२०१२ मधे पहिल्यांदाच पाचगणीची वारी घडली. तिथे संजीवन विद्यालयाच्या मनोरम, निसर्गमयी आवारात जीजाजींना मिळालेल्या बंगल्यात राहायला मिळालं.(ते तिथे एक्झीक्युटिव्ह कोऑर्डिनेटर च्या पदावर कार्यरत आहेत.) शाळेची सफर करताना आर्ट सेक्शन चे हेड ,'सुरेश पुंगाटी' भेटले. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने देवराई आर्ट विलेज बद्दल सांगितले. तो त्याला आर्ट विलेज वगैरे भारी नाव वापरत नाही सरळ सरळ वर्कशॉप म्हणतो.
हुषार, काळासावळा ,तरतरीत सुरेश, जिल्हा गडचिरोली , तालुका भामरागड मधील कोयंगुदा खेड्यातील, माडिया जातीचा एक आदिवासी तरुण आहे. बाबा आमटे यांच्या शाळेत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
गडचिरोली, भामरागड ही नांवे वर्तमानपत्रात नेहमी नक्षलवादी कारवायांशी निगडित असल्याने ही नावे कानावर प्रत्यक्ष पडल्याने माझे कान टवकारले आणी सुरेश बद्दल अजून नीट माहिती जाणून घेण्याकरता आम्ही त्याला घरीच बोलावून घेतले.
त्याच्याबरोबर चहा पितापिता सहजपणे गप्पा मारता बर्याच गोष्टी समजल्या. त्याच्या छोट्याश्या खेड्यातले लोकं पारंपारिक ढोकरा आर्ट जपणारे कलाकार आहेत.
क्ले कोर पासून हवा त्या डिझाईन चा रफ मोल्ड तयार केला जातो.या मोल्ड वर शुद्ध बी वॅक्स चा थर दिला जातो. या मेणात त्या डिझाईन चे बारकावे कोरले जातात. तत्पश्चात या मोल्डवर क्ले चे थरावर थर चढवले जातात. हा मोल्ड , क्लिन मधे भाजला जातो. भाजल्यावर वरचा मेणाचा थर वितळून जातो. आता या मोल्ड मधे वितळलेले मेटल ओतण्यात येते. ( मोस्टली पितळ किंवा कॉपर बेस्ड अलॉय वापरले जातात.) हे वितळलेले मेटल, कोर आणी मोल्ड च्या आतील सरफेस मधे जाऊन, वितळलेल्या मेणाच्या जागा भरत त्या डिझाईन चा आकार घेते्ए मेटल थंड झाल्यावर टणक होते. नंतर बाहेरचा क्ले चा थर तोडून वेगळा केला जातो. तयार झालेल्या मेटल च्या कलाकृती ला मग पॉलिश केले जाते.
या मेथड ला द लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हणतात. मी ही संपूर्ण क्रिया प्रत्यक्ष पूर्ण पाहू शकले नाही कारण इतका वेळ नव्हता. तरी ही भयंकर वेळखाऊ आणी किचकट प्रक्रिया असावीसे वाटत होते. जरा दुर्लक्ष झालं तर मेणावर च्या बारीक नक्षीचे काम झटक्यात नष्ट होऊ शकते.
इतक्या मेहनतीनी तयार केलेल्या कलाकृतींना गडचिरोली जिल्ह्यात भाव मिळत नाही. नक्षलवाद्यांच्या दादागिरीमुळे कुणालाही आपला व्यवसाय स्थापन करता येत नाही.
दहा वर्षांपूर्वी एका आदिवासी कलेच्या प्रदर्शनानिमित्त सुरेश ची भेट ,'संजीवन; विद्यालयाच्या एका ट्रस्टीज शी झाली आणी त्यांनी त्याला या विद्यालयात आर्ट शिक्षका ची नोकरी देऊ केली. पाचगणीला आल्यावर काही काळाने त्याची भेट पाचगणीच्या रहिवासी मंदाकिनी माथुर या फिलम मेकर आणी environmentalist शी गाठ पडली. या दोघांच्या प्रयत्नांमुळे २००८ मधे 'देवराई आर्ट विलेज' उभे राहिले. या वर्कशॉप करता मंदाकिनी यांनी आपली जागा देऊ केलीये. या झोपडीवजा वर्कशॉप मधे सुरेश च्या गावांतील कलाकार मंडळी आपल्या कलेसा वारसा चालवत असतात.आपल्या गावातील थोड्या लोकांना तरी दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढून आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याचे समाधान सुरेश च्या डोळ्यात दिसते. त्यांच्याबद्दल वाटणारी कळकळ, त्यांच्या भविष्याकरता काहीतरी करण्याची धडपड त्याच्या प्रत्येक वाक्यांतून डोकावत असते.
२००२ साली एडिनबरा येथे 'सर्वोत्तम शिल्पकार ' आणी राज्यसरकार कडून ,' आदीवासी सेवा पुरस्कार' इ. सन्माननीय एवॉर्ड्स , सुरेश ला मिळालेले आहेत. याशिवाय मिलान इथे भरणार्या प्रदर्शनात भारतीय आदीवासी कला आणी हस्तकौशल्य संघाचे प्रतिनिधित्वही केलेले आहे.
याव्यतिरिक्त सुरेश , अनुसूचित जमातींच्या जातीची प्रमाणपत्रे त्यांना शासनाकडून मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. १९३२ पासून शासनाशी चालत आलेला झगडा आज ही त्याच स्टेज मधे आहे. !! या वतनकार समाजाबद्दल परत केंव्हा सांगेनच सविस्तर..
तोपर्यन्त सुरेश आणी त्याच्या साथीदारांच्या कामाची एक छोटीशी झलक..
शॉर्ट वे टू वर्कशॉप
काही कलाकृती
आफ्रिकन कंगव्या पासून इन्स्पिरेशन घेतलेला हा कंगवा मलाच खूप आवडला म्हणून मी लगेच विकत घेऊन टाकला
सुरेश पुंगाटी
आणी त्याचे साथी कलाकार
इच्छुक मंडळींकरता सुरेश पुंगाटींचा कॉन्टॅक्ट नंबर +919765052057
.
.
वा, चांगली माहिती दिलीस
वा, चांगली माहिती दिलीस वर्षूताई.
वर्षूताई, छान माहिती
वर्षूताई, छान माहिती
वर्षु सुंदर ओळख. खूप छान कला
वर्षु सुंदर ओळख. खूप छान कला आहे ही. धन्यवाद!
देवराई आर्ट व्हिलेजमधे होमस्टेची सोयही आहे असं वाटतं. त्याबद्दल काही माहिती आहे का?
स्निग्धा, गजानन, शर्मिला
स्निग्धा, गजानन, शर्मिला थांकु थांकु..
शर्मिला, जीजाजींना विचारून सांगते तुला लौकरच ..त्यांच्याकडून सही मिळेल खबर
व्वा! मस्तच! छान माहिती आणि
व्वा! मस्तच!
छान माहिती आणि एक से एक कलाकृती!
सुरेश आणि त्याच्या कलाकांना शुभेच्छा!
वॉव !!! मला शेळीची कलाकृती
वॉव !!! मला शेळीची कलाकृती फारच आवडली. मेहनती सुरेश पुंगाटींचे अभिनंदन आणि ईतकी चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचेही.
कलाकृती अतिशय सुरेख आहेत.
कलाकृती अतिशय सुरेख आहेत. वर्षु, परीचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
छान माहिती आणि सुरेख कलाकृती.
छान माहिती आणि सुरेख कलाकृती. धन्यवाद.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद वर्षू. सही आहेत सगळ्याच कलाकृती!
छानच माहिती वर्षुताई. मुंबईत
छानच माहिती वर्षुताई. मुंबईत हे बघायला मिळेल का?
छान माहिती वर्षू मला फार
छान माहिती वर्षू
मला फार आवडतं त्या मूर्ती बनवताना पहायला.
वर्षु, नक्की कळव मला. मामी,
वर्षु, नक्की कळव मला.
मामी, सीएसएमव्हीएसच्या Coomarswamy Hall मधे कारिगरतर्फे जी ट्रायबल आर्टची प्रदर्शनं भरतात तिथे अशा कलावस्तू मिळतील, त्या करत असतानाही बघायला मिळतात. त्याकरता अशा कलाकारांना खास तिथे बोलावले जाते. किंवा कुलाब्याच्या जमात आर्ट गॅलरीतही ट्रायबल आर्टची प्रदर्शने भरतात, आत्ता नुकतेच तिथे गोंड आर्टचे छान प्रदर्शन होऊन गेले. मात्र तिथे कलाकारांच्या कौशल्याचे दर्शन होत नाही.
थांकु माबोकर्स मामी..
थांकु माबोकर्स
मामी.. त्यांचे वरचेवर मुंबईत एक्झीबिशन लागत असतात..
मी जेंव्हा पाचगणीत होते तेंव्हा ही होतं प्रदर्शन मुंबईत
मी तुला लौकरच कळवते नेक्स्ट एक्झीबिशन कधी कुठे ते..
>>ढोकरा आर्ट माहिती नसलेल्या
>>ढोकरा आर्ट
माहिती नसलेल्या या कलेची तुमच्यामुळे ओळख झाली. अप्रतिम कलाकृती आहेत.
सगळ्याच कलाकृती एकदम हटके
सगळ्याच कलाकृती एकदम हटके आहेत.
छान माहिती दिलीस वर्षूताई
छान माहिती दिलीस वर्षूताई
सुंदर आहेत सर्व कलाकृती. इथे
सुंदर आहेत सर्व कलाकृती. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
काय सही आहे हे. ढोकरा आर्ट
काय सही आहे हे.
ढोकरा आर्ट गडचिरोलीचे आहे हे नव्हते माहीत. महाग असतं ना फार? हँडक्राफ्टेड असल्याने महाग असणारच म्हणा..
नताशा अगं या लोकांना
नताशा अगं या लोकांना त्यांच्या श्रमाचं फळ मिळतंच नव्हतं कितीतरी वर्षं..
सुरेश ने सांगितल्याप्रमाणे त्यांचे कितीतरी लोकं नक्षली जबरदस्तीने त्यांची कामं करायला त्यांच्या ठिकाणांवर घेऊन जातात (अजूनही!!)..
मग नक्षलीज बरोबर संबंध आहेत असा त्यांचावर आरोप लागून पोलीस त्यांच्या पाठी पडतात..
एक तरफ कुआँ दूसरी तरफ खाई अशी परिस्थिती आहे.. वरून दारिद्र्य, निरक्षरता ही पाचवीला पुजलेलीच आहे
छान माहिती आणि सुरेख वस्तू
छान माहिती आणि सुरेख वस्तू आहेत. संधी मिळाली तर तिथे जाउन बघायला खरच आवडेल.
मस्त! ते काळे इवलेशे प्राणी
मस्त!
ते काळे इवलेशे प्राणी कसले गोड दिसतायेत
ढोकरा आर्ट मी गडबडीत ढेकरा आर्ट असं वाचलं
पण हे असलं काही माहीतच नव्हतं! मस्त माहीती
मस्त आहेत वस्तू आणि फोटोपण.
मस्त आहेत वस्तू आणि फोटोपण. वस्तूंना खास भारतीय टच आहे.
तसले कंगवे इथे शिंगापासून आणि लाकडापासून केलेले दिसतात. धातूकाम फारच क्वचित दिसते इथे. जास्त भार लाकडावरच.
मस्त आहेत सर्व कलाकृती.
मस्त आहेत सर्व कलाकृती. आवडल्या.
सर्व कलाकृती मस्तच धन्स
सर्व कलाकृती मस्तच
धन्स वर्षूदी
वा मस्त. इथे टाकल्याबद्दल
वा मस्त.
इथे टाकल्याबद्दल धन्स वर्षूताई.
त्या जागेचे तपशील सांग प्लीज.
भेट देणार लगेच.
मस्तच गं. तुला ते कलादालन
मस्तच गं. तुला ते कलादालन पाहता आलं ... सही
नी खातरजमा रख.. तुला लौकरच
नी खातरजमा रख.. तुला लौकरच कनेक्टेड फोन नंबर्स पाठवते.. आता शाळेला सुट्टी लागलीये.. समर ब्रेक..
जीजाजी गोव्याला गेलेत.. बहिणीबरोबर..
शाळेतील रेसिडेंट पोरं घरी..
स्कूल्स आर क्लोज्ड.. त्यामुळे प्रत्यक्ष भेट बहुतेक शाळा उघडल्यावरच
हरकत नाही. मी नंतर जाऊन येईन.
हरकत नाही. मी नंतर जाऊन येईन.
तुला लौकरच कनेक्टेड फोन
तुला लौकरच कनेक्टेड फोन नंबर्स पाठवते>>> वर्षु, योग्य फोन नंबर्स इथेच द्याल का? बर्याच लोकांना (आमच्यासकट) उपयोगी पडतील.
Pages