उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

namskar , hi mi navin aahe mayboli var
mala na tummy liposuction chi mahiti havi aahe kitpat sucess rate aahe?

n chin chi blackish skin janyasathi kay upay aahe.... khup upay karun zale...... atta mala vatate peel treatment karavi ka?.... ya baddal kunala kahi mahit asel tar suchavave please.....

majhi skin khup dry n unhamule khup kali padli ahe....kahi lavle teri farak padat nahi........sarv prakarchya creams waprun jhalaya ahet majhe......war sangitlyapramane nisha herbal che kumkumaditailam dry skin sathi kase ahe..........?
please mala dry skin sathi kahi tari upay suchva..........

hi ..........
me mayboliwar navin ahe......me atta MBA 1st year la ahe........chehryawar chote chote dag n halli khup til yayla laglet............tyat unhamule skin khup tan jhali ahe....n dry tar khupach ahe.........me lonavlyat rahate......n ithe nisha herbalch kahich product milat nahi....milat nahi.........

प्राची, सनस्क्रिन असलेले मॉईश्चरायझर लाव बाहेर जाताना. रात्री चेहरा स्वच्छ धुवून खोबरेल तेलाचा पुसट हात फिरवायचा. चेहरा धुवायला माइल्ड फेसवॉश वापर.

प्राची,
tan जाण्या करीता,Aloe Vera Gel मस्त आहे.निशा हर्बल चे नाहि मिलाले तरी दुसरे कुठले वापरु शकतेस.मी ग्रीन लीफ वापरते आहे,बराच फायदा आहे. (http://www.brihans.com/products_greenleaf.html)

आणी कोरडे पणा कमी करण्या साठी रात्री झोपताना moisturiser लाव ,सकाळी उठाल्यावर चेहरा धुण्याआधी नीट मसाज कर ५-६ मि.हळुहळु फरक जाणवेल

thanks zhampi mala samjun ghetlyabaddal........me marathit pan nakki try karen...ag mala marathi typing ajun jamt nahiye.....n ho ag amchya baget korfadachi raas ahe...me jel karun fridge madhe thevlay...roj lavte..pan mala kahi farakch padat nahi.......khup dry skin ahe...me war wachle ki nisha herbal che cosmetics chan ahet mahnun.me kaal tysche safrojel anlay.......bghu ata kay farak padtoy ka te...kumkumaditailamche search chalu ahe........

प्राची तु मराठीच लिहितेस हे पण इंग्रजी फॉन्ट मधे. मराठी टायपिंगचा प्रश्नच नाहीये. कारण इथे फोनेटीकल टाइप करायचं आहे. प्रयत्न कर नक्के जमेल तुला. उजवीकडे भाषा सिलेक्ट कर.

माझ्या कपाळावर उन्हामुळे फार काळे डाग झाले आहेत व उन्हात गेल्यावर ते काळे दाग जास्त डार्क होतात, क्रुपया मला काळे डाग जाण्यासाठी ऊपाय सुचवा,.

स्विमिंगपूर्वी शॉवर गरजेचे. स्विमिंगनंतर लगेच बॉडीवॉश वापरुन शॉवर घ्यावा आणि लगेच मॉ. लावावे. निविया छान आहे. सध्या तरी मी इतकेच करते आहे.

माझ्या कपाळावर उन्हामुळे फार काळे डाग झाले आहेत व उन्हात गेल्यावर ते काळे दाग जास्त डार्क होतात, क्रुपया मला काळे डाग जाण्यासाठी ऊपाय सुचवा,.>>> कुकुंबर जेल कोणितरी सुचवले आहे मागच्या पानावर,जाणकारांनी प्रकाश टाकावा.

कुठल्याही पद्ध्तीचे टॅन जाण्यासाठी अभ्यंग स्नान हा छान उपाय आहे. म्हणजे जिथे जिथे टॅन आहे त्या भागावर मुरेल तेव्ह्ढे तेलाचा मसाज करणे आणि पंधरा ते विस मिनिटांनी साबणाने अगर उटण्याने धुवुन टाकणे.
तसेच टॉमॅटॉने किंवा काकडीच्या चकतीने अगर लिंबाच्या फोडीने मसाज केला तरीही टॅन निघुन जाण्यास मदत होते.
उन्हामुळे त्वचा कोरडी होत जाते आणि नॅचरल मॉईच्शर कमी होते त्यामुळे त्वचा काळपट होत जाते म्हणुन मॉईच्शराईझरचा वापर करणेही क्रमप्राप्त आहे.

मधुरीता
खूपच चांगली पोस्ट
लिँबाच्या फोडीने मसाज हे समजल नाही
नक्की काय करायचे

जाई,
लिंबाची फोड टॅन झालेल्या भागावर चोळायची. त्याने टॅन निघुन जाण्यास मदत होते.
लिंबाच्या रसामध्ये दुध/साय मिसळुन थोडा वेळ लावुन ठेवल्यानेही टॅन कमी होण्यास मदत होते.

मधुरीता, टॉमॅटॉने किंवा काकडीच्या चकतीने अगर लिंबाच्या फोडीने मसाज केला तर स्किन pigmentation कमी होईल का?

गितांजली
हो. या उपायांमुळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. शिवाय सोबत फेस पॅक ही वापरु शकतो.
ग्रीन फार्मसीचे प्रॉडक्ट्स छान असतात.

एक सोपा फेस पॅक म्हणजे-

मुलतानी माती १ चमचा(किंवा बेसन) + दुध + गुलाब जल + हळद (चिमुटभर) + चंदन
यामध्ये हळद आणि चंदन सुट होत असेल तरच मिसळावे. आणि हा पॅक १० मिनिटे लावुन धुवुन टाकावा.
या पॅकनेही पिगमेंटेशन कमी होते.

या पॅक मध्ये कोरफड किंवा तुळस मिसाळली तरी चालते.

गितांजली, नेहमी म्हणजे आठवड्यातुन एकदा किंवा दोन वेळा. जास्त वेळा फेस पॅक लावल्याने चेहरा ताणला जातो. पॅक लावल्यावर सुद्धा खुप सुकवु नये. आणि नंतर मॉईश्चरायझर लावुन ठेवावे. म्हणजे त्वचा मऊ राहते.

दोन दिवसांपुर्वी असेच मुलीचे उरलेले उटणे लावले तेंव्हा लक्षात आले, दुधात भिजवलेले आयुर्वेदीक उटणे + मसुर पिठ एकत्र करुन लावल्याने उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुर्ववत होण्यास मदत होते. मी फक्त २ वेळा लावले तर लगेच फरक दिसला.

हे उटणे मी घरी तयार केले आहे, पण आज्काल बर्‍याच ठिकाणी आयुर्वेदिक उटणी मिळतात.

लोक्स त्वचेसाठी चांगल्या असणार्या आनि रोजच्या जेवणात घेता येइन अश्या पदार्थांची नावे सांगा न..
दुध आनि तुप सोडुन .. दोन्ही घशाखाली मुळ रुपात उतरत नाही.. दुध + बोर्नविटा अस काहीतरी कॉम्बो कराव लागत . Happy
फळ >>> ???
भाज्या >>> ???
अजुन काही ???

Pages