Submitted by मुग्धमानसी on 22 November, 2012 - 00:11
यमुनेकाठी रोज उतरतो कृष्ण वाजवीत पावा...
यमुनेच्या धारेला छेडीत राधा घेते धावा..
श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा
राधेचे प्रतिबिंब तयातून, मूर्तिमंत सोहळा
कृष्णाची बासरी आळवी 'राधा... राधा...' गीत
राधेच्या श्वासातून घुमते 'कृष्ण... कृष्ण..' संगीत
कुष्ण धावतो रेतीवरती, उमटतात पाऊले
राधा पळते सृष्टीवरती सांडत चांदणफुले
उष्ण श्वास अन् अधीर डोळे त्यात राधेचे बिंब
कृष्णाच्या डोळ्यात थेंब अन् तिकडे राधा चिंब
अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा
कातरवेळी रोजच राधा होई अशी बावरी
नेत्र सावळे, सृष्टि सावळी, सोनेरी बासरी
भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत
हीच अनामिक हुरहुर भरते आत आणि बाहेर
सांजवेळ मग होऊन जाते हळवी कातरवेळ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही ओळी सुंsssदरच उतरल्यात,
काही ओळी सुंsssदरच उतरल्यात, काही ठिकाणी अर्थ नीटसा लागला नाही
श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा
अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा>>
दिवाळीअंकात आहे ना ही कविता?
दिवाळीअंकात आहे ना ही कविता?
हो. ही कविता हितगुज दिवाळी
हो. ही कविता हितगुज दिवाळी अंकातही आहे.
apratim...farach chhan.
apratim...farach chhan.
ग्रेट कविता आहे ही
ग्रेट कविता आहे ही !!!
प्रतिसाद वाचले ....अशा कवितेत उणीवा शोधण्यात अर्थ नसतो !!अशी कविता वाचून फक्त एकच करावे त्या कवितेपुढे नतमस्तक व्हावे
___________/\____________
पुढील लेखनास शुभेच्छा
पुढील लेखनास शुभेच्छा
फारच छान ,चिरंतन प्रेमावरील
फारच छान ,चिरंतन प्रेमावरील निरंतर सुंदर काव्य
मस्त!! अगदी श्रीरंगाच्या
मस्त!! अगदी श्रीरंगाच्या रंगात रंगलीये कविता!!!...:स्मित:
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतिम, अप्रतिम........
अप्रतिम, अप्रतिम........
(No subject)
भेटेना राधेला कान्हा जरी भरला
भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत>>>
शब्दांच्या पलीकडले.......
केवळ अप्रतिम.... केवळ
केवळ अप्रतिम.... केवळ अप्रतिम, मुग्धमानसी
भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत...
आता ह्यापुढे अजून काहीही वाचायचं नाही. (काही इतकं अतीव सुंदर, आतलं, गहन वाचलं की त्यापुढे त्यादिवशी अजून काहीही वाचायचं नाही... शक्यच नाही)
खुप खुप धन्यवाद सुशांत आणि
खुप खुप धन्यवाद सुशांत आणि दाद!
एखाद्या चलतचित्रासारखी सजीव
एखाद्या चलतचित्रासारखी सजीव कविता.खूप सुंदर.
एखाद्या चलतचित्रासारखी सजीव
एखाद्या चलतचित्रासारखी सजीव कविता.खूप सुंदर.
आवडली
आवडली कविता.
---------------------------------------------------------
अवांतर...
श्यामल श्यामल मेघांसम का भरुन येती लोचन
राधिके येईल ग मोहन...राधिके येईल ग मोहन
गुपित सांगते राधे तुजला
तुझ्याविना ना चैन हरीला
याच घडीला, तव भेटीला
अधीर झाला असेल साजण
श्यामल श्यामल मेघांसम का भरुन येती लोचन
राधिके येईल ग मोहन...राधिके येईल ग मोहन
या गाण्याची आठवण झाली
----------------------------------------------------------
आहा .... >>>भेटेना राधेला
आहा ....
>>>भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत <<< शब्दच संपले ! जिओ
---------------/\------------
---------------/\----------------
सुन्दर....
एवढ्या दिवसांनी हा धागा वर
एवढ्या दिवसांनी हा धागा वर आला आणि सर्वांना आवडलाही... छान वाटलं. खूप धन्यवाद!
ए तु असंच मस्त मस्त लिहित जा
ए तु असंच मस्त मस्त लिहित जा गं. आता कसं माबो वर पुन्हा आल्याचं समाधान मिळतंय
(No subject)
सुंदर
सुंदर