Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिथे सल्लू पडीक असतो?
तिथे सल्लू पडीक असतो?
मुंबईच्या स्टेन्ड ग्लास
मुंबईच्या स्टेन्ड ग्लास हेरिटेज किंवा इतरही हेरिटेज आर्किटेक्चरबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणार्यांकरता एक सुरेख ब्लॉगही आहे- बॉम्बे आर्किटेक्चर- अ टूर ऑफ सिटीज हेरिटेज होम्स
>>> शर्मिला, मस्त लिंक दिलीस. धन्स.
मामी, प्रभादेवीचे मंदिरात
मामी,
प्रभादेवीचे मंदिरात नाही गेलात का?
हो की. ते ही एक आहे. जरा
हो की. ते ही एक आहे. जरा आतल्या गल्लीत आहे म्हणून राहिलं तसंच नविन पासपोर्ट ऑफिसजवळही एक जुनं शंकराचं एक दत्ताचं अशी दोन देवळं आहेत.
खोताची वाडी गिरगाव
खोताची वाडी गिरगाव
पाटील, अप्रतिम.
पाटील, अप्रतिम.
मामी, अशी काचेवरची चित्रं
मामी, अशी काचेवरची चित्रं आणखी कोणत्यातरी इमारतीच्या खिडकीत तावदानांवर बघितली होती. चांगली लक्षवेधक आणि सुंदर होती. खिडकीवर बाहेरून पडलेल्या उन्हामुळं आतून ते रंग अतिशय तेजस्वी भासत होते. कुठे ते अजून आठवत नाही.
मामी प्रभादेवी ते वरळी
मामी प्रभादेवी ते वरळी माहिती आणि प्रचि मस्तच.. मराठा उद्योग भवनच्या समोरील गल्लीत माता प्रभादेवीच जागृत देवस्थान आहे. लोटसच्या समोरील मार्केडेय शंकराच मंदिर मस्तच.. शांत निवांत
वरळी सीफेस


वरळी सीफेस वरचा कॉमन मॅन

दादर चौपाटी वरुन सी लिंक


दादर चौपाटी

शिवडीची जेट्टी

कॉनवुड कॉम्प्लेक्स

डावीकडे घारापुरी (एलिफन्टा) आणि उजवीकडे जवाहर द्विप (Butcher Island)

वडाळा उद्योग भवन आणि मागे वाडियाचा Spring Tower

इंद्रा, शिवाजी पार्कातून
इंद्रा, शिवाजी पार्कातून सीलिंकचा फोटो???
मला तू रजनीकांत आहेस की काय असं वाटून गेलं
मंजूडी... बदल साठवला आहे..
मंजूडी... बदल साठवला आहे.. धन्स
इन्द्रा, लई भारी.
इन्द्रा, लई भारी.
इंद्रा, मस्त फोटो. वरळी
इंद्रा, मस्त फोटो. वरळी सीफेसला विकडेला सक्काळी सक्काळी गेल्ता का? अजिबात गर्दी दिसत नाहीये.
तो समुद्राचं पाणी उसळणारा दादर चौपाटीचा फोटो आहे ज्ञानेश्वर उद्यानातून घेतलेला. नुकतंच काही वर्षांपूर्वी हे मोठं उद्यान केलं. आधी दोन वेगवेगळी कधीकाळी सुबक असलेली पण आता अवकळा आलेली उद्यानं होती. नवं उद्यान फारच मस्त आहे. आणि त्यातून सी-लिंक अगदी समोर दिसतो.
कॉनवुड कॉम्प्लेक्स
>>> हे कुठे आहे?
मामी... रविवारची सकाळची ९ -
मामी... रविवारची सकाळची ९ - १०ची वेळ होती म्हणून गर्दी नसेल.
कॉनवुड कॉम्प्लेक्स हे BPCL refineryच्या मागच्या बाजूला असल्याने शिवडी जेट्टीवरुन आरामात दिसते.
ओके.
ओके.
हवा छान असेल तर मध्य
हवा छान असेल तर मध्य रेल्वेच्या डॉकयार्ड रोड स्टेशनवरुन कर्नाळ्याचा सुळका दिसतो.
होय दिनेशदा.. जून महिन्यातील
होय दिनेशदा.. जून महिन्यातील पहिल्या पावसा नंतर वडाळ्या वरुन मी प्रबळगडची उजवी बाजू त्या मागे इर्शाळगडचा W आणि उजवी कडे कर्नाळ्याचा सुळका बघितला आहे.
इंद्रधनुष्य, अप्रतिम प्रचि
इंद्रधनुष्य, अप्रतिम प्रचि !
<< मामी प्रभादेवी ते वरळी माहिती आणि प्रचि मस्तच.. >> अनुमोदन. पण....सर्वधर्मसमभावानं देवदर्शन घडवतान हाजी अलीलाच यु-टर्न जरा घाईतच घेतलात असं नाही वाटत ? महालक्ष्मी मंदिराच्या इतक्या जवळ येऊन मागें वळलांत हें लतादिदीनां कळलं तर ..... !!
मुंबईततल्या तीन जत्रा ऐतिहासिक महत्वाच्या- वांद्र्याच्या मठ[मेरी]माऊलीची, माहिमच्या दर्ग्याची व नवरात्रीतल्या महालक्ष्मीची ! दीडशें वर्षांचं जुनं महालक्ष्मीचं देऊळ हें मुंबईतल्या सर्वांत श्रीमंत देवस्थानांतल एक. समुद्राच्या कांठांवरचं, कांहीशा उंचावरचं सुरेख बांधणीचं हें हवेशीर देऊळ आज एक महत्वाचं 'टूरिस्ट अट्रॅक्शन'च झालंय.

पूर्वीं फक्त नवरात्र व निवडक दिवशींच गर्दी होत असलेलं हें देऊळ आतां सदाचंच तुफान गर्दीने वेढलेलं असतं.[ माझे एक मित्र देवळालगतच दोन-तीन पिढ्या रहात; पण केवळ तिथली सदाची वाढती प्रचंड गर्दी व गोंगाट यामुळें महालक्ष्मीवर नितांत श्रद्धा असूनही ते नाईलाजाने हल्लींच ती जागा सोडून दुसरीकडे रहायला गेले !]. देवळाच्या मागच्या पायर्यांवरून अरबी समुद्र महालक्ष्मीच्या 'चरणतला धुवायला' आतुरलेला दिसतो -अजूनही दिसत असावा . देऊळ इमारतींच्या विळख्यांत असलं तरी वरळीनाक्यावरून येताना पहिलं समुद्रदर्शन या देवळाच्या कळसाच्या दर्शनाबरोबरच होतं.

कामचलाऊ, उधारीवर घेतलेल्या वरच्या प्रचि गोड मानून घ्याव्या, ही विनंति.]
देवळाच्या मागच्या बाजूस देवळाच्या ट्रस्टचं कार्यालय आहे. अनेक लोकोपयोगी कामांना, धार्मिक संस्थानां हा ट्रस्ट मदत करतोच पण अनेक गरजू विद्यार्थ्याना लाखों रुपयाच्या शिष्यवृत्याही देतो. कार्यालयाच्या इमारतींतच देवीला भक्तानी वाहिलेल्या मौल्यवान साड्यांचा संग्रहही आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार ,या साड्यांच्या 'ऑक्शन'चंच देवस्थानला दरवर्षीं होणारं उत्पन्न लाखों रुपयांचं आहे ! महालक्ष्मीवर नितांत श्रद्धा असणारे सर्वच वर्गातले अगणित लोक मुंबईत आहेत; लतादिदीनीं तर त्यांचं 'प्रेमकुंज'मधलं निवासस्थान निवडलं तें म्हणे तिथून समोरच्या महालक्ष्मीच्या या देवळाचं दर्शन होतं म्हणूनच ! [ कदाचित, महालक्ष्मी व त्यांच्यात अडथळा, दुरावा निर्माण होईल या भितीनेच त्यानी पोटतिडकीने तिथल्या 'फ्लायओव्हर'ला विरोध केला असावा !
पाटीलजी, चित्रासाठीं नेहमीप्रमाणे सलाम ! ' खोताच्या वाडी'वर एखादं रांगडं, बालीश शब्दचित्र काढून तुमच्या जलरंगातल्या चित्राला तीट लावायचाही विचार आहे !
आहा पाटील! क्लास संपवून
आहा पाटील!
क्लास संपवून उत्तरदुपारी खोताच्या वाडीतून घरी जायचो तेव्हा तिथल्या त्या टुमदार घरांतून गिटार वगैरे ऐकू यायचं आणि निराळ्याच जगात आल्यासारखं वाटायचं.
तिथल्या आयडियलमधले वेफर्स मस्त असतात ताजे.
इंद्रधनुष्य, फोटो मस्त आहेत.
मामे, सही!
<< केवळ 'अर्धा ब्रूनमस्का और
<< केवळ 'अर्धा ब्रूनमस्का और पानीकम चाय'वर दीडदोन तास बिनधास्त करायचं मुंबईतलं स्वप्नवत ठीकाण म्हणजे इराण्यांची नाक्या-नाक्यावर वसलेलीं ' व्हॉईस ऑफ इंडिया' सारखीं हॉटेलं.>> आजच्या म.टा.मधे नेमक्या याच विषयावर श्री.राजेश चुरी व श्री नितीन चव्हाण यांचे छान,वाचनीय लेख आहेत - 'ब्रूनमस्का हरवतोय' व ' "इराणीचे" साहित्यिक ' !
भाऊ, मध्यंतरी महालक्ष्मी कडे
भाऊ, मध्यंतरी महालक्ष्मी कडे थोडी गर्दी कमी झाल्यासारखी वाटायची, त्या काळात एकदम हाजी आली कडे जाणार्यांची संख्या वाढली होती. आता परत महालक्ष्मीला गर्दी होतेय, हे वाचून छान वाटले.
' खोताच्या वाडी'वर एखादं
' खोताच्या वाडी'वर एखादं रांगडं, बालीश शब्दचित्र काढून तुमच्या जलरंगातल्या चित्राला तीट लावायचाही विचार आहे ! >>> लिहा लिहा
माझ्या लहानपणी अशी अफवा होती की खोताच्या वाडीत मानकाप्या फिरतो आणि कुठल्याही बोळातून तो एकदम समोर येतो आणि मान कापतो. त्याला मुंडके नसते आणि त्याचे हात बुजगावण्यासारखे पसरलेले असतात 
खोताच्या वाडीतलं "जैन क्लिनिक" म्हणजे गिरगावकरांना जवळचं आणि चांगलं हॉस्पिटल. तसंच ग्रँटरोड गिरगावच्या मधोमध असलेलं हरकिसनदा हॉस्पिटल.
खोताच्या वाडीतील कॅथलिकांची घरं, व्हरांडे म्हणजे एक संस्कृतीच आहे. ते गिटार वगैरे अगदी अगदी.
स्वाती, कुठल्या क्लासला जायचीस गं खोताच्या वाडीतून?
भाऊ नक्की लिहा. काही
भाऊ नक्की लिहा. काही महीन्यांपुर्वी खोताच्या वाडीत फोटो काढत असताना एका गृहस्थाने (बहुतेक विली असे त्याचे नाव)घरात बोलवले, त्याच्या कडे अँटीक वस्तुंचे कलेक्षन आहे (बहुतेक वस्तु चोरबाजारातुन जमवलेल्या)तसेच वेगवेगळे पक्षी आणि मासे.
http://khotachiwadi.urbz.net/ हि साईट मस्त आहे
स्वाती_आंबोळे - आयडीअलचे वेफर्स आणि बाकीचे मंचींग आयट्म्सपण मस्त असतात.
सर्व्या लेटेस्ट पोस्टी
सर्व्या लेटेस्ट पोस्टी ब्येश्ट
पाटीलजी, छान लिंकबद्दल
पाटीलजी, छान लिंकबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. [ तिथं जी उंच ,स्वच्छ चाळ दाखवली आहे, त्यांत माझे मामा रहात].
'हेरिटेज कॉन्झर्वेशन'साठी 'खोताची वाडी'ची निवड झाल्याचं मला कळलं होतं पण शोधूनही 'नेट'वर मला त्या यादीत तें नांव मिळत नव्हतं. [ रच्याकने, या धाग्यावर रंगलेला 'चोर बाजार' मात्र 'हेरिटेज'च्या यादींत चमकतो आहे !]
<< आयडीअलचे वेफर्स >> आठवणींच्या ढीगातून काढून काय काय हा धागा नजरेसमोर नाचवणार आहे, कुणास ठाऊक !!!
लतादिदीनीं तर त्यांचं
लतादिदीनीं तर त्यांचं 'प्रेमकुंज'मधलं निवासस्थान निवडलं >>> भाऊ, ते प्रभुकुंज.
<< ते प्रभुकुंज.>>बरोबर.
<< ते प्रभुकुंज.>>बरोबर.
बरं, लोक्स. मेधा२००२ नं एक
बरं, लोक्स. मेधा२००२ नं एक सुचना केली आहे की या धाग्यावरची फक्त माहिती (म्हणजे बाकीच्या गप्पा वजा करून) एक वेगळा धागा काढून साठवावी म्हणजे सलग फक्त मुंबईची माहिती असलेला धागा तयार होईल. काय मत?
मामी, गप्पा म्हणजे निव्वळ
मामी, गप्पा म्हणजे निव्वळ टीपी असलेल्या पोस्टी वगळून का? अशा पोस्टी तशा फारच कमी असाव्यात असे वाटतेय. बर्याच पोस्टींमध्ये गप्पांसोबत माहितीही असणार ना? ती वेगळं काढणं किचकट होईल, कदाचित.
<< प्लीज ते वरचं वाक्य
<< प्लीज ते वरचं वाक्य बदला.>> बदललं. झालं समाधान ?
त्यापेक्षा कुठली माहिती
त्यापेक्षा कुठली माहिती कुठल्या पानावर आहे त्याची सूची करून हेडरमधे डकवली तर?
ती अपडेट करत रहाणे हा व्याप होईल मात्र तुला.
Pages