पहिला पाऊस

Submitted by तुमचा अभिषेक on 29 May, 2013 - 00:25

नो चिकचिक नो झिगझिग
अन दरवळणारा मातीचा वास
आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला !

अंग भिजवायला पुरेसा नव्हता,
मन मात्र पार न्हाऊन निघाले..

- तुमचा अभिषेक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

लोक काहीही लिहितात आणि कविता म्हणतात
अहो महाशय एक कविता न म्हणता चारोळी म्हणा हिला पण तत्पूर्वीही चार ओळीत हिला बसवा

वैवकु तुमच्याशी सहमत, खरेच मी काहीही लिहिलेय, माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन माझ्या लिखाणावर क्लिक करा, कविता विभागातील माझे हे पहिलेच खरडणे, अन खरेच मी काहीही लिहिलेय.... पण नाही राहावले, गेले महिनाभर इथे मुंबईत गरमीने अंगाला पाणी सुटून जे नुसती चिकचिक झिगझिग होतेय ती आज झाली नाही, कसलं बरं वाटलय म्हणून सांगू जेव्हा महिन्याभरानेच आज डॉकयार्ड ते बेलापूर या तासाभराच्या प्रवासात थंड झोप लागली.... सिमेंट काँक्रीटचे जंगल आमची मुंबई पण आज त्या दगडी रस्त्यांनाही कुठूनसा कोकणातल्या मातीचा वास येत होता, त्यावरून चालताना अंगाखांद्यावर आभाळातून पडणारे पावसाचे थेंब, किती वाट बघत होतो मी या थंडाव्याची गेले महिनाभर.... ऑफिसमध्ये आल्यावर देखील हाच विषय चर्चेचा, म्हटल आपल्या ऑनलाईन कट्ट्यावरही या भावना शेअर कराव्यात, तर जे मनात आले ते टाईपले, झालीच एखादी ओळ जास्त तर आता कुठे काटत बसू.... नाहीतरी वर्षानुवर्षे आपण त्याच त्या चार ओळीत चारोळ्या ठोकत आलो आहोत, फॉर ए चेंज म्हणून हिला पांचोली (आदित्य नाही हं) म्हणत गोड मानून घ्या.. Happy

आवडला प्रतिसाद
यात आहे बघा कविता !!!! मला दिसली बुवा

बाकी खरय अहो मधे २ दिवस आलो मुंबईत काय हाल झाले म्हणून सांगू !!!!! बाप रे बाप !!!

(आदित्य )पांचोली<<< Rofl

कविता नाही तर नाही प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद, अन तुम्हाला दिसली तर त्यात असेलही कविता... तसेही कविता माझे क्षेत्र नसल्याने जसे लेखाच्या बाबतीत असते तशी प्रतिसादांची उत्सुकता नव्हतीच, बाकी फेसबूकवर वीस-पंचवीस लाईक कुठे जाणार नाहीत एवढे मात्र सांगून ठेवतो. Wink

Lol __/\__