Submitted by हायझेनबर्ग on 1 May, 2013 - 10:54
मनस्मिंनी कुठल्यातरी बाफ वर लिहिलेल्या प्रतिसादात 'मी अॅडमिन असतो तर अमुक अमुक केले असते' असे लिहिले. वाचताक्षणीच विचारांचे वारू चौफेर ऊधळून आले. मनस्मि, १०-१५ मिनिटे तुमच्या कल्पनेने दिवसाढवळ्या मस्त स्वप्नरंजन करवले. धन्यवाद तुम्हाला.
माझे स्वप्नरंजन फारच रक्तरंजित होते असे वाटल्याने ईथे लिहिणे बरोबर नाही पण अजून कुणाला त्यांचे स्वप्नरंजन शेयर करायचे असल्यास वाचायला नक्कीच आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅडमिन असणे फार कटकटीचे काम
अॅडमिन असणे फार कटकटीचे काम असते.. त्यापेक्षा साधा सभासद असणे केव्हाही चांगले..
मी अॅडमिन नाही तेच बरं..
शब्दखुणा मुद्दाम टाकल्यात का
शब्दखुणा मुद्दाम टाकल्यात का चुकून आल्यात? सार्वजनिक स्वच्छता हे मात्र बरोबर आहे
"सार्वजनिक स्वच्छता हे मात्र
"सार्वजनिक स्वच्छता हे मात्र बरोबर आहे" >>>
---------------------------------------------------------------------------------------------------
"माझे स्वप्नरंजन फारच रक्तरंजित होते असे वाटल्याने ईथे लिहिणे बरोबर नाही" >>> लिहा तर खरं......
बरोबर की चूक ते ऍडमिन सांगतीलच.....
ह्या धाग्याला सर्च टर्म 'अरे
ह्या धाग्याला सर्च टर्म 'अरे ओ सांबा' का बरे लिहिले आहे??!!! "कितने Admin थे?" अस विचारयच होत काय??!!!
सिमंतिनी ये सिक्सर मारा
सिमंतिनी ये सिक्सर मारा तुमने.:खोखो:
धाग्याचं शिर्षक लिं नि केलं
धाग्याचं शिर्षक लिं नि केलं असतं
मुद्दामच टाकल्यात त्या
मुद्दामच टाकल्यात त्या शब्दखुणा, माझ्या स्वप्नरंजनातले टप्पे आहेत ते. अजूनही टाकायच्या होत्या पण त्या लेखातल्या शब्दांअपेक्षा जास्त झाल्या असत्या म्हणून आवरते घेतले.
माबोसारख्या सोशल नेटवर्किंगच्या साईट्सवर पण आता गरीब, बापड्या वाचकांच्या भल्यासाठी आणि न्यायासाठी अॅसॉल्ट, बॅटरी, रिस्ट्रेनिंग ऑर्डर, मिसडिमेनर, फेलनी, ज्यूरी असे सगळे आणले पाहिजे.
मी अॅडमिन असतो
मी अॅडमिन असतो तर...
सदस्यांची स्वप्नं पूर्ण केली असती. लोकपाल बिल आणलं असतं. संसद बरखास्त केली असती. नव्याने निवडणुका घेतल्या असत्या. नमोंना प्रधानमंत्री केलं असतं. झलपूरकरांना तुरुंगात टाकलं असतं. लेखकांच्या यांच्या कथेवर सिनेमे काढून माध्यम प्रायोजक ते निर्माते अशी प्रगती केली असती. कवींच्या कविता गाणी म्हणून घेतली असती. मुक्तछंद संवाद म्हणून घेतले असते. हॉटेलं काढून प्रत्येका/की ची रेसिपी त्यात ठेवली असती. प्रवासवर्णनांची पुस्तकं छापली असती. विनोदी लेखकांचं कथाकथन गावोगावी आयोजित केलं असतं. गझलकारांचे मुशायरे ठिकठिकाणी आयोजित केले असते. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची सोयही ठेवली असती. टवाळक्या करणा-या सदस्यांचे फोटो खिसेकापूंच्या फोटोसारखे शहरातल्या एसटीस्टँड, बस टर्मिनस आणि रेल्वे स्टेशनवर लावले असते. माझा वाढदिवस येतोय, कृपया शहरभर फ्लेक्स लावू नका अशा विपू पाच सहा दिवस आधीच केल्या असत्या. खटकणा-या गोष्टींना वेळीच पायबंद घातला असता. उदा. नाकात बोटं घालणा-या सदस्यांचा आयपी अॅड्रेस बॅन केला असता. बास कि इतकं. पाळायची नसली म्हणून काय झालं भरमसाट थोडीच द्यायची आश्वासनं ? आँ ? आले लगेच बोटण्या सरसावत.
धाग्याचं शिर्षक लिं नि केलं
धाग्याचं शिर्षक लिं नि केलं असतं >>>>> अहो अॅडमिन हे क्वामन नाऊन (सर्वनाम ?) लिंनिच आहे की. चमन पुल्लिंगी आहेत ना पण? लिंनि व्हायला स्वतःचं लिंगं धाब्यावर बसवायचं का आता?
मी अॅडमिन असतो तर
मी अॅडमिन असतो तर सदस्यत्वासाठी फोटो आयडी कंपल्सरी केला असता.... बरीच बिनकामाची जनता कमी झाली असती
अॅडमिन यांची विपु पाहिली, तर
अॅडमिन यांची विपु पाहिली, तर हे सापडेल..
हो बरोबर आहे ईब्लिस, मलाही
हो बरोबर आहे ईब्लिस, मलाही अगदी तसेच वाटते. अजय आणि समीरशी प्रत्येक भेटीनंतर त्यांच्याबद्दलचा आदर नेहमी वाढतंच आला आहे.
पण तुम्ही आपलं ऊगीच गंभीर वळण देताय बुवा धाग्याला! 'मी पंतप्रधान झालो' तर निबंधाला कोणी 'पंतप्रधानांना घटकपक्षाची मर्जी आणि नाटकं सांभाळण्यासाठी किती प्रयास पडतात आणि खुर्ची हा काटेरी मुकूट आहे' किंवा 'मला लॉटरी लागली तर' 'भरावयाच्या टॅक्स संबंधी घोर पडेल' असे सांगण्यासारखे झाले.
'मी पंतप्रधान झालो तर पहिल्याने चीन्यांना धडा शिकवेन' असे वाचायला किती मजा येईल
किरण, तुम्ही व्ही शांताराम किंवा ह्रषीदांचे फॅन आहात का? आम्हाला रामू वर्माचा सिनेमा बघायचा आहे.
ओ लिंगनिरपेक्षवाले, तुम्हाला पंतप्रधानपद दिलेय (झक्कींच्या मराठीत प्रेशिडेंट बनवतोय ना बे!) आणि तुम्ही वडगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या शिपाईभरतीच्या राजकारणात काहून अडकू राहिला.
मग चमन तुही तुझे रक्तरंजीत का
मग चमन तुही तुझे रक्तरंजीत का काय ते स्वप्नरंजन लिही. कदाचीत त्यानेही क्रांती होईल
मी अॅडमिन असतो तर... >>> तर
मी अॅडमिन असतो तर... >>> तर तुझा आयडी चमन नसता ............................. अॅडमीन असता
सदस्यत्वासाठी फोटो आयडी कंपल्सरी केला असता.. >>> स्वरुप पोरींचे फोटो लावलेले डुआयडी विसरलास का ?
सदस्यत्वासाठी फोटो आयडी
सदस्यत्वासाठी फोटो आयडी कंपल्सरी केला असता.. >>> स्वरुप पोरींचे फोटो लावलेले डुआयडी विसरलास का ?
>>>
तर काय
अनेक पोहचलेले लोक्स आहेत इथे!
आय डि फोटो नाही 'फोटो आय डि'
आय डि फोटो नाही 'फोटो आय डि' पासपोर्ट किंवा वाहन परवाना बघून मग देणे....
मी अॅडमिन अस्तो तर...... (हे
मी अॅडमिन अस्तो तर...... (हे कालत्रयीही शक्य नाही, पण स्वप्नरन्जन करत मनोराज्ये रचायला काय हरकत आहे? - तेवढे मनोराज्ये मनातल्या मनात गुपित ठेवायची अस्तात या नियमाला बगल देऊ हवे तर)
१. तर, सर्वप्रथम मी "सिन्हगड रोड" या धाग्याला मायबोलीची राजधानी म्हणून घोषित केले असते अन तेथिल सर्व "निष्ठावन्तान्ना" निरनिराळी अधिकाराची पदे देऊन सरदारदरकदार बनविले अस्ते.
२. कविता/गझला अशा निरुपद्रवी पण सन्ख्येमुळे उपद्रवी धाग्यान्ना मुख्य पानावर लुडबुडण्याची बन्दी केली अस्ती.
३. मॉडरेटर टीम पुन्हा जिवन्त करुन "विशिष्ट धाग्यान्च्या अन त्यान्च्या निर्मात्यान्च्या आयडीच्या" कापाकापीस टीमच्या हातात जरा जास्तच धारदार चाकूसुर्या दिल्या अस्त्या.
४. खाद्य पदार्थान्या रेसिप्या अन फोटु टाकणार्यान्वर तो तो पदार्थ राजधानीस पार्सलने/क्युरिअरने पाठविण्याची सक्ति केली अस्ती!
५. मायबोलीवर, खडे फोडण्याचा नवा, सार्वजनिक नसलेला विभाग सुरू केला अस्ता ज्यात भारताबद्दल, अमेरिकेबद्दल, कॉन्ग्रेसबद्दल, हिन्दुत्ववाद्यान्बद्दल, ब्राह्मणान्बद्दल, वगैरे अनेक विषयान्बाबत मुक्तकन्ठाने आयमीन मुक्तहस्ताने खडे फोडण्याची परवानगी दिली अस्ती.
६. वविच्या सांस्कृतिक समितीची पुनर्गठना करुन त्यात पीटी शिक्षक, व्यक्तिमत्वविकासप्रशिक्षक, मेणबत्तीसमुहातीलसामुहिकदुखवटाचालक वगैरेन्चा समावेश केला अस्ता
७. मायबोलिच्या मेम्बरान्ना अमेरिकेचा व्हीसा मिळण्याबाबत इस्पेशल सूट मिळावी याकरता अमेरिकेच्यासरकारदरबारी विशेष प्रयत्न केले अस्ते, व माबोकरान्ना अमेरिकेचा व्हीसा मिळणे हे अमेरिकेच्याच हिताचे कसे आहे या विषयावर प्रबन्ध स्पर्धा ठेवली अस्ती. (जाता जाता नरेन्द्रमोदीन्ना माबोकर व्हायचे आमन्त्रणवजा सल्ला दिला अस्ता तो वेगळाच! )
८. अखिल विश्व मराठी साहित्य सम्मेलन मायबोलीवर ऑनलाईन भरवून सर्व प्रस्थापित /विस्थापित/ विद्रोही/ वन्चित/ मोडीत निघालेल्या वगैरे साहित्यसम्मेलन सन्योजकान्चे वर्चस्व मोडीत काढले असते. त्याचबरोबर, अशा सम्मेलनाकरता अमेरिकन व युरोपिअन सरकारान्कडून अनुदानही मिळवले अस्ते व व्यासपीठावर मिरवायची भारतीय राजकारण्यान्ची मक्तेदारी मोडून काढली अस्ती.
९. सीआयडी/सीबीआय/एफबीआय/मोसाद/ इन्कमट्याक्स/ प्रोफेशनलट्याक्स/ सेल्स ट्याक्स/ एलबीटी ट्याक्स/ पाणीपट्टी/ घरकर वगैरे सर्वच डिपार्टमेन्टान्शी सलोख्याचे व मित्रत्वपूर्ण संबंध स्थापले अस्ते
१०. निरनिराळ्या देशान्च्या सरकारान्ना निरनिराळ्याप्रश्नान्वर त्यान्नी न मागताच आधीच सल्ला देण्याकरता माबोकर तज्ञान्चे मंडल गठीत केले अस्ते. याकरता भविष्यात कोणापुढे कोणते प्रश्न निर्माण होतील हे भविष्य जाणुन घेण्याकरता माबोकर भविष्यवेत्त्यान्ची समिती स्थापन केली अस्ती.
अजुन बरेच काही काही करता येण्यासारखे आहे, पण सध्या इतकेच पुरे.
चांगला विषय आहे स्पर्धेचा
चांगला विषय आहे स्पर्धेचा
किमान एव्हडे तरी केले(च) असते:
सभासदत्व फुकट असल्याने (अॅडमिन व संस्थापकांच्या विशाल हृदयाची मोजमापणी टेराबाईट मध्ये देखिल करता येणार नाही) प्रत्येक आयडी साठी, महिन्याला कमाल १० फुकट पोस्टी (कुठल्याही विभागात) व कमाल १० फुकट प्रतिक्रीया, पैकी गझलेसाठी ही मर्यादा कमाल १!
त्याऊपर सर्व फक्त 'पेड मेंबरशिप' साठी असा नियम केला असता.. . त्यामूळे अनेक का.का. प्रकारच्या कचर्याचा आपसूक निचरा होईल- शेवटी का.का. लिहायला पैसे कोण भरेल, नाही का?
'दशावतारी' आयडींसाठी: कुणाच्या किती आयडी आहेत हे अॅडमिन ना माहित असल्याने, दर नविन आयडी साठी त्या मूळ आयडी ला डॉलर १०० फक्त/ एव्हडा कर आकारणे.
स्वताचे जुने लिखाण काहीही कारणाने वा कशाही प्रकारे 'वर' आणणे यासाठी मूल्य डॉलर ५० फक्त
अर्थात, असे केल्याने एकंदर माबो संकेतस्थळाचा टीआरपी पार घसरेल याची पुरेपूर कल्पना असल्याने वेगळा 'दंगा' बाफ ऊघडून दिला असता. व त्याचे नेमस्तक म्हणून श्री. झक्की यांची नियुक्ती केली असती.
लिंबाजीरावांना निभंदाबद्दल धा
लिंबाजीरावांना निभंदाबद्दल धा पैकी सा मारकं.
चार मारकं कापली, कारन :
>>
(जाता जाता नरेन्द्रमोदीन्ना माबोकर व्हायचे आमन्त्रणवजा सल्ला दिला अस्ता तो वेगळाच! फिदीफिदी )
<<
गुजराती भाषेतली मायबोली तयार झाली असती. कारण नरेनभाई मराठी बोलतील असे वाटत नाही +
याही धाग्यावर मोदी आणने म्यानेज केल्याबद्दल हबिनंडण.
बाकी निभंद छाण जमलेला आहे! <-- हे मुक्तकंठाने केलेले कवतूक आहे. खडे फोडणे न्हवे.
- इ. मास्तर (वे.मास्तर नव्हे )
इब्लिसराव, ये नै चालजा बे! ये
इब्लिसराव, ये नै चालजा बे! ये तो बहुत बडी नाइन्साफी है|
फक्त एका नरेन्द्रमोदिन्ना आणले तर दहापैकी चार मार्क कापले? डायरेक्ट चाळीस टक्के कपात?
इत्के का तुम्हाला मोदी महत्वाचे वाटतात?
बाकी आवर्जुन कवतिकाबद्दल धन्यवाद हां :)द
>>>> गुजराती भाषेतली मायबोली तयार झाली असती. <<<<<
होऊ शकेलही, पण मराठीमायबोलीसारखी ती "फुक्कट" असणार नाही, त्यातुन फायदाच कमविला जाइल, मायबोलीचा धन्दा केला जाईल! धन्दा नसेल, नफा नसेल, तर कोणताही गुजराथी कोणत्याही फन्दात पडत नाही!
>>>> कारण नरेनभाई मराठी बोलतील असे वाटत नाही + <<<< बोलतात, समोरचा मराठी बोलला तर नक्की बोलतात, मी ऐकल आहे प्रत्यक्ष!
>>>> याही धाग्यावर मोदी आणने म्यानेज केल्याबद्दल हबिनंडण. <<<
सर्व विश्व गोलाकार आहे, त्यामुळे फिरुन फिरुन तिथेच यायला होते त्याला मी काय करणार?
अन आमच्या गोलाकार विश्वात राहूल/सोनिया/मनमोहन वगैरे कोणीच नाही, सगळे आमच्या विश्वाच्या बाहेर आहेत अन आमच्याशी फटकून आहेत, त्यालाही मी काय करणार?
त्यान्नी माझ्याशी वेळेत सम्पर्क केला असता तर त्यान्नाही मी इथे "म्यानेज" केले अस्ते यात शन्का नाही! याबाबतीत आपलं इमान चोख आहे.
तुम्ही असंच असंबद्ध लिहीत
तुम्ही असंच असंबद्ध लिहीत राहिलात तर तुमच्यातला एकही अॅडमिन होऊ शकणार नाही. कुठलीही वेबसाईट मेंबरसंख्या आणि हिटस वर चालते. ब-याच ठिकाणी मालकच कण्हत कुथत कसे बसे मेंबर वाढवत असतात. अशा वेळी एखाद्या मेंबरचे दहा हजार ड्युआय असतील तर त्याला काढून फायदा काय ? टाकाऊ असलं तरी रोज लिहीणा-या लेखक / कवींच्या जोरावरच वेबसाईट चालतात. गप्प बसून महिन्याला एक पोस्ट टाकणा-या तथाकथित शहाण्या सदस्यांच्या जोरावर वेबसाईट चालत नाही. ज्यांना कुणाला फुकट सर्वरची काळजी वाटते, त्यांच्या खिशातून पैसे जात नसून जे सदस्य आपला वेळ खरचून क्लिक्स आणि हिटसची संख्या वाढवतात त्यांच्या जोरावर हा सर्वर फुकट चालवणं परवडतं हे त्यांनी लक्षात ठेवावं. आजकाल कुणीही उठतो आणि फुकट सर्वर म्हणून इतरांना झाडायला लागतो. तुमच्या आयडिया वापरून एक स्वतंत्र सर्वर विकत घ्या आणि तिथं या आयडिया राबवून वेबसाईट चालवा बरं. चॅलेंज आहे. पेड म्हटल्यावर काळं कुत्र तरी फिरकतं का बघा तुमच्याकड. तुम्हीच मालक, तुम्हीच अॅडमिन आणि तुम्हीच मेंबर असा मामला होईल. मग बसा आचारसंहीता लावत.
^^^ याला म्हणतात 'जन्मजात
^^^ याला म्हणतात 'जन्मजात हुश्शार'
पहा बरं!
सदर आयडी जन्माला येतानाच प्रगाढ पांडित्य व अनुभवसिद्ध मसंसंचालक आहेत या पोस्टीचा टाईम, अन आयडीचा सदस्य कालावधी व त्यांच्या पोस्टीचा टाईम पहावा
ओ इब्लिस हे कुणालापन बघता
ओ इब्लिस
हे कुणालापन बघता येत. लै भारि तीर नाहि मारला. काय चुकिचं लिहिल ते बोला. आपल्याला हे विषय भरकटवनं आवडत नाहि.
सध्या ऑनलाईन जगतात सिग्नेचर
सध्या ऑनलाईन जगतात सिग्नेचर ट्रॅक व्हेरिफिकेशन शक्य आहे. मी अॅडमिन असेन तर कोणी एखादा लेख लिहिताना हे सिग्नेचर ट्रॅकिंग कसे काय शक्य होईल याची पडताळणी करून पाहिन व लोकांना सिग्नेचर ट्रॅक ठेवायला लावेन!
Identity Verification
To join the Signature Track, you’ll build a Signature Profile that you use to tie your work to your identity. Your Signature Profile includes a biometric profile of your unique typing pattern and your photo. Every time you submit work, you’ll confirm your identity with a typing sample or webcam photo.
सिग्नेचर प्रोफाईल आणा, फोटो
सिग्नेचर प्रोफाईल आणा, फोटो आयडेण्टिटी आणा काहीही करा. मी तर म्हनतो एक पोल टाका. हे सगळे ठराव पास करून घ्या. ड्युआय कमी होतात का बघा. नाहितर स्वतःची साइट काढा आणि हे सगळं करून दाखवा. आपल्याकडून काय वाटल ते हारू.
munja मी तुमच्याशी सहमत आहे.
munja
मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही चुकीचे काहिच लिहिले नाही
>>>> टाकाऊ असलं तरी रोज
>>>> टाकाऊ असलं तरी रोज लिहीणा-या लेखक / कवींच्या जोरावरच वेबसाईट चालतात.<<<<
ओल्यासुक्या कचर्यातुन उर्जेच्या पुनर्निर्मिती सारखे का?
ओल्यासुक्या कचर्यातुन
ओल्यासुक्या कचर्यातुन उर्जेच्या पुनर्निर्मिती सारखे का?<<<
नव्हे. ही उपमा ब्राह्मणद्वेष, सांस्कृतीक अधःपतन, कॅतरिना आणि शाहरुखच्या कॅडबरीने बरबटलेल्या ओठांमधील मादकतेतील फरक यासारख्या चर्चांसाठी योग्य आहे.
ओके ओके बेफिकीरजी, मग काय
ओके ओके बेफिकीरजी, मग काय गोबरग्यास प्लान्ट सारखे काही तरी होते का? की टाकाऊतून टीकाऊनिर्मिती सारखे? नै? मग गेलाबाजार, महिन्याचे तन्गीचे कालखन्डात घरातील रद्दी विकुन जमविल्या जाणार्या पैशासारखे का?
तुमच्या लक्षात येणे अवघड आहे.
तुमच्या लक्षात येणे अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला टाकाऊ लिहिता यायला पाहिजे.
.
.
.
.
बराच लांबचा पल्ला आहे
Pages