गृहिणींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काय काय करता येईल?

Submitted by पियू on 14 June, 2013 - 03:12

नमस्कार.

मला फक्त गृहिणींसाठी एक पाच दिवसांचा व्यक्तीमत्व विकासाचा कोर्स घ्यायचा आहे.
या गृहिणी कोणताही व्यवसाय किंवा अर्थार्जन करत नाहीत.

मला या पाच दिवसांच्या (रोज दिड तास) प्रोग्राम मध्ये कोणकोणते विषय घेता येतील?

मी स्वतः आत्तापर्यंत जेवढे व्यक्तीमत्व विकासाचे कार्यक्रम अटेंड केलेत त्यात मुख्यत्वे पुढील मुद्द्यांना स्पर्श केला होता.

- व्यक्तीमत्व (प्रकार - एक्स्ट्रोवर्ट, इन्ट्रोवर्ट, पॉसिटिव्ह, निगेटीव्ह इ.)
- कामांचे नियोजन (ऑफिसमधल्या)
- गोल सेटींग
- लीडरशीप
- टीम बिल्डींग
- स्टेज कॉन्फिडंस
- टेबल मॅनर्स इ.

पण मला हे विषय ग्रुहिणी ऑडियन्सला अपील होणारे वाटत नाहीयेत. शिवाय इनमीन पाच दिवसात मी हे विषय घेउन त्यांना बोर करु इच्छित नाही.

मोस्ट्ली क्राऊड असा आहे ज्यांना घरुन कोणत्याही मुलासोबत्/पुरुषासोबत शिकण्यासाठी परवानगी नाहीये. म्हणुन "फक्त स्त्रीयांसाठी" असलेल्या या प्रोग्रामला कसेबसे सोडत आहेत. काही जणींना लग्नानंतर घराबाहेरच पाठवत नाहीयेत अश्याही मुली आहेत.

त्यामुळे या पाच दिवसांसाठी मी कोणते विषय घेऊ?

मला सुचलेले काही विषय-

१. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे.
२. न्युनगंड न बाळगणे./ इतरांशी तुलना न करणे.
३. सकारात्मक विचार / आशावादी असणे.
४. "नाही" म्हणायला शिकणे.
५. स्वतःवर प्रेम करणे.
६. नातेसंबंध जपणे.

तुम्ही काही सुचवु शकाल का?

* अजुन एक:

मला कोणी इन्स्पीरेशनल (मराठी शब्द सुचवा प्लीज) व्हिडिओज ची लींक द्याल का? शक्यतो भाषातीत (कोणतीही भाषा नसलेली)..

उदा. फॉर द बर्डस किंवा बाऊंडीन (हे माझ्याकडे ऑलरेडी आहेत. ह्यांची लींक देऊ नका)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टार्गेट ऑडियन्सच्या सवयी, दिनक्रम, प्राधान्यक्रम, विचार काय आहेत हे जाणून घेणं फायद्याचं ठरेल.

त्यांना त्यांच्याकडे असलेल्या काही कलांचा विकास कसा करता करता येईल अथवा त्या कलेचे संगोपन करत करत / काही छंद जोपासत घरबसल्या अर्थार्जन कसे करता येईल त्यावर एक सेशन घेऊ शकता तुम्ही... अर्थार्जन नको असेल तर स्वकरमणुकीसाठी कला जोपासण्याबद्दल सुचवता येईल.

मी जेसिआय क्लब मध्ये... नातेसंबंध जपणे. हा विषय मांडला होता........... हया .. मध्ये मी नवरा, मुलं...नवर्‍याच्या नातेवाइंकाशी कसे वागायचे..नवर्‍याने बाय्कोच्या नातेवाईकांशी कसे वागाय्चे..शेजारच्याशी कसे वागायाचे ..सगळे मांडले होते............ खुप छान प्रतिसाद मिळाला होता............... बहुतेक ठिकाणी पुरुष हे बायकोच्या माहेरच्यांशी ...निट वागत नाही म्हणुन... आम्हीही त्यांच्या नाते वाईकांशी असे वागतो.... हे महिलांन कडनं ऐकायला आले.................

बचतीचे महत्व,
आर्थिक साक्षरता, शिस्त / स्वावलंबन याचे महत्व,
वेळेचे नियोजन (Time Management)

मुळात या गृहिणींच्यात आत्मविश्वास नसतो.शिक्षित मुलींच्यात ही हे बघितलं आहे.चार लोकांच्यात त्यांना बोलता येत नाही. मत मांडता येत नाही.काही मुद्दे सुचवत आहे.बघा तुम्हाला उपयोग होतो का ते -

१.एखादा छंद शिकायला प्रोत्साहित करणे.नंतर या छंदाचे व्यवसायात ही रुपांतर करता येइल.उदा.सॉफ्ट टॉईस वैगेरे.
२. ईंग्रजी संभाषण शिकवता येइल.(भारतात असाल तर)
३. काही जणी घरात आलेला पेपर हि वाचत नाहित.त्यासाठी प्रोत्साहित करणे.बाहेरच्या ४ बातम्या माहित असाव्यात यासाठी.
४.घरातली कामे पटापटा आवरून,कामाचे नियोजन करणे . स्वतःसाठी वेळ देणे.या वेळात वाचन ,गाणी/संगीत ऐकणे,काही लिहिणे ,भरत काम्,विण काम , फिरायला जाणे.योगा,मेडितेशन या गोष्टी करता येतील.

तुम्ही दिलेल्या लिस्ट्मधल्या - ४. 'नाही ' म्हणायला शिकणे बद्दल -
लग्नानंतर घराबाहेरच पाठवत नाहीयेत असा जर काउड असेल तर त्या गृहिणी 'नाही' कशा म्हणणार ?
व "नाही" म्हणाल्या तरी त्यांचं मत कोण विचारात घेईल ?

मघाशी टाळलं. टार्गेट ऑडीयन्सचा डेटा नसल्याने आधी ठरवणं किंचित गैरसोयीचं होईल.

टिपीकल गृहीणी असतील तर घरातील पुरुषांनी घरकाम शेअर करणं (जसं शक्य होईल तसं) किती गरजेचं आहे हे त्यांना पटलं पाहीजे. आहारात चमचमीत पदार्थांपेक्षा मुलांची वाढ आणि हवामान बदल याला साजेसे पदार्थ कसे असतील हे पाहणं, याचं शिक्षण मुलग्यांना देणं, ज्यांना मुलगे आहेत त्यांच्यावर स्त्री चा आदर करण्याचे संस्कार कसे करता येतील याबद्दल चर्चा.
याशिवाय सध्याचे ज्वलंत प्रश्न, आजूबाजूला कुठे विपरीत घडत असल्यास तटस्थ भूमिका न घेणे असे अनेक विषय हाताळता येतील.

स्व प्रतिमा जपणे
घरातील स्वच्छता
भेसळ ओळखणे
आधार card वै गोष्टीचे महत्व
safety measures related with home , jewellery etc
Personal Hygiene
Kitchen Hygiene
Relaxation
Exercise
Taking care of your & your family health
Communication with other family members
अगदी टिपिकल गृहिणी असतील & बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नसेल तर त्यांना जगात काय चालू आहे ते कळत नसेल. साध्या साध्या गोष्टी जशा पाठ दुखी होवू नये म्हणून काळजी घेणे, आधार कार्ड चे महत्व समजावून सांगणे अशा अनेक गोष्टी त्याच्या आहे त्या जीवनाला सकारात्मक जोड देवू शकतात.

सेव्हिंग्स / इन्व्हेस्टमेंट्स
बँकांचे व इतर व्यवहार

१. आर्थिक साक्षरता (बँकेत स्वतःचे खाते असणे, त्याचे व्यवहार स्वतः करायला शिकणे, बचत करणे, बचत-गट फायदे, छोटासा घरगुती व्यवसाय करण्याचे महत्त्व इ.इ.)
२. स्वतःचा छंद जोपासणे व स्व-विकासासाठी वेळ देण्याचे महत्त्व : यात कोणताही छंदवर्ग, नियमित व्यायाम, वाचन, पर्यावरण-साक्षरता इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
३. स्वच्छता, आरोग्य व परिसर स्वच्छता.
४. स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याविषयी जागरूकता, आवश्यक वैद्यकीय तपासण्या न टाळणे, खाण्या-पिण्याच्या सवयी, सुयोग्य दिनचर्या पाळणे, रोज मोकळ्या हवेत थोडा वेळ का होईना घालवणे, रोज कोवळे ऊन अंगावर घेणे इ.इ.
५. हेल्पलाईन्स : कोणकोणत्या प्रकारच्या प्रसंगांत / आपत्तींमध्ये स्त्रियांना संरक्षण मिळते, विनामूल्य मदत मागता येते अशा हेल्पलाईन्सची, मदत यंत्रणांची माहिती.
६. कोणकोणते घरगुती व्यवसाय या स्त्रिया करू शकतात याची उदाहरणे. अशा प्रकारचे व्यवसाय करून समाजात आर्थिक यश मिळवणार्‍या किंवा वेगळे काही करणार्‍या स्त्रियांची उदाहरणे. (अगदी शिवणकाम, विणकाम यांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांना मेंदी, रांगोळी, पुष्परचना, सजावट करून देणार्‍या स्त्रिया... गोधड्या, पिशव्या, फॅन्सी बॅग्ज इत्यादी शिवून त्यातून उत्पन्न कमावणार्‍या स्त्रिया वगैरे वगैरे). त्यासाठी त्यांना कशा प्रकारचे अर्थसाहाय्य मिळू शकते, त्याबद्दलचे मार्गदर्शन इ.इ.

घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची माहिती आणि त्यांची घरच्या घरी होण्यासारखी दुरुस्ती. उदा. फ्युज बदलणे,बल्ब/ ट्युबलाईट बसवणे, सिलेंडर लावणे, वायर/ पीन बसवणे... इ अनेक छोट्या छोट्या गोष्टी.

महिलांसाठी असलेल्या कायद्यांविषयी ओळख.
वेगवेगळ्या कायद्यात असलेल्या महिलाविषयक तरतुदी.
उदा. ipc, प्रॉपर्टी लॉ इ.

सगळ्याजणी योग्य सांगतायत पण मला राहून राहून हा प्रश्न पडतोय की ज्या मुलींना घरातून बाहेर पडायची परवानगी नाहीये किंवा केवळ बायकाच आहेत अश्याच ठिकाणी जायला ’परवानगी’ मिळालीये अश्या मुलींना पाच दिवसात वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देऊन किती उपयोग होईल?

आपल्यावरची बंधने चुकीची आहेत आणि ती उलथली पाहिजेत हे जाणवणे, त्यासाठी प्रयत्न करणे या दृष्टीने त्यांना बळ देणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी होईल ना?

>>> मोस्ट्ली क्राऊड असा आहे ज्यांना घरुन कोणत्याही मुलासोबत्/पुरुषासोबत शिकण्यासाठी परवानगी नाहीये. <<<<< असा क्राऊड? खेडेगावातील अडाणी लोक आहेत का? की विशिष्ट जाती/धर्मातील लोक? असे असेल तर अवघड आहे त्या स्त्रीयान्चे, एकवीसाव्या शतकात अशा स्त्रीया अन अशी कुटुम्बे(?) असू शकतात याचे आश्चर्य वाटते. असो.

वरती सगळ्यान्नीच चान्गले विषय/विभाग सुचविलेत Happy

>>>> आपल्यावरची बंधने चुकीची आहेत आणि ती उलथली पाहिजेत हे जाणवणे, त्यासाठी प्रयत्न करणे या दृष्टीने त्यांना बळ देणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी होईल ना? <<<<
नीरजा, डायरेक्ट असे करायला जाणे/वा आडमार्गानेही सुचविणे म्हणजे बुद्धिबळातल्या घोड्याप्रमाणे अडिच घरे उड्या मारत जाण्यासारखे आहे. असे करुन चालत नाही. आधी त्यान्ना जगण्यातील रस / शिस्त/ जगण्याचे महत्व / स्व अस्तित्व यान्ची तर ओळख होऊ द्यात.
एकदम सुधारणा या टीव्ही सिरियल मधेच असू शकतात, व्यवहारात अवघड आहे, असे माझे मत.

वरती पियुने अश्याच मुलींचे लिहिले आहे. माझ्या मनचे नाही.

मी जे म्हणतेय तो फायनल आउटपुट आणि बराच दूरचा आहे याची मला कल्पना आहे. त्या दिशेने प्रयत्न हे म्हणायचे आहे.

क्राफ्ट आणि रोल प्लेयिंग, इम्प्रॉव्ह... बेसिकली थिएटर गेम्स हे अश्या प्रकारच्या गोष्टींसाठी उपयोगी पडतात. रेट्रोस्पेक्ट करायला लावतात. असे बरेच गेम्स लेसन प्लॅनसकट नेटवर मिळतील.

आपल्यावरची बंधने चुकीची आहेत आणि ती उलथली पाहिजेत हे जाणवणे, त्यासाठी प्रयत्न करणे या दृष्टीने त्यांना बळ देणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी होईल ना?

>> हे अगदी १००% बरोबर आहे. पण मी डायरे़क्ट असे सांगितले आणि कोणी घरी जाऊन सांगितले तर त्यांना पाठवतील का दुसर्‍या दिवशी? त्यामुळे मी फारतर त्यांना अर्थार्जनाचे महत्व पटवुन देईन. पैसा माणसाला थोडासा का होईना, स्वाभिमान देतोच. कमावणारी म्हणुन त्यांच्या घरी कोणाला त्यांचे जरातरी कौतुक वाटले तर बरे होईल. शिवाय त्यांच्याकडे बघुन त्यांच्या मुलींवर कमावण्याचे आणि बचतीचे संस्कार झाले तर उत्तम.

खेडेगावातील अडाणी लोक आहेत का? की विशिष्ट जाती/धर्मातील लोक? असे असेल तर अवघड आहे त्या स्त्रीयान्चे, एकवीसाव्या शतकात अशा स्त्रीया अन अशी कुटुम्बे(?) असू शकतात याचे आश्चर्य वाटते. असो.

>> पुण्यात बालाजीनगर जवळ धनकवडी गाव आहे. तिथे काही (बरीचशी) कुटुंबे अजुनही अशीच आहेत. मलाही आधी आश्चर्य वाटले होते. पण खरंच त्या मुलींचं कठीण आहे.

(अवांतरः माझ्या साबांना मात्र ऐकुन फार आनंद झाला. मला म्हणाल्या.."बघा.. लोक आपल्या सुनांना कसे वागवतात.. आम्ही तुला किती स्वातंत्र्य दिले आहे" :कपाळावर हात मारुन घेणारी बाहुली: )

माझ्या पोस्टमधे मी डायरेक्ट असंच सांगण्याबद्दल काहीच म्हणाले नाहीये. नीट वाचावे. निदान पुढची पोस्ट तरी वाचावी.

क्राफ्ट आणि रोल प्लेयिंग, इम्प्रॉव्ह... बेसिकली थिएटर गेम्स हे अश्या प्रकारच्या गोष्टींसाठी उपयोगी पडतात. रेट्रोस्पेक्ट करायला लावतात. असे बरेच गेम्स लेसन प्लॅनसकट नेटवर मिळतील.

>> काय म्ह्णुन सर्च करु?

पियु परी
त्या बायका जर कधीच घराबाहेर पडत नसतील तर त्यांची गोष्टी समजून घेण्याच्या क्षमतेचा तुम्ही अंदाज घेऊन मग सगळे प्लॅन करा असे मला वाटते. त्यांना काही मुद्दे समजावताना व्यवहारातील सोपी उदाहरणे किंवा लहान लहान गोष्टी सांगून ते मुद्दे त्याच्यापर्यंत परिणामकारकरित्या कसे पोहोचतील हे बघितले तर फायदा होऊ शकतो.
तुम्हाला शुभेच्छा. वेगळा अनुभव असेल.

अकु +१
आणि -
१. खूप भारंभार माहिती देण्याच्या भानगडीत पडू नये. आज आत्ता ह्या क्षणाला माझ्यातले कुठले कौशल्य मी वापरू शकते आणि एक व्यवसाय सुरु करू शकते हा विचार करावा. भारतात माहित नाही पण इतरत्र - पाच डॉलर साठी मी काय काम करू शकते हे आपण वेबसाईटवर नोंदवता येते. मग इतर लोक तुम्हाला त्या कामासाठी 'हायर' करण्याचा विचार करतात. अशी छोटी सुरुवात आत्मविश्वासास उपयोगी ठरते. आणि मुख्य - घरात पैसा येतोय हे दिसले कि घरातील इतरांचे मत बदलायला सुरुवात होते.
२. शिबिराचे ५ दिवस संपले की पुढे ये रे माझ्या मागल्या ही परिस्थिती येणार नाही ह्याचा विचार करावा. एखाद्या गृहोद्योग करणाऱ्या महिलेशी ओळख उदा: एखादीला घरगुती पाळणाघर काढायचे असेल तर सध्या जिचे घरगुती पाळणाघर आहे अशा महिलेची ओळख (मेंटरिंग). सरधोपट सर्वाना एक मेंटर पेक्षा प्रत्येकीला यथावकाश एक मेंटर.
३. आपापसात एक गट म्हणून काय करू शकतो ह्याचा विचार. उदा: भांडवल कमी पडत असेल तर भांडवल भिशी , मदतगार कमी पडत असतील तर पगाराऐवजी %वारी वर एकमेकिंसाठी कामे करणे.
४. पियुपरी, तुला खूप खूप शुभेच्छा. आपल्या व्यापातून वेळ काढून अशा उपक्रमात भाग घ्यायचा म्हणजे बाकी काही साधले नाही तरी तुझा आत्मिक, भावनिक आणि मानसिक विकास नक्की होईल. कसे झाले शिबिर हे नंतर जरूर पोस्त कर (विपु पण चालेल Happy )

ही पोस्त व्यक्तिमत्त्व विकास पेक्षा उद्योजिका विकास दृष्टीने झालीये पण चर्चा साधारण त्या अनुषंगाने होती आणि अगदीच रहावले नाही म्हणून. (बाकी सा.बा.नाच नक्की घेऊन जा स्वतःबरोबर ५ दिवस :))

मुलांवरील संस्काराचे महत्त्व सांगताना तुम्ही काही महापुरुषांच्या गोष्टी सांगु शकता किंवा सकारात्मक दृष्टीकोनाचे महत्त्व सांगतानाही काही खरी उदाहरणे देऊ शकता.

Pages