देवराई आर्ट विलेज

Submitted by वर्षू. on 6 May, 2013 - 08:01

२०१२ मधे पहिल्यांदाच पाचगणीची वारी घडली. तिथे संजीवन विद्यालयाच्या मनोरम, निसर्गमयी आवारात जीजाजींना मिळालेल्या बंगल्यात राहायला मिळालं.(ते तिथे एक्झीक्युटिव्ह कोऑर्डिनेटर च्या पदावर कार्यरत आहेत.) शाळेची सफर करताना आर्ट सेक्शन चे हेड ,'सुरेश पुंगाटी' भेटले. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने देवराई आर्ट विलेज बद्दल सांगितले. तो त्याला आर्ट विलेज वगैरे भारी नाव वापरत नाही सरळ सरळ वर्कशॉप म्हणतो.

हुषार, काळासावळा ,तरतरीत सुरेश, जिल्हा गडचिरोली , तालुका भामरागड मधील कोयंगुदा खेड्यातील, माडिया जातीचा एक आदिवासी तरुण आहे. बाबा आमटे यांच्या शाळेत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
गडचिरोली, भामरागड ही नांवे वर्तमानपत्रात नेहमी नक्षलवादी कारवायांशी निगडित असल्याने ही नावे कानावर प्रत्यक्ष पडल्याने माझे कान टवकारले आणी सुरेश बद्दल अजून नीट माहिती जाणून घेण्याकरता आम्ही त्याला घरीच बोलावून घेतले.
त्याच्याबरोबर चहा पितापिता सहजपणे गप्पा मारता बर्‍याच गोष्टी समजल्या. त्याच्या छोट्याश्या खेड्यातले लोकं पारंपारिक ढोकरा आर्ट जपणारे कलाकार आहेत.
क्ले कोर पासून हवा त्या डिझाईन चा रफ मोल्ड तयार केला जातो.या मोल्ड वर शुद्ध बी वॅक्स चा थर दिला जातो. या मेणात त्या डिझाईन चे बारकावे कोरले जातात. तत्पश्चात या मोल्डवर क्ले चे थरावर थर चढवले जातात. हा मोल्ड , क्लिन मधे भाजला जातो. भाजल्यावर वरचा मेणाचा थर वितळून जातो. आता या मोल्ड मधे वितळलेले मेटल ओतण्यात येते. ( मोस्टली पितळ किंवा कॉपर बेस्ड अलॉय वापरले जातात.) हे वितळलेले मेटल, कोर आणी मोल्ड च्या आतील सरफेस मधे जाऊन, वितळलेल्या मेणाच्या जागा भरत त्या डिझाईन चा आकार घेते्ए मेटल थंड झाल्यावर टणक होते. नंतर बाहेरचा क्ले चा थर तोडून वेगळा केला जातो. तयार झालेल्या मेटल च्या कलाकृती ला मग पॉलिश केले जाते.
या मेथड ला द लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हणतात. मी ही संपूर्ण क्रिया प्रत्यक्ष पूर्ण पाहू शकले नाही कारण इतका वेळ नव्हता. तरी ही भयंकर वेळखाऊ आणी किचकट प्रक्रिया असावीसे वाटत होते. जरा दुर्लक्ष झालं तर मेणावर च्या बारीक नक्षीचे काम झटक्यात नष्ट होऊ शकते.
इतक्या मेहनतीनी तयार केलेल्या कलाकृतींना गडचिरोली जिल्ह्यात भाव मिळत नाही. नक्षलवाद्यांच्या दादागिरीमुळे कुणालाही आपला व्यवसाय स्थापन करता येत नाही.
दहा वर्षांपूर्वी एका आदिवासी कलेच्या प्रदर्शनानिमित्त सुरेश ची भेट ,'संजीवन; विद्यालयाच्या एका ट्रस्टीज शी झाली आणी त्यांनी त्याला या विद्यालयात आर्ट शिक्षका ची नोकरी देऊ केली. पाचगणीला आल्यावर काही काळाने त्याची भेट पाचगणीच्या रहिवासी मंदाकिनी माथुर या फिलम मेकर आणी environmentalist शी गाठ पडली. या दोघांच्या प्रयत्नांमुळे २००८ मधे 'देवराई आर्ट विलेज' उभे राहिले. या वर्कशॉप करता मंदाकिनी यांनी आपली जागा देऊ केलीये. या झोपडीवजा वर्कशॉप मधे सुरेश च्या गावांतील कलाकार मंडळी आपल्या कलेसा वारसा चालवत असतात.आपल्या गावातील थोड्या लोकांना तरी दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढून आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याचे समाधान सुरेश च्या डोळ्यात दिसते. त्यांच्याबद्दल वाटणारी कळकळ, त्यांच्या भविष्याकरता काहीतरी करण्याची धडपड त्याच्या प्रत्येक वाक्यांतून डोकावत असते.
२००२ साली एडिनबरा येथे 'सर्वोत्तम शिल्पकार ' आणी राज्यसरकार कडून ,' आदीवासी सेवा पुरस्कार' इ. सन्माननीय एवॉर्ड्स , सुरेश ला मिळालेले आहेत. याशिवाय मिलान इथे भरणार्‍या प्रदर्शनात भारतीय आदीवासी कला आणी हस्तकौशल्य संघाचे प्रतिनिधित्वही केलेले आहे.
याव्यतिरिक्त सुरेश , अनुसूचित जमातींच्या जातीची प्रमाणपत्रे त्यांना शासनाकडून मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. १९३२ पासून शासनाशी चालत आलेला झगडा आज ही त्याच स्टेज मधे आहे. Uhoh !! या वतनकार समाजाबद्दल परत केंव्हा सांगेनच सविस्तर..
तोपर्यन्त सुरेश आणी त्याच्या साथीदारांच्या कामाची एक छोटीशी झलक..

शॉर्ट वे टू वर्कशॉप

काही कलाकृती

आफ्रिकन कंगव्या पासून इन्स्पिरेशन घेतलेला हा कंगवा मलाच खूप आवडला म्हणून मी लगेच विकत घेऊन टाकला

सुरेश पुंगाटी

आणी त्याचे साथी कलाकार

इच्छुक मंडळींकरता सुरेश पुंगाटींचा कॉन्टॅक्ट नंबर +919765052057

http://www.youtube.com/watch?v=N9n1kZWk1sE

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लेख.....

ह्या कलाकारांना प्रसिद्धी मिळवुन द्यायलाच पाहिजे.... केवढं टॅलेंट आहे आपल्या कडे पण वाव नाही.....

वर्षु ताई तुझे अभिनंदन....

खुप छान माहिती .. आता हे सगळे धागे समोर येत आहे .. बरच काही सुटलय वाचन्यातुन..
सुंदर ओळख करुन दिलीय तुम्ही . हे सर्व इथ शेअर केल्याबद्दल धन्यवाद .

Pages