निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
चितमपल्लींनी, धनेशाची
चितमपल्लींनी, धनेशाची जीवननिष्ठा असा एक लेख लिहिला होता. पिल्लाच्या संगोपनासाठी नरमादी अक्षरशा: जीवाचे रान करतात. मादी आपली पिसे काढून टाकते कारण ढोलीमधे तिला त्यांची अडचण होणार असते. मग केवळ तिची चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवून, ढोलीचे दार चिखल आणि विष्ठा मिसळून बंद केले जाते. मग पुढील काही महिने तिची आणि पिल्लांच्या पोषणाची जबाबदारी केवळ नराची. तो त्या सर्वांना पुरेल एवढे अन्न, बाहेरूनच पुरवतो.
या अन्नातही विविधता असते, कधी उंबरासारखी फळे तर कधी पाली, सरडे तर कधी केवळ पाने ( धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. )
आणि ज्यावेळी पिल्ले मोठी होतात, त्यावेळी सर्व कुटुंब बाहेर येतं. आई बाबा अगदी धन्य होतात.
या सर्व धांदलीचे सुंदर चित्रण, अॅनिमल्स आर ब्यूटीफूल पीपल मधे आहे. ( संवाद नाहीत हं, ते माझे. )
दिनेश दा.. मस्त संवाद..
दिनेश दा.. मस्त संवाद.. डायलाक रायटर म्हणून साईड जॉब बघा मिळेल... समर जॉब सारखा
बरोबरची माहिती ही अतिशय रंजक..
अब सिर्फ फोटोग्राफर की देर है..
धनेशीण बाई सांगत असतील का,
धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. >>> धनेशीण बाईंचं मन जाणलं हं तुम्ही दिनेशदा!
ते खरंच, पण पक्ष्या
ते खरंच, पण पक्ष्या प्राण्यांमधे शब्दांवीणा संवादु, किती सुंदर असतो ना !
धनेशाला, त्याच्या नजरेआड वाढणार्या पिल्लांची ख्यालीखुशाली पण ती सांगत असेलच. त्याला त्यांच्या गरजा, न सांगताही कळत असतीलच.
चोचीमंदी चोच टाकून, दानं उष्ट झालं जी... झालं जी.
आज आमच्याकडे धुँवाधार पाऊस
आज आमच्याकडे धुँवाधार पाऊस आहे......... संध्याकाळ चे ५ पण रात्रीचे १२ वाजल्यासारखे वाटतायेत...
मानुषी अप्रतीम फोटो टिपलेयस
मानुषी अप्रतीम फोटो टिपलेयस अगदी.
माझ्याकडे साधनाने दिलेल अॅडेनियम छान झाल आहे. पण सध्या त्याला अबोलीने गुरफटून टाकल आहे. माझी लेक ह्या शेंगांची वाटच पहात असते. त्या फुटल्या की त्यांच्याशी म्हातारी म्हातारी उडवत खेळते.
ह्या मागील वर्षीच्या म्हातार्या.
दिनेशदा म्हणजे धनेश कुटुंब आमच्यासारख दिसत.
का गोईण पुस्तकात वाचल की उंबराच्या पानावर जे फोड येतात तुम्ही ज्यावर मागे लिहीले होते ते फोड आदिवासी मुले खातात. उंबराची फळेही न फोडता खातात त्यातील पाखरे दिसू नये म्हणून.
वर्षु, धन्स ! मानुषी, किती
वर्षु, धन्स !
मानुषी, किती छान फोटो आलेत ! केसर कसले चमकदार दिसतायत !
मी गेल्याच भागात माझ्याकडील
मी गेल्याच भागात माझ्याकडील कडिपत्त्याच्या रोपाविषयी लिहिले होते, ते रोप आता फारच जोमाने वाढत आहे, पण ते रोप मला देणारे माझे काका मात्र परत न येण्याच्या दिशेने गेले. (२ मे). आता गॅलरीत त्या कुंडीकडे पाहाताना डोळे भरून येतात. मी त्या पानांवरून हळूवार हात फिरवते, आणि निराश मनाने घरात फिरते.
दिनेशदा, तुम्हाला मी जी हळद दिली होती ती त्या काकांकडूनच आणली होती.
प्रज्ञा वाईट झाले. पण
प्रज्ञा वाईट झाले. पण तुझ्याकडे त्यांनी त्यांच्या झाडाचा वारस दिला आहे त्याला प्रेमाने जोपास.
बेलाच्या कळ्या.
प्रज्ञा वाईट झाले. पण
प्रज्ञा वाईट झाले. पण तुझ्याकडे त्यांनी त्यांच्या झाडाचा वारस दिला आहे त्याला प्रेमाने जोपास. >>+१
मानुषी - अतिशय सुंदर प्रचि
अॅडेनियमच्या थोड्या बिया आम्हालाही द्या हो.
जागुताई प्रचि सुंदर आहेत ते बेलाचे झाड घरी आहे का ?
प्रज्ञा, काकांची बातमी मला
प्रज्ञा, काकांची बातमी मला समजली होती. ते आपल्यामधे आहेतच असे समजायचे.
जागू,
बेलाच्या फुलाचा रंग पण अनोखाच असतो. लक्ष ठेवून फोटो काढ. ते फुल झाडावरून न तोडता जर दोन बोटांच्या मधे धरलेस तर कॅमेरा, त्या फुलावर छान फोकस करता येईल आणि फोटोही नीट येईल.
इनमीनतीन कधी येता नगरला
इनमीनतीन कधी येता नगरला बोला.........एडेनियमच्या बीया न्यायला?
मानुषी, लाजवाब फोटो. आणि 'बो'
मानुषी, लाजवाब फोटो. आणि 'बो' ची उपमा पण परफेक्ट
वर्षू ... तुझं माझं शोभीचं(कुठाय ती?) ठरलं होतं ना सग्गळीकडे कॅमेरा कॅरी करायचा....हाकानाका!>>>>>>>>>>>आल्के, आले, बोल आता. कुठे कुठे घेऊन गेली होतीस कॅमेरा?
तरी ते हॉर्नबिल काही आज आले नाहीत. मलाही उठायला अंमळ उशीरच झाला व्हता!>>>>>>>>.ते काय तुझी वाट पहात थांबणार? फोटो काढणार आहेस म्हणून?
मी गेल्याच भागात माझ्याकडील कडिपत्त्याच्या रोपाविषयी लिहिले होते, ते रोप आता फारच जोमाने वाढत आहे, पण ते रोप मला देणारे माझे काका मात्र परत न येण्याच्या दिशेने गेले. (२ मे). आता गॅलरीत त्या कुंडीकडे पाहाताना डोळे भरून येतात. मी त्या पानांवरून हळूवार हात फिरवते, आणि निराश मनाने घरात फिरते. अ ओ, आता काय करायचं>>>>>>>>प्रज्ञा, तुझ्याकडे ते रोप तरी आहे. ....
मानुषी, मस्तच फोटो. प्रज्ञा
मानुषी, मस्तच फोटो.
प्रज्ञा
सध्या माझ्याकडे कुंडीत ग्रीष्मबहर सुरू आहे. मोगरा, अबोली आणि एडेनियम मस्त फुललेत.
मायबोलीकर बित्तुबंगाने बहाव्याच्या बिया दिल्या होत्या, त्या सगळ्या रूजल्या त्याची आता छोटी छोटी रोपे तयार झाली आहेत.
कुणाला पाहिजे असेल तर सांगा.
मामी,शोभा१२३,ईनमीनतीन फोटोखरच
मामी,शोभा१२३,ईनमीनतीन
फोटोखरच छान!
येळेकर, आपलं नि.ग.वर स्वागत
येळेकर, आपलं नि.ग.वर स्वागत आहे. धन्यवाद!
माझ्याकडील बहाव्याला आता
माझ्याकडील बहाव्याला आता पालवी फुटली आहे नविन.
नितीन, दिनेशदा बेलाचे मोठे झाड माझ्या माहेरी आहे. घरी अगदी छोटे बाळ आहे. पुन्हा माहेरी गेल्यावर फुल दिसले तर फोटो काढेन.
जागू, मला लेकीचे फोटो नाही
जागू, मला लेकीचे फोटो नाही पाठवले ना?
कुंडीतली मिरच्यांची रोपे
कुंडीतली मिरच्यांची रोपे तरारली आहेत.फुलेही आली आणि गळाली.पण १ ही मिरची लागली नाही.काय करावे लागेल? कारल्याच्या वेलीला पिटुकले कारले लागले आहे.
आजच एका कावळ्याला चोचित काड्या नेताना पाहिले.म्हणजे खरच पाऊस जवळ आला!
आजच एका कावळ्याला चोचित
आजच एका कावळ्याला चोचित काड्या नेताना पाहिले.म्हणजे खरच पाऊस जवळ आला!>>>>>>>>>>५-६ दिवसांपूर्वी मी ऑफिसला येताना, एक कावळा, माडाची विरी पडली होती, त्याच्या काड्या काढत होता. फोटो काढण्याचा मोह झाला . पण बसची वेळ झाली होती. त्यामुळे नाईलाजाने फोटो काढता आला नाही. पण खूप चुट्पूट लागली.
येळेकर, कुंडीत रोपांची दाटी
येळेकर, कुंडीत रोपांची दाटी झाली आहे का ? एका कुंडीत एकच जोमदार रोप ठेवायचे.
जिप्सी / शांकली, जर बहाव्याची रोपे कुंडीतच ठेवलीत तर पावसाळ्यात हमखास पिवळी फुलपाखरे त्यावर अंडी घालायला येतील..
जागू, बेलफळ पण लागत असतील ना ? खरे तर आताही माहेरच्या झाडावर असतील.
मानुषी, लई भारी फोटो आणि
मानुषी,
लई भारी फोटो आणि निरिक्षण, निसर्गाची किमया लाजवाब आहे.
जागु,
छान फोटो, बेलाच्या अशा कळ्या कधी जवळुन पाहिल्या नव्हत्या.
दिनेशदा,
छान माहिती.
आमच्या साठी तुम्ही दुसरे चितमपल्लींच आहात..
आज आमच्याकडे धुँवाधार पाऊस
आज आमच्याकडे धुँवाधार पाऊस आहे......... संध्याकाळ चे ५ पण रात्रीचे १२ वाजल्यासारखे वाटतायेत...
वर्षु,
काय तुमचं चिनी हवामान ..आता पाऊस ?
आमच्याकडे संध्याकाळचे ५ वाजलेत पण दुपारी १२ वाजल्याप्रमाणे कडक ऊन पडलं आहे.
येळेकर, आपलं नि.ग.वर स्वागत
येळेकर, आपलं नि.ग.वर स्वागत आहे. धन्यवाद! >> १+
दिनेशदा,
छान माहिती.
आमच्या साठी तुम्ही दुसरे चितमपल्लींच आहात.. >> अगदी
जागू, मधाचं पोळं आणि मिळालेला
जागू, मधाचं पोळं आणि मिळालेला शुद्ध मध खासच!! मज्जा आहे बाई तुझी!! फोटो पण मस्त आलेत. अगं ती कदाचित मोहोरी माशी असेल. ती खूप शांत स्वभावाची असते. आग्या माश्यांसारखी अॅग्रेसिव्ह नसते.
मानुषी.......सह्हीच हं अॅडेनियमच्या म्हातार्याचं कलेक्षन!! कस्ल्या गोडू गोडू दिसताहेत त्या!! आणि तू अगदी अथ पासून इती पर्यंत सगळे फोटो काढलेस......ते भारीच!
अनिल, तुमचा सेल नं संपर्कातून कळवाल का?
धनेशीण बाई सांगत असतील का,
धनेशीण बाई सांगत असतील का, काय मेलं ते रोज शाकाहारी खायचं, मुलं कटाळलीत अगदी, एखादा सरडाबिरडा बघा कि, किंवा किनई आज संकष्टीचा उपास आहे, नुसती हिरवी पाने खायचीत.. >>>>>>>>
दा, खरंच तुम्ही संवाद लिहिण्याचं मनावर घ्याच!
आमच्या साठी तुम्ही दुसरे
आमच्या साठी तुम्ही दुसरे चितमपल्लींच आहात..
>>> आजपासून दिनेशदांचं नाव 'दिनेशदा अंगोलापल्ली'!
मामी
मामी
जगभरातल्या औषधी वनस्पती
जगभरातल्या औषधी वनस्पती Healing Plants Around the World शिर्षकाखाली मोठी यादी आहे पीडीएफमध्ये.
आजपासून दिनेशदांचं नाव
आजपासून दिनेशदांचं नाव 'दिनेशदा अंगोलापल्ली'! >>>>>>>>>>>>अगदी अगदी!!
हे अंगोलापल्ली मात्र भारीये!
Pages