श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावणघेवड्याची कोशिंबीर टाईप भाजी >>
मी कुठल्याही प्रकारची श्राघेची भाजी असली तर त्यावर दाण्याचे कुट टाकुन लिंबु पिळतोच. लै भारी लागते. Happy

आयला!! ललीच्या रेस्पीला तीन आकडी प्रतिसाद. आयॅम जेलसच!!!

वर्दाने टाकलेला फोटोत पावट्याच्या शेंगा आहेत.

फरसबीला ग्रीन बीन्स म्हणणारे फ्रेंच बीन्स कशाला म्हणतात?

आयला एव्हड्या पोश्टी पाहुन वाटले.. लोकांनी भाजी केली आणि एकतर आवडली म्हणुन लिहीले किंवा फसली म्हणुन शंका विचारल्या.. पण इथे तर तिसरेच काही Uhoh
हे राम ! Lol

ललीने हे ही फिल्ड आत्मसात करायचं (सोडायचं नाही) असं ठरवल्याबद्दल मला अत्यंत गहिवरून येत आहे, डोळे वारंवार भरून येत आहेत.. आई-आजीचे सद्गदित चेहरे डोळ्यासमोरून हालत नाहीयेत.. पाकृ, स्वयंपाकघर आणि लली यांचं नातंच असं आहे, काय करणार आम्ही तरी.

लले, याही क्षेत्रात तू नेत्रदिपक यश मिळवशील माबोवर याची मला १००% खात्री आहे.

आता पाकृ बद्दल........ ललीकडून ही भाजी शिकल्यापासून मी आता श्रावणघेवडा (french beans) ची भाजी दुसर्‍या कुठल्याही प्रकारे करत नाही, आमच्याकडे मुलं (इन्क्लुडिंग नवरा) ही अशीच भाजी आवडीने खातात. पांढर्‍या भाताबरोबर खरोखरच या भाजीची लज्जत वाढते. Happy

फरसबी म्हणजे फ्रेंचबीन्स चा अपभ्रंश ना?
मग त्याला श्रावणघेवडा असे नांव कसे प्रचलित झाले असावे? इंग्रज जसे हवे त्याला कायबाय म्हणून पुढे अ‍ॅपल लावत (कस्टर्ड अ‍ॅपल, क्रॅब अ‍ॅपल, इ.इ.) तसे दिसली शेंग की म्हण घेवडा, असा प्रकार असावा काय?...

लले, आता माझा रेसिपीबद्दल असा प्रश्न आहे -
>>- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
का म्हणे? म्हणजे नक्की काय होते?

मंजूडे, फ्रेंच बीन्स्/ग्रीन बिन्सपेक्षाही पुलावाची रेसिपी सांगताना श्रावणघेवडा म्हणता का? मी तरी कायम फरसबी असंच ऐकलं/वाचलं आहे.

दिसली शेंग की म्हण घेवडा >>> Biggrin

लोला, हळद घालून आणि न घालता, दोन्ही प्रकारे ही भाजी खाऊन बघ, फरक तुलाच कळेल Wink

मी तरी कायम फरसबी असंच ऐकलं/वाचलं आहे.>> मी पण गं... म्हणूनच मला प्रश्न पडला.
आता जौ द्या झालं Wink

Happy
मला काहीच मजा कळली नाही म्हणून तर..

फरसबी, तुला "श्रा घे" म्हणतील ते चालणार नाही म्हणून सांग.

श्रावण घेवडा म्हणा, फरसबी म्हणा, फेंच बीन म्हणा नही तर सुरळीच्या वड्या म्हणा. आम्ही आपलं गुमान खाणार. पोटात गेल्यावर मोठं आतडं आणि लहान आतडं नाव विचारत बसत नाही. यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड हे देखील नावासाठी भांडत बसत नाही कि आत्ता आलेलं फरसबी आहे कि शाघे आहि कि आणखी काय! त्याप्रमाणे आम्ही पाझरतो असं ते म्हणत नाहीत आणि अडूनही बसत नाहीत. त्यांची तक्रार एकच. जे काही बनवलंय त्यात पचायला अवघड असे तेल, मसाले, तडका किती आहे याचीच. खटाची पोस्ट कुणी वाचेल न वाचेल, कुणी वाचल्यासारखी करून पुढे जाईल, कुणी पटल्यासारखी वाटून न पटल्यासारखी करेल, कुणाला कळल्यासारखी होऊन वळल्यासारही होणार नाही... या सर्वाची फिकीर खटाला नाही. खटाची पोस्ट फक्त मत्स्यभेद करते. Lol

कला कलावंताला बदलते हे ऐकले होते, पण कलेवरची चर्चा कलावंताचे नावदेखील बदलते हे लली उर्फ फरसबीमुळे कळाले Proud

श्री घेवडेश्वर प्रसन्न..

घेवडा पुरण वाचले.
छान आहे... Happy

Lol ललीच्या रेस्पीने मी ज्याला फरसबी म्हणते त्या बीन्सची भाजी केली आज. आवडली चव, रिपिट करणेबल वाली लिटमस टेस्ट पास झाली ही रेस्पी Proud

Pages