निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चितमपल्लींनी, धनेशाची जीवननिष्ठा असा एक लेख लिहिला होता. पिल्लाच्या संगोपनासाठी नरमादी अक्षरशा: जीवाचे रान करतात. मादी आपली पिसे काढून टाकते कारण ढोलीमधे तिला त्यांची अडचण होणार असते. मग केवळ तिची चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवून, ढोलीचे दार चिखल आणि विष्ठा मिसळून बंद केले जाते. मग पुढील काही महिने तिची आणि पिल्लांच्या पोषणाची जबाबदारी केवळ नराची. तो त्या सर्वांना पुरेल एवढे अन्न, बाहेरूनच पुरवतो.
या अन्नातही विविधता असते, कधी उंबरासारखी फळे तर कधी पाली, सरडे तर कधी केवळ पाने ( धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. )
आणि ज्यावेळी पिल्ले मोठी होतात, त्यावेळी सर्व कुटुंब बाहेर येतं. आई बाबा अगदी धन्य होतात.
या सर्व धांदलीचे सुंदर चित्रण, अ‍ॅनिमल्स आर ब्यूटीफूल पीपल मधे आहे. ( संवाद नाहीत हं, ते माझे. )

दिनेश दा.. मस्त संवाद.. Happy डायलाक रायटर म्हणून साईड जॉब बघा मिळेल... समर जॉब सारखा Happy

बरोबरची माहिती ही अतिशय रंजक..
अब सिर्फ फोटोग्राफर की देर है.. Happy

धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. >>> Biggrin धनेशीण बाईंचं मन जाणलं हं तुम्ही दिनेशदा!

ते खरंच, पण पक्ष्या प्राण्यांमधे शब्दांवीणा संवादु, किती सुंदर असतो ना !
धनेशाला, त्याच्या नजरेआड वाढणार्‍या पिल्लांची ख्यालीखुशाली पण ती सांगत असेलच. त्याला त्यांच्या गरजा, न सांगताही कळत असतीलच.

चोचीमंदी चोच टाकून, दानं उष्ट झालं जी... झालं जी.

मानुषी अप्रतीम फोटो टिपलेयस अगदी.
माझ्याकडे साधनाने दिलेल अ‍ॅडेनियम छान झाल आहे. पण सध्या त्याला अबोलीने गुरफटून टाकल आहे. माझी लेक ह्या शेंगांची वाटच पहात असते. त्या फुटल्या की त्यांच्याशी म्हातारी म्हातारी उडवत खेळते.
ह्या मागील वर्षीच्या म्हातार्‍या.

दिनेशदा म्हणजे धनेश कुटुंब आमच्यासारख दिसत. Lol

का गोईण पुस्तकात वाचल की उंबराच्या पानावर जे फोड येतात तुम्ही ज्यावर मागे लिहीले होते ते फोड आदिवासी मुले खातात. उंबराची फळेही न फोडता खातात त्यातील पाखरे दिसू नये म्हणून.

मी गेल्याच भागात माझ्याकडील कडिपत्त्याच्या रोपाविषयी लिहिले होते, ते रोप आता फारच जोमाने वाढत आहे, पण ते रोप मला देणारे माझे काका मात्र परत न येण्याच्या दिशेने गेले. (२ मे). आता गॅलरीत त्या कुंडीकडे पाहाताना डोळे भरून येतात. मी त्या पानांवरून हळूवार हात फिरवते, आणि निराश मनाने घरात फिरते. Uhoh
दिनेशदा, तुम्हाला मी जी हळद दिली होती ती त्या काकांकडूनच आणली होती.

प्रज्ञा वाईट झाले. पण तुझ्याकडे त्यांनी त्यांच्या झाडाचा वारस दिला आहे त्याला प्रेमाने जोपास.

बेलाच्या कळ्या.

प्रज्ञा वाईट झाले. पण तुझ्याकडे त्यांनी त्यांच्या झाडाचा वारस दिला आहे त्याला प्रेमाने जोपास. >>+१
मानुषी - अतिशय सुंदर प्रचि Happy
अ‍ॅडेनियमच्या थोड्या बिया आम्हालाही द्या हो. Happy
जागुताई प्रचि सुंदर आहेत Happy ते बेलाचे झाड घरी आहे का ?

प्रज्ञा, काकांची बातमी मला समजली होती. ते आपल्यामधे आहेतच असे समजायचे.

जागू,
बेलाच्या फुलाचा रंग पण अनोखाच असतो. लक्ष ठेवून फोटो काढ. ते फुल झाडावरून न तोडता जर दोन बोटांच्या मधे धरलेस तर कॅमेरा, त्या फुलावर छान फोकस करता येईल आणि फोटोही नीट येईल.

मानुषी, लाजवाब फोटो. आणि 'बो' ची उपमा पण परफेक्ट Happy
वर्षू ... तुझं माझं शोभीचं(कुठाय ती?) ठरलं होतं ना सग्गळीकडे कॅमेरा कॅरी करायचा....हाकानाका!>>>>>>>>>>>आल्के, आले, बोल आता. कुठे कुठे घेऊन गेली होतीस कॅमेरा? Proud

तरी ते हॉर्नबिल काही आज आले नाहीत. मलाही उठायला अंमळ उशीरच झाला व्हता!>>>>>>>>.ते काय तुझी वाट पहात थांबणार? फोटो काढणार आहेस म्हणून? Light 1 Lol

मी गेल्याच भागात माझ्याकडील कडिपत्त्याच्या रोपाविषयी लिहिले होते, ते रोप आता फारच जोमाने वाढत आहे, पण ते रोप मला देणारे माझे काका मात्र परत न येण्याच्या दिशेने गेले. (२ मे). आता गॅलरीत त्या कुंडीकडे पाहाताना डोळे भरून येतात. मी त्या पानांवरून हळूवार हात फिरवते, आणि निराश मनाने घरात फिरते. अ ओ, आता काय करायचं>>>>>>>>प्रज्ञा, Sad तुझ्याकडे ते रोप तरी आहे. ....

मानुषी, मस्तच फोटो. Happy
प्रज्ञा Sad

सध्या माझ्याकडे कुंडीत ग्रीष्मबहर सुरू आहे. मोगरा, अबोली आणि एडेनियम मस्त फुललेत. Happy

मायबोलीकर बित्तुबंगाने बहाव्याच्या बिया दिल्या होत्या, त्या सगळ्या रूजल्या त्याची आता छोटी छोटी रोपे तयार झाली आहेत.

कुणाला पाहिजे असेल तर सांगा. Happy

माझ्याकडील बहाव्याला आता पालवी फुटली आहे नविन.

नितीन, दिनेशदा बेलाचे मोठे झाड माझ्या माहेरी आहे. घरी अगदी छोटे बाळ आहे. पुन्हा माहेरी गेल्यावर फुल दिसले तर फोटो काढेन.

कुंडीतली मिरच्यांची रोपे तरारली आहेत.फुलेही आली आणि गळाली.पण १ ही मिरची लागली नाही.काय करावे लागेल? कारल्याच्या वेलीला पिटुकले कारले लागले आहे.
आजच एका कावळ्याला चोचित काड्या नेताना पाहिले.म्हणजे खरच पाऊस जवळ आला!

आजच एका कावळ्याला चोचित काड्या नेताना पाहिले.म्हणजे खरच पाऊस जवळ आला!>>>>>>>>>>५-६ दिवसांपूर्वी मी ऑफिसला येताना, एक कावळा, माडाची विरी पडली होती, त्याच्या काड्या काढत होता. फोटो काढण्याचा मोह झाला . पण बसची वेळ झाली होती. त्यामुळे नाईलाजाने फोटो काढता आला नाही. पण खूप चुट्पूट लागली. Sad

येळेकर, कुंडीत रोपांची दाटी झाली आहे का ? एका कुंडीत एकच जोमदार रोप ठेवायचे.

जिप्सी / शांकली, जर बहाव्याची रोपे कुंडीतच ठेवलीत तर पावसाळ्यात हमखास पिवळी फुलपाखरे त्यावर अंडी घालायला येतील..

जागू, बेलफळ पण लागत असतील ना ? खरे तर आताही माहेरच्या झाडावर असतील.

मानुषी,
लई भारी फोटो आणि निरिक्षण, निसर्गाची किमया लाजवाब आहे.

जागु,
छान फोटो, बेलाच्या अशा कळ्या कधी जवळुन पाहिल्या नव्हत्या.

दिनेशदा,
छान माहिती.
आमच्या साठी तुम्ही दुसरे चितमपल्लींच आहात..

आज आमच्याकडे धुँवाधार पाऊस आहे......... संध्याकाळ चे ५ पण रात्रीचे १२ वाजल्यासारखे वाटतायेत...
वर्षु,
काय तुमचं चिनी हवामान ..आता पाऊस ?
आमच्याकडे संध्याकाळचे ५ वाजलेत पण दुपारी १२ वाजल्याप्रमाणे कडक ऊन पडलं आहे. Happy

येळेकर, आपलं नि.ग.वर स्वागत आहे. धन्यवाद! >> १+ Happy

दिनेशदा,
छान माहिती.
आमच्या साठी तुम्ही दुसरे चितमपल्लींच आहात.. >> अगदी

जागू, मधाचं पोळं आणि मिळालेला शुद्ध मध खासच!! मज्जा आहे बाई तुझी!! फोटो पण मस्त आलेत. अगं ती कदाचित मोहोरी माशी असेल. ती खूप शांत स्वभावाची असते. आग्या माश्यांसारखी अ‍ॅग्रेसिव्ह नसते.

मानुषी.......सह्हीच हं अ‍ॅडेनियमच्या म्हातार्‍याचं कलेक्षन!! कस्ल्या गोडू गोडू दिसताहेत त्या!! आणि तू अगदी अथ पासून इती पर्यंत सगळे फोटो काढलेस......ते भारीच! Happy

अनिल, तुमचा सेल नं संपर्कातून कळवाल का?

धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. >>>>>>>> Rofl

दा, खरंच तुम्ही संवाद लिहिण्याचं मनावर घ्याच!

आजपासून दिनेशदांचं नाव 'दिनेशदा अंगोलापल्ली'! >>>>>>>>>>>>अगदी अगदी!!
हे अंगोलापल्ली मात्र भारीये! Lol

Pages