मागे वळून पाहते तेव्हा
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
6
मागे वळून पाहते तेव्हा
दिसतो लांबलचक एकाकी रस्ता
समोर पसरलेल्या रस्त्यासारखाच
मागे वळून पाहते तेव्हा
मोजून घेते मनातले घाव पुन्हा
खपल्या निघता निघत नाहीत
मागे वळून पाहते तेव्हा
हातून सुटलेले हात दिसतात
अन् सलतो न दिसणारा काळ
मागे वळून पाहते तेव्हा
अंधारभरल्या सावल्या छळतात
पुढचंही दिसत नसतं नेमकं
मागे वळून पाहते तेव्हा
माझीच राख मला खिजवत राहते...
मागे वळायला 'तू' राहीली आहेसच कुठे?
विषय:
प्रकार:
शेअर करा
आईग्ग! जामच आवडली... मागे
आईग्ग!
जामच आवडली...
मागे वळायला 'तू' राहीली आहेसच कुठे?
>>>
उच्च!
वा शेवटची कलाटणी जमलीये
वा
शेवटची कलाटणी जमलीये
धन्यवाद रिया आणि जाई.
धन्यवाद रिया आणि जाई.
सुरुवात अप्रतिम, कविता आवडली,
सुरुवात अप्रतिम, कविता आवडली, शेवटातली 'राख' ही प्रतिमा अप्रस्तुत वाटली..
शेवट मस्ते !
शेवट मस्ते !
भारती, श्री... धन्यवाद!
भारती, श्री... धन्यवाद!