अर्धा किलो मटन खीमा
२ मोठे कांदे किसून
२ मिडियम टोमेटो किसून
२,३ तेजपाने
आलं लसूण पेस्ट , गरम मसाला,तिखट, लवंग + दालचिनी पूड, बडीशोपेची पावडर, धने जिरा पावडर, मीठ - चवीनुसार प्रमाण घेणे.
१- मटन खीमा, ओल्या फडक्यात गुंडाळून ४,५ वेळा पाण्यात बुडवून घट्ट पिळून स्वच्छ आणी कोरडा करून घ्या.
२) खीम्यात वरील सर्व मसाले ( कांदे,टोमॅटो वगळून) आपल्या चवीनुसार मिसळून लहान गोळे करून घ्या.एका पसरट स्टील च्या ताटलीत/ ताटात नीट लावून ठेवा.
३) एका जाड बुडाच्या प्रेशरकुकर मधे तेल गरम करा. गरम झाल्यावर आधी तेजपाने टाका, वरून किसलेला कांदा टाका.
४) गॅस अगदी बारीक करून कुकर वर खीमा कोफ्ते ठेवलेले ताट/ ताटली झाकण म्हणून ठेवा.
थोड्या वेळाने ताटली गरम होऊन कोफ्त्याना पाणी सुटेल. कोफ्त्यांचा रंग हळूहळू पालटू लागेल.
कोफ्तांना सर्व बाजूने सारखा रंग यावा म्हणून मधून मधून आलटत पालटत राहा. थोड्या वेळाने त्यांना सुटलेले सर्व पाणी आटून कोफ्ते ड्राय होतील.
५) ही प्रोसेस होत असताना मधून मधून कांदा सतत हलवत राहा. कान्दा छान ब्राऊन रंगावर झाला कि किसलेले टॉमेटो घाला. ते ही नीट परतल्यावर आलं लसूण पेस्ट आणी इतर सर्व मसाले चवीनुसार घाला. आता मसाला नीट परता.
६) हे सर्व होईस्तोवर आता कोफ्ते नीट ड्राय होतील हाताला टणक लागले पाहिजेत. कारण आता त्यांना मसाल्यात टाकून लाल रंग येस्तोवर परतायचे आहे. परतताना तुटायला नकोत म्हणून कंप्लीट ड्राय पाहिजेत कोफ्ते. हलक्या हाताने परतायची आवश्यकता नाही.
७) नीट परतल्यावर खीम्याचा वास जाईल आणी त्यांना छान रंग येईल. आता ग्रेवीकरता ,कोफ्ते बुडतील इतपत गरम पाणी टाका. कुकर ला झाकण लावून प्रेशर आलं कि एक १२ ते १५ मिनिटे शिजवा.
८) भांड्यात काढून वरून कोथिंबीर घाला.
पोळी/ भात कशाबरोबरही सर्व करा..
शोपेची ब्लेंडर मधे बारीक पूड
शोपेची ब्लेंडर मधे बारीक पूड करून फ्रीझर मधे हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. त्यातील लागेल तितकी काढून रेसिपीज मधे वापरा. फ्रिज मधे ठेवल्याने वास दीर्घ काळपर्यंत टिकून राहतो..
सृष्टी.. खीमा पाण्यात बुडवून
सृष्टी.. खीमा पाण्यात बुडवून धुतला तर त्याची चव ही जाते आणी पाणीपाणी होतो..
म्हणून एक पातळ फडकं ( घरी पनीर/ चक्का बनवत असशील तर ते पंच्यासारख पातळ कापड घे) पाण्यात भिजवून घट्ट पिळून घे. मग आत खीमा ठेवून घट्ट पुरचुंडी करून , पिळून घे . मग नळाखाली धरून घट्ट पिळत राहा..
थोड्या वेळाने खीमा स्वच्छ होईल आणी कोरडा ही..
शोपेची पावडर म्हणजे काय?
शोपेची पावडर म्हणजे काय?
अय्यो.. सांगितलं ना वरती
अय्यो.. सांगितलं ना वरती
बहुधा बडीशोपेची असावी. (नुसतं
बहुधा बडीशोपेची असावी.
(नुसतं शोपा म्हटलं की सहसा बाळंतशोपा - डिल सीड्स वाटतात, पण या बाकीच्या मसाल्यांबरोबर ती शक्यता वाटत नाही. तरीही वर्षू_नील सांगतीलच.)
ऊप्स... स्वाती.. बडीशोप च ..
ऊप्स... स्वाती.. बडीशोप च .. ठांकु गा
अरे काय हे.. एकदम तोंपासु !
अरे काय हे.. एकदम तोंपासु !
आत्ताच केली ही करी. चिकन
आत्ताच केली ही करी. चिकन वापरलं. चांगली झाली बहुतेक [१]. करायला पण सोप्पी आहे. धन्यवाद.
[१] बहुतेक यासाठी की, मी आणि बायको, कोणीच चिकन खाण्यात अनुभवी नाही
Pages