अर्धा किलो मटन खीमा
२ मोठे कांदे किसून
२ मिडियम टोमेटो किसून
२,३ तेजपाने
आलं लसूण पेस्ट , गरम मसाला,तिखट, लवंग + दालचिनी पूड, बडीशोपेची पावडर, धने जिरा पावडर, मीठ - चवीनुसार प्रमाण घेणे.
१- मटन खीमा, ओल्या फडक्यात गुंडाळून ४,५ वेळा पाण्यात बुडवून घट्ट पिळून स्वच्छ आणी कोरडा करून घ्या.
२) खीम्यात वरील सर्व मसाले ( कांदे,टोमॅटो वगळून) आपल्या चवीनुसार मिसळून लहान गोळे करून घ्या.एका पसरट स्टील च्या ताटलीत/ ताटात नीट लावून ठेवा.
३) एका जाड बुडाच्या प्रेशरकुकर मधे तेल गरम करा. गरम झाल्यावर आधी तेजपाने टाका, वरून किसलेला कांदा टाका.
४) गॅस अगदी बारीक करून कुकर वर खीमा कोफ्ते ठेवलेले ताट/ ताटली झाकण म्हणून ठेवा.
थोड्या वेळाने ताटली गरम होऊन कोफ्त्याना पाणी सुटेल. कोफ्त्यांचा रंग हळूहळू पालटू लागेल.
कोफ्तांना सर्व बाजूने सारखा रंग यावा म्हणून मधून मधून आलटत पालटत राहा. थोड्या वेळाने त्यांना सुटलेले सर्व पाणी आटून कोफ्ते ड्राय होतील.
५) ही प्रोसेस होत असताना मधून मधून कांदा सतत हलवत राहा. कान्दा छान ब्राऊन रंगावर झाला कि किसलेले टॉमेटो घाला. ते ही नीट परतल्यावर आलं लसूण पेस्ट आणी इतर सर्व मसाले चवीनुसार घाला. आता मसाला नीट परता.
६) हे सर्व होईस्तोवर आता कोफ्ते नीट ड्राय होतील हाताला टणक लागले पाहिजेत. कारण आता त्यांना मसाल्यात टाकून लाल रंग येस्तोवर परतायचे आहे. परतताना तुटायला नकोत म्हणून कंप्लीट ड्राय पाहिजेत कोफ्ते. हलक्या हाताने परतायची आवश्यकता नाही.
७) नीट परतल्यावर खीम्याचा वास जाईल आणी त्यांना छान रंग येईल. आता ग्रेवीकरता ,कोफ्ते बुडतील इतपत गरम पाणी टाका. कुकर ला झाकण लावून प्रेशर आलं कि एक १२ ते १५ मिनिटे शिजवा.
८) भांड्यात काढून वरून कोथिंबीर घाला.
पोळी/ भात कशाबरोबरही सर्व करा..
वर्षुताई, मस्त रेसिपी,
वर्षुताई, मस्त रेसिपी, तोंपासु
खिम्याचे गोळे व्यवस्थित होतात का? शीग कबाब करताना सारखे फुटत होते म्हणुन विचारतोय.
वाँव सहीच
वाँव
सहीच
आशुतोष, अगदी व्यवस्थित होतात.
आशुतोष, अगदी व्यवस्थित होतात. खीमा मात्र अगदी कोरडा ,घट्ट पिळून घे. आणी कोफ्त्यांमधे कांदा,कोथिंबीर नको घालूस.. कांदा,कोथिंबीरीने पाणी सुटतं म्हणून..
मी तर मटनाला जसा जोर लागतो,
मी तर मटनाला जसा जोर लागतो, तितकाच जोर वापरलाय परतताना.. अजिब्बात तुटत वगैरे नाहीत.
शिवाय ग्रेवीत शिजवल्याने मऊ ही होतात पण फुटत नाहीत.. काही स्पेशल टेक्निक नाही जस्त कोरडा, घट्ट पिळलेला खीमा.. पाण्यात बुचकळून धुतलेला नाही..
करी दिसत्येय एकदम चटकदार...
करी दिसत्येय एकदम चटकदार... पण खाऊ नाही शकत...
मटण खिम्याऐवजी चिकन खीमा वापरून तर चालणर असेल तर नवर्यासाठी करेन म्हणते
लाजो..तू वेज आहेस???????
लाजो..तू वेज आहेस??????? अअओउ..
चिकन कीमा भी चलेगा नं.. मग प्रेशर कुकर ची गरज नाही पडणार..
हो... मी एगीटेरिअन आहे बरं
हो... मी एगीटेरिअन आहे
बरं मग मी चिकन खिमा वापरुन करुन बघेन नक्की
ओ आय सी.. मी चिकन कीमा चे
ओ आय सी..
मी चिकन कीमा चे कोफ्ते खाल्लेत पण बनवले नाहीत कधी.. अब तूहीच बताना
सही$$$ मला सांग आदल्या दिवशी
सही$$$
मला सांग आदल्या दिवशी खीमा आणुन दुसर्या दिवशी केला तर चालतो का? आणि चालत असेल तर काही लावुन फ्रीजमधे ठेवायचा की तसेच
केला केला.. किम्याचा खीमा
केला केला.. किम्याचा खीमा केला
वर्षे.. सरळ फ्रीझर मधे ठेवून
वर्षे.. सरळ फ्रीझर मधे ठेवून दे.. दुसर्या दिवशी सकाळी डीफ्रॉस्ट कर.. काहे लावून ठेवायची गरज नाही.. मला तर इथे नेहमी फ्रोझनच घ्यावा लागतो..
मस्त. वर्षू ताई.. असले
मस्त. वर्षू ताई.. असले होमवर्क रोज मिळो.
खुप दिवसांपासून करायची होती
खुप दिवसांपासून करायची होती पण एक tried and tested recipe (या बाबतीत मायबोलीवर जास्त विश्वास आहे)हवी होती ती मिळाली.
कसल... मस्त दिसतेय.... वर्षू
कसल... मस्त दिसतेय.... वर्षू ताई ..
छान दिसतेय. कोल्हापूर भागात
छान दिसतेय. कोल्हापूर भागात असा प्रकार करतात. तिथे तो फार फेमस आहे.
आशुतोष,
मी असे वाचले होते, कि खिमा कबाबसाठी तयार करताना तो परत परत वाटायचा म्हणजे त्याचे कबाब अलवार होतात. अर्थात ते भाजायच्या कबाबासाठी होते. नाहीतर त्यात अंडे किंवा डाळे टाकायचे ( आणि वाटायचे ) म्हणजे फूटत नाहीत.
वॉव कसले मस्त दिसताहेत
वॉव कसले मस्त दिसताहेत गं...
त्या दुसर्या फोटोमधली चॉपस्टिक दिसतेय मला ...ती तुझी पुरी तळताना पण चॉपस्टीक वाली कमेंट आठवली एकदम
हे मी नक्की करून पाहणार. माझ्याकडे खिमाखाऊ पब्लिक आहे.
शेवटचा फोटो तर एकदम कातिल आहे..ताटलीवर कोफ्ते लावायची आयडिया लय भारी आहे
वॉव! सही दिसतायत!
वॉव! सही दिसतायत!
फॅट कण्टेण्ट चांगली असेल
फॅट कण्टेण्ट चांगली असेल खिम्यात तर तुटणार नाही. लीन मीट चॉप करून घेतले तर काहीतरी बाईंडिंग घ्यावेच लागेल असे वाटते
प्रकरण खत्तरनाक दिसते आहे. करण्याच्या आवाक्यातले दिसते. चान्स मिळाल्यास करून पाहीले जाईल.
सही पाककृती आणि अफाट मस्तं
सही पाककृती आणि अफाट मस्तं फोटो आहेत.
खिम्याच्या गोळ्यांचा पुलावा माहिती आहे. करी नव्हती माहिती.
वॉव! ही ताटली कुकरवर ठेऊन
वॉव! ही ताटली कुकरवर ठेऊन एकाच वेळी दोन दोन कामं साधण्याची पद्धत लै भारीये. तयार डीश एकदम कातिल दिसतेय.
तयार करी भारी दिसतेय.
तयार करी भारी दिसतेय.
मामी.. ये तो हमारा २० साल से
मामी.. ये तो हमारा २० साल से भी पुराना राज है !!
आणी एक तास भर प्रोसेस मंद गॅस वर चालू असल्यामुळे आजूबाजूची कामं जसे कपडे इस्त्री करणे , शॉवर इ. कामंही व्यवस्थित होतात तेव्हढ्या वेळात..
पद्धतीवरून वाटलेच की 'तिकडची'
पद्धतीवरून वाटलेच की 'तिकडची' असणार...
पाकि मूळचा अस्तित्वात कुठे होता हो?.. सिंध होता. तेव्हा मूळातला सिंध जो आता पाकीत गेलाय असे पाहिजे ना? .
रेसीपी क्लास.
माझ्या आजीची पन सेम अशीच
माझ्या आजीची पन सेम अशीच रेसिपि आहे..पण ती फक्त खिम्यामधे दालचिनिची पुड टाकते...आनि वाटण खोबर्याच करते..त्याच पातळ कालवण... खुपच मस्त लागते ही डिश...
माझी आजी तिच्या एका पारशी/सिंधी मैत्रीणी कडे शिकली होती... मटन दालचा पण भारी करतात हे लोक..
हाँ रे झंपी.. बरोबरे तुझं..
हाँ रे झंपी.. बरोबरे तुझं.. वर्ड्स इधर उधर..
है झक्कास. तोंपासु. पण करणार
है झक्कास. तोंपासु.
पण करणार नाही. आईलाच करायला सांगणार.
वॉव वर्षूताई मस्तच रेसिपी
वॉव वर्षूताई मस्तच रेसिपी आहे.
मटन खीमा, ओल्या फडक्यात
मटन खीमा, ओल्या फडक्यात गुंडाळून ४,५ वेळा पाण्यात बुडवून घट्ट पिळून स्वच्छ आणी कोरडा करून घ्या.
>>>म्हनजे आपण मटन पाण्याने साफ करतो तसे करयचे नाहि ??? ओल्या फडक्यात गुंडाळून पाण्यात बूडवा यचे का?
-
-
-
शोपेची पावडर म्हणजे
शोपेची पावडर म्हणजे काय?
मसाल्यांच प्रमाण किती घ्यायचे ते कळेल का आर्ध्या किलो साठी
रावणा.. बाप्रे नांव लिहायलाही
रावणा.. बाप्रे नांव लिहायलाही भीती वाटली..
अर्ध्या किलो ला आपल्याला आवडणार्या चवीनुसार मसाले घ्या. शोपेची पूड १/४ टीस्पून पुरेशी होते. शोपेचा वास फार पुढे आलेला चांगला वाटत नाही.
मला स्वतःला गरम मसाला अगदी कमी प्रमाणात आवडतो.. ज्या प्रमाणात सहन होईल तितकंच घ्यायचं.. तुम्हाला आवडत असल्यास हाफ टीस्पून प्रत्येकी घेऊ शकता.
दोन खायचे चमचे, प्रत्येकी आलंलसूण पेस्ट, धनेजिरे पावडरीचे घेऊ शकता.
Pages