अपघात

Submitted by shilpa mahajan on 29 May, 2013 - 16:02

अपघात
डोळ्यावर उन्हाचा कवडसा आला तशी वीणाने डोळे किलकिले करून भिंतीवरचे घड्याळ बघितले साडेसहा . . वाजून गेलेले पहाताच तिची झोप कुठल्या कुठे पळाली . झटक्याने उठून बसून तिने कडकडून आळस दिला.. चादरीची घडी घालत ती स्वतःशी पुटपुटली ,"छे बाई , भलताच उशीर झाला आज उठायला ! “
भराभर ब्रश करता करता एकीकडे तिने चहाचे आधण चढवले. . बाल्कनी मध्ये येउन पडलेला पेपर चाळावा कि नाही याचा विचार करता करता तिने चहा गाळला. . चहाचा घोट घेता घेता हेड लाइन्स पाहिल्या आणि कपडे बदलून ती पार्कमध्ये फिरायला घाइनेच निघालि.
घरापासून पार्क पर्यंतचे जेम तेम पाच सात मिनिटांचे अंतर आज तिला खूप जास्त वाटले . पार्क मध्ये पोहोचल्यावर तिला जरा हायसे वाटले. े गाणी सेट करून तिने कानात इयरफोन लावला आणि मग ती रोजच्या सारखी एका विशिष्ट लयीत चालू लागली. मधून मधून तिच्यासारख्या रोज चकरा मारायला येणाऱ्या मुली समोर आल्या कि ती हलकेसे स्मित करून पुढे जात होती. . पाच चकरा पूर्ण झाल्या , अजून चार तरी मारायला हव्या होत्या , तेव्हाच तिचा रोजचा कोटा पूर्ण होणार होता. . आणखी एक चक्कर मारेपर्यंत गर्दी खूपच कमी झालेली तिला जाणवली ." आज उठायला आणि पर्यायाने पार्कमध्ये यायला उशीर झाला होता , त्याचाच हा परिणाम होता !
आज राहू द्याव्यात का उरलेल्या चकरा ? " तिने स्वतःलाच उद्देशून प्रश्न विचारला.
" नाही नाही ! असे करून कसे चालेल" ? अशाने मनाला रोजच काही ना काही बहाणे शोधायची सवय लागेल ! कशाला हवी आहे गर्दी ? माझ्यासारख्या दोन चार दूर वर का होईना , दिसताहेत ना ? झाल तर मग !"
स्वतः च्या मनाशी संवाद साधत ती चकरा पूर्ण करत होती .
एका मल्टी नेशनल कंपनीत ती काम करत होती . एकदा कामाला सुरुवात केली की दहा बारा तास उठायला वेळ मिळेलच याची खात्री नसे . तिने रोज सकाळी उठून किमान पाऊण तास वेगाने पार्कमध्ये चकरा मारायचा नियम स्वतःला लावून घेतला होता . त्यामुळे तिचे शारीरिक आरोग्य व्यवस्थित होते.
स्वतःच्या शरीर सौष्ठवाचा तिला रास्त अभिमानही होता. तिच्या बरोबर काम करणाऱ्या तिच्या वयाच्या . बायका बहुधा सुटल्या तरी होत्या किंवा हडकल्या तरी होत्या. खऱ्या वयापेक्षा पाच सहा वर्षे तरी कमी . त्या गोष्टीचा उल्लेख वाटणारी ती एकटीच होती तिच्या सहकारी मित्रांच्या तोंडून कित्येकदा होत असे आणि तिला सुखद जाणीव करून देत असे.
आत्ताही चालता चालता तिला त्या आठवणीने गुदगुल्या झाल्या. तिच्य ा चेहेऱ्यावर स्मित उमटले . . आपल्याला स्वतःशी. एकदम तिला वेळेचे भान आले हसताना कुणी पाहिले तर नाही ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजू बाजूला चोरटी नजर फिरवली. . तिच्या पुढे काही अंतरावर दोन तीन तरुण आपल्याच मस्तीत गप्पा छाटत खिदळत चालले होते. त्यांचे कुणाकडेच लक्ष नव्हते. तिने घड्याळ पाहिले. वाजत आले होत आठ े. आता मात्र घाई करायला हवी होती . घरी जाउन अंघोळ वगैरे आवरून साडे आठाची बस पकडायची तर नाश्ता सोडून द्यावा लागणार होता . ही शेवटची चक्कर संपवावी लागणारच होती कारण अर्ध्याहून जास्त अंतर तिने कापले होते . आता परत जायचे म्हटले तरी तितकाच वेळ लागला असता .
तिने चालण्याचा वेग वाढवला . आठ दहा पावले चालून झाल्यावर तिला भराभरा चालता येईनासे झाले . इतका वेळ दूर वाटणारी ती तीन मुले तिच्या अगदी पुढ्यात ठाकली होती . तिने त्यांच्याकडे एकदा पाहिले आणि ती थबकून उभी राहिली . तिला जायला वाट देतील म्हणून ! पण त्यांचा तसा काही विचार दिसेना ! तिने त्याना वळसा घालून जाण्याच्या विचाराने डावीकडे मोर्चा वळवला . पण त्यांच्यातल्या एकाने ती वाट अडवली . तिने दचकून एक पाउल मागे घेत उजवीकडून निघण्याचा प्रयत्न केला . पण दुसरया मुलाने तो हि हाणून पाडला . आता तिला धोक्याचा खरा आभास झाला . तिने मदतीसाठी मागे पुढे पाहिले . " “कुणी नाही मेडम ! तुमची हाक ऐकून येईल असे कोणीच नाही !" मदाम , मुकाट्याने माझ्यामागे चाला . " मधल्या मुलाने जीन्सच्या खिशातून चाकू काढून दाखवत तिला दरडावले .
चाकू पाहून तिचे डोळे विस्फारले . तोंडाला कोरड पडली . अंगाला थरकाप सुटला . पायातले त्राण नाहीसे होऊन ती भोवळ येउन पडणारच होती ! तेवढ्यात एकाने तिला आधार दिला. आधार कसला , तिचा दंड करकचून धरला आणि तिला फरफटत चालवले .
पार्कच्या एका कोपऱ्यात कधीकाळी वौचमन साठी बनलेली खोली आता मोडकळीला आली होती आणि वापरात नव्हती . तिथे गेल्यावर तिला जोरात ढकलले . ती जमिनीवर धडपडली . एकाने तिच्या तोंडात त्याचा घामात भिजलेला रुमाल कोंबला . एकजण दारापाशी पहारा करायला उभा राहिला . एकजण चाकू काढून तिने आवाज केला तर तिचे काम तमाम करण्याच्या तयारीत उभा राहिला , त्या रुमाल कोम्बणाऱ्या माणसाला पुढे सरकताना पाहून तिला आपल्यावर ओढवणाऱ्या प्रसंगाची कल्पना आली .
आपण एकट्या काहीच करू शकणार नाही हे तिने ओळखले . " शक्यतो असला प्रसंग टाळण्या चा प्रयत्न करा , पण ते शक्यच नसेल तर तो एन्जोय करा !" केव्हातरी कुठे तरी वाचलेले तिला आठवले . तिने हात जोडून त्यांच्याकडे केविलवाणे पणाने पाहिले .
कसे काय कोण जाणे पण ती विरोध करणार नाही एवढे तिच्या देहबोली वरून त्यांच्या लक्षात आले असावे . त्यांनी देखील तिचे जास्त हाल न करता त्यांचे ईप्सित उरकले . त्यानंतर मात्र त्याना काय वाटले कोण जाणे, पण चाकू वाला तिच्या दिशेने पुढे सरकू लागला . कदाचित ती त्यांची ओळख पटवू शकेल याची कल्पना आली असावी . तिने हात जोडले . " मी कुणाला काही सांगणार नाही . मला जाऊ द्या ! तुमची इच्छा तर पूर्ण झाली ना ? मला कशाला मारता ? मी तर आधीच मेलेली आहे ! मेलेलीला मारून तुम्हाला काय मिळेल ?
" मेलेली ? म्हणजे काय ?" गरज नसतानाही न राहवून एकाने विचारले .
" माझ्या पतीकडून मला गिफ्ट मध्ये एड्स मिळालेला आहे. मी तर त्यामुळे आधीच मेलेली आहे . फक्त शरीराने कधी जाते ,आज कि उद्या एवढाच प्रश्न आहे ! फक्त माझा काही दोष नसताना मला एकटीला हि शिक्षा कशाला असा विचार मनात यायचा आणि दुक्ख वाटायचे . आता तुमच्या मुळे ते दुक्ख संपले . !"
" म्हणजे ?"
" म्हणजे असे कि तुमचा सर्वांचा माझ्याशी संबंध आलाय ना ! आता माझा एड्स तुम्हाला पण गिफ्ट मध्ये मिळणारच! तुमची सर्वांची कंपनी मरताना मिळेल या विचाराने मला खूप बरे वाटते आहे.
तरीसुद्धा मला मारणारच असाल तर मारा ! एड्स बरोबर तुरुंगवास देखील मिळेल ! कारण माझा नवरा तक्रार करणारच !"
एवढे बोलून ती क्षणभर प्रतिक्रिया पहात उभी राहिली . सर्वांचे चेहेरे एकदम पांढरे फटफटीत पडले होते . माना खाली झुकल्या होत्या . क्षण भराच्या आनंदाची खूप मोठी किंमत चुकवल्याचा पस्तावा त्यांच्या चेहेऱ्यावर साफ दिसत होता !
वीणा त्या लोकाना तसेच सोडून बाहेर आली . तिने कपडे नीट केले. केसांवरून हात फिरवला . तिने घराकडे मोर्चा वळवला . आज कित्येक वर्षांनी तिला आपले गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन झाले आहे याचा मनापासून आनंद झाला … "सॉरी विकास ! तुझ्या निष्कलंक शीलाला आज मी डाग लावला , तो देखील खोटा ! पण मी तरी काय करणार ? शारीरिक शिक्षा तर मी त्याना देऊ शकत नव्हते , पण त्याना तशीच सोडूही शकत नव्हते !” मनातल्या मनात वीणा विकासची , आपल्या पतीची क्षमा मागत होती . “ एड्स ची धास्ती आता त्याना जन्म भर छळत राहील ! कोणतीही व्याधी झाली तरी एड्स मुळे असेल या कल्पनेने उपचाराच्या वेळी उघड होइल म्हणून डॉक्टर कडे जायला हि घाबरतील !मरा लेको ! तुम्हाला अशीच शिक्षा हवी !आता बघाल का बाईकडे वाकड्या नजरेने ? माझ काय बिघडलं ? काहीच नाही ! आत गर्भाशय नव्हताच ! त्यामुळे मी सपशेल वाचले ! झाला तो फक्त एक अपघात ! मनावरून पुसायला थोडा वेळ लागेल इतकेच ! तिने मान झटकली . पाऊण तास वाया गेलां होता ! जाऊ दे ! एवि तेवी पहिली बस गेलीच आहे ! आता घरी जाउन स्वच्छ अंघोळ करावी, झकास नाश्ता करावा आणि मग च कामावर जावं झालं ! नवरयाला उशिराचे काय कारण सांगायचे याचा विचार करत ती संथ गतीने घराकडे निघाली,
---------------------------------------------------------------0-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------0------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>" शक्यतो असला प्रसंग टाळण्या चा प्रयत्न करा , पण ते शक्यच नसेल तर तो एन्जोय करा !" केव्हातरी कुठे तरी वाचलेले तिला आठवले
बाप रे! इतकं विचित्र कुठे वाचलं असेल?

१. नायिकेच नशीब त्या लोकांपैकी कोणाला एड्स नव्हता.
२. एड्स असला तरी उपचार घेऊन व्यक्ती २०-३० वर्षे जगते. हल्ली उपचार सरकारी दवाखान्यात उपलब्ध असतात. एड्स अनेक कारणांनी होऊ शकतो त्यामुळे दवाखान्यात जाण्यास हल्ली कोणी लाजत-घाबरत नाही.
३. रिसर्चमध्ये आढळून येते की बहुतेक रेप करणारे पुढे कुठलाही पुरावा राहणार नाही याची काळजी घेतात, त्यामुळे संसारात होत नाही इतका ग.नि चा वापर रेपमध्ये होतो.
४.गर्भाशय असले आणि रेप करणाऱ्याने कंडोम वापरले नाही तरी रेपनंतर प्रत्येक स्त्रीला गर्भधारणा राहील असे नाही. त्यामुळे 'माझे काय बिघडले' आणि गर्भाशय नसणे ह्याचा सम्बन्ध लावणे बादरायण आहे. शिवाय जे काही बिघडते ते शारीरिक पातळीवरच असले पाहिजे? नक्की काय म्हणायचे ते लक्षात येत नाही.
५. रेप, एड्स, संसारातील विश्वास, सामाजिक सुरक्षा हे संवेदनशील विषय आहेत. अत्यंत संवेदनशील विषयांची हाताळणी इतक्या वर-वर करणे हे फारसे उचित वाटले नाही. रेप पिडीत व्यक्ती कोलमडून पडू नये, तिने दैनंदिन व्यवहार चालू ठेवावे हा मुद्दा योग्य. पण ते मांडण्याची पद्धत पटली नाही.

कित्ती छान गोष्टं, कित्ती मस्तं पॉजिटीव अ‍ॅप्रोच, किती धडाडीची बाई.
शिल्पाताई, भारीच आवडली गोष्टं!

सिमन्तिनी , फॅक्टस कसल्या देताय, गोष्टं एंजॉय करा. Wink

hmm

बाप रे! इतकं विचित्र कुठे वाचलं असेल?

मृण्मयी, 'असं कोण म्हणतं?'
या प्रश्नाचं उत्तर आहे 'इफ यू कान्ट अवॉईड इट, एंजॉय इट ' असं अमेरिकन मुली रेपबद्दल म्हणतात असं भारतीय मुलींना वाटतं!

हे म्हणजे घोडा खाली बसला की तो मरतो असं मालकाला वाटतं असं घोड्याला वाटतं.

नायिकेच नशीब त्या लोकांपैकी कोणाला एड्स नव्हता. >>>>> +१ सिमन्तिनी.. नाहीतर नायिकेला त्यांच्याकडून एड्स 'गिफ्टमधे' मिळाला असता..

गर्भाशय काढल्यावर शरीरात एड्स चे जंतू शिरण्याचा मार्ग बंद होतो असे मला वाटते म्हणून ते वाक्य मी लिहिले आहे . पण ते
चुकीचे असू शकेल कदाचित .
आजकालच्या काळात रेप चे प्रमाण इतके वाढले आहे कि बोलून सोय नाही . त्यामुळे लोकांनी आपला दृष्टीकोन केवळ एक
अपघात असा ठेवला तर पुढील आयुष्य जगणे थोडे सुकर होईल , आणि मी लिहिलेले वाक्य खरोखरीच मी वाचलेले आहे , कुठल्याशा मराठी वर्तमान पत्राच्या बलात्कारा संबंधी च्या लेखात ! पिडीत व्यक्तीने कसे वागावे यासंबंधी तो लेख होता ,तो वाचून खूप दिवस झाले , त्याचा तपशील आठवत नाही .

आजकालच्या काळात रेप चे प्रमाण इतके वाढले आहे कि बोलून सोय नाही . त्यामुळे लोकांनी आपला दृष्टीकोन केवळ एक
अपघात असा ठेवला तर पुढील आयुष्य जगणे थोडे सुकर होईल , ........बलात्कारा संबंधी च्या लेखात ! पिडीत व्यक्तीने कसे वागावे यासंबंधी तो लेख होता <<<< बापरे Uhoh

शिल्पा, कथा लिहिताना जे सांगायचे आहे ते पटण्यासाठी पुरेशी कारणमीमांसा कथेत लिहिली जायला हवी (असे माझे मत). तुम्हाला या कथेतून जर असे सुचवायचे असेल की बलात्कार अटळ असल्यामुळे त्या स्त्रीने तो सोसला व विस्मरणात ढकलण्यात यश मिळवले किंवा तसा प्रयत्न केला, तसेच, अश्या पद्धतीने या दुर्दैवी बाबी विस्मृतीत साराव्यात, तर ते विस्तृतपणे किंवा पुरेश्या जबाबदारीने नोंदवले गेलेले दिसत नाही. त्या स्त्रीने त्या दुर्घटनेबाबत तात्काळ जो काही विचार केला तितक्या अल्पावधीत एखादी स्त्री असे विचार करू शकेल का? ही घटना एखाद्या प्राण्याच्या बाबतीत घडली आहे का? एड्सचे भय दाखवणे हा पुरेसा सूड ठरू शकेल का? तसेच, दुसरे काहीच करता येत नसल्यामुळे फक्त एड्सची भीती दाखवली हे आजच्या जगात मान्य होईल का? आज माध्यमे इतकी तेजीत आहेत की अशी घटना घडलेली त्यांना समजली तर एका तासात देश ढवळून निघू शकतो. सूड घ्यायचा असला तर घेता येऊ शकेलही, तोही कायद्यान्वये!

कथा रंगवताना चूक होण्यात काहीच वाटून घेण्याचे कारण नाही, पण एकंदर कथा, त्यातील पात्रांचे वर्तन, विचार, भूमिका, कथेतील संदेश हे शक्य तितक्या 'रास्ततेच्या' निकषावर आधारीत तर असायला हवेत ना?

बाकी प्रतिसादांना प्रत्युत्तर देत बसलात तर पुढची कथा राहून जाईल Happy

(किंवा न ठरलेली कथा लिहिली जाईल).

'बलात्कार केवळ एक अपघात समजून सोडून द्या' हे मूळ कथाबीज कितीही बरोबर असलं तरी इतकं वरवरचं लिहिण्यासारखं सोपं नाही. त्याला अनेक गुंतागुंतीचे कंगोरे आहेत. आणि ते मांडण्याइतकी प्रगल्भता आणि सेन्सिटिव्हिटी कथेत दिसली पाहिजे. चालता चालता धडपडलं आणि कपड्यावरची धूळ झटकून पुन्हा चालायला लागण्यासारखं हे असं सहज घडणार नाही.

बलात्कार झाल्यानंतर एडस ची भिती दाखवण्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असहाय स्त्रीवर बलात्कार करण्याची मानसिकता असलेले ते तरूण, आपल्याला होऊ घातलेला एडस अजून इतरांना का देऊ नये? असा विचार करणारे निघाले तर?

एक कथा म्हणून बघितलं तर जे काही लिहिलंय ते अगदी बेसलेस आहे. कथा लिहिताना त्यामधे अशा पद्धतीच्या वैद्यकीय चुका असू नयेत अशी वाचकाची अपेक्षा असते. लेखक म्हणून आपल्याला जितकी अक्कल असते त्यापेक्षा जास्त अक्कल वाचकांना असते हा थंबरूल कायम लक्षात ठेवायला हवा. तुमच्या मागच्या एका कथेमधे पण असंच मेडीकली बेसलेस प्लॉट होता, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगितली होतीच.

गर्भाशय काढल्यावर शरीरात एड्स चे जंतू शिरण्याचा मार्ग बंद होतो असे मला वाटते म्हणून ते वाक्य मी लिहिले आहे . पण ते चुकीचे असू शकेल कदाचित .
>>> कदाचित नव्हे, तर ते चुकीचेच आहे. थोडंसं गूगल करून पाहिलंत अथवा जवळच्या एखाद्या डॉक्टरला विचारलं असतं तर योग्य ती माहिती मिळाली असती. आपल्या शरीराची बेसिक अ‍ॅनाटॉमी आपल्याला माहित हवीच. अशा चुकीच्या कारणांमुळे आपण लोकांमधे कसले गैरसमज पसरवत आहोत का याचा एकदा विचार करा.

दुसरी गोष्ट म्हणजे गेले कितीतरी दिवस मीडीयामधून, सोशल नेटवर्किंगमधून स्त्रियांनी अशा परिस्थितीत कसं वागलं पाहिजे, कसं प्रसंगावधान राखलं पाहिलं याबद्दल लिहून आलेले वाचलं असेलच. अशावेळेला कथानायिका कसलाही प्रतिकार न करता चक्क "एंजॉय" करायचा विचार करते, हे फार म्हणजे फार खटकलं. भर पार्कमधे किमान तिने आरडाओरडा तरी करायला हवा होता पण तसं न करता नंतर ती "मला एड्स आहे" वगैरे गप्पा मारत बसते.... अगदीच विचित्र.

"इफ यू कान्ट अवॉईड इट, एंजॉय इट" असं लेखिका (की नायिका ?) म्हणते पण रेप अवॉईड करण्यासाठी कुठलेच प्रयत्न ती करत नाही.
एड्स ची भीती बलात्कार होण्याआधी दाखवली असती तर तो कदाचित टाळता आला असता ना?
(फारच बै विचार करते मी :))

स्त्री शिवाय कुठलेच नाते पूर्ण होत नाही. या नायिकेच्या ठिकाणी कुणीही असू शकतं. डोकं गहाण न टाकता थोडासा असा विचार केला तर ही कथा सहन होईल का ? कल्पनाशक्तीच्या जोरावर काहीही लिहीता येतं हा भ्रम आहे. वेळ जात नाही म्हणून बलात्कार, एडस अशा गंभीर समस्यां अगदीच लाइटली घेणे ( खिल्ली उडवणे) , लेख वर राहील असे पाहणे हे थांबवाल का ?

( एक कथा आठवली. कुठली ते लक्षात नाही. पण त्यात नायिकेवर बलात्कार होतो. आणि ती त्या ठिकाणाहून बाहेर पडताना लगेचच एका प्रसंगाला तोंड देताना धूर्तपणे मनात अंक काय मोजते, मागे पाहून अंदाज काय घेते.. त्याची आठवण झाली. अशा प्रसंगातून गेल्यावर तिची उद्ध्वस्त मानसिकता अशा लेखकांच्या गावीही नसते का ?)

एड्स ची भीती बलात्कार होण्याआधी दाखवली असती तर तो कदाचित टाळता आला असता ना?
(फारच बै विचार करते मी ) +१११११११११११११११११११

एड्स ची भीती बलात्कार होण्याआधी दाखवली असती तर तो कदाचित टाळता आला असता ना?<<<

१. जिच्यावर जबरदस्ती होत आहे / होणार आहे (पार्कमध्ये इतर कोणी नसताना, तिघांकडून आणि व्यवस्थित नियोजन केलेल्यांकडून) ती 'भीती दाखवण्याच्या' पोझिशनमध्ये असणे फार अवघड वाटते. ती स्वतः इतकी घाबरलेली असेल की 'आपण कशाचीतरी भीती दाखवू शकतो' असे तिला सुचणे अवघड वाटते.

२. ते तिला सुचले, तरी 'एड्सची भीती दाखवणे' हे पोकळ वाटते. एक तर नियमीत जॉगिंग / वॉकिंग करणारी (कानाला इयरफोन लावून वगैरे) मुलगी / स्त्री सहसा चांगल्या व सुशिक्षित घरापैकी असते हे बघणार्‍याला समजू शकते. तिला एड्स असूच शकत नाही असे मुळीच म्हणायचे नाही, पण असण्याची शक्यता फार कमी हे कोणालाही वाटेल. एड्सऐवजी शस्त्र, ओरडून लोक जमा करण्याचा प्रयत्न याची भीती दाखवणे / वाटणे अधिक संभव वाटते.

३. वासनांध तरुण एड्सची धमकी ऐकून दुष्कृत्य आवरते घेतील असे वाटत नाही. किंबहुना, काहीच न करता आल्यामुळे ते तिला उगीचच छळतील.

४. एवढे सगळे करून, तिने भीती दाखवली आणि घाबरून ते काही न करता निघून गेले तर ठीकच. पण मग असे तरुण, जे एड्सला घाबरतात पण बलात्कार करायला घाबरत नाहीत, ते नक्की कोणत्या 'मिट्टीचे' असतील असे मनात आले.

बाकी, यावरून असेही मनात आले की नियमीत पार्कमध्ये वॉकिंगला येणार्‍या एका मुलीला निव्वळ एखाद्या दिवशी किंचित उशीर झाल्यावर पार्क सुनीसुनी झालेली पाहून लगेच एक तरुणांचे टोळके बलात्काराचे नियोजन करू शकेल व ते अंमलात आणू शकेल हेही असंभवच वाटते.

जिच्यावर जबरदस्ती होत आहे / होणार आहे (पार्कमध्ये इतर कोणी नसताना, तिघांकडून आणि व्यवस्थित नियोजन केलेल्यांकडून) ती 'भीती दाखवण्याच्या' पोझिशनमध्ये असणे फार अवघड वाटते. ती स्वतः इतकी घाबरलेली असेल की 'आपण कशाचीतरी भीती दाखवू शकतो' असे तिला सुचणे अवघड वाटते >>>>>>>>>>>> अगदी मान्य.

पण हीच घाबरलेली मुलगी, बलात्कार झाल्यानंतर एड्स ची भीती दाखवण्याइतकी धीट कशी झाली?
बलात्कार झाल्यानंतरची तिची मानसिकरित्या उध्वस्त वगैरे झाली नाही का?
मी फक्त बलात्कार टाळण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणुन एड्स ची भीती दाखवण्याचा उल्लेख केलाय. त्याने तो टाळता आला असता की नाही ही नंतरची गोष्ट.

पण हीच घाबरलेली मुलगी, बलात्कार झाल्यानंतर एड्स ची भीती दाखवण्याइतकी धीट कशी झाली?<<<

म्हणूनच नंदिनी याला 'बेसलेस' म्हणत आहेत व ते पटते.

नाही पटला खुप असंबद्ध वाटला.
पण सगळ्यांना मनापासुन एकचं प्रश्न विचारावासा वाटतोय की नेहमी बलत्कार झालेली स्त्री, मुलगी ही लोकांना असहायचं का वाटते....?
ती शरीराने दुबळी झालेली असते हे मान्य. पण मानसिकरीत्या ती खंबरी का असु शकत नाही....?
माझा प्रतिसाद हा लेखिकेला प्रोत्साहन नक्कीच देत नाही आहे. ही कथा मलाही मनापासुन बिलकुल पटलेली नाही आहे. ईतका संवेदनशील विषय खुपच संवेदनाक्षमपणे हाताळायला हवा होता.

गर्भाशय काढल्यावर शरीरात एड्स चे जंतू शिरण्याचा मार्ग बंद होतो असे मला वाटते म्हणून ते वाक्य मी लिहिले आहे . पण ते
चुकीचे असू शकेल कदाचित .
<<
आपले लेखक देखिल रिसर्च करतात हो. थोडे कष्ट घेतले तर बरे असते. दुसरे काही नसले, तरी देवाने गूगल दिले आहे ना तुम्हाला?

भंकस लिहून ठेवलंय, अन वर अशी स्पष्टीकरणे.

कथा आवडली नाही... पुन्हा परत लिहण्याचा प्रयत्न करा असे सुचवावेसे वाटते.

बेफिकीर - पहिला प्रतिसाद आवडला.

katheche manthan karanaarya saaryaanche manaapaasoon aabhaar ! jevhaa mi hi kathaa dusarya ekhaadya masikaakade paathaven tevhaa yaa sarva muddyanchaa vichaar karoon aavashyak te badaal nakki karen . maayabolivar kathaa paathavanyaachaa hetu haach hotaa ki tyaatil truti malaa kalaavyaat. olakheechyaa lokaanaa daakhavali tar te teekaa na karataa chaan chaan ase mhanoon vel maaroon netaat . punha ekadaa dhanyavaad.

पाऊण तास वाया गेलां होता ! जाऊ दे ! एवि तेवी पहिली बस गेलीच आहे ! आता घरी जाउन स्वच्छ अंघोळ करावी, झकास नाश्ता करावा आणि मग च कामावर जावं झालं ! नवरयाला उशिराचे काय कारण सांगायचे याचा विचार करत ती संथ गतीने घराकडे निघाली,

---> How can a woman think like this after what happened... kahipan thoughts aahet...

Pages