Submitted by हायझेनबर्ग on 1 May, 2013 - 10:54
मनस्मिंनी कुठल्यातरी बाफ वर लिहिलेल्या प्रतिसादात 'मी अॅडमिन असतो तर अमुक अमुक केले असते' असे लिहिले. वाचताक्षणीच विचारांचे वारू चौफेर ऊधळून आले. मनस्मि, १०-१५ मिनिटे तुमच्या कल्पनेने दिवसाढवळ्या मस्त स्वप्नरंजन करवले. धन्यवाद तुम्हाला.
माझे स्वप्नरंजन फारच रक्तरंजित होते असे वाटल्याने ईथे लिहिणे बरोबर नाही पण अजून कुणाला त्यांचे स्वप्नरंजन शेयर करायचे असल्यास वाचायला नक्कीच आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मान्य बेफिकीरजी, बराच लाम्बचा
मान्य बेफिकीरजी, बराच लाम्बचा पल्ला आहे तो, आधी केलेची पाहिजे. तद्वत आधी टाकाऊ लिहीता यायला हवे. तसेच दुसर्या कुणी टाकाऊ लिहिलेले वाचताही यायला पाहिजे. अन त्यावर व्वाव्वाही करता आले पाहिजे. येऊन जाऊन हिट्स वाढल्या पाहिजेत! बरोबर ना?
बरोब्बर.
बरोब्बर.
मी अॅडमिन असते तर वर्षातून
मी अॅडमिन असते तर वर्षातून एक दिवस पुर्ण मोकळीक दिवस साजरा केला असता. वर्षाविहारासारखा. ज्या आयडीला जे काही बोलायचं असेल, चांगलं वाईट ते बोलण्याची मुभा दिली असती. मोकळं होण्यासाठी.
ज्या आयडीला जे काही बोलायचं
ज्या आयडीला जे काही बोलायचं असेल, चांगलं वाईट ते बोलण्याची मुभा दिली असती. मोकळं होण्यासाठी.<<<<
माझ्या मते लोक ऑलरेडी असे करतच आहेत इथे !!!!!!
वेगळे काही करायची गरज नसावी
(No subject)
नाही अजून पूर्णपणे मोकळे
नाही अजून पूर्णपणे मोकळे झालेले नाहीये आकाश.:फिदी: दक्षिणा बरोबर बोलतीय्.:स्मित:
>>>> मी अॅडमिन असते तर
>>>> मी अॅडमिन असते तर वर्षातून एक दिवस पुर्ण मोकळीक दिवस साजरा केला असता. वर्षाविहारासारखा. ज्या आयडीला जे काही बोलायचं असेल, चांगलं वाईट ते बोलण्याची मुभा दिली असती. मोकळं होण्यासाठी <<<<
वर्षाविहारासारखा??? आँ? सान्स्कृतिक समिती हाणेल की तुला.
तुला "शिमग्या" सारखा असे म्हणायचे आहे का?
मग चमन तुही तुझे रक्तरंजीत का
मग चमन तुही तुझे रक्तरंजीत का काय ते स्वप्नरंजन लिही. कदाचीत त्यानेही क्रांती होईल >>> हो तर! मी माझ्या स्वप्नरंजनाची स्क्रिप्ट लिहायला घेतलीच आहे. सुरुवात डायलॉग लिहिण्यापासून केली. ट्रेलर म्हणून एक डायलॉग देत आहे. अजून ट्रेलर येतीलच.
गझलांनी दुभंगले पाताळ, पर्यायांनी आस्मान
प्रतिसादांनी थरारली गझलियत, स्मायलींचे चेकाळले हैवान
ज्यांचा असेल निश्चय पक्का, ज्यांचा बसे सोटा नेमका
जे होतील त्याचा कर्दनकाळ, तेच म्हणवतील अॅडमिनsss
अॅडsssमिनsssमिन
(No subject)
स्मायलींचे चेकाळले हैवान >>
स्मायलींचे चेकाळले हैवान >>
गझलांनी दुभंगले पाताळ,
गझलांनी दुभंगले पाताळ, पर्यायांनी आस्मान
प्रतिसादांनी थरारली गझलियत, स्मायलींचे चेकाळले हैवान
ज्यांचा असेल निश्चय पक्का, ज्यांचा बसे सोटा नेमका
जे होतील त्याचा कर्दनकाळ, तेच म्हणवतील अॅडमिनsss
अॅडsssमिनsssमिन
>>> त्रिदेवचा डायलॉग होता नं असा?
मी तो आर्यमानच्या चालीत वाचला
मी तो आर्यमानच्या चालीत वाचला
भारीच्चे!
>>>अजून पूर्णपणे मोकळे झालेले
>>>अजून पूर्णपणे मोकळे झालेले नाहीये आ>>><<
त्यासाठी खाजगी जागा वापरा ना, मोकळेच व्हायचे आहे ना?
फार आशा होती पण काहीतरी
फार आशा होती पण काहीतरी boring चालू आहे इथे. त्यापेक्षा "अमूक आयडी अॅडमिन झाला तर काय करेल" अश्या प्रकारच्या पोश्टी टाकल्या तर काहीतरी ठीक होईल.
लोला, तू सुरुवात कर. ते वाचुन
लोला, तू सुरुवात कर. ते वाचुन सगळ्यांच्या कल्पनांना पंख फुटतील.
मी अॅडमीन असते तर 'गझल' हा विभाग फक्त त्या विभागाचे सदस्यत्व घेतलेल्या लोकांनाच दिसेल असे काहीतरी केले असते किंवा त्या विभागाचे सदस्यत्व फी घेऊन दिले असते!
मी अॅडमिन असतो तर
मी अॅडमिन असतो तर 'शिमगोत्सव'नावाचा लिमिटेड उत्सव ठेवला असता की ज्यात विनिर्दिष्ट कालावधीत सोनिया, वाजपेयी, हिन्दू, मुस्लिम, पाकिस्तान, फाळणी, आधिनिक बायका, गझला लिहिणारे 'कवडे', राहुल, मोदी, ५५ कोटी, जीना, दलित, ब्रम्हण यांना मनमुराद शिव्या देण्याची 'स्मोकिंग झोन'सारखी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली असती. म्हनजे लोक भर वस्तीत कुठेही असे रस्त्याच्या कडेला 'बसले' नसते
"आमेन".
"आमेन".:फिदी:
झंपे मी मायबोलीचे आकाश
झंपे मी मायबोलीचे आकाश म्हंटलेय, माझ्यासाठीचे आकाश नाही.:डोमा:
मायबोलीचे आकाश थोडे थोडे व्यापत चाललय दिवसेंदिवस.:खोखो:
चमन फिट्ट बसलाय डॉयलॉग.:फिदी:
गझलांनी दुभंगले पाताळ,
गझलांनी दुभंगले पाताळ, पर्यायांनी आस्मान
प्रतिसादांनी थरारली गझलियत, स्मायलींचे चेकाळले हैवान
ज्यांचा असेल निश्चय पक्का, ज्यांचा बसे सोटा नेमका
जे होतील त्याचा कर्दनकाळ, तेच म्हणवतील अॅडमिनsss
अॅडsssमिनsssमिन<<< तुफान!!!!
रच्याकने, 'गझलीस्तान'असा
रच्याकने, 'गझलीस्तान'असा पाकिस्तानसारखा वेगळा विभाग नाही का करता येणार की ज्यात ज्याला 'उबळ " आली असेल त्याने एकाखाली एक गझला पोस्ट कराव्यात. अंताक्षरीसारख्या?
या निमित्ताने मी अॅडमिनकडे स्वतंत्र 'गझलीस्तान' ची मागणि करीत आहे.
ज्या आयडीला जे काही बोलायचं
ज्या आयडीला जे काही बोलायचं असेल, चांगलं वाईट ते बोलण्याची मुभा दिली असती. मोकळं होण्यासाठी.<<<<
माझ्या मते लोक ऑलरेडी असे करतच आहेत इथे !!!!!!
वेगळे काही करायची गरज नसावी
>> वैवकु सध्या लोकं डूआयडी ने बोलतात.. आपापल्या आयडीने बोलायचे ही मोठी अट असेल मोकळे आकाश दिवसासाठी
रॉबिनहुड , उबळ नाही हो
रॉबिनहुड ,
उबळ नाही हो उचंबळ....
पर्यायी शब्द दिलाय ... बघा कसा वाततो
ड्युआयडी ही अशी चीज आहे कि
ड्युआयडी ही अशी चीज आहे कि आपल्या जवळच्याचा शिवराळ असेल तरी तो बाब्याच असतो
- झ पु गोरे
दुस-याचा निरूपद्रवी असला तरी ते कार्टं असतं. काहींनी तर कोण कुणाच्या धाग्याला वर काढतं हे शोधण्यात करीयर केलीय. शिव्या देणारा आयडी आला कि मग हे लोक लांब राहतात
आज आपल्याला गरज आहे ती अनेक सुधाकर, ऑर्फिअस, मोहिनी पवार, खवीस, सुखनवर, कविता लाड, शिवम पिंपळे, बाजीराव मेंगाणे निर्माण होण्याची.
सुधाकर पण डु आय होता हे मला
सुधाकर पण डु आय होता हे मला नव्हतं माहीत
मोहीनी पवार मात्र भारी आयडी होता
गझलांनी दुभंगले पाताळ,
गझलांनी दुभंगले पाताळ, पर्यायांनी आस्मान
प्रतिसादांनी थरारली गझलियत, स्मायलींचे चेकाळले हैवान
ज्यांचा असेल निश्चय पक्का, ज्यांचा बसे सोटा नेमका
जे होतील त्याचा कर्दनकाळ, तेच म्हणवतील अॅडमिनsss
अॅडsssमिनsssमिन
गझलांनी दुभंगले पाताळ,
गझलांनी दुभंगले पाताळ, पर्यायांनी आस्मान
प्रतिसादांनी थरारली गझलियत, स्मायलींचे चेकाळले हैवान
ज्यांचा असेल निश्चय पक्का, ज्यांचा बसे सोटा नेमका
जे होतील त्याचा कर्दनकाळ, तेच म्हणवतील अॅडमिनsss
अॅडsssमिनsssमिन>>>
मी अॅडमीन असते तर 'गझल' हा
मी अॅडमीन असते तर 'गझल' हा विभाग फक्त त्या विभागाचे सदस्यत्व घेतलेल्या लोकांनाच दिसेल असे काहीतरी केले असते किंवा त्या विभागाचे सदस्यत्व फी घेऊन दिले असते!
चांगली भरपूर फी लावा. अनुमोदन.
'गझलीस्तान'असा पाकिस्तानसारखा वेगळा विभाग
वेगळा विभाग पाहिजेच.पण पाकीस्तानसारखा नको. तिथले लोक बेकायदेशीरपणे इतर देशात घुसून मारामारी करतात.
रेशन कार्ड, पॅन आय डी, व्हिसा, पासपोर्ट, निदान पाच अॅडमिन कडून पाच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एव्हढे असेल तरच त्या विभागातील लोकांना इतर विभागात प्रवेश असावा. दुसर्या विभागत गेल्यावर तिथे गझल शब्दाचा उल्लेख करण्यास सक्त मनाई हवी.
खटाचे प्रतिसाद पण महीन्यातून
खटाचे प्रतिसाद पण महीन्यातून एखाद दुसरे किंवा तीन चार महीन्यातून एखादा असेच असतात. पण दुर्दैवाने खट शहाणा नाही. आज एकाच वेळी तिसरा प्रतिसाद खटाकडून आला म्हणजे नव्या धाग्याची वेळ झाली आहे. कोण घायाळ होईल, कुणाला खरचटेल, कुणाला अर्धांगवायू होईल हे काही सांगता येत नाही. खटाला असं काही लिहायची पाळी येऊ देऊ नका. उलट खटाला मनापासून अप्रतिम असा शेरा द्यावासा वाटेल असं काहीतरी घेऊन या.
मी अॅडमिन असतो तर... समाज
मी अॅडमिन असतो तर...
समाज सेवेच्या धाग्यांवर सारखं सारखं मदत कशी पाठवायची ? अमूक स्वरूपात चालेल का ? चेक पाठवू की कॅश असे प्रश्न जाहीररित्या विचारायला बंदी केली असती. केली अमाउंट ट्रान्स्फर, पाठवला चेक, आत्ता जरा समाधान वाटलं असं कळवणारे आयडी बॅन केले असते.
कृपया मला इथे एखादा आयडी कसा
कृपया मला इथे एखादा आयडी कसा शोधायचा सांगा ना . मला admin ला वि पु करायची असेल तर मी त्यांचा आयडी शोधून वि पु च्या लिंक वर कसं जाणार ?
Pages