नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे "मे" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या महिन्याचा विषय आहे " खेळ मांडला "
"ए आई, मी बाहेर जाऊ का खेळायला. आत्ता तर अभ्यास पण नाही. मस्त सुट्टी लागलीय ना?"
"अरे, नको रे आता बाहेर ऊन आहे. संध्याकाळी जा बाहेर खेळायला, तो पर्यंत घरातच काहितरी खेळा"
"चला रे, आपण नवा व्यापार, सागरगोट्या, भातुकली खेळुया."
शाळा संपली, परीक्षेचा निकाल लागला आणि मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. आता फक्त दे धम्माल. मे महिन्याची सुट्टी आणि खेळ याच्याशी आपल्या सर्वांच्या
काही ना काही आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांनाच पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे "खेळ मांडला..." या फोटो थीमद्वारे.
यात खेळांचे प्रचि अपेक्षित आहे. उदा. चोरपोलिस, नवा व्यापार, सागरगोटे, बुद्धीबळ, सापशिडी, भातुकली, आट्यापाट्या, विटीदांडू, काचाकवड्या, कॅरम, शेजार्यांचा डोळा चुकवून कैर्या, आंबे, करवंदे लंपास करतानाचे फोटो. इतकेच काय तर अगदी मंगळागौरीच्या, गणपती/गौरी सणांच्या दिवशीच्या खेळांचे फोटो सुद्धा चालतील.
जुने विस्मरणात गेलेल्या खेळांचे फोटो असतील तर अधिक चांगले.
चला तर मग ह्या नविन थीमद्वारे तुमच्यातील लहान मुलांना पुन्हा एकदा खेळण्यास प्रवृत्त करा.
निकाल :-
प्रथम क्रमांक :- आशुचँप - पहिल्या पावसातली होडी
द्वितीय क्रमांक :- रंगासेठ - घोडा गाडी
तृतीय क्रमांक :- इन्ना ..
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
अरे वाह!!! शोधतो...
अरे वाह!!!
शोधतो...
चांगली थिम
चांगली थिम
या महिन्याची थीम "जिप्सी
या महिन्याची थीम "जिप्सी यांनी सुचवली आहे.............
मस्त थीम रे .. जिप्सी, उदय
मस्त थीम रे .. जिप्सी, उदय !!!
दहावा माझा नंबर हे फोटो
दहावा माझा नंबर


हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत, कारण हे फोटो मित्राने क्लिक केलेले आहेत मी नाही, पण 'खेळ' थिम असल्यामुळे डकवले
अरे खेळ खेळतानाचा हवा आहे तु
अरे खेळ खेळतानाचा हवा आहे
तु शुन्यावर बाद झालेला होतास
(No subject)
खेळ मांडला
खेळ मांडला
खेल मांडला
खेल मांडला
खेळ मांडला
खेळ मांडला
घारुआण्णा, मर्यादा ओलांडताय.
घारुआण्णा, मर्यादा ओलांडताय. << ४) जास्तित जास्त २ फोटो......>>
(No subject)
अरे व्वा...खरोखरच मस्त थीम
अरे व्वा...खरोखरच मस्त थीम आहे.... त्यानिमित्ताने उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणींना उजाळा मिळेल!
शोधतो काही सापडतेय का ते!
(No subject)
दुपारी बाहेर जायला मिळत
दुपारी बाहेर जायला मिळत नाहि मग घरातच खेळ मांडला ..........खेळ रंगला.
.
मस्त थीम.. आबासाहेब.. फोटो
मस्त थीम..
आबासाहेब.. फोटो मस्तच.. कसली होडी बनवलि आहे ! कुठला ?
खेळांची नाव देखील लिहिलीत तर
खेळांची नाव देखील लिहिलीत तर इतरांना देखील माहीती मिळुन जाईल
ठांकू यो रॉक्स कुठला ?
ठांकू यो रॉक्स
कुठला ? >>>> हरिहरेश्वर
छान छान फोटो आणि छान थीम
छान छान फोटो आणि छान थीम
मंडळींनो, जुने विस्मरणात गेलेल्या खेळांचे फोटो असतील तर अधिक चांगले.
चोरपोलिस, नवा व्यापार, सागरगोटे, बुद्धीबळ, सापशिडी, भातुकली, आट्यापाट्या, विटीदांडू, काचाकवड्या, कॅरम, शेजार्यांचा डोळा चुकवून कैर्या, आंबे, करवंदे लंपास करतानाचे फोटो. इतकेच काय तर अगदी मंगळागौरीच्या, गणपती/गौरी सणांच्या दिवशीच्या खेळांचे फोटो सुद्धा चालतील.
योगेश त्यावेळी रिल वाले
योगेश त्यावेळी रिल वाले कैमेरे होते. प्रत्येक फोटो धुवायला पैसे लागायचे. आता हे खेळ परत खेळावे लागतील.
किशोर आता हे खेळ परत
किशोर

"चला तर मग ह्या नविन थीमद्वारे तुमच्यातील लहान मुलांना पुन्हा एकदा खेळण्यास प्रवृत्त करा."
आता हे खेळ परत खेळावे लागतील.>>>>तेच वर लिहिलंय
आबासाहेब, होडी मस्त बर्का
आबासाहेब, होडी मस्त बर्का

घारूअण्णा, तुम्चे खेळ जरा रासवटच आहेत
झकोबा, लौकर शोध! मला पण शोधायलाच लागेल, जुन्या ट्रन्केत बरेच काही आहे.
क्रिकेट अति झालय, ते सोडून काहीही टाका बोवा.
सध्यापुरते हा घ्या पत्याचा बन्गला! उन्हाळ्याच्या सुट्टीत नव्हे, ऐन डिसेम्बर शेवटास थन्डीत काढलेला हा फोटो...... क्वालिटी शून्य मार्कस - फक्त विषय म्हणून मान्डला इतकेच.

दुसर्या छायाचित्राकरता खूप वाट बघितली, पण हल्ली खेळणारी मुले दृष्टीसच पडत नाहीयेत, किमान माझ्या आजुबाजुला तरी
त्यातुन दूपारी खेळत अस्तील, पण मी हापिसात, कसा काय फोटो काढणार? तेव्हा आहे त्यातला हा एक टाकू की नको टाकू की नको अशा संभ्रमावस्थेत असतानाही टाकतोच!

शीर्षासन - जिमनास्ट शिकत असलेल्या माझ्या नातीचा हा घरबसल्या खेळ (हा फोटो देखिल केवळ विषय म्हणून मान्डला इतकेच - दर्जाबद्दल मी समाधानी नाहीच.)
आबासाहेब, सॄष्टी, लिंबुटिंबु
आबासाहेब, सॄष्टी, लिंबुटिंबु - मस्त आहेत प्रचि. आणखी १ येऊद्या.
भातुकली ! पितळेची भांडी,
भातुकली !
)


पितळेची भांडी, कळशी, बंब ,चूल , ते तुळशीबागेत मिळणारा भातुकली सेट गॅसची शेगडी, फ्रीज सकट. आताच्या पिढीत बार्बी आणि तिचा सरंजाम
जवळपास सगळ्या लहान मुलांच्या खेळण्यातला ,भावविश्वातला एक भाग . हेच खेळ जपान मधे तुळशीबाग सद्रुश आकासाका देवळाच्या बाजारात पाहिले . आणि वाटल तुमच आणि आमच सेम असत! /http://www.maayboli.com/node/35461 ( लगे हात रिक्षा फिरवते
इन्ना, ते खुप क्युट आहे मला
इन्ना, ते खुप क्युट आहे
मला अजुनही वाटतं माझ्याकडे भातुकलीचा खेळ असावा आणी त्यात सगळं छोटं छोटं सामान असावं
खुप मस्त फोटोय तो
थीम मस्त आहे. जुने खेळ शोधून
थीम मस्त आहे. जुने खेळ शोधून बाहेर काढावे लागतील आत्ता
इन्ना, मस्त रिया, मलाही
इन्ना, मस्त
खर तर प्रत्येक गोष्टीचे मिनिएचर आवडतेच म्हणा!
रिया, मलाही वाटते अजुन की माझ्याकडेही इवलुस्से छोटेसे खेळ असावेत भातुकलीचे!
लहान मुलान्चा विरन्गुळा...
लहान मुलान्चा विरन्गुळा... गोट्या .... इथेही......घूम मोनेस्ट्री, दार्जिलिन्ग, पश्चिम बन्गाल.
गोट्या.. अगदी एकट्याला खेलता येतात आणि खुप जणे असतील तर अजूनच मज्जा.....
मस्त इना , गिता९
मस्त इना , गिता९
इना, गीता_९ : मस्त आहेत प्रचि
इना, गीता_९ : मस्त आहेत प्रचि
Pages