चॅलेंज
“कसल पुस्तक आहे?” माझी पुस्तकाला कव्हर घालण्याची धडपड पाहून पॅकिंग करता करता राघवनने विचारले. राघवन, माझा नवरा, २ महिन्यासाठी पॅरिसला चालला होता. विकेंडला राज आणि जेनी आले होते. राज, माझा मुलगा, सध्या मेड स्कूलमध्ये आहे आणि जेनी त्याची गर्लफ्रेंड. मी सांगितलं “माझी आणि जेनीची स्त्रीवादाची मते जुळतात. माझी ह्या पुस्तकाबद्दलची मते ऐकायला तिला आवडेल म्हणून ती देऊन गेलीये'’ . “कुठलं?” म्हणून राघवनने पुस्तक घेतले. “फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे. एरिका लिओनार्दने लिहिलेले अनास्तासिया स्टील आणि ख्रिश्चन ग्रे या दोघांच्या संबंधावरचे हे पुस्तक. एरोटिकाच म्हणना. मी वाचल्या नाहीयेत कधी एरोटिका, पण स्त्रीवादी संघटनांनी अगदी दोन टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत म्हणे ह्या पुस्तकाबद्ल” मी म्हणाले. “आरती, मी नेतो हे पॅरिसला” राघवन म्हणाला. “नाही हं, जेनीने मला दिलाय स्त्रीवादी म्हणून. तुला कशाला हवय?" मी जरा ठणकावले. “अगं, लॉर्ड ऑफ रिंग्स माझ सगळ्यात आवडतं पुस्तक. त्याला हॅरी पॉटरने मागे टाकले. ह्या फिफ्टीने हॅरीला पण मागे टाकले आहे अस ऐकलय मी. माझा हॅरी वरचा सूड म्हणून मी हे वाचणार आहे.” मिश्किलपणे राघवन म्हणाला. मी वैतागले “तुझ्या ह्या बाष्कळ स्पष्टीकरणावर मी विश्वास ठेवावा असा वाटतय की काय तुला? आणि पॅरीस तर एरोटीकेची राजधानी तिथे मिळेल कि तुला दुसरी कादंबरी ” . “अरु प्लीज" म्हणून त्याने पुस्तक पॅक ही केले. आता मात्र मी अगदी इरेला पेटले. “नाही द्यायच आहे ना तुला, नको देऊस. मला पण गरज नाही उगीच त्या इंग्रजी एरोटिका वाचायची. मीच लिहीन एक एरोटिका. मग समजेल तुला. नाहीतरी मराठीत कोणी एरोटिका लिहित नाही. मराठीला ह्याची गरज आहे". आधी गडबडलाच राघवन. पण मग सावरून, पुस्तक न देता, खटयाळपणे म्हणाला “ओह, आय अम शुअर अबाउट दॅट.” (ठासून दोन पंज्या ‘दोन राण्या' म्हणून लावाव्या आणि समोरच्या गड्याने ‘चॅलेंज’ म्हणावे,.तेव्हा जे काय वाटते ते सगळ माझ्या मनात उफाळले.).. अचानक मला माझा चुरगळलेला पायजमा, हळदीचे डाग असलेला टी शर्ट, बायफोकल चष्मा आणि रुपेरी बटाची लाज वाटली आणि हे मी काय बोलून बसले ह्याची जाणीव झाली. पण लगेच मी स्वतःला समजावले लेखन ही कला ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही.
राघवन गेला आणि मग राजचा फोन आला. मी त्याला जेनीने दिलेल्या पुस्तकाबद्दल आणि माझ्या निश्चयाबद्दल सांगितले. “मॉम, नाही म्हणजे लिही तू, पण अजून हे जेनीला सांगितल नाहीस ना? म्हणजे एक वेळ जेनीला सांग पण ते मराठी मंडळात कोणाला नको सांगूस. तो ‘फ्रेंड्स' शो तुमच्याच वेळचा ना. तू पहिल आहेस त्या चँडलरची आई एरोटिका लिहिणारी असते. काय खेचतात त्याची!! अर्थात तुला नक्कीच वाटत असेल आपल्या मुलाला अस कोणी काही म्हणू नये. नाही ?” मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात हा चँडलर सारखा वागला आणि आता ह्याला चँडलरची आई आठवतीये. बर, नको एरोटिका तर निदान “संगणकयुगातील मराठी वाङ्मयीन काम-कथांचा आढावा” असा अभ्यासपूर्ण लेख लिहावा. पण फिफ्टी सारख्या कामकथा बहुतेक मराठीत नसाव्यातच, काय आढावा लिहिणार? आईला विचारायला हवे. तिचे वाचन ह्या वयातही दांडगे आहे, शिवाय तिने मला मुलीसारखे नाही तर मैत्रीणी सारखे वाढवले आहे. मी आईला फोन लावला. माझा किस्सा आणि माझा निश्चय ऐकताच ती फक्त म्हणाली “बाबा इथेच बसलेत हं …”. झाssल! राघवन आणि माझा संसार २५ वर्ष अगदी छान चालला आहे. वेगस पासून अलास्का पर्यंत फिरून आलो, आर्टिस्टक अमेलिया पासून अगदी चावट शीला की जवानीवाले पिक्चर पहिले, आवडती नोकरी केली, घर बांधले, मुले वाढवली, पण ह्या सगळ्यात का कुणास ठावूक एक एरोटिका वाचायचे राहूनच गेले. आणि आता संधी होती तर किती किती हा घरच्यांचा पाठींबा. पन्नाशी आली की नवरा, मुलगा, आई-बाप कोणी कोणी आपले नसते. छे, काही लेखबिख नको मी छोटीशी एरोटिका लिहीनच.
न वाचलेला वाङ्मय प्रकार लिहायचा म्हणजे कठीणच. पण जिसका कोई नाही उसकी ओप्रा है यारो. ओप्रा तारी त्याला कोण मारी. मी ओप्रा विन्फ्रेयच्या वेबसाईटवर एरोटीकेची वैशिष्ट्ये काय असतात ते शोधू लागले. एक सुमारे २०-२५ वर्षाची कार्टी तिथे ‘से** मटेरीअल रिव्ह्यूअर’ आहे म्हणे. अस जॉब टायटल असावा. कधी डाऊनसायझिंगची भीती नाही. तिच्या मते एरोटिकामध्ये आर्ट असते, लोन्जरे आणि टोएज असतात. हम्म ….. खऱ्या दुकानात जाणें नाही बाबा होणार आपल्याचाने. अॅमाझोनवर याची माहिती मिळेल. पण हा राघवन ‘येणाऱ्या वादळाची चाहूल पाहिजे’ म्हणून नेहमी माझी अॅमाझोन व्ह्यू हिस्ट्री चेक करतो. आधी हिस्ट्री ऑफ करता येते का ते शोधले पाहिजे. का अॅमझोन वर दुसरी ‘फिफ्टी' मागवू? नकोच, हे उशिराचे शहाणपण नेहमी दुसरे वेडेपण ठरते. सपशेल माघारपेक्षा अयशस्वी लढाई बरी. माझ्या एरोटिकामध्ये पात्रे कशी टाकावी बरे? एरोटिका मधली पात्र नवरा बायको असून चालत नाही. म्हणजे त्याचं नातं हे भुवया उंचावेल अस असाव लागत. डेस्परेट हाउसवाईफ ह्या टीव्ही शो मधली गब्रिएल आपल्या माळयाबरोबर संबंध ठेवते हे बघताना माझ्या भुवया उंचावल्या होत्या. आता ह्यापेक्षा किती जास्त मिलीमीटर उंचावल्या की ती एरोटिका ठरते आणि किती खालावल्या की ती प्रेमकथा होते हे आधी नीट ठरवले पाहिजे. एरोटिकाचा चुकूनही पोर्न मला होऊ द्यायचा नाहीये. म्हणतात ना - “What porn has done for men is same as what fairy tales have done for women- Set unrealistic expectations”. बरचशी खोटी आणि तरी हवीहवीशी अशी, स्त्री-पुरुष भेद न करता रसिक वाचकासाठी एरोटिका लिहिण अवघडच. त्यात पण मराठीत एरोटिका लिहणे खूप अवघड. मराठीत साधा चेहरा कधी मुखकमल होऊन उन्मीलित होतो तर कधी ‘थोबाड' होऊन रंगवला जातो. अवयवांच्या यादीत मुस्काड, तंगड, खुबा, ढोपर असले अवयव असतील तर कशी लिहावी मराठी एरोटिका. उगीच नाही कालिदासाने पूर्ण संस्कृत घेतल. त्यात मला संस्कृतप्रचुर शब्द नाही वापरायचे; आणि उगीच अचकट-विचकट नकोसे सडकछाप मराठी ही नको. टवटवीत मराठी हवी. ही अनंत व्यवधानं, पण हळू हळू दर दिवशी एरोटिका थोडी थोडी वाढत होती.
काल शेवटी हिंमत करून निमाला माझी एरोटिका वाचून दाखवली. माझ्या एरोटीकेची जन्मकथा ही सांगितली. निमा माझी तरुण मैत्रीण. ई ए डी येईपर्यंत घरी बसून ब्लॉग लिहिणारी. ती पटकन म्हणाली “मावशी मस्त आहे. नाहीतरी मराठीला ह्याची गरज आहे. मी टाकते ब्लॉगवर तुमच्या गेस्ट एन्ट्रीज. टोपण नावाने टाकू म्हणजे राजची पण काही कटकट नाही” निमाच्या ब्लॉगला दोन-अडीचशे लोक फॉलो करतात. निमाने टाकलेली माझी एन्ट्री दोन तासात व्हायरल झाली समजा ना. दिवसभरात तिला ८०० पेक्षा जास्त हिट्स मिळाल्या. आता मला राघवन येण्याचे वेध लागले. राघवन आला, चहापाणी झाल्यावर मी राघवनला निमाचा ब्लॉग दाखवला. तिची “मावशी, इतक्या हिट्स” म्हणून आलेली ई-मेल दाखवली. राघवन हसत म्हणाला “जमलय की! अगं, खरच मला खात्री होती तू छान लिहशील म्हणून. माणसाला गरज असते ती थोडासा चेंज आणि थोडासा चॅलेंज याची. मग तो एरोटीका म्हणून असो की नोकरी-धंद्यात असो की साध्या लाईफ मध्ये असो. लाईफमधल्या सगळ्या चेंज आणि चॅलेंजेसला तू हसत सामोरी जातेस. पण युनिव्हर्सिटीत असताना जसे तू तुझे चॅलेंजेस ठरवायची तशीच आज बऱ्याच वर्षांनी वागलीस. गम्मत वाटली." आणि त्याने बॅगेतून दोन फ्रेंच एरोटिका काढून माझ्या हातात कोंबल्या. मोडक तोडक फ्रेंच येणारी मी, त्यात हा आता नवीन चॅलेंज....
नेहमीप्रमाणे मस्त
नेहमीप्रमाणे मस्त
मस्तच! पुढचा भाग
मस्तच!
पुढचा भाग सप्टेंबरमधे, म्हणजे जरा जास्तच उशीर होतोय
मस्त लिहिले आहे. अॅडमिन /
मस्त लिहिले आहे.
अॅडमिन / वेमा - इरोटिका विभाग सुरू करायचे चॅलेंज घेतात का ते बघावे. शेवटी इरोटिका असो की ललित साहित्य ते साहित्यच की.
मराठीत साधा चेहरा कधी मुखकमल
मराठीत साधा चेहरा कधी मुखकमल होऊन उन्मीलित होतो तर कधी ‘थोबाड' होऊन रंगवला जातो. >>
मलाही वाटलं की इरॉटिकाचा काही भाग येईल नमुन्यासाठी
सिरिज छानच आहे, पण हा भाग ठीकठाक वाटला.
What is the difference
What is the difference between Erotica and Porn?
- Erotica is what I read. and porn is what YOU read, you pervert!
(No subject)
superb as usual!
superb as usual!
मस्त आहेत सगळेच भाग
मस्त आहेत सगळेच भाग
छान आहे हा भाग पण
छान आहे हा भाग पण
(No subject)
मस्तच. अगदी फ्रेश, टवटवीत
मस्तच. अगदी फ्रेश, टवटवीत आहेत तुमच्या कथा. लिहिण्याची स्टाईल अनौपचारिक आणि सहज. खूपच आवडल्या.
आधीच्याही आत्ताच वाचल्या. पंधराशे हॅरिसनच्या पुढच्या भागाची उत्सुकता आहे आता खूप. (मराठी इरॉटिका कोणत्या ब्लॉगवर टाकलीय शोधाशोध करायला हवी )
छान आहे हा भाग.
छान आहे हा भाग.
आधीच्या भागांप्रमाणे - मस्त!
आधीच्या भागांप्रमाणे - मस्त!
सहज सुंदर लिखाणशैली.. मूड
सहज सुंदर लिखाणशैली.. मूड फ्रेश करून जाणारी..
हा भागही आवडला
सही....
सही....
नेहमीची cute आरती नव्हती इथे
नेहमीची cute आरती नव्हती इथे ..... कोपरखळ्या पण नाहीत .... I m missing cute Aarti ... September मध्ये चार पाहिजेत १५००
अरे हे १५०० हॅरिसन फारच भारी
अरे हे १५०० हॅरिसन फारच भारी आहे.
सप्टेंबर आलाय हं सिमंतिनी..
सप्टेंबर आलाय हं सिमंतिनी.. पुढचं १५०० हॅरिसन कधी? वाट बघतेय कधीची.
सप्टेंबर आलाय हं सिमंतिनी..
सप्टेंबर आलाय हं सिमंतिनी.. पुढचं १५०० हॅरिसन कधी? वाट बघतेय कधीची.+११११११११
एरोटीका खरचं लिहिली असेल तर
एरोटीका खरचं लिहिली असेल तर ती वाचायला आवडेल. मला हवी तर संपर्कातून पाठवं. साहित्य म्हणून वाचेल
झाल .. तू लिहिल तेवढं सगळं वाचूनं झालं माझं
झकास.... निमाच्या ब्लॉग
झकास.... निमाच्या ब्लॉग शोधाची जबाबदारी गुगलबाबाही नाही म्हणेल
मस्तच लिहिलय. एकदम वेगळं आणि रिफ्रेशिंग - तजेलदार.
मस्त, आवडलंच एकदम!
मस्त, आवडलंच एकदम!
पुढचे भाग लिहा कि जमलं तर
पुढचे भाग लिहा कि जमलं तर
थँक्स अॅमी हे पंधराशे हॅरिसन
थँक्स अॅमी हे पंधराशे हॅरिसन वर काढल्याबद्दल.
सीमंतिनी, ही सगळी सीरीजच भारी आहे. मज्जा येतेय वाचायला!
एवढे दिवस कशी मिस झाली कोण जाणे.
पुढचे भाग लिहा कि जमलं तर>>>
पुढचे भाग लिहा कि जमलं तर>>>+१
खरंच लिहा.
भन्नाट विनोदी लिहिला आहे हा
भन्नाट विनोदी लिहिला आहे हा लेख. वाचताना चेहऱ्यावर मोठं स्माइल पाहून शेवटी कलीगने विचारलं.
कालिदासाचं पूर्ण संस्कृत >>>>
Lol rofl!
Lol rofl!
एरॉटिका लिहायला पूर्ण संस्कृतच घेईन मी पण! ८०० लाईक्स तेही मराठी ब्लॉगवर म्हणजे जमलेली दिसते आहे की. व्हायरल होऊन जाऊदे व्हॉट्स ॲपवर.
अरे वर कशाला काढायचा धागा.
अरे वर कशाला काढायचा धागा. पण धन्यवाद. आता व्हॉट्सअॅपवर काहीही चालतंय, पब्लिकची नजर सरावली आहे. ९-१० वर्षापूर्वी मायबोलीवर टाकायची तरी मी चार वेळा विचारात पडून चाळीस वेळा एडिट केली असेन....
पूर्ण संस्कृत
पूर्ण संस्कृत
मराठीत ले अवयव
मराठीत ले अवयव
Pages