दुर्गवीरांची वचनपुर्ती

Submitted by मी दुर्गवीर on 14 May, 2013 - 10:49

दुर्गवीरांची वचनपुर्ती (लेख टाकण्यास विलंब झाला असो शिवकार्य महत्वाचे Wink )

दि.२४ / ३ / २०१३ रोजी दुर्गवीर च्या वीर आणि वीरांगनांनी दिलेल्या वचनाची पुर्ती करून अजून एक शिवकार्य निर्विघ्नपणे पार पाडले. शिवाय दुर्गवीरांनी अनुभवले पेब किल्यावर माथेरान चे अनोखे भारतीय सौदर्य मी धीरज लोके व नितीन पाटोळे दि. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी पेब किल्ला (विकटगड) येथे दुर्गदर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तेथील जोशी गुरुजी यांना आम्ही दुर्गवीर च्या कार्याची माहिती दिली ते दुर्गवीर च्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी तिथे चालू असलेल्या श्रमदान कार्यात मदत करण्याचे आवाहन केले. नितीन पाटोळे यानि दुर्गवीर च्या वतीने गुरुजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत या कार्यात मदत करण्याचा शब्द दिला.आज दुर्गवीर च्या ८ दुर्गवीर व २ वीरांगनांनी तो शब्द २४/३/२०१३ रोजी पूर्ण केला.

दि. २४/३/२०१३ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान च्या १० वीर आणि २ वीरांगनानि पेब किल्ला (विकट गड) येथे श्रमदान मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
पेब किल्ला येथिल जोशी गुरुजी यांना दिलेल्या शब्दास जागून तेथील प्रती गिरनार च्या मंदिरासाठी दुर्गवीर तर्फे श्रमदान मोहिम आयोजित करण्यात आली होती. शिवकार्य फक्त गड किल्ले यापर्यंत मर्यादित न ठेवता सोबतची धार्मिकता हि जागरूक ठेवण्याचे कार्य आज दुर्गवीर च्या १२ दुर्गवीर आणि वीरांगणांनी पार पाडले.
मंदिरासाठी या अगोदर महेश पिचारे (Mahesh Pichare ) आणि सुबोध हे कार्य करीत आहेत. गेली ४ वर्ष मदतीअभावी हे कार्य रखडून आहे. म्हणूनच दुर्गवीर च्या वीर आणि वीरांगणांनी हि मोहीम हाती घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेत तब्बल ७० - ८० गोण्या वाळू आणि विठा रेल्वे पटरी पासून काही अंतरावर असलेल्या तारेच्या रोप वे पर्यंत आणण्यात आल्या.

या मोहिमेत २ वीरांगनानि सुद्धा सहभाग घेतला होता.

"दुर्गवीर" धीरज लोके
1_1.jpg

मुलांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच मेहनतीने जड वाळू व सिमेंट, विठा याने ने भरलेल्या गोण्या उचलताना दुर्गवीरांगना ओजास्विनी पावशे व ज्योती डसके
या वीरांगना हे कार्य करू शकतात तर मग तुम्ही का नाही…
2_0.jpg

!! गडकोटांचे संवर्धन हाच खरा शिवरायांना मानाचा मुजरा !!
3_0.jpg4_0.jpg
आम्ही श्रमदानाचे फोटो टाकतो कारण ......
हे कार्य तुमच्या पर्यंत पोहचवण्या साठी ..
या कार्यत तुम्ही हि सहभाग घाव्या या साठी .....
या कार्यतून प्रेरित होऊन कधी हि कुठेही आणि केव्हाही हे कार्य करण्या साठी ...
तेव्हाच कुठे तरी ...

"सळसळल हे रक्त पुन्हा नव्याने
ढासळलेले गडकोट पुन्हा उभारू
पुन्हा भगवा दिमाखात फडकवण्यासाठी एक होवु
कष्ठ करु ईतिहास पुन्हा सांगण्यासाठी"

5_0.jpg6_0.jpg

लेखन ''दुर्गवीर'' धीरज लोके
__/\__
जय शिवशंभूछत्रपती
धन्यवाद "दुर्गवीर" नितीन पाटोळे 08655823748

Group content visibility: 
Public - accessible to all site users

!! गडकोटांचे संवर्धन हाच खरा शिवरायांना मानाचा मुजरा !!>>>>+१० ०

खूपच छान , तुमच्या कामाचे कौतुक करावे तेव्हडे कमीच .

शुभेच्छा …

खूपच छान , तुमच्या कामाचे कौतुक करावे तेव्हडे कमीच . > +१

या श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याची फार इच्छा आहे.

खूपच छान , तुमच्या कामाचे कौतुक करावे तेव्हडे कमीच . > +१

या श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याची फार इच्छा आहे.>>>
+१