अळुची पाने - ४
मध्यम कांदा - १
बेसन - एक वाटी
धने जिरे पावडर - २/३ चहाचे चमचे
तिखट, हळद
चवीपुरती चिंच
चवीपुरता गुळ
तेल
मोहोरी
मीठ
अळूची पाने स्वच्छ धुवुन शिरा काढुन बारीक चिरुन घ्या.
एका भांड्यात अळूची चिरलेली पाने, बेसन, तिखट, हळद, धणे जीरा पावडर, चिंच, गुळ ( किसुन ), मीठ हे सगळे एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालुन कालवा. मिश्रण सरबरीत होऊदे. भज्याप्रमाणे अगदी घट्ट नको.
एका जाड बुडाच्या पसरट कढई / पॅन मधे तेल टाका.
तेल तापले की त्यात मोहोरी टाका.
तडतडली की हिंग, हळद आणि लगेच कांदा टाकुन किंचित परतवा.
कांदा भांड्याच्या बुडाशी व्यवसथित पसरवा. त्यावर मघाशी केलेले अळु बेसनचे मिश्रण पसरवा. मिश्रण कांद्यावर एकसारखे पसरले पाहिजे.
आता झाकण ठेवुन मंद गॅस वर शिजू द्या. अजिबात ढवळायचे नाहीये.
दहा / बारा मिनीटांनी झाकड उघडुन बघा. कडेचा कांदा लाल झाला असेल आणि बेसनाचे मिश्रण थालिपिठासारखे झाले असेल तर उलथण्याने हळुच न मोडता उलटवा.
आता दुसर्या बाजुने पण चांगले लाल होईपर्यंत शिजवा.
दोन्ही बाजु लाल झाल्या की थालिपिठ उलथण्यानेच कुस्करा आणि झुणक्याप्रमाणे करा.
अळुची खमंग थालिपीठ भाजी तयार आहे. मधे मधे कुरकुरीत झालेला कांदा खायलाही मजा येते.
अळुवड्यांमधे अजुन काही घालत असल्यास ते ही मिश्रणात टाकले तर चालेल.
थालिपीठाप्रमाणे पण कांद्यावर शिजवल्यामुळे खमंगपणा वाढतो
मेहेनत न करता आरामात शिजवायची भाजी
अळु नसल्यास इतर पालेभाजी वापरुन करु शकता
>तर उलथण्याने हळुच न मोडता
>तर उलथण्याने हळुच न मोडता उलटवा >> हे कठीण आहे! घरात पालक आहे. आज संध्याकाळी करुन पाहते, आणि फोटो का नाही? फोटोग्राफरकडून फोटो नाही म्हंजे काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो फोटोशिवाय पाककृती अळणीच.
हो फोटोशिवाय पाककृती अळणीच. डोळे तॄप्त होतात.
चव अळूवडीचीच लागेल आणि उंडे
चव अळूवडीचीच लागेल आणि उंडे करण्याचे कसब नसले तरी चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावली, अगदी वेगळा प्रकार
अगदीच शैलजा. इथे अळू मिळत
अगदीच शैलजा.
इथे अळू मिळत नाही त्यामुळे.......पण भा़जी खरंच खमंग होईल असं वाटतंय.
चांगली लागेल भाजी ...पण अळूची
चांगली लागेल भाजी ...पण अळूची मजा बाकी कुठ्ल्या भाजीला येणार नाही...
व्वा! नवीन प्रकार! पण
व्वा! नवीन प्रकार!
पण सावलीच्या रेसीपीत फोटो नाही असं कसं काय?
मी केली अळुची झुणका भाजी
मी केली अळुची झुणका भाजी मस्तच झाली
केली पाहीजे.
केली पाहीजे.
छान शॉर्टकट आहे
छान शॉर्टकट आहे
पण ह्यात भाज्या अगदी बारीक कराव्या लागतील , नैतर शिजणार नाहीत