आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
श्र, ये मौजमस्ती घडीभरकी है,
श्र,
ये मौजमस्ती घडीभरकी है, तुम्हे अपनी जिंदगी संवारनी है' च्या अर्थाचं काही गाणं आहे का?
आत्ता क्लू तर दे.
आत्ता क्लू तर दे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, नाही. केवळ त्यांच्यामते
मामी, नाही. केवळ त्यांच्यामते असलेली वस्तुस्थिती मांडणारं गाणं. दुसरा क्लूही महत्त्वाचा आहे. गाणं जुनं नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रध्दा, इतिहासातल्या एका
श्रध्दा, इतिहासातल्या एका व्यक्तिरेखेवर बेतलेला चित्रपट.
ओह. मला- 'तेरा मेरा प्यार
ओह. मला-
'तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यूं मुझको लगता है डर.
मेरे जीवनसाथी बता, क्यूं दिल धडके रहरहकर..'
हे वाटलं होतं. पण अपेक्षित सिनेमा वेगळाच दिसतोय.
नाही, तेरा मेरा प्यार अमर वर
नाही, तेरा मेरा प्यार अमर वर मी आधी कोडं घातलंय.
०५/३०: 'क्षितीज? अरे तू
०५/३०:
'क्षितीज? अरे तू एव्हढ्या लवकर कसा काय आलास आज?' दरवाजा उघडल्यावर मीनल आश्चर्याने म्हणाली.
'अग, आज लवकर संपवलं काम. बॉसला जरा मस्का मारला आणि आलो घरी.'
'आज काय स्पेशल?'
'आहे ना. सांगतो. पण आधी पटकन तयार हो बघू. आपण आज बाहेर जेवायला जायचं आहे. आणि आल्यावार आपलं सामान पण भरायचं आहे.'
'सामान भरायचं आहे?'
'होय. आपण फुल एक आठवड्यासाठी बाहेर चाललोय. मी आजच सुट्टी मंजूर करून घेतली आहे'
'कुठे जायचं पण?'
'मी फक्त एव्हढचं सांगतोय की ते ठिकाण महाराष्ट्रातच आहे. फार प्रवास नाही करावा लागणार. पण इतकं मस्त आहे की तू वेडीच होशील बघून. आता चल बघू लवकर. बोलण्यात वेळ घालवू नकोस.'
दुसर्या दिवशी पहाटेच दोघं निघाले. चांगले दोन तास ड्राईव्ह करून झाले तरी क्षितीजने आपण कुठे चाललोय ह्याचा पत्ता मीनलला लागून दिला नव्हता.
'अरे, अजून किती प्रवास बाकी आहे?'
'झालं की आलंच. एखादा तास फार तर.'
मीनलला भारी उत्सुकता लागली होती. क्षितीजला विचारलं तरी तो काही सुगावा लागू देणार नाही हे ठाऊक असूनही तिने विचारायचं ठरवलं. पण त्याचा एकूण खेळकर मूड आणि जुन्या हिंदी गाण्याची आवड पहाता तिने हा प्रश्न गाण्यातूनच विचारायचं ठरवलं. कोणतं गाणं म्हटलं असेल तिने?
०५/३१: मी काही गझलकार नाही.
०५/३१:
मी काही गझलकार नाही. पण कोड्याचा एखादा नवा प्रकार ट्राय करावा म्हणून हे घालतेय.
रहते हो जिस आशियानेमे
उसमे है खिडकीया हजार
दिलकी गिरह खोल दो जाना
कबसे दस्तक दे रहा है मेरा प्यार
ही सिच्युएशन असलेलं गाणं ओळखा पाहू.
०५/०३१ पल भर के लिए को हमें
०५/०३१ पल भर के लिए को हमें प्यार कर ले झूठा ही सही
०५/०३० कहाँ ले चले हो बता दो
०५/०३० कहाँ ले चले हो बता दो मुसाफिर
सितारों के आगे यह कैसा जहाँ है?
५.३० >> ये कहा आ गये हम ??
५.३० >> ये कहा आ गये हम ??
माझं गाणं ओळखा की.
माझं गाणं ओळखा की. स्वप्नाचंही आधीच्या पानावरचं एक राहिलंय ओळखायचं.
स्वप्ना, 'ऐ दिल-ए-नादान, आरजू क्या है ..' (रझिया सुलतान) का?
भरत बरोबर ०५/३१: रहते हो जिस
भरत बरोबर
०५/३१:
रहते हो जिस आशियानेमे
उसमे है खिडकीया हजार
दिलकी गिरह खोल दो जाना
कबसे दस्तक दे रहा है मेरा प्यार
ही सिच्युएशन असलेलं गाणं ओळखा पाहू.
उत्तरः पल भर के लिए को हमें प्यार कर ले झूठा ही सही
नाही भरत.... ०५/३०: 'क्षितीज?
नाही भरत....
०५/३०:
'क्षितीज? अरे तू एव्हढ्या लवकर कसा काय आलास आज?' दरवाजा उघडल्यावर मीनल आश्चर्याने म्हणाली.
'अग, आज लवकर संपवलं काम. बॉसला जरा मस्का मारला आणि आलो घरी.'
'आज काय स्पेशल?'
'आहे ना. सांगतो. पण आधी पटकन तयार हो बघू. आपण आज बाहेर जेवायला जायचं आहे. आणि आल्यावार आपलं सामान पण भरायचं आहे.'
'सामान भरायचं आहे?'
'होय. आपण फुल एक आठवड्यासाठी बाहेर चाललोय. मी आजच सुट्टी मंजूर करून घेतली आहे'
'कुठे जायचं पण?'
'मी फक्त एव्हढचं सांगतोय की ते ठिकाण महाराष्ट्रातच आहे. फार प्रवास नाही करावा लागणार. पण इतकं मस्त आहे की तू वेडीच होशील बघून. आता चल बघू लवकर. बोलण्यात वेळ घालवू नकोस.'
दुसर्या दिवशी पहाटेच दोघं निघाले. चांगले दोन तास ड्राईव्ह करून झाले तरी क्षितीजने आपण कुठे चाललोय ह्याचा पत्ता मीनलला लागून दिला नव्हता.
'अरे, अजून किती प्रवास बाकी आहे?'
'झालं की आलंच. एखादा तास फार तर.'
मीनलला भारी उत्सुकता लागली होती. क्षितीजला विचारलं तरी तो काही सुगावा लागू देणार नाही हे ठाऊक असूनही तिने विचारायचं ठरवलं. पण त्याचा एकूण खेळकर मूड आणि जुन्या हिंदी गाण्याची आवड पहाता तिने हा प्रश्न गाण्यातूनच विचारायचं ठरवलं. कोणतं गाणं म्हटलं असेल तिने?
उत्तरः
तुम कहा ले चले हो साजन अलबेले
ये कौनसा जहा है बताओ तो बताओ तो
चित्रपट ६५ सालचा पूनम की रात - गाणं इथे पहाता येईल.
>>स्वप्ना, 'ऐ दिल-ए-नादान,
>>स्वप्ना, 'ऐ दिल-ए-नादान, आरजू क्या है ..' (रझिया सुलतान) का?
नाही श्रध्दा......आणखी एक क्लू - ह्या चित्रपटात एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तडप ये दिन रात की, कसक ये बिन
तडप ये दिन रात की, कसक ये बिन बात की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भला ये रोग है कैसा, सजन अब तो बता दे..
आम्रपाली. वैजयंतीमाला.
येस्स श्रध्दा! ०५/०२७: चित्रा
येस्स श्रध्दा!
०५/०२७:
चित्रा गेले काही दिवस अगदी बेचैन होती. तिला अजिबात बरं वाटत नव्हतं. सकाळी उठल्यावर अगदी अस्वस्थ वाटायचं. दिवस जाईल तसतशी बेचैनी वाढायची. आणि संध्याकाळनंतर तर सारखी हुरहुर लागायची. सगळ्या फिजिकल तपासण्या झाल्या पण काही निष्पन्न होईना. तिचा नवरा चिन्मय प्रतिथयश मानसोपचारतज्ञ. त्याच्या सल्ल्यावरून तिने त्याही चाचण्या केल्या. पण कसलंच निदान होईना.
एके दिवशी संध्याकाळी चिन्मय घरी आला तेव्हा चित्रा उदास होऊन खिडकीजवळ बसलेली होती. त्याला कसंतरीच झालं. बायकोला नक्की होतंय काय ह्याचं निदान न झाल्याने तोही तसा अस्वस्थच होता. 'नको काळजी करू चित्रा. सगळं ठीक होईल' असं तो म्हणाला खरा. पण त्याच्या आवाजात विश्वास नव्हता. चित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला. ओळखा ते गाणं.
क्लू १:इतिहासातल्या एका व्यक्तिरेखेवर बेतलेला चित्रपट
क्लू २: ह्या चित्रपटात एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे
उत्तरः
तडप ये दिन रात की, कसक ये बिन बात की
भला ये रोग है कैसा, सजन अब तो बता दे
चित्रपट आम्रपाली. पडद्यावर वैजयंतीमाला.
हे मस्त कोडं होतं स्वप्ना.
हे मस्त कोडं होतं स्वप्ना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
०५/३२:
आज एक गंमतच झाली. आजी आणि वर्षा दोघीच घरात होत्या. आजी घराच्या पुढच्या दाराशी काही काम करत होत तर वर्षा मागच्या दारात बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात आजीनं वर पाहिलं तर दाराशी उभा होता जवळच राहणार्या त्यांच्या मुलीचा - अमृताचा - मुलगा घनश्याम. तो आला होता वर्षाशी खेळायला. नेमकं त्याचवेळी मागच्या दारात शेजारी राहणार्या सोनियाताईचा छोटुकला दिनकर आजीकडून मम्मं भरवून घ्यायला आला होता. तर वर्षा अन आजी हे एकमेकींना कसं सांगतील?
०५/३२: आजी सोनियाचा
०५/३२:
आजी सोनियाचा दिनु..
वर्षे अमृताचा घनु..
माझं कोडं ओळखा की राव!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बरोब्बर श्रद्धा! पण ते
बरोब्बर श्रद्धा! पण ते लिहिताना योग्य प्रकारे लिहिलं पाहिजे हं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
०५/३२:
आज एक गंमतच झाली. आजी आणि वर्षा दोघीच घरात होत्या. आजी घराच्या पुढच्या दाराशी काही काम करत होत तर वर्षा मागच्या दारात बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात आजीनं वर पाहिलं तर दाराशी उभा होता जवळच राहणार्या त्यांच्या मुलीचा - अमृताचा - मुलगा घनश्याम. तो आला होता वर्षाशी खेळायला. नेमकं त्याचवेळी मागच्या दारात शेजारी राहणार्या सोनियाताईचा छोटुकला दिनकर आजीकडून मम्मं भरवून घ्यायला आला होता. तर वर्षा अन आजी हे एकमेकींना कसं सांगतील?
अजिSSSS सोनियाचा दिनु..
वर्षेSSSSS अमृताचा घनु..
तुझ्या कोड्याचं उत्तर मला तरी
तुझ्या कोड्याचं उत्तर मला तरी येत नाहीये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे राज्य व्हावे हि तो श्रींची
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा
http://www.maayboli.com/node/42771
०५/०३३ पूजाताईंचा स्वभाव
०५/०३३ पूजाताईंचा स्वभाव पराकोटीचा शांत. त्यात त्यांच्यावर 'घर दोघांचं असतं, एकाने पसरलं तर दुसर्याने आवरायचं असतं' या सुविचारमंत्राचे एक कोण आणि दुसरा कोण या भूमिकांसकट पक्के संस्कार झालेले. याउलट त्यांचे यजमान. एवढ्यातेवढ्या कारणावरून चिडणे. आदळआपट. चिडले की ते घरातली छोटी छोटी स्टुले आपटून तोडत. तरीही पूजाताई त्यांना अगदी शांतपणे राहून.."नका हो स्टुलं तोडू...आपलंच नुकसान. माझ्याकडे बघा. मलाही कधीकधी राग येतो. पण मी आदळआपट करते का?" असे विचारीत. यजमानांचा राग ओसरला की स्टुलांची दुरुस्ती करताकरता 'तुला राग आला की तूही आदळआपट कर' असे सांगीत.पण पूजाताईंना ते अजिबात पटत नसे. त्या गाण्यातून उत्तर देत. कोणत्या?
<तुझ्या कोड्याचं उत्तर मला
<तुझ्या कोड्याचं उत्तर मला तरी येत नाहीये. >
मलाही. क्लुज प्लीज.
०५/०३४ या वरच्या कोड्यातल्या
०५/०३४ या वरच्या कोड्यातल्या पूजाताईंच्या यजमानांनी मायबोलीवरचा महिलादिन परिसंवाद वाचला आणि त्यापासून प्रेरणा घेतली. पूजाताईंच्या शिक्षणाचा, शांतपणाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांना एका शाळेत नोकरी मिळवण्यास प्रवृत्त केले. घरकामात ते बरोबरीचा वाटा उचलू लागले. घरातल्या अनेक कामांबरोबर सगळ्यांचे कपडे धुण्याचे काम त्यांनी आवडीने आणि आपले हक्काचे म्हणून निवडले. पण परंपरांच्या संस्कारांची पुटे चढलेल्या पूजाताईंच्या मनाला मात्र हे सोसत नसे.पण यजमानांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. तेव्हा घरात कोणी नसताना यजमानांनी घरकाम केलेले एक वेळ त्यांना चाले. पण पाहुण्यांसमोर मात्र तुम्ही काही करायचे नाही, अशी त्यांनी गळ घातली. तुम्ही कपडे धुतलेले चालतील, पण माझे कपडे मीच वाळत घालणार्.(उगाच शेजारीपाजारी बघतील) असेही कलम जोडले. धुतलेल्या कपड्यांतून स्वतःचे कपडे निवडून त्या वाळत घालीत. एकदा त्यांची ओढणी (नोकरी करायची म्हणून साडीवरून सुटसुटीत पंजाबी ड्रेस हाही यजमानांनी केलेल्या गृहक्रांतीचा एक भाग) त्यांच्या नजरेतून सुटली. यजमान इतर कपड्यांबरोबर आपली ओढणीही वाळत घालणार ही गोष्ट त्यांच्या नजरेस पडली. त्यांना थांबवण्यासाठी पूजाताईंनी कोणते गाणे म्हटले असेल?
आह, छोड दो आंचल जमाना क्या
आह, छोड दो आंचल जमाना क्या कहेगा?
०५/०३३ पूजाताईंचा स्वभाव
०५/०३३ पूजाताईंचा स्वभाव पराकोटीचा शांत. त्यात त्यांच्यावर 'घर दोघांचं असतं, एकाने पसरलं तर दुसर्याने आवरायचं असतं' या सुविचारमंत्राचे एक कोण आणि दुसरा कोण या भूमिकांसकट पक्के संस्कार झालेले. याउलट त्यांचे यजमान. एवढ्यातेवढ्या कारणावरून चिडणे. आदळआपट. चिडले की ते घरातली छोटी छोटी स्टुले आपटून तोडत. तरीही पूजाताई त्यांना अगदी शांतपणे राहून.."नका हो स्टुलं तोडू...आपलंच नुकसान. माझ्याकडे बघा. मलाही कधीकधी राग येतो. पण मी आदळआपट करते का?" असे विचारीत. यजमानांचा राग ओसरला की स्टुलांची दुरुस्ती करताकरता 'तुला राग आला की तूही आदळआपट कर' असे सांगीत.पण पूजाताईंना ते अजिबात पटत नसे. त्या गाण्यातून उत्तर देत. कोणत्या?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
>>>>> भरत मयेकर .... स्टुलं आपटणं
जो तुम तोडो पिया, मै नाही तोडू रे ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गाण्याचे क्लू. १. गाणं जुनं
गाण्याचे क्लू.
१. गाणं जुनं नाही.
२. एखाद्याला कॉलसेंटर आवडत नसेल आणि आपल्या मुलीला त्यातले तोटे दाखवून ते जॉइन करायला परावृत्त करायचं असेल तर एखाददुसरा शब्द वगळता हे गाणं फिट बसतं.
३. कॉलसेंटरांतली नाईट शिफ्ट, कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतलेल्याला तिथे नोकरी मिळणं वगैरे बाबींचा विचार करून बघा.
मामी आणि स्निग्धा, बरोबर.
मामी आणि स्निग्धा, बरोबर. पन्हं प्यायला या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा, हे गाणं ऐकलेलं नाही,
श्रद्धा, हे गाणं ऐकलेलं नाही, पण विषयावरून शोधलं.
हेलो हेलो हेलो हेलो जब फोन की घंटी बजती है तो कहते हैं हेलो
हेलो(वन नाइट अॅट कॉल सेंटर) या चित्रपटाचं टायटल साँग
इतकं सरळसरळ कोडं असणार नाही ना?
Pages