही सोय करता येईल का? असो.
आपल्याला शाळेत असताना, वेगवेगळ्या प्रकारची पत्रं - पोस्टकार्ड, जोडकार्डं, आंतरदेशीयपत्र, हवाईपत्र यांची ओळख असायची. पोस्टाच्या तिकिटावर, पार्सलच्या किंमतीवर, अंतरावर आधारीत गणितं सोडवायला लागायची. आजकालची पोरं यातून सुटलीच की! माझ्या लेकीला पोस्टाच्या तिकीटाची कन्सेप्ट समजून घ्यायला बराच वेळ लागला.
कदाचित तिथल्या पोस्टमनच्या
कदाचित तिथल्या पोस्टमनच्या मोबाईल वर मेसेज पाठवता येईल अशी काही सोय करता येईल का? असो.<<< आता बहुतेक अशी काहीतरी टेलीकम्युनिकेशन सोय आहे. बाबांना विचारेन मी एकदा. मनीऑर्डर पण आता ईलेक्ट्रॉनिकलीच होते.
माझे सासरे- बाबा जेव्हा मुंबई पोस्टात होते तेव्हा ताज हॉटेलमधल्या तार ऑफिसमधे त्यांची ड्युटी असायची. ताज हॉटेलमधे तेव्हा स्पेशल टेलीग्राम ऑफिस होतं. ताजमधे बाबांना चहा लंच वगैरे सर्व मिळायचं म्हणे. रहायला ते सांताक्रूझला होते तिथून गेटवेला रोज जाणंयेणं. पण ते म्हणजे अगदी शुद्ध शाकाहारी वगैरे. बाहेरचं शक्यतो खायचे नाहीत आणि खाल्लं तरी शाकाहारी हॉटेलमधेच. ताजमधे तर व्हेज-नॉनव्हेज असं सर्व असायचं म्हणून ते घरून डबा घेऊन जायचे. आमच्या सासूबाई वैतागाने मला एकदा म्हणाल्या बाईने सकाळी साडेपाचला उठून यांना पोळीभाजी करून द्यायची हे हाटिलात घरचा डबा खाणारे...."
<<If its a girl, name her
<<If its a girl, name her Nandini. Will start from here immediately. If its boy, dont bother to tell me.>> अहो, नंदिनी, तुमच्या लक्षांत येतंय का, सामजिक दृष्ट्या या तारेला काय ऐतिहासिक महत्व आहे तें !
<<पोस्टाने एक तिकीटांचा आल्बम भेट म्हणून दिला होता आम्हा सर्वांना. >> जगभरच्या पोस्ट ऑफिसांचं नवीन स्टँप काढणं व स्टँप कलेक्शन हा एक प्रतिष्ठेचा भाग असतो व तसा तो जीपीओचा पण आहे. "स्टँप कलेक्शन" हा जागतिक छंद असल्याने व जुने दुर्मिळ स्टँप अमूल्य असल्याने याबाबत खूप कडक नियम असतात. खूप वर्षांपूर्वीं एका जागतिक क्रिडास्पर्धेसंबंधातल्या एका छोट्या कमिटीवर काम करताना त्या स्पर्धेच्या निमित्ताने खास स्टँप काढावा म्हणून मी बर्याच वेळां जीपीओत जात असे. असा स्टँप काढण्यासाठीचे निकष बव्हंशी ठरलेले असतात व म्हणून त्या स्पर्धेसाठीं स्टँपऐवजीं फक्त 'फर्स्ट डे कव्हर'च शक्य आहे असं मला नीट समजावून सांगण्यात आलं होतं [ त्या स्पर्धेचं -किंवा इव्हेंटचं -बोधचिन्ह वापरून फक्त मर्यादित नवीन पाकीटं छापलीं जातात व स्पर्धेच्या वेळीं तीं पोस्टातर्फे स्टँप मारून ' फर्स्ट डे कव्हर्स' म्हणून विकलीं जातात. उरलेलीं सर्व पाकिटं सील करून पोस्टाच्या ताब्यांत रहातात. अतिशय मर्यादित पाकिटं असल्याने त्यांचं संग्रह मूल्यही वाढतं.]
त्यावेळी जीपीओच्या पहिल्या मजल्यावरचा हा कक्ष अतिशय छान ठेवला होता व अनेक पर्यटक स्टँप पहाण्यासाठीं व खरेदीसाठीं तेथें येत. भारतीय स्टँपच्या कांहीं सिरीज तर जगभर लोकप्रिय झाल्या आहेत.
भाऊ, आताही जीपीओमध्ये असे
भाऊ,
आताही जीपीओमध्ये असे वेगळे, विशेष स्टँप(गांधीचे सोडुन) विकत मिळतात का?
भाऊकाका, तो आल्बम ओरिजिनल
भाऊकाका, तो आल्बम ओरिजिनल स्टॅम्पचा नव्हता. स्टॅम्प्स प्रिंट केले होते त्यामधे. १८० काहीतरी स्टॅम्प्स होते. बंधुराजे मात्र खुश झाले होते तो अल्बम बघून.
त्यावेळी जीपीओच्या पहिल्या मजल्यावरचा हा कक्ष अतिशय छान ठेवला होता व अनेक पर्यटक स्टँप पहाण्यासाठीं व खरेदीसाठीं तेथें येत. >>> हे बहुतेक मी पाहिलं तेव्हा २००५ च्या दरम्याने पहिल्या मजल्यावर नव्हतं. पण स्टॅम्प्स मात्र पाहिले होते.
त्या बिल्डिंगमधल्या लिफ्ट हा एक स्वतंत्रच विषय आहे.
<< विशेष स्टँप(गांधीचे सोडुन)
<< विशेष स्टँप(गांधीचे सोडुन) विकत मिळतात का? >> ज्या स्टँप्सची विक्री अधिकृतपणे बंद झालेली नाही व ते स्टँप शिल्लक असतील तर मिळत असावेत. पण त्याकरतां त्या विशेष कक्षांत जावून चौकशी करावी लागेल. [ स्टँप , मला वाटतं, मागणी -पुरवठा तत्वावर छापले जात नाहीत. म्हणूनच त्याना संग्रह मूल्य असतं.पण मीं यातला तज्ञ नाहीं, हेंही महत्वाचं.]
<< त्या बिल्डिंगमधल्या लिफ्ट
<< त्या बिल्डिंगमधल्या लिफ्ट हा एक स्वतंत्रच विषय आहे.>> जीपीओच्याच इमारतीच्या बंदराकडील भागात जनरल मॅनेजर [टेलेकॉम्]चं कार्यालय दुसर्या मजल्यावर[ म्हणजे उंचीने आतांच्या बिल्डींग्सचा चौथा-पांचवा मजला] होतं.तिथंही मीं बर्याच वेळां जायचो. तिथली चारही बाजूने फक्त नक्षीदार जाळी व उघडी असलेली लिफ्ट बहुधा लिफ्टच्या पहिल्या पिढीतली असावी. ती इतक्या संथपणे वर खाली करायची कीं तुम्ही लिफ्ट्साठीं थांबलात तर तो लिफ्टमनच तुम्ही लुळे -पांगळे आहात का अशा तर्हेने तुमच्याकडे पहायचा ! पण कधीं वेळ असेल तर मात्र मीं मुद्दाम थांबून लिफ्टनेच वर जायचो; शेजारच्या जिन्यावरून चढणारे लोक मला अगदीं सहज ओव्हरटेक करताना पाहून मजा वाटायची !
गमभनजी व इतर कोणास स्टँप्स
गमभनजी व इतर कोणास स्टँप्स संग्रह व संबंधित बाबींबद्दल [Philately ] कुतूहल असेल, तर ही छान लिंक जरूर पहा -
http://www.indiapost.gov.in/Philately.aspx
भाऊकाका, मी आणी माझा एक
भाऊकाका, मी आणी माझा एक पत्रकार मित्र मुद्दाम त्या लिफ्टने वर गेलो होतो. अगदी सावकाश चढणारी ती लिफ्ट म्हणजे एक टाईम मशिन आहे. आणि आपण हळू हळू शंभर दोनशे वर्षं काळाच्या मागे जात आहोत असं काहीतरी आम्ही बकबक करत होतो. लिफ्ट मॅन आमच्याकडे "न जाने कहां कहां से चले आते है" भाव चेहर्यावर् ठेवून बघत होता तेव्हा
भाऊ, लिंकबद्द्ल धन्स!
भाऊ,
लिंकबद्द्ल धन्स!
भाऊ, नंदिनी.. क्या बात है...
भाऊ, नंदिनी.. क्या बात है... सुंदर आठवणी. GPO मधे फक्त एकदाच जाणे झाले. कॉलेजातील मित्राच्या कृपेने त्या दिव्य इमारती बसुन भारत वि. इंग्लड टेस्ट मॅच बघितली होती.
अगदी सावकाश चढणारी ती लिफ्ट म्हणजे एक टाईम मशिन आहे. > अगदी. तश्या लिफ्ट दादरच्या पारशी आणि हिंदू कॉलनीत होत्या. दादरच्या साईबाबा संस्थानच्या इमारती मधिल ती लिफ्ट काढुन टाकण्यात आली आहे.
(No subject)
जी पी ओ मधेच एक मोठा हॉल
जी पी ओ मधेच एक मोठा हॉल सर्वांसाठी खुला आहे. तिथे निवांत बसून पत्रही लिहिता येते.
जूनी इमारत असल्याने जिथे सॉर्टिंगची वगैरे कामे होतात, तिथे फार गरम होत असते. तिथे बरीच मुले शर्ट
काढूनच बसतात. वरच्या मजल्यावरच्या लोकांनी खाली काही टाकू नये, म्हणून तिथे जाळी लावलीय.
स्पीड पोस्टाच्या त्यांच्या वेळा जास्त आहेत. बाकीची पोस्ट ऑफीसेस बंद झाल्यावर मी बर्याच वेळा तिथून
पार्सल्स पाठवली आहेत. पुर्वी स्पीड पोस्टने पाठवायच्या वस्तूंवर फारसे निर्बंध नव्हते ( आता आहेत. ) आणि कुरीयरपेक्षा ते खुपच स्वस्त पडते. शिवाय ट्रँकिंगही व्यवस्थित होते.
भारताच्या अनेक देशांतील पोस्ट खात्यांशी स्पीड पोस्ट संबंधात अॅग्रीमेंट्स आहेत, त्यांची यादी पोस्टात असतेच. त्या त्या देशात अगदी व्यवस्थित पार्सल पोहोचते.
अगदी पहिल्यांदा फॅक्सची सुविधापण तितकी कॉमन नव्हती. पहिल्या जॉबच्या वेळी मी कागदपत्रे पाठवण्यासाठी, ती उंच संगमरवरी ( टेलिकम्यूनिकेशन्स बिल्डींग ना ? ) इमारतीमधे गेल्याचे आठवतेय.
ती इमारत नवी कोरी होती तेव्हा छान वाटायचे, पण लवकरच तिला लावलेल्या संगमरवराच्या लाद्या, निखळून पडू लागल्या. आणि तशा पाट्याच तिथे लावल्याने, जवळून जायला सुद्धा भिती वाटू लागली
ती इतक्या संथपणे वर खाली
ती इतक्या संथपणे वर खाली करायची कीं <<
पार्ल्यातल्या टिळक मंदिराच्या लायब्ररीची लिफ्ट संथपणात या लिफ्टची बहीण दिसते..
खरं सांगायचं तर जीपीओची खास
खरं सांगायचं तर जीपीओची खास शान होती तिथल्या भव्य घुमटाखालील प्रचंड मोठ्या हॉलमधला वर्तुळाकार काऊंटर व त्याच्या आंतील व बाहेरील गजबजाट, असं मला तरी वाटतं. वरच्या गॅलरीतून तर हें सर्व पहाणं खूप रोमहर्षक वाटायचं. आतां सुरक्षेमुळे तसं पहाणं शक्य आहे का, हें मात्र माहित नाही.
मध्यंतरी शिवाजी पार्कच्या
मध्यंतरी शिवाजी पार्कच्या कोहीनूर हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्युटमध्ये एक जवळच्या नात्यातलं लग्न होतं त्याकरता गेले होते. पाचव्या मजल्यावरच्या त्यांच्या हॉलमधून संध्याकाळचं दृष्य माझ्या भाचीनं टिपलंय. दादर चौपाटी आणि वरळी-वांद्रा सी-लिंक किती सुंदर दिसतंय. :
दुसर्या फोटोत सगळ्यात डावीकडे एमटीएनएल चा टॉवर दिसतोय. त्यावरून उजवीकडे नजर वळवली की कॅडेल रोडवरच्या इंदु मिलची चिमणी दिसतेय.
लोकहो, इंजिन लोकल संबंधी
लोकहो,
इंजिन लोकल संबंधी काही माहिती आहे का कुणाला? इथे लिहिलंय की दुपारी दीडच्या सुमारास बोरीबंदराहून सुटणार्या कर्जत डब्बल फास्ट गाडीला इंजिन लोकल म्हणंत. हे खरंय का? हे नाव कुठून पडलं? या लोकलला इंजिन असायचं का? असं असेल तर डबे नेहमीच्या लोकलचे असण्याची गरज नसावी. बोरीबंदरास येणार्या इंजिन लोकलची वेळ काय? कुणास माहीत असल्यास कृपया सांगावे.
आ.न.,
-गा.पै.
इस्टर्न फ्रीवेवरून गेले का
इस्टर्न फ्रीवेवरून गेले का कोणी? वृत्तांत टाका. चेंबूर ते सीएस टी २५ मिनिटात!
मला आजच इमेलवर ही मुंबैतल्या
मला आजच इमेलवर ही मुंबैतल्या फोटोंची लिंक आली आणि ह्या धग्याची आठवण झाली
http://raskalov-vit.livejournal.com/130686.html
शूम्पे, कसले सह्ही फोटोज आहेत
शूम्पे, कसले सह्ही फोटोज आहेत हे. १६ नंबरचा फोटो पाहून जीव धसकलाच!
माझ्या अत्यंत ओळखीचे अनेक फोटो आहेत यात. त्यामुळे धन्सच धन्स!
ईस्टर्न फ्रीवे बद्दलची ही
ईस्टर्न फ्रीवे बद्दलची ही आजच्या मुंबई मिरर मधली बातमी. इतक्या साध्या आणि डोळ्यात भरण्याजोग्या चुका होतातच कशा? प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन करताना डोकी काढून ठेवलेली असतात काय?
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Audit-exposes-eight-deadl...
सही आहे लिंक..
सही आहे लिंक..
शूम्पी, मस्त आहेत त्या
शूम्पी, मस्त आहेत त्या लिंकवरचे फोटो.
एका फोटोत एक केस मोकळे सोडलेली तरुणी इमारतीवर चढते/उतरते आहे असं वाटतंय. पण तिच्या कमरेला दोर्/हार्नेस इ. बांधलेलं दिसलं नाही. त्यामुळे ते शिल्प आहे, की जिवंत व्यक्ती असा क्षणभर प्रश्न पडला.
Pages