हिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी

Submitted by मामी on 28 April, 2013 - 13:44

साहित्य : कर्तव्याची जाणीव (१ किलो), चिकाटी (५ किलो), भरपूर वेळ (काढता येईल तितका), होडी आणि वल्ही (मी दोन वल्ही वापरलीयेत.)

सध्या आमच्याकडे पाचवीचा अभ्यास सुरू झाला आहे. गृहकार्यात हिंदी टीचरनं प्राणी आणि पक्ष्यांची हिंदी नावं गुंफून एक शब्दकोडं बनवायला सांगितलं होतं.

सोडवायला सोपं जातं (शब्दकोडं - मराठी. हिंदी शब्दकोडं नव्हे. हिंदी शब्दकोडं आतापर्यंत सोडवलंच नाहीये.) पण बनवायला वेळखाऊ प्रकरण. शब्द शोधा, मग त्यातली कॉमन अक्षरं (त्यांच्या काना, मात्रा, वेलांटीसकट) शोधा. मग त्यांचे गुच्छ (क्लस्टर्स) बनवा आणि मग एक सोईनं ग्रिड तयार करून त्यात ते त्यातल्यात्यात योग्य प्रकारे बसवा - असलं चिकाटीचं काम.

पण तरीही एकदाचं हे शब्दकोडं पूर्ण केलंच. माझ्या हिंदी शब्दांच्या अज्ञानसागरात हातपाय मारत असताना गुगलरूपी होडीनं आणि वल्हं क्रमांक १वल्हं क्रमांक २ नं मला पैलतीरी सुखरूप पोहोचवलं.

तर हे शब्दकोडं इथे देत आहे. मायबोली नेक्स्टजेनला उपयोगी पडेल अशी आशा आहे. आमच्या कोड्यात शब्दांना उभे आडवे क्रमांक दिले नाहीत कारण आम्हाला क्लु द्यायचे नव्हते.

पण तुम्हाला याच शब्दकोड्यातले शब्द गाळून, रिकामं ग्रिड बनवून, उभ्या आणि आडव्या शब्दांना क्रमांक देऊन आणि खाली त्या त्या प्राण्या-पक्ष्यांची चित्रं चिकटवून अथवा वर्णन करून देता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त बनवलय, मामी !

फक्त १ किलो कर्तव्याची जाणीव आणि ५ किलो चिकाटी मध्ये जमलं? मला ह्याच्या दसपट वापरूनही जमणार नाही...
प्रश्न : काही शब्द हिंदी भाषेला तुम्ही बहाल केले का?

टीप :छोट्या मॅडम चं अक्षर सुंदर झालय.

Lol मस्तच गं मामी... आणी हे लाराने लिहिलंय.. सुबक आहे अक्षर..

ते चूं वरचं टिंब इरेज करायला हवंय का?? चूहा चं Happy

अजगरच्या इथे उभा शब्द काय आहे ? >>>> सिंडी, तो आहे खंजन = Wagtail

ते चूं वरचं टिंब इरेज करायला हवंय का?? चूहा चं >>> वर्षुताई, धन्स. सांगते करायला. Happy

सुबक अक्षर पाहून मलाही भोवळ आली आहे. Proud

काही शब्द हिंदी भाषेला तुम्ही बहाल केले का? >>> नाय नाय. ते आहेत तसेच आधीपासून. Proud

'मोरनी' हा शब्द नंतर काढून टाकला कारण त्याला जोडणारा 'मोर' आधीच 'सारस'बरोबर वापरून झालाय आणि दोनाक्षरी, मो, र, नी यापैकी कोणत्याही अक्षराने संपणारा दुसरा कोणताही प्राणी किंवा पक्षी आयत्यावेळी मिळाला नाही. त्यामुळे 'मोरनी' चे तीन चौकोनही पिवळे झाले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

भारी! Happy

वा ! मस्तच.
मामी,
एक सुचवावसं वाटलं.
मायबोलीवरील सदस्यनामांचं एक कोडं तयार कराल का ?
क्ल्यू मात्र मजेशीर हवेत हां.

मस्तय कोडं . Happy चमगादड, लकडबग्गा, नेवला वाचुन जंगलबुकाची आठवण झाली.

मानव हा प्राणी नाही का मानत >>> दिनेशदा, कशाला त्या बिचार्‍या प्राण्यांचा अपमान करायचा??? Happy

मामी, खरंच भारी झालंय कोडं. लाराला सांग, आवडलं.
>>>>> गजानन, नक्की सांगते. खुश होईल अगदी! Happy

मायबोलीवरील सदस्यनामांचं एक कोडं तयार कराल का ?
क्ल्यू मात्र मजेशीर हवेत हां. >>> भिडे, छान आहे कल्पना. नक्की विचार करते. अजूनही कोणी करणार असेल तर जरूर करा. Happy

अक्षराबद्दल आधी एक छानशी शाबसकी. Happy

प्रोजेक्ट मस्तच झालाय. काही प्राण्यांची नावे पण ऐकली नाहीत