फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"...निकाल

Submitted by उदयन.. on 4 May, 2013 - 00:38

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मे" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " खेळ मांडला "

"ए आई, मी बाहेर जाऊ का खेळायला. आत्ता तर अभ्यास पण नाही. मस्त सुट्टी लागलीय ना?"
"अरे, नको रे आता बाहेर ऊन आहे. संध्याकाळी जा बाहेर खेळायला, तो पर्यंत घरातच काहितरी खेळा"
"चला रे, आपण नवा व्यापार, सागरगोट्या, भातुकली खेळुया."

शाळा संपली, परीक्षेचा निकाल लागला आणि मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. आता फक्त दे धम्माल. मे महिन्याची सुट्टी आणि खेळ याच्याशी आपल्या सर्वांच्या

काही ना काही आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांनाच पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे "खेळ मांडला..." या फोटो थीमद्वारे. Happy

यात खेळांचे प्रचि अपेक्षित आहे. उदा. चोरपोलिस, नवा व्यापार, सागरगोटे, बुद्धीबळ, सापशिडी, भातुकली, आट्यापाट्या, विटीदांडू, काचाकवड्या, कॅरम, शेजार्‍यांचा डोळा चुकवून कैर्‍या, आंबे, करवंदे लंपास करतानाचे फोटो. इतकेच काय तर अगदी मंगळागौरीच्या, गणपती/गौरी सणांच्या दिवशीच्या खेळांचे फोटो सुद्धा चालतील.

जुने विस्मरणात गेलेल्या खेळांचे फोटो असतील तर अधिक चांगले.

चला तर मग ह्या नविन थीमद्वारे तुमच्यातील लहान मुलांना पुन्हा एकदा खेळण्यास प्रवृत्त करा. Happy

निकाल :-

प्रथम क्रमांक :- आशुचँप - पहिल्या पावसातली होडी

ashuchamp 1st.JPG

द्वितीय क्रमांक :- रंगासेठ - घोडा गाडी

ranga seth 2nd.JPG

तृतीय क्रमांक :- इन्ना ..

innaa 3rd.JPG

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच... देवगिरीचा किल्ला दिसतोय.. खंदक, त्यात पाणी, मगर, मासे, खंदक पार करायचा साकवं,
किल्ल्यावर पाण्याच टाकं, बालेकिल्ल्यावर झेंडा.. मस्तच Happy

भारतवारी मधला फोटो... लेक आणि शेजारच्या दोन मुली मिळुन भातुकली खेळत होत्या... भांडी मांडुन कुठेतरी पळाल्या तेव्हा घेतलेला हौसेने फोटो Happy
photo.jpg

आणि ह्या बाहुल्या
photo (1).jpg

सगळ्यांचेच फोटो छान!

मयु मला न्यायचस ना तुझ्या घरी
आम्ही दोघी मस्त खेळलो असतो Proud

मी अधुन मधुन प्रितीला म्हणते चल भांडीकुंडी खेळू पण ती मला "ए गप्पे" असा लूक देते Sad

थीम आवडली.

किल्ला मस्त झालाय. खंदकात डायनसोर पण दिस्तोय. Happy

मयुरींच्या फोटोतली, शिस्तीत मांडलेली चूल बोळकी भारी आहेत. अँग्रीबर्ड सगळ्या संसाराकडे पाठ फिरवून बसल्यासारखा वाटतो. Happy आवडलं.

उदय त्या मयुच्या बाहुल्या नसणारेत
मी बर्‍यापैकी मोठी झाल्यावर या बाहुल्या आल्या मार्केटात ( मला चांगलं आठवतय)
मयू तर माझ्यापेक्षा बरीच मोठी आहे Proud

फोटो माझ्या कडे नाहीयेत सो मी आनंद लुटते फक्त Proud

धन्यवाद Happy
प्रि ये ना इकडे नाहीतरी लेकीला इकडे खेळायला कोणी सोबती नाहीये Wink
उदय आपल्याकाळात होते का रे अशा खेळणी jibh%20dakhavanari.gif

Biggrin
हो मग बरोबर...... टायर फिरवणे...सापसिडी...पारंब्या खेळणे ..इत्यादी बरेच होते .. बहुतेक सगळेच मैदानी होते...घरात बसुन खेळणे किमान मला तरी जमलेच नाही

१) लिटील चँपिअन्स Happy

IMG_2259 (Large).JPG

२) दोस्तांची संगत, खेळाची लज्जत आणि साथीला समुद्रकिनारा Happy

IMG_4800.JPG

रन्गासेठ, कुठुन कुठुन काढून आणता हो फोटो? दोन्ही मस्त Happy दुसर्‍यात गती छान टिपली गेली आहे.

(अर्थात मी हे धाग्याच्या विषयास धरुन आहे वा नाही वा फोटो टेक्निकली किती चान्गला वगैरे बघत नाही हां, मला ते समजतही नाही, प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या जे काय वाटते ते सान्गतोय, पान्ढरे चौकोन न दिसता जिथे फोटो दिसतो, अन वेळ असतो, तर लग्गेच सान्गतो)

आर्ये!!!!!!!!!!!

१२ वर्षाखालील मुला / मुलींसाठी असतात ना खेळणी...
Happy

जिप्स्या,इंद्रा.. मस्त मस्त!!
रंगासेठ .. सुप्पर्ब फोटोज..
.. वरून खाली कोण आलं आधी तिची वाट नाही नं लागली/? Happy Light 1

आर्या.. मस्त गं

Pages