Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधा जितकं मॅनेज करू शकशील
सुमेधा जितकं मॅनेज करू शकशील तितकं घरी ठेव, थोडं तुरित, थोडं पोह्यात, गव्हात.. इ.
आणि इतर वाटून टाक, वाया जाण्यापेक्षा ते बरं. नाही का?
सुके खोबरे हलके भाजुन गार
सुके खोबरे हलके भाजुन गार झाल्यावर डिप फ्रिज कर छोट्या पिशव्यातून
भाकरीच्या पीठात १ वाटीला १
भाकरीच्या पीठात १ वाटीला १ चमचा कणिक.... योग्य प्रमाण. वरुन जे पाणि फिरवतो त्यात १ चमचा कणिक घातली तर उलटताना मोडत नाही
सुमेधा - मला तर वाटत की
सुमेधा - मला तर वाटत की फ्रीज मध्येच राहुदेत. १० किलो कधी नाही ठेवले पण २ किलो फ्रीज मध्ये ठेवते काहीही होत नाही. उलट डाळी , पोह्याचे डबे जास्त उघडले जातात. सील करून फ्रिजर मध्ये ठेवून दे.
हे कळल्या पासून मी कधीच खोबरे बाहेर ठेवत नाही. वापरताना थोडावेळ मावे मध्ये गरम करायचे / बाहेर काढून ठेवायचे नाहीतर नीट वाटले जात नाही
बरंबरं धन्यवाद सगळ्यांना.
बरंबरं धन्यवाद सगळ्यांना.
मि कसुरी मेथीचे मोठे पॅकेट
मि कसुरी मेथीचे मोठे पॅकेट आणले आहे. ती पराठे करताना धुवुन घ्यायची का?
शेवयांचा उपमा करताना शेवया
शेवयांचा उपमा करताना शेवया आधी नूडल्ससारख्या पाण्यात शिजवून घ्यायच्या आणि मग फोडणीत टाकायच्या.
मस्त मोकळा शेवयांचा उपमा होतो. शेवया कच्च्या राहणे, गिच्च गोळा होणे असे प्रकार होत नाहीत.
शेवयांचा उपमा करताना शेवया
शेवयांचा उपमा करताना शेवया आधी नूडल्ससारख्या पाण्यात शिजवून घ्यायच्या आणि मग फोडणीत टाकायच्या.
<< प्राची, +१. शिवाय शेवया शिजल्या की चाळणीतून निथळून गार पाण्यामधे धुवून घ्यायच्या मग पाणी पूर्ण निथळून घ्यायचे, आदल्या रात्री हे करून फ्रीझमधे ठेवलं की सकाळी झटपट उपमा करता येतो.
शिवाय शेवया शिजल्या की
शिवाय शेवया शिजल्या की चाळणीतून निथळून गार पाण्यामधे धुवून घ्यायच्या मग पाणी पूर्ण निथळून घ्यायचे,>>> 'नूडल्ससारख्या' लिहीताना हे सगळे गृहित धरले होते मी नंदिनी.
हक्का नूडल्स च्या शेवया
हक्का नूडल्स च्या शेवया उकळत्या पाण्यात घातल्या नंतर पाणी निथळल्यावर त्यावर थोडेस तेल घालायला सांगतात.. तेल घालायच्या आधी गार पाण्यात धुवून घ्यायच्या का?? बाहेर मिळतात तसे हक्का नूडल्स घरी काही केल्या करायला जमत नाहीयेत.. ते थोडेसे गिच्चाच होतायेत..
तेल घालायच्या आधी गार पाण्यात
तेल घालायच्या आधी गार पाण्यात धुवून घ्यायच्या का?? >>> हो. मग नूडल्सना तेल लावून घ्यायचे.
प्राची, मी माझ्यासारख्या एलकेजीमधल्या मुलींसाठी विस्तारीत करून सांगितलं
तेल घालायच्या आधी गार पाण्यात
तेल घालायच्या आधी गार पाण्यात धुवून घ्यायच्या का?>>> गरम पाण्यातून चाळणीत काढल्यावर लगेच नळाच्या थंड पाण्याखाली धरावेत. म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते. जास्त शिजल्याने गिच्च होतात नूडल्स.
'थोडे तेल' असे म्हटले असले तरी बरेच तेल वापरावे लागते नूडल्सना.
थोडे तेल' असे म्हटले असले तरी
थोडे तेल' असे म्हटले असले तरी बरेच तेल वापरावे लागते नूडल्सना.>> +१
हिमेश, अजिनोमोटो वापरल्याने
हिमेश, अजिनोमोटो वापरल्याने ती बाहेरची चव येइल. गरम तेलात पहिले गार्लिक तुकडे फ्राय करायचे मग भाज्याघालून अजिनो मोटो घालून हाय हीटवरच परतायचे.
नकाऽऽ हो नकाऽ खाऊ अजिनोमोटो!
नकाऽऽ हो नकाऽ खाऊ अजिनोमोटो!
अजिनोमोटो न घालता पण चव
अजिनोमोटो न घालता पण चव येते.. पण गिच्चा होतोच... हे मात्र खरय की तेल सांगताना फक्त १ टेस्पून सांगतात पण बरचं लागत तेल.. प्राची प्रोसेस कळालेली आहे...
आमच्या लेकीला आख्खा(हक्का) नूडल्स फारच आवडतात त्यामुळे ते नीट कसे करता येतील हे आता समजले आहे.. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी केलेले कधीही बरे..
हिम्या, उकळत्या पाण्यात नूडल
हिम्या, उकळत्या पाण्यात नूडल घालायच्या आधी त्यात एक चमचा तेल घाल आणि नूडल घालून शिजवून चाळणीतून निथळून वगैरे नेहमीची पद्धत असे एकदा करून पहा.
तेल घालायची गरज नाही. उकळत्या
तेल घालायची गरज नाही. उकळत्या पाण्यातून शिजून निथळून घेतल्या की सरळ एका भांड्यात बर्फाच्या पाण्यात सोडायच्या नूडल्स. कुकिंग प्रोसेस थांबते. जो काही एक्स्ट्रा स्टार्चीनेस आहे तो त्या पाण्यात उतरतो. भाज्या परतून झाल्या की बर्फाचं पाणी निथळून नूडल्स टाकायच्या. अजिबात चिकटत नाहीत. जास्तीचं तेल घालायला लागत नाही.
मला इथे भारतात अवन साफ करायचे
मला इथे भारतात अवन साफ करायचे क्लीनर कुठले चांगले आहे ते सांगाल का?
माझ्या मुलीने मोठा प्रताप केलाय केक बेक करायला गेली आवडीने व चुकून आयसिंग बॉटल जी ठेवली होती अवनमध्येच(अवन वापरत नसताना त्यामध्ये केकची भांडी ठेवतो ) विसरली. सगळा अवनचा तळ वितळलेल्या प्लॅस्टीक ने भरलाय. अवन गरम करून साफ करायचा प्रयत्न केला पण ते प्लॅस्टीक पुन्हा थंड पडून कडक होतेय...).
मला नवीन अवन फेकावे लागेल विचार करून त्रास झालाय.. )
झंपी, सरळ कंपनीच्या माणसाला
झंपी, सरळ कंपनीच्या माणसाला फोन करून विचार. त्यांची माणसं येऊन योग्य तो सल्ला देतील.
धन्यवाद नंदीनी. तोच विचार
धन्यवाद नंदीनी.
तोच विचार चाललाय... केक फेकून द्यावा का हा विचार सुद्धा चाललाय?... मुलगी केक बेक करायला लावून बसली बाहेर टीवी बघत ..वास कसा आला नाही कळत नाही..
---------------
तो प्लॅस्टीकचा वास आत गेलेला केक फेकूनच द्यावा ना? सगळ्या वस्तू फुकट चीज केकच्या...
केक फेकून द्यावा का हा विचार
केक फेकून द्यावा का हा विचार सुद्धा चाललाय?... >> केक तर फेकूनच द्या.
हिम्सकूल...तू भाज्या परताना
हिम्सकूल...तू भाज्या परताना मीठ कधी घालतेस...ते नुडल्स टाकल्यावर नको टाकूस कारण भाज्यांना पाणी सुटते मग नुडल्स अजून सॉफ्ट होतात. तसेच सोया सॉस लाईटच्या ऐवजी डार्क वापर म्हणजे कमी लागेल नाहितर चव येण्यासाठी जास्त टाकावा लागतो अन त्यामुळेही नूडल्स जास्त शिजून गिच्च होतात.
कुरमुर्याचे लाडू केले होते.
कुरमुर्याचे लाडू केले होते. कसा कोण जाणे पण डबा थोडा उघडा राहिला आणि सगळे लाडू आता सादळले आहेत, काय करू इतक्या सार्या लाडवांचे? फेकायचे अगदीच जीवावर आलंय.
(ओली भेळ करता येणार नाही कारण मुलांना आवडतात म्हणून खास अतिगोड केले होते.)
थोडावेळ प्रिहिट केलेल्या
थोडावेळ प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये ठेव. ओव्हन नसेल तर गरम तव्यावर एका भांड्यात किंवा गरम कुकर मध्ये ठेव.
पुल्ला रेड्डी ची मलाई बर्फी
पुल्ला रेड्डी ची मलाई बर्फी बरीच भेट आली होती. एक-एक बर्फीचा बदाम-पिस्ता काप काढले, हाताने कुस्करून थोडा पाण्याचा आणि तुपाचा हात लावला, मावेत १० सेकंद गरम केले, लगेच गोळा करून पोळीच्या उंड्यात भरून साटोर्या केल्या, एकदम झटपट ... मला हे लिहाय्ला जास्त वेळ लागतोय ... एकावेळी एकाच साटोरीची बर्फी कुस्करा आणि मावेत गरम करा... मी दोनाच एकत्र केले तर दुसरी साटोरी नीट लाटली गेली नाही... बर्फी कुस्करल्यावर कणीदार आणि मोकळी होती.
इथे कुणी तरी दहीवड्यासाठी डाळ
इथे कुणी तरी दहीवड्यासाठी डाळ वाटल्यावर फेटून घ्यायची असं सांगितलेलं आठवतं. आज डाळ फेटून वडे केले. मस्त हलके, कुरमुरीत वडे झाले. टिपबद्दल धन्यवाद
दहीवडे फॅनक्लब - मुद्दा नंबर
दहीवडे फॅनक्लब - मुद्दा नंबर ६

केशर खराब झाले का? कसे
केशर खराब झाले का? कसे बघायचे.
अरे हो हा बाफ विसरलेच होते
अरे हो हा बाफ विसरलेच होते (मांसाहेबांना काही लक्षात म्हणून राहात नाही). धन्यवाद मंजूडी
Pages