मदनबाण-२०१३

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2013 - 14:03

मी ह्या फुलांचे फोटो देते ह्यावर तुमचे मनोगत तुम्ही व्यक्त करा. Happy
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. ंएकदम प्रसन्न वाटले.
माझ्याकडे बहुदा हाच आहे. फुलला ़की याचा सुगंध घरभर दरवळ्तो.

जागुले.. मदनबाण हा शब्दच गेली कित्येक वर्षात कानावर पडला नव्हता..
आता तुझ्यामुळे दर्शनही घडलं... नॉस्टेल्जियाचा सुवास घेऊन आलेली ही सुंदर, शुभ्र ,फुलं खूप खूप आवडली...

जागू, मस्त फोटो! माझी सर्वात आवडती फुले. याच्या जुन्या आठवणी, सुगंध मनात अगदी दरवळला.
स्वाती, तुला हे झाड ईथे कुठे मिळाले? कोणत्या नावाने? माझ्याकडे मोगरा आहे.

जागू,
माझ्याकडे एकदम सारखीच दिसणरी फुले आहेत, त्यावर स्टार जासमिन लिहलेले.
पण मला वासाने चमेली वाटते म्हणून..
इथे फोटो टाकतेय्,..(तुझी हरकत असेल तर सांग.. मग काढते. मला फक्त नाव हवय त्याचे माहीत करून.)
photo (200x150).jpg

एखाद्या पाकळीच्यामागे लालसर छटा आहे..

photo (1) (400x300).jpg

हा खालील फोटो फक्त नेटवरून आहे, नंतर काढते(वरील फुलाचे फोटो माझ्या घरचे आहेत).
असे झाड दिसते,
Star Jasmine.JPG

बस नाम ही काफी है!! क्या बात है जागू...................इतकी सारी फुलं!! मस्त. घर सुगंधानं अगदी भरून गेलं असेल Happy

झंपी, तुम्ही टाकलेल्या फुलांचं नाव कुंद आहे. Happy

शांकली, तुमचे बरोबर आहे, मी गूगले कुन्दा म्हणून.

जागू, सॉरी...
मदनबाण मस्त दिसतोय... ईंग्रजीत काय म्हणतात मदनबाण ला मग?

सगळ्यांचे धन्यवाद.

झंपी शांकली म्हणते त्याप्रमाणे कुंद ची फुले आहेत ती. मदनबाणचे फुल त्याहून मोठे असते. आणि सॉरी, परवानगी कसल्या आल्यात? फक्त मनोरंजनासाठी आणि आस्वादासाठी धागा आहे. अजुन फोटो टाकलेत तरी चालतील.

धन्यवाद.

जागू, तू खूपच लकी आहेस. मला तुझ्याकडची सर्व पांढरी फुले(तुझा मागचा बीबी सफेद फुलांचा) आवडली असती अंगणात लावयला पण इथे हवामानामुळे टिकत नाहीत बहुतेक वेळा.. आत्-बाहेर करता करता वाट लागते कधी.
पन तेवढेच उन्हाळ्याचे चार महिने मजा. असो.

मी यंदा मोगरा, कुंदा(आत्ताच नाव कळले), जुइ, निशिगंधा लावलेत.

पारीजाताच्या बिया मी नाही आणू शकत भारतातून. Sad

जागू, मस्त फुलं आहेत आणि फोटोपण Happy Happy Happy

माझा एक मोगरा आणि एक मदनबाण गोकर्णाने वेढल्याने मरून गेला गेल्या पावसाळ्यात Sad Sad Sad

धुंदी फुलांची--धुंदी कळ्यांची
खूप छान आहेत फोटो
माझ्या बगीच्यातल्या फुलांचीआठवंण ताजी झाली.
एका हजारी महादेवा(एकाच पिंडीत हजार लहान -लहान पिंडी होत्या) त्यास ह्या कुंद -फुलांनी सजवत असू.