Submitted by अभय आर्वीकर on 2 June, 2013 - 05:19
हुलकडूबी नाव
यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे
हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे
दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे
मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे
जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे
भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे
पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे
फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!
- गंगाधर मुटे
-------------------------------------
ढोबळमानाने शब्दांचे रूढार्थ
फेकणे = अतिरंजित बढाया मारणे
हुलकडूबी = अती हुरळून जाणारी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'साव' आणि 'वाव' हे शेर अधिक
'साव' आणि 'वाव' हे शेर अधिक प्रभावी वाटले.
आपल्याला ब्वॉ नाय आवडली
आपल्याला ब्वॉ नाय आवडली
हिला गझल म्हणणार्या तुमच्या
हिला गझल म्हणणार्या तुमच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे मुटे.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
<<<< हिला गझल म्हणणार्या
<<<< हिला गझल म्हणणार्या तुमच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे मुटे. >>>
विदीपा, माझ्या कोणत्याही
विदीपा,
माझ्या कोणत्याही गझलेला गझल म्हणून न स्विकारणार्या तुमच्या चिकाटीचेही कौतुक केले पाहिजे.
(No subject)