‘सायन्स सेंटर’
मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरला काहीच महिन्यांपूर्वी भेट देऊन आलो होतो. याच सायन्स सेंटरच्या उपक्रमातून पिंपरी-चिंचवडलाही सायन्स सेंटर उभे राहीले आहे. घरापासून केवळ दोन किलोमीटरवर असलेले हा महापालिकेचा प्रकल्प पाहण्यासाठी निघालो. त्या विषयी....
अधिक फोटो http://ferfatka.blogspot.com/2013/05/blog-post_8.html
विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्या कलागुणांना आणखी वाव निर्माण होऊन ते समृद्ध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथे आटो क्लस्टरजवळ विज्ञान केंद्र विकसित केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील हे पहिलेच विज्ञान केंद्र आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल व जिज्ञासा असते. एखादी गोष्ट कशी कार्य करते, ती तशीच कार्य का करते, मोटार कार, टू व्हिलर कशी सुरू होते. ती कार्य कशी करते याचे या ठिकाणी लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही हाताळून पाहता येते. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत असणाºया नॅशनल काउंसिल आफ सायन्स म्युझियमच्या सहायाने हे केंद्र विकसित केले आहे. ध्वनींचे तरंग उठविणारे काष्ठरंग, लांब नलिकांमधून येणारे ध्वनी, वजन मोजण्याची नवी समतोल पद्धत, समुद्रातील परिदर्शी आणि कोण बोलतो आहे, हे सांगणारे दोन पुतळे. अशी जादूई वैज्ञानिक खेळणी या ठिकाणी सायन्स पार्कच्या बाहेरील मोठ्या बगीच्यामध्ये उभारलेली आहेत.
केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ८ फेब्रुवारी २०१३ ला झाले. अंदाजे सात एकर क्षेत्रात हे सायन्स पार्क उभारले आहे. प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे उभारलेले आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेली पण जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभारलेली येथे खेळणी आहेत. त्यात प्रतिध्वनीचा अनुभव देणारी भव्य नलिका आहे. लांबवर असणाºया दोन पुतळ्यांमधून आपलाच आवाज कसा ऐकायला येतो. ‘योयो’, कुजबुजणारी बाग, वजन पाहण्याची समतोल पद्धती, विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळेही येथे बसविले आहेत. असेच पुतळे मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये ही आपणास पाहावयास मिळतात.
मुख्य इमारत दुमजली आहे. त्यात चार दालने असून, इमारतीत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस पहिले दालन आहे. तेथे मानवाची निर्मितीनंतर त्यात कसे काळानुसार कसे बदल होत गेले. याची प्रतिकृती साकारलेली आहे. चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती आहे. इस पूर्व १५० मध्ये हेरॉनने वाफेवर चालणाºया यंत्रांचा लावलेला शोध आणि पुढे त्यावरील यंत्रांची झालेली निर्मिती याचेही दर्शन घडते. १८८५ मध्ये विकसित केलेली सायकल, त्यानंतर आलेली मोटार सायकल, चारचाकी गाडी असा २०१३ पर्यंतच्या वाहन उद्योगाचा मोठा फोटो येथे लावलेला आहे.
डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे
विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळे
चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती
दुसरे दालन हे आटो मोबाईल दालन आहे. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनाचे इंजिन कसे असते. मोटार कशी चालते. याच्या खºया प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही प्रतिकृतींना लहान मुलांना हात लावण्यास परवानगीही आहे. गिअर कसे पडतात, टू व्हिलर कशी काम करते. नॅनोचे इंजिन कसे बनवले आहे. बाहेरून छान वाटणारी गाडीच्या आतमध्ये कसे असते. गाडी चालविण्याचा अनुभव कसो येतो. त्यांची कार्ये काय याची जाणीव हे दालन देते. वाहनउद्योगाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला आहे.
दुसºया मजल्यावर गेल्यानंतर समोरच ऊर्जा दालन आहे, सौर, इलेक्ट्रिक, वाफेवरील उर्जांचा उपयोग कसा केला आहे, याची माहिती हे विविध खेळण्यांच्या माध्यमातून दिली आहे. विविध छोटे मॉडेल पाहून छान वाटते. शेजारील दालनामध्ये धड गायब झालेला माणूस, दोनशे फुट खोल विहीर (दृष्टीभ्रम) हवेत तरंगण्याचा अनुभव, भास घडविणारी दुर्बिण, विविध प्रकारचे आरश्यांमध्ये आपली दिसणारी खुजी व उंच, जाड अशी प्रतिकृती पाहून मजा येते.
चौथे दालन थ्रीडी थिअटरचे आहे. मी गेलो तेव्हा ते काही कारणांमुळे बंद होते. तेथे मुंबईतील नेहरू तारांगणाप्रमाणे अवकाशातील तारे, ग्रह यांचा थ्रीडी चित्रपट दाखवितात.
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर ज्यांनी पाहिले असेल त्या पेक्षा हे वेगळे आहे. तेथील काही खेळण्यांप्रमाणे येथेही काही खेळण्यांचा इतक्या लवकर (उद्घाटन ८ फेब्रुवारी २०१३ ) ‘सत्यानाश’ झाल्याचे पाहून मन दु:खी होते. काही वैज्ञानिक खेळण्यांची बटन दाबून देखील ते सुरू होत नसल्याने बच्चे कंपनी नाराज होते. परंतु लहान मुलांना विज्ञानाची आवड लावण्यासाठी एकदा जरूर या सायन्स पार्कला प्रत्येकाने आवश्य भेट द्यावी.
- तिकीट दर : प्रौढांसाठी ५० रुपये, लहान मुलांसाठी ३० रुपये.
- प्रत्येक सोमवारी बंद
- वेळ : सकाळी १० ते ५.३०
पाहण्यासाठी लागणारा वेळ : निवांत असला तर अख्खा दिवसही . घाईत पाहत असला तर दोन तास तरी.
जायचे कसे : पुण्याहून पिंपरी-चिंचचवडला स्वत:चे वाहन अथवा बसने येता येते. चिंचवड स्टेशनच्या येथून यु टर्न घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेकडे जाण्यास निघावे. डाव्या बाजूला सायन्स पार्ककडे जाण्याचा फलक दाखविला आहे.
दुसरा मार्ग : पिंपरी महापालिकेच्या येथून मोरवाडी कोर्टाकडे जाणाºया मार्गावरून मोहननगरकडे जाणाºया रस्त्यावर डावीकडून वळूनही जाता येते.
फोटू दिस्त नाहीत..
फोटू दिस्त नाहीत..
चांगली माहीती.
चांगली माहीती.
माहिती दिल्याबद्दल आभार. असे
माहिती दिल्याबद्दल आभार. असे काही वाचनात आले की बरे वाटते.
छान माहिती. चिंचवडला रहात
छान माहिती. चिंचवडला रहात असुन अजुन पाहिले नाही. आता नक्की पाहिन.
चिंचवड पिंपरीत पाणी २४ तास असते असा समज कुणी वरचा फोटो पाहुन करुन घेऊ नये. सगळ्यात पाण्याचे अनियोजन कुठे असेल तर ते पिंपरी चिचवड मनपा विभागात. जेव्हडा नेता दमदार तो दुसर्यांच्या हद्दीतले पाणी पळवतो. बळी तो पाणी पळवी अशी म्हणच इकडे रुढ आहे.